Maharashtra

Beed

CC/11/150

Ashvini Ganpat Ambade - Complainant(s)

Versus

LIC Aurangabad - Opp.Party(s)

02 Sep 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/11/150
 
1. Ashvini Ganpat Ambade
Barshi road Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. LIC Aurangabad
Adalat road Aurangabad
Aurangabad
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                            निकाल
                      दिनांक- 02.09.2013
                  (द्वारा- श्री विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )
            तक्रारदार श्रीमती अश्विनी गणपत अंबाडे हिने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार क्र.1 हया मयत गणपत मच्छिद अंबाड यांची पत्‍नी असून तक्रारदार क्र.2 हा तक्रारदार क्र.1 व मयत गणपत यांचा मुलगा आहे.
            मयत गणपत हे यशवंतराव चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई येथे मराठी विषयाचे वरिष्‍ठ प्राध्‍यापक म्‍हणून नौकरी करीत होते.  मयत गणपत यांनी मराठी विषयामध्‍ये प्रावीण्‍य मिळाले होते. ते मराठी विषयाचे विभाग प्रमूख म्‍हणूम काम पाहत होते. संशोधनासाठी त्‍यांना यूजीसी ची फेलोशिपही मिळाली होती. मयत गणपत हे सेवेत कार्यरत असताना दि.23.3.2010 रोजी नजरचुकीने जास्‍तीचा औषध डोस घेतल्‍यामुळे मयत झाले.
            मयत गणपत यांनी दि.15.10.2007 रोजी घेतलेली विमा पॉलिसी नंबर 984506624 ही बंद करुन त्‍याऐवजी दि.2.7.2008 रोजी रक्‍कम रु.1,00,000/- प्रत्‍येकी एकूण चार पॉलिसी घेतल्‍या. त्‍यांचा पॉलिसी नंबर 984555209, 984555210, 984555211, 984555212 असे होते. तसेच मयत गणपत यांनी घेतलेली पॉलिसी नंबर 983696201 ही बंद पडली आहे.
            मयत गणपत यांनी पॉलिसी घेताना संपूर्ण माहीती सामनेवाला यांना दिली होती. त्‍या माहीतीची खातरजमा सामनेवाला यांनी केली होती. खातरजमा केल्‍यानंतर वर नमूद केलेल्‍या पॉलिसी मयत गणपत यांना देण्‍यात आल्‍या होत्‍या. महाविद्यालयामार्फत मयताच्‍या पगारातून सामनेवाले यांचा हप्‍ता कपात सुरु झाली व ते मयत गणपत जिवंत असपर्यत चालू होती.  दि.12.09.2009 रोजी मयत गणपत यांस डिप्रेशनचा आजार सूरु झाला. त्‍यांनी डॉ.इंगोले यांचेकडून औषधोपचार केला. दि.20.3.2010 रोजी मयताने नजरचूकीने औषधाचा जास्‍तीचा डोस घेतला. त्‍यानंतर मयत गणपत यांस स्‍वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्‍यात आले ते उपचार घेत असताना दि.23.3.2010 रोजी मयत झाले.
            श्री.गणपत मयत झाल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचेकडे विमा पॉलिसीच्‍या रक्‍कमेची मागणी केली व विमा पॉलिसी सामनेवाले यांचेकडे पाठविली. सामनेवाले क्र.2 यांनी पॉलिसी नंबर984555209 ही सामनेवाले क्र.1 यांचेकडे विचारार्थ पाठवून दिली. पॉलिसी नंबर 984555210,984555211, 984555212 या लॅप्‍स असल्‍यामुळे क्‍लेम देता येणार नाही असे दि.12.09.2009 रोजी कळविले. वास्‍तविक पाहता सदर पॉलिसीचे हप्‍ते हे डिसेंबर 2008 ते जानेवारी 2009 मयत गणपत यांचे पगारातून कपात करण्‍यात आले होते. तसेच ऑगस्‍ट 2009 ते मार्च 2010 या कालावधीचे हप्‍ते कपात केल्‍या बाबत प्राचार्य यशवंत चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई यांनी दि.04.10.2010 रोजी सामनेवाले क्र.2 यांना कळविले होते असे असतानाही सामनेवाला यांनी पॉलिसीत नमूद केलेली रक्‍कम दिली नाही. तक्रारदार यांनी दि.10.09.2011 रोजी झोनल मॅनेलर यांनी कळविले असता त्‍यावर कोणताही निर्णय घेण्‍यात आला नाही.
            तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की,  मयत गणपत यांचे प्रेत ताब्‍यात घेत असताना त्‍यांचे वडिलांचा जवाब पोलिसांनी बरोबर घेत‍लेला नाही. मयत हे पूर्वी कधीही आजारी नव्‍हते तसेच सामनेवाले यांनी पॉलिसी देतानाही सर्व बाबीची खातरजमा केली होती. सबब तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून पॉलिसीमध्‍ये नमूद केलेली रक्‍कम व त्‍याअनुषंगाने फायदा देण्‍यात यावा ही मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे. सामनेवाले यांचे कथन की, पॉलिसी नंबर 984508624 ही बंद केल्‍या बाबत मयत गणपत यांना इन्‍शुरन्‍स कंपनी सोबत कोणताही पत्रव्‍यवहार केले नाही. अगर सदर पॉलिसी सरेंडरही केली नाही. सामनेवाला यांनी मयत गणपत यांचे कडे येणे असलेल्‍या महिन्‍याचा हप्‍ता कॉलेजने कपात करुन भरली आहे. त्‍यामध्‍ये काही वेळेला बाधा आलेली आहे. वर नमूद केलेली पॉलिसी बंद करुन मयत गणपत यांनी चार नवीन पॉलिसी काढल्‍या ही बाब नाकारलेली आहे.मयत गणपत यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या चार पॉलिसी काढल्‍या होत्‍या तसेच पॉलिसी नंबर983696201 ही पॉलिसी बंद पडली आहे. कारण विमा पॉलिसीचे हप्‍ते भरले नव्‍हते ते त्‍यामुळे सदर पॉलिसी अंतर्गत तक्रारदार यांना कोणतीही रककम देय नाही.
            मयत गणपत यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या चार पॉलिसी घेतलेल्‍या होत्‍या व त्‍या पॉलिसी हया सॅलरी सेव्‍हींग्‍ज स्‍कीम योजना अंतर्गत घेतलेल्‍या होत्‍या. त्‍यांचे हप्‍ते प्रत्‍येक महिन्‍याला मयत गणपत यांचे पगारातून वजा करुन सामनेवाले यांचेकडे भरावयाचा होता. मयत गणपत नौकरीत असलेल्‍या कॉलेजने विम्‍याचा हप्‍ता दरमहा पगारातून कपात करुन सामनेवाले यांचेकडे भरावयाचा होता. सामनेवाला यांनी पूढे असे कथन केले आहे की, पॉलिसी नंबर 984555209 अंतर्गत क्‍लेम मान्‍य केलेला आहे. सामनेवाले हे त्‍या पॉलिसीचे रककम देण्‍यास तयार आहेत. सामनेवाले यांना पॉलिसी 984555210, 984555211, 984555212 हया पॉलिसीचा दरमहा म्‍हणजे 10/08, 11/08, 02/09, 03/09, 04/09, 05/09, 06/09, चे हप्‍ते न मिळाल्‍यामूळे सामनेवाले हे तक्रारदार यांना कोणतीही रक्‍कम देणे लागत नाही. तिन्‍ही पॉलिसी हया लॅप्‍स स्थितीमध्‍ये होत्‍या. म्‍हणून तक्रारदार यांचा क्‍लेम नाकारण्‍यात आला. तसेच प्राचार्य यशवंत चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई  यांनी दि.04.10.2010 रोजी दिलेले पत्र हे चूकीचे होते.  आणि ते पत्र तक्रारदार यांना फायदा मिळावा म्‍हणून दिलेले आहे. सबब, सामनेवाले यांचे कथन की, सामनेवाला यांनी सेवेत कोणताही कसूर केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केलेली रक्‍कम देणे लागत नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार खर्चासह नामंजूर करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारीसोबत प्रपोजल फॉर्म, मयत गणपत यांनी घेतलेल्‍या पॉलिसीची झेरॉक्‍स कापी, घटनास्‍थळाचा पंचनामा, मरणोत्‍तर पंचनामा, शवविच्‍छेदन अहवाल, दवाखान्‍यात उपचार घेतल्‍या बाबत प्रमाणपत्र, तसेच सामनेवाले यांचेकडे केलेला पत्र व्‍यवहार , प्राचार्य यशवंतराव चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई यांचे पत्र दाखल केले आहे. सामनेवाले यांनी श्री. हेंमत माली यांचे शपथपत्र दाखल केले. सामनेवाले यांनी नि.14 सोबत कागदपत्र दाखल केले.
            तक्रारदार यांची वकील श्री. धांडे यांचा यूक्‍तीवाद ऐकला, तसेच सामनेवाले यांचे वकील श्री.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला. दाखल केलेले पुराव्‍योच शपथपत्र व कागदपत्राचे बारकाईने अवलोकन केले. न्‍याय निर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
            मुददे                                      उत्‍तर
1.     तक्रारदार हया तक्रारीमध्‍ये नमूद केलेल्‍या विमा
      पॉलिसीच्‍या रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत काय ?         होय.
2.    काय आदेश ?                               अंतिम आदेशाप्रमाणे.
                                                                                कारणे
मुददा क्र.1 व 2ः-
            तक्रारदार व सामनेवाले यांचे शपथपत्र व कागदपत्र यांचे अवलोकन केले असता खालील नमूद केलेल्‍या बाबी विषयी वाद नाही. मयत गणपत हे प्राचार्य यशवंत चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई येथे मराठी विषयाचे वरिष्‍ठ प्राध्‍यापक म्‍हणून काम करीत होते. ते दि.23.03.2010 रोजी सेवेत कार्यरत असताना मयत झाले. मयत गणपत यांनी त्‍यांचे हयातीत दि.2.07.2008 रोजी प्रत्‍येकी रक्‍कम रु.1,00,000/- च्‍या पॉलिसी नंबर 984555209, 984555210, 984555211, 984555212 घेतलेल्‍या होत्‍या. सदरील विमा पॉलिसीचे हप्‍ते दरमहा मयत गणपत यांचे महाविद्यालयातील पगारातून कपात करुन सामनेवाले यांचेकडे भरले जात असत. सामनेवाले यांनी त्‍यांचे शपथपत्र व लेखी निवेदनात पॉलिसी नंबर 984555209 चा क्‍लेम मान्‍य केलेला आहे ते सामनेवाले तक्रारदार यांना देण्‍यास तयार आहेत असे नमूद केले आहे.
            सामनेवाले यांनी पॉलिसी नंबर 984555210, 984555211, 984555212 चे क्‍लेम नाकारलेले आहेत. सामनेवाले यांचे म्‍हणणे की,10/08,11/08,02/09,03/09,04/09,05/09,06/09 या महिन्‍याचे देय असलेल्‍या हप्‍ते भरलेले नाहीत. त्‍यामुळे सदरील तिन्‍ही पॉ‍लिसी लॅप्‍स झाल्‍या आहेत. तक्रारदार हे सदर पॉलिसी अंतर्गत रक्‍कम मिळण्‍यास पात्र नाहीत. सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी मंचाचे लक्ष त्‍यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावर वेधले व असा यूक्‍तीवाद केला की,कॉलेजने सदरील रक्‍कम मयताचे पगारातून कपात केली नाही व सामनेवाल यांचेकडे हप्‍त्‍याचे स्‍वरुपात भरले नाही. त्‍यामुळे विम्‍याचे रक्‍कमेचे हप्‍ते हे सलग भरले नाही. ते भरण्‍यास सात महिन्‍याचा खंड झालेला आहे. म्‍हणून सदरील पॉलिसी अंतर्गत रक्‍कम देता येत नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी हप्‍ते भरल्‍या बाबत जो उतारा दाखल केला त्‍यावर मंचाचे लक्ष वेधले. तसेच आपल्‍या यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेला न्‍यायनिवाडा, एलआयसी ऑफ इंडिया विरुध्‍द जया चंदेल 2008 एसीजे 1040 यांचा हवाला दिला. सदरील तक्रारीमध्‍ये चेक हा पॉलिसीचा सदस्‍य मृत्‍यू झाल्‍यानंतर मिळाला होता. सदरील चेक हा पॉलिसी होल्‍डरच्‍या मृत्‍यूपूर्वी भरणा केला नव्‍हता. पॉलिसी पूर्नजिवीत ही ज्‍याने विमा पॉलिसी काढली आहे तो जिवंत असेपर्यतच करता येते असा निर्णय दिला आहे.वर नमूद केलेल्‍या तक्रारीचा आधार घेऊन श्री.कूलकर्णी यांनी असा यूक्‍तीवाद केला की, सामनेवाला यांना विम्‍याचा हप्‍ता प्रिमियम मिळाल्‍याशिवाय त्‍यांचेवर पॉलिसीमध्‍ये नमूद केलेल्‍या रक्‍कमेचे फायदे देण्‍याचे बंधन नाही.  तक्रारदार यांनी नमूद केलेल्‍या पॉलिसीमध्‍ये हप्‍ते न भरल्‍यामुळे सदरील पॉलिसी लॅप्‍स झालेल्‍या आहेत. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांचे  वकील श्री. धांडे यांनी असा यूक्‍तीवाद केला की, सदरील पॉलिसी लॅप्‍स झालेल्‍या नव्‍हत्‍या. मयत गणपत ज्‍या कॉलेज मध्‍ये नौकरीस होता त्‍या कॉलेजने त्‍यांचे पगारातून विम्‍याची रक्‍कम वजा केलेली आहे. ती सामनेवाले यांचेकडे भरली आहे. सदरील पॉलिसी या नौकरदार यांचे पगारातून कपात करुन सामनेवाले यांचेकडे पाठविण्‍याची जबाबदारी ही मयत ज्‍या संस्‍थेत नौकरीस होता त्‍यांची होती. त्‍या संस्‍थेने सदरील रक्‍कम कपात केली परंतु मयत यांची जी पॉलिसी लॅप्‍स झाली होती त्‍या पॉलिसीमध्‍ये ती रक्‍कम भरण्‍यात आली व त्‍या संबंधी कॉलेजच्‍या प्राचार्य यांनी सामनेवाला यांना पत्र लिहून सदरील पॉलिसीतील रक्‍कम चूकीच्‍या पॉलिसीमध्‍ये भरण्‍याल आल्‍या आहेत ते तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसीमध्‍ये भरावेत असे कळविले आहेत. असे असतानाही सदर पॉलिसी लॅप्‍स झाल्‍या आहेत असे म्‍हणता येणार नाही. तक्रारदार यांची मागणी रास्‍त व कायदेशीर आहे. मयत गणपत यांनी पॉलिसी काढण्‍यापूर्वी कोणताही गंभर आजार नव्‍हता व सामनेवाला यांनी त्‍याबाबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. तक्रारदार यांचे वकिलांनी त्‍यांचे यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेल्‍या न्‍याय निवाडा निदर्शनास आणला.
                             III (1999) CPJ 15 (SC)  SUPREME COURT OF INDIA
                                    Delhi Electric Supply Undertaing Vs. Basanti Devi & anr.
In this case, the Hon ble Apex Court has held that, DESU, Agent of LIC to collect premium on its behalf. Certaintly agent as defined in section 182, of Cotract Act. Under agreement between LIC and DESU premium was payable to DESU to be deducted from salary of employees under “Salary Savings Scheme” DESU had implied authority to collect premium from employees on behalf of LIC. Valid payment of premium by deceased employee. For him DESU was agent of LIC to collect premium on its behjalf. Formation of contract of insurance is between LIC and employee of DESU. Deceased never made aware of fact that DESU was not acting as agent of LIC. DESU not liable as agent of its principal i.e. LIC rendering service free of cost to employees. It was fault of agent of LIC i.e. DESU in not remitting premium in time. LIC wrongly discharged of its liability under insurance policy taken out by deceased. Proceedings arisen under Act which was enacted to provide protection to interests of consumers. Widow of deceased should not be deprived of her right.
 
                         वर केलेला यूक्‍तीवाद लक्षात घेता व सर्व कागदपत्राचे अवलोकन करता असे निदर्शनास येते की, मयत गणपत यांचे पगारातून कॉलेजने तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसीच्‍या अंतर्गत हप्‍ते कपात केलेले आहेत व ते हप्‍ते कपात केल्‍यानंतर त्‍या त्‍या पॉलिसीमध्‍ये पाठविण्‍याची जबाबदारी कॉलेजची होती. सदरील कॉलेज यांनी सदरील रक्‍कम कपात केलेली आहे परंतु त्‍या रक्‍कम तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसीमध्‍ये न भरता मयत यांचे नांवे जी पॉलिसी लॅप्‍स झालेली होती. त्‍यामध्‍ये भरलेल्‍या आहेत. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्रे यांचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या विमा पॉलिसीच्‍या रक्‍कम जूलै 2009 पासून पूढे सलग स्विकारल्‍या आहेत व त्‍या मयत यांचे पॉलिसीमध्‍ये जमा झाल्‍याचे दाखवले आहे. जर सदरील पॉलिसी हया 2007,2008 या सालातीलच जर लॅप्‍स झाल्‍या असत्‍या तर तदनंतर सदरील पॉलिसीच्‍या हप्‍त्‍याची रक्‍कम स्विकारण्‍याचे कोणतेही प्रयोजन नव्‍हते. लॅप्‍स झालेल्‍या पॉलिसीची रककम अशा प्रकारे स्विकारणे हे दर्शविते की सदरील पॉलिसी हया सामनेवाला यांना मान्‍य व कबूल आहेत. अर्थात काही महिन्‍याचे हप्‍ते भरावयाचे खंड पडले आहे ही बाब निदर्शनास येते. परंतु प्राचार्य यशवंत चव्‍हाण आर्टस, कॉमर्स व विज्ञान महाविद्यालय अंबाजोगाई यांनी सामनेवाला यांना दिलेले पत्र यांचे विचार केला असता कॉलेजने मयत गणपत यांचे पगारातून तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसीच्‍या हप्‍त्‍यापोटी दरमहा भरण्‍यात आलेले आहे. ती चूक दूरुस्‍त करण्‍याकामी सामनेवाले यांचेकडे पत्र दिलेले आहे. यांचा विचार करता तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसी लॅप्‍स झाल्‍या आहेत असे म्‍हणता येणार नाही. जर पॉलिसी लॅप्‍स झाल्‍या असल्‍या तर तदनंतर दरमहा हप्‍ते स्विकारण्‍याचे काहीच कारण नव्‍हते. सामनेवाला यांनी तिन्‍ही पॉलिसी अंतर्गत जुलै 2009 पासून पुढे दरमहा हप्‍ते स्विकारले आहेत. तसेच जानेवारी 2009 मध्‍ये ही हप्‍ते स्विकारल्‍याचे दाखवले आहे. डिसेंबर 2008 मध्‍ये हप्‍ते स्विकारल्‍याचे दाखवले आहे. त्‍यामुळे डिसेंबर 2007 ते मार्च 2008 व डिसेंबर 2008 व जानेवारी 2009 मध्‍ये दरमहा हप्‍ते भरले नाही व त्‍या कारणास्‍तव पॉलिसी लॅप्‍स झाली आहे असे सामनेवाला यांना म्‍हणता येणार नाही. कारण तदनंतर दरमहा विमा पॉलिसीची रक्‍कम नियमित सामनेवाला यांनी स्विकारली आहे. सामनेवाला यांनी मयत गणपत अगर महाविद्यालय दरमहा हप्‍ते जमा होत नाही या बाबत कळविलेले नाही. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी महाविद्यालयात त्‍या बाबत कळवणे गरजेचे होते. मयत गणपत ज्‍या संस्‍थेत नौकरीस होते त्‍या संस्‍थेने त्‍यांचे पगारातून विमा पॉलिसीचा हप्‍ता वजा केलेला आहे व तो सामनेवाला यांना पाठविला आहे. काही महिन्‍याचे बाबत चूकीची माहीती दिल्‍या गेल्‍यामुळे हप्‍ते भरण्‍यास खंड दिसतो परंतु ती रक्‍कम सामनेवाला यांचेकडे लॅप्‍स असलेल्‍या पॉलिसीमध्‍ये सामनेवाला यांनी जमा करुन घेतल्‍याचे दिसते. अर्थात दाव्‍यात नमूद केलेल्‍या पॉलिसीच्‍या रक्‍कमा सामनेवाला यांना मिळालेल्‍या आहेत. त्‍या पॉलिसीच्‍या अंतर्गत जे जे काही फायदे तक्रारदार यांना मिळावयास हवे होते ते मिळाले नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे पॉलिसी अंतर्गत क्‍लेम नामंजूर  करण्‍यास कोणतेही संयूक्‍तीक व वैधानिक कारण आढळून येत नाही. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यास त्रूटी केली आहे. सबब, तक्रारदार हे तक्रारीत नमूद केलेल्‍या पॉलिसी नंबर 984555209, 984555210, 984555211, 984555212 अंतर्गत जे फायदे आहेत ते मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदार यांना सदरील तक्रार दाखल करण्‍याकामी जो खर्च करावा लागला त्‍याबददल रु.2500/- व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- सामनेवाला यांनी दयावेत.
            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्‍यात येते.
2.    सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार क्र.1
      यांना त्‍यांची पॉलिसी नंबर 984555209, 984555210, 984555211,    
      984555212 बददल प्रत्‍येकी रु.1,00,000/- व त्‍यावर पॉलिसी अंतर्गत
      फायदे निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत दयावेत. सदरील
      फायदे 30 दिवसांचे आंत न दिल्‍यास त्‍यावर द.सा.द.शे. 9 टक्‍के व्‍याज
      तक्रार दाखल  दि.22.09.2011 पासून संपुर्ण रक्‍कम मिळेपर्यत दयावे.
3.    सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार क्र.1 
      यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्‍कम रु.3,000/- व दाव्‍याच्‍या
      खर्चापोटी रक्‍कम रु.2500/- निकाल कळाल्‍यापासून 30 दिवसांचे आंत
      दयावेत.
      4.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                             जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Smt.Manjusha Chitlange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.