Maharashtra

DCF, South Mumbai

MA/1/2020

DR HELASKAR SADASHIV YASHWANT - Complainant(s)

Versus

LIC HOUSING FINANCE LTD - Opp.Party(s)

17 Nov 2021

ORDER

SOUTH MUMBAI DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, SOUTH MUMBAI
Puravatha Bhavan, 1st Floor, General Nagesh Marg, Near Mahatma Gandhi Hospital
Parel, Mumbai-400 012
 
Miscellaneous Application No. MA/1/2020
( Date of Filing : 07 Jan 2020 )
In
Complaint Case No. CC/19/216
 
1. DR HELASKAR SADASHIV YASHWANT
A 4 SHANTI NIKETAN SHANTI AHRAM BORIVALI WEST MUMBAI 400103
MUMBAI
MHA
...........Appellant(s)
Versus
1. LIC HOUSING FINANCE LTD
131 MAKER TOWER F PREMISES 13TH FLOOR CUFF PARADE MUMBAI 400005
MUMBAI
MHA
2. NATIONAL HOUSING BANK DY GENERAL MANAGER DEPT OF REGULATION & SUPERVISION
CORE 5 A 4TH FLOOR INDIA HABITAT CENTER LODHI ROAD NEW DELHI 110003
NEW DELHI 110003
DELHI
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MR. D.S. PARADKAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 17 Nov 2021
Final Order / Judgement

द्वारा- श्रीमती. स्‍नेहा म्‍हात्रे, अध्‍यक्षा

     तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणात विलंब माफीचा अर्ज दाखल केला असून त्यावर सामनेवाला यांनी त्यांचे म्हणणे दाखल केले आहे. तक्रारदार यांनी त्यावर प्रति जबाब (Rejoinder) दिला आहे तक्रारदार व सामनेवाला यांच्या वकिलांचा माफीच्या अर्जावर युक्तिवाद ऐकला तक्रारदार सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक आहेत

     तक्रारदारांनी सामनेवाला 1 हे गृहकर्जाचा व्यवसाय करतात व सामनेवाला 2 हे रिझर्व बँकेचा भाग असून गृहकर्जाबाबतच्या कामकाजाची प्रकरणे इत्यादींवर त्यांचे मार्गदर्शन असते

     तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून Home Loan Account Scheme (HLA) सन 1990 मध्ये गृहकर्ज घेतले होते व सदर योजनेनुसार त्यांना गृह कर्जाच्या व्याजावर सूट मिळणार असे सांगण्यात आल्याने त्यांनी सदर योजनेमध्ये भाग घेतला. सामनेवाला यांनी पहिल्या पाच वर्षांकरिता तक्रारदारांना गृहकर्जाच्या व्याजात सूट दिली परंतु त्यानंतर व्याजात सूट देण्यास नकार दिला तक्रारदारांनी सदर HLA Scheme मध्ये गुंतवलेली रक्कम देण्यास सामनेवाला 1 यांनी अतिशय विलंब केला म्हणून तक्रारदार यांनी सामनेवाला 2 यांना संपर्क केला, परंतु त्यांच्याकडून सुरुवातीला तक्रारदारांना कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. तक्रारदारांनी सामनेवाला 2 यांचेकडे अनेक वेळा सामनेवाला 1 यांचेकडून तक्रारदारांना सदर योजनेनुसार गृहकर्जाच्या व्याजात सूट मिळत नसल्याने तसेच सदर योजनेअंतर्गत गुंतवलेली रक्कम मिळाली नसल्याने तसेच त्यामुळे तक्रारदाराचे आर्थिक नुकसान होत असल्याने तक्रारी दाखल केल्या परंतु त्याला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने तक्रारदारांनी माहितीचा अधिकारांमध्ये माहिती मिळण्याबाबत व सामनेवाला 1 बद्दल तक्रार केली परंतु त्याला सुरुवातीला काही प्रतिसाद सामनेवाला 2 यांनी दिला नाही म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला 2 यांचे वरिष्ठांकडे RTI अंतर्गत तक्रार देऊन दाद मागितली तक्रारदारांनी C.I.F. मुंबई यांच्याकडे दाद मागितली परंतु तक्रारदारांना त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आले नाही त्यानंतर तक्रारदार ग्राहक पंचायत येथे 2018 मध्ये गेले त्यांनी दिनांक 15/10/2018 रोजी सामनेवाला 1 यांना पत्र पाठवून तक्रारदारांना सामनेवाला 1 यांनी दिलेल्या त्रुटी पुर्ण सेवेबाबत उल्लेख करून सदर गृहकर्जाच्या योजनेनुसार NHB यांनी दिलेल्या कार्यालयीन पत्रानुसार तसेच सामनेवाला 1 यांचे Brochure नुसार तक्रारदारांना सदर योजनेनुसार गृह कर्जात सुट का दिली नाही? अशी विचारणा करून तक्रार दाराकडून सामनेवाला यांनी घेतलेली अतिरिक्त व्याजाची रक्कम सामनेवाला 1 यांनी तक्रारदारांना परत करावी असे कळविले तक्रारदारांनी NHB Delhi येथे माहितीच्या अधिकारात सामनेवाला 1 बाबत तक्रार केली दिनांक 20/02/2019 रोजी सामनेवाले 1 यांचे मॅनेजर श्री मनीष शर्मा (Manager, LIC Housing Finance Ltd.) तक्रारदारांना सर्व कागदपत्रे घेऊन येण्यास व प्रस्तुत तक्रारीत नमूद तक्रारदार यांची समस्या सोडविण्याबाबत तयारी दर्शविली. त्यानंतर तक्रारदारांना दिनांक 13/03/2019 रोजी सामनेवाला यांचे कडून पत्र प्राप्त झाले त्यामध्ये 'They have closed the matter and nothing was payable' असे नमूद केलेले पत्र पाठविण्यात आले. तक्रारदारांनी त्यानंतर National Consuner Help line कडे संपर्क करून गृहकर्जा बाबत शासन सेवेतील त्रुटी बाबत दिनांक 26/04/2019 रोजी प्रस्तुत तक्रार नोंदविल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर Housing Loan Account Scheme मध्ये तक्रारदारांनी वेळोवेळी गुंतवलेल्‍या रकमेनुसार तक्रारदारांना गृह कर्जात सूट दिली नसल्याने तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाल्याचे नमूद करून तक्रारदारांनी प्रस्तुत तक्रार सामनेवाला विरुद्ध दाखल केली आहे तसेच तक्रारीतील घटनाक्रम पाहिला असता तक्रारीचे कारण कायम असल्याचे दिसून येते व सामनेवाला 1 यांच्या दिनांक 13/03/2019 रोजीच्या ई-मेल/पत्रापासून तक्रारीचे कारण घडले असे विचारात घेतल्यास प्रस्तुत तक्रार दिनांक 27/11/2019 रोजी दाखल केली असल्याने ती विहित मुदतीत दाखल केल्याचे दिसून येते. तसेच तक्रारीत काही विलंब असल्यास तो माफ करण्यात यावा अशी तक्रारदारांनी विनंती केली असल्याने सामनेवाले यांचे म्हणण्याप्रमाणे तांत्रिक दृष्ट्या प्रस्तुत तक्रार मुदतबाह्य असल्याचा आक्षेप असल्याने तक्रार दाखल करणे कामी झालेला विलंब माफ करण्यात येतो. पुढील तारीख तक्रार दाखल युक्तिवादासाठी 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. D.S. PARADKAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.