जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.
मा.अध्यक्ष - श्री.डी.डी.मडके.
मा.सदस्य – श्रीमती.एस.एस.जैन.
---------------------------------------- ग्राहक तक्रार क्रमांक – 145/2011
तक्रार दाखल दिनांक – 01/08/2011
तक्रार निकाली दिनांक – 29/11/2012
विलास काशिनाथ जोशी. ----- तक्रारदार
उ.व.50,धंदा-व्यवसाय,
रा.प्रकाश वेल्डींग वर्क्स,
कलामंदिर समोर,80 फुटीरोड,
धुळे.ता.जि.धुळे.
विरुध्द
(1)डिव्हीजनल मॅनेजर, ----- विरुध्दपक्ष
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन,
जीवन प्रकाश,रा.ग.गडकरी चौक,
जुना आग्रारोड,नाशिक-422002.
(2)मॅनेजर,
लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन,
सिव्हील कॉस्पीटल समोर,साक्रीरोड,धुळे.
न्यायासन
(मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
(मा.सदस्या – श्रीमती.एस.एस.जैन)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.एम.जी.देवळे.)
(विरुध्दपक्ष तर्फे – वकील श्री.विशाल एस.भट.)
निकालपत्र
(द्वाराः मा.अध्यक्ष – श्री.डी.डी.मडके)
--------------------------------------------------------------------------
(1) सदर प्रकरणी विरुध्दपक्ष यांनी नि.नं.12 वर अर्ज देऊन प्रकरण आज रोजी बोर्डवर घेण्याची विनंती केली, तसेच नि.नं.13 वर तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी संयुक्तरित्या स्वाक्षरी केलेली पुरसीस दाखल करुन,उभयपक्षांमध्ये मंचाबाहेर आपसात समझोता झाल्याचे कथन केले आहे. त्यामुळे त्यांना सदर प्रकरण मंचापुढे चालविणे नसल्याने प्रकरण निकाली काढण्यात यावे अशी विनंती केली आहे.
(2) तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी दाखल केलेली पुरसीस पाहता त्यांच्यात आपसात समझोता झाल्याने, तक्रारीस कारण राहिले नसल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे पुरसीस मंजूर करण्यात आली असून, प्रकरण निकाली काढणे योग्य होईल असे या न्यायमंचाचे मत आहे. सबब न्यायाचे दृष्टीने खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येत आहे.
आदेश
(अ) तक्रारदारांची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांकः 29-11-2012.
(श्रीमती.एस.एस.जैन.) (डी.डी.मडके)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,धुळे.