Maharashtra

Mumbai(Suburban)

MA/49/2017

AKHIL KUMAR JAIN - Complainant(s)

Versus

LENOVO INDIA PVT.LTD. - Opp.Party(s)

05 Jan 2018

ORDER

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG, NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN , BANDRA (E), MUMBAI-400051
 
Miscellaneous Application No. MA/49/2017
In
Complaint Case No. CC/16/2016
 
1. AKHIL KUMAR JAIN
BLEGANT BUSINESS PARK, 4 TH floor, MIDC CROSS ROAD B. OPP. ANDHERI KURLA ROAD ANDHERI EAST, MUMBAI
...........Appellant(s)
Versus
1. LENOVO INDIA PVT.LTD.
THROUGH FEMS ICON LEVEL 2, DODDEAKUND VILLGE MARATHHALLI OUTER RING ROAD, BAGALORE. 560037
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. M.Y.MANKAR PRESIDENT
  SHRI S.V.KALAL MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
Dated : 05 Jan 2018
Final Order / Judgement

तक्रारदार स्‍वतः हजर.

सा.वाले क्र 1 गैरहजर.

सा.वाले क्र 2 व 3 एकतर्फा.

तक्रारदारानी त्‍यांच्‍या अर्जाच्‍या पृष्‍ठर्थ कागदपत्रे सादर केली. ऐकले.  एम.ए.क्र 49/2017 वर आदेश पारीत करण्‍यात आला.

आदेशः- श्री.एम.वाय.मानकर, अध्‍यक्ष.         ठिकाणः बांद्रा

      

                                                              तक्रारदार यांच्‍या  अर्जावर आदेश

 

1.      तक्रारदार यांनी  ऑनलाईनद्वारे  सामनेवाले क्र 1 यांनी उत्‍पादित केलेला भ्रमणध्‍वनी रक्‍कम अदा करून विकत घेतला.  परंतू, त्‍याच्‍यामध्‍ये दोष उत्‍पन्‍न झाला. सबब, तक्रारदारानी ही तक्रार दाखल करून सामनेवाले यांचेविरूध्‍द तक्रार दाखल केली. नोटीस प्राप्‍त झाल्‍यानंतर सामनेवाले क्र 1 हे उपस्थित झाले व आपली लेखीकैफियत व पुरावा सादर केला. सामनेवाले क्र 2 व 3  हे उपस्थित न झाल्‍यामूळे त्‍यांच्‍याविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यात येत आहे.  तक्रारदार यांनी त्‍यांचा लेखीयुक्‍तीवाद सादर केला. उपरोक्त अर्ज दि.18/10/2016 ला  सादर केला. तक्रारदारानी विनंती केली की, त्‍यांचा उपरोक्‍त अर्ज निकाली काढण्‍यात याव. सामनेवाले क्र 1 यांना वारंवार संधी दिल्‍यानंतर सुध्‍दा त्‍यांनी अर्जाला जबाब सादर केला नाही. सबब, त्‍या  अर्जावर त्‍यांच्‍या जबाबाशिवाय सुनावणी घेण्‍यात आली. तक्रारदार यांना अर्जासंबधी ऐकण्‍यात आले.

2.  तक्रारदारांनी हा अर्ज दि. 18/10/2016 ला मंचात सादर केला. अर्जदारांनी सामनेवाले यांना नोटीस काढून  त्‍यांच्‍या मालकानी व्‍यक्‍तीशः मंचात उपस्थित राहावे. तसेच मिडीयाला नोटीस काढण्‍यात यावी. अशी विनंती केली आहे. उपरोक्‍त नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले क्र 1 यांनी त्‍यांच्‍या प्लिडींग्‍स सादर केल्‍या आहेत व सामनेवाले क्र 1 व 2 यांचेविरूध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍यात येते. आमच्‍या मते तक्रार निकाली काढणेकामी सामनेवाले यांना मंचाची नोटीस  बजावणे आवश्‍यक  असते. सामनेवाले यांनी मंचात उपस्थित राहावे किंवा नाही ही सर्वस्‍वी त्‍यांची इच्‍छा असते.  सामनेवाले उपस्थित न झाल्‍यामूळे मंचास आदेश पारीत करण्‍याकरीता अडथळा येत नाही. मंच एकतर्फा आदेश पारीत करू शकतो. सामनेवाले यांनी व्‍यक्‍तीशः मंचात उपस्थित राहणे बंधनकारक नाही व हा मंच तसे निर्देश देऊ शकत नाही. ग्रा. सं. कायदा 1986 मध्‍ये सामनेवाले यांनी  व्‍यक्‍तीशः उपस्थित राहण्‍याकरीता त्‍यांना पुन्‍हा नोटीस काढण्‍याबाबत तरतुद नसल्‍यामूळे हा मंच तशी नोटीस काढू शकत नाही. तसेच “मिडीयाला” नोटीस काढण्‍याकरीता तरतुद  नाही. या करीता आम्‍ही मा.सर्वोच्‍च्‍ न्‍यायालयानी सिव्‍हील अपील क्र 4307/2007 राजीव हितेंद्र पाठक आणि इतर विरूध्‍द अच्‍युतनाथ काशीनाथ कारेकर निकाल तारीख 19/08/2011 चा आधार घेत आहोत.  सबब. खालील आदेश.

                 आदेश

1.   एम. ए. क्र 49/2017 हा फेटाळण्‍यात येतो.

2.  अर्ज वादसूचीमधून काढून टाकण्‍यात यावा.

3.  प्रकरण सा.वाले क्र 1 यांच्‍या लेखीयुक्‍तीवादाकामी  नेमण्‍यात येते. 

 
 
[HON'BLE MR. M.Y.MANKAR]
PRESIDENT
 
[ SHRI S.V.KALAL]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.