Maharashtra

Kolhapur

CC/22/8

Ishan Shashank Kulkarni - Complainant(s)

Versus

lenovo India Pvt.Ltd - Opp.Party(s)

V.M.Kulkarni

27 Apr 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/22/8
( Date of Filing : 04 Jan 2022 )
 
1. Ishan Shashank Kulkarni
Nagala Park, Kolhpaur
Kolhapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. lenovo India Pvt.Ltd
Maratha Holl, Hubali,
Hubali
Karnataka
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Savita P. Bhosale PRESIDENT
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Apr 2022
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 2019 चे कलम 35 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      तक्रारदार हे अॅनिमेशनचा कोर्स करत होते त्‍यांनी सदर शिक्षणासाठी Lenovo Legion 5i, 151 MHSO5, Sr.No.S/N PF 2 PYYRL हा लॅपटॉप वि.प. कंपनीकडून दि. 18/09/2020 रोजी खरेदी केला.  तथापि सदरचा लॅपटॉप खरेदी केलेनंतर त्‍यामध्‍ये खालील दोष निर्माण झाले.

      1) Laptop over heating

            2) Laptop crashing

            3) Track pad not working properly

            4) Cameral not working at all

            5) Micglitching

            6) Laptop stuck in boot loop

            7) Newly changed mother board stopped working and many more problems of

                your.

 

सदर लॅपटॉप हा पूर्णपणे दोषपूर्ण असून त्‍याचे सर्व पार्ट्स एकामागून एक खराब झाले.  म्‍हणून तक्रादारयांनी वि.प. यांचेकडे डिसेंबर 2020, जानेवारी 2021 व ऑगस्‍ट 2021 मध्‍ये संपर्क साधला.  पण वि.प. यांनी सदरचा लॅपटॉप बदलून दिला नाही किंवा दुरुस्‍त देखील करुन दिला नाही.  त्‍यानंतर वि.प. यांचे तज्ञ इं‍जिनिअर यांनी तक्रारदार यांचेकडे स्‍वतः येवून तक्रार सोडवण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु सदरच्‍या लॅपटॉपमध्‍ये अन्‍य दोष निर्माण झाल्‍याचे या तज्ञ व्‍यक्‍तीच्‍या निदर्शनास आले.  अशा प्रकारे वि.प. यांनी दिलेल्‍या दोष पूर्ण लॅपटॉप मुळे तक्रारदारांना काम करणे अशक्‍य झाले व तक्रारदार यांना अॅनिमेशन कोर्सची ऑनलाईन परिक्षा देता आली नाही.  वि.प. यांची वॉरंटी कालावधी वाढवून घेण्‍यासाठी रक्‍कम रु. 4,550/- तक्रारदाराकडून भरुन घेतले व लॅपटॉप दुरुस्‍त करुन देण्‍याचा एक अयशस्‍वी प्रयत्‍न केला.  अशा प्रकारे वि.प. यांनी तक्रारदारांना सदोष लॅपटॉप देवून सेवेत त्रुटी केल्‍याने प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.  सबब, तक्रारदारास Lenovo Legion 5i, 151 MHSO5, Sr.No.S/N PF 2 PYYRL कंपनीचा लॅपटॉप देण्‍याचा आदेश व्‍हावा, वै‍कल्पिकरित्‍या रक्‍कम रु.2,00,000/- मिळावेत, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.5,00,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रु.50,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत बिल, टिकेट तपशील, नोटीस, तक्रारदारांनी पाठविलेली नोटीस, नोटीसची पोहोच पावती इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी वि.प. यांना नोटीस लागू झालेचा पोस्‍टाचा ट्रॅक रिपोर्ट दाखल केला आहे.  तसेच वि.प. यांचा पत्‍ता बरोबर असलेचे अॅफिडेव्‍हीट दाखल केले आहे.  वि.प. यांना नोटीस लागू होवूनही ते वारंवार पुकारता गैरहजर. सबब, वि.प. यांचेविरुध्‍द दि. 23/3/2022 रोजी एक‍तर्फा आदेश करण्‍यात आला. 

 

4.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

अ.क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

होय.

3

तक्रारदार हे लॅपटॉपची रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

4

तक्रारदार हे मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम मिळणेस पात्र आहेत काय ?

होय.

5

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

5.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार हे अॅनिमेशनरचा कोर्स करत होते.  सदरचे शिक्षणासाठी तक्रारदारांनी लिनोव्‍हा कंपनीचा लॅपटॉप खरेदी करण्‍याचा होता.  त्‍याप्रमाणे तक्रारदार यांनी Lenovo Legion 5i, 151 MHSO5, Sr.No.S/N PF 2 PYYRL हा लॅपटॉप वि.प. कंपनीकडून अॅमेझॉन मार्फत ता. 18/09/2020 रोजी खरेदी केला. सदरचा लॅपटॉप वि.प. यांचेकडून खरेदी केलेचे बिल तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले आहे.  सदरचा लॅपटॉप तक्रारदारांनी वि.प. यांचेकडून रक्‍कम रु.75,990/- इतक्‍या किंमतीस खरेदी केलेला आहे.  सबब, या बाबीचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

6.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून सदरचा लॅपटॉप खरेदी केलेवर त्‍यामध्‍ये खालील अनेक दोष निर्माण झाले.

 

      1) Laptop over heating

            2) Laptop crashing

            3) Track pad not working properly

            4) Cameral not working at all

            5) Micglitching

            6) Laptop stuck in boot loop

            7) Newly changed mother board stopped working and many more problems of

                your.

 

सदरचे लॅपटॉपमधील सदरचे दोषांचे निराकरण करणेसाठी तक्रारदारांनी वि.प. यांना वेळोवेळी कळवून देखील सदरचे लॅपटॉप मधील दोषांचे निराकरण झालेले नाही.  सबब, वि.प.यांनी तक्रारदारांचे सदर लॅपटॉपची खरेदीची संपूर्ण रक्‍कम स्‍वीकारुन तक्रारदारांना सदोष लॅपटॉप अदा करुन तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांना ता. 16/09/2021 रोजी मेल पाठविलेचे पत्र दाखल केले आहे.  सदरचे पत्रामध्‍ये तक्रारदारांनी सदरचे लॅपटॉप मधील दोषांची माहिती वि.प. यांना कळविलेली असून सदरचे लॅपटॉपची वॉरंटी संपत आली असलेने लॅपटॉपमधील दोषांचे 24 तासांत निराकरण करावे असे कळविले आहे.  त्‍यानुसार वि.प. यांनी ता. 17/09/2021 रोजी सदरचा मेल वि.प. यांना प्राप्‍त झालेला असून वि.प. यांनी लॉकडाऊनचे कारणाने कर्मचारी वर्ग अपुरा असलेने तक्रारदारांना कळवू शकले नसलेचे सदरचे मेलमध्‍ये कथन केले आहे.  तसेच तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत नोटीस पाठविलेली असून सदरचे नोटीसीची पोहोच दाखल केलेली आहे.  सबब, वरील सर्व कागदपत्रांचे व तक्रारदारांचे पुराव्‍याचे शपथपत्राचे अवलोकन करता तक्रारदारांनी वि.प. यांना डिसेंबर 2020, जानेवारी 2021, ऑगस्‍ट 2021 मध्‍ये वि.प. कंपनीचे सर्व्हिसिंग सेंटरचे सांगण्‍याप्रमाणे वेळोवेळी संपर्क साधला आहे.  वि.प. कंपनीचे सर्व्हिस सेंटरकडे रिपेअर टिकेट नं. 2003471699 दि. 26/08/2021, 2003283611 दि. 10/08/2021, 2002931233 दि. 7/07/2021, 2002437294 दि. 17/05/2021, 2002311217 दि. 30/04/2021, 7029604547 दि. 12/08/2020 अन्‍वये तक्रारदार यांनी तक्रार केलली होती.  तदनंतर ता. 15/6/20201 रोजी वि.प. कंपनीचे तज्ञ इंजिनिअर यांनी स्‍वतः तक्रारदार यांचेकडे येवून सदरचे लॅपटॉपमधील प्रॉब्‍लेम सोडवण्‍याचा प्रयत्‍न केला.  सदरचे लॅपटॉपमधील हिट सिक बदलून नवीन सिक टाकला.  तथापि ता. 18/6/2021 रोजी जास्‍त हीटमुळे सदरचा सिक खराब झाला व लॅपटॉपमध्‍ये अन्‍य दोष निर्माण झाल्‍याचे तज्ञ व्‍यक्‍तीचे निदर्शनास आले.  त्‍याकारणाने सदरचा लॅपटॉप रिइन्‍स्‍टॉल करुन दोष सोडवण्‍याचा प्रयत्‍न केला तथापि सदरचा लॅपटॉप दोषयुक्‍त राहिला.  तसेच वि.प. यांनी मदरबोर्ड बदलण्‍याचा ता. 25/8/20201 रोजी प्रयत्‍न केला.  तो प्रयत्‍न देखील असफल झाला.  वि.प. यांनी सदरचे लॅपटॉपमधील दोष सोडवून देतो असे सांगून वॉरंटी वाढवून देणेसाठी तक्रारदार यांचेकडून रक्‍कम रु. 4,550/- भरुन घेतले.  तथापि, सदरचा लॅपटॉप दुरुस्‍त करुन देण्‍याचा वि.प. यांचा प्रयत्‍न अयशस्‍वी ठरला.  तक्रारदारांनी सदरची कथने पुराव्‍याचे शपथपत्रावर केलेली असून सदरची कथने वि.प. यांनी आयोगात हजर होवून नाकारलेली नाहीत.  त्‍याकारणाने सदरची कथने ग्राहय धरणे आयोगास न्‍यायोचित वाटते.  सबब, तक्रारदारांनी वि.प. यांना सदरचा लॅपटॉपमधील दोषांचे निराकरण न करुन देता लॅपटॉप मधील दोष तसेच राहिले.  या सर्व बाबींचा विचार करता, वि.प. यांनी तक्रारदारांकडून लॅपटॉपच्‍या खरेदीचा संपूर्ण मोबदला स्‍वीकारुन सदरचा लॅपटॉप वॉरंटी कालावधीत असताना देखील त्‍यातील दोषांचे निराकरण न करुन देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3      

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 व 2 मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता वि.प. यांनी तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केलेली आहे.  प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी रक्‍कम रु.2,00,000/- तसेच मानसिक व शैक्षणिक नुकसानीपोटी रक्‍कम रु.5,00,000/- ची मागण आयोगामध्‍ये केलेली आहे.  तक्रारदारांनी शिक्षणासाठी अॅनिमेशनचे कामासाठी लॅपटॉप खरेदी केलेला होता.  तथापि वि.प. यांनी दूषित सेवा दिलेने सदरचा लॅपटॉप ज्‍या कारणासाठी खरेदी केला त्‍यासाठी त्‍याचा उपयोग न होता तक्रारदार यांना आपला कोर्स वेळेत पूर्ण करता आला नाही.  त्‍यामुळे रु. 60,000/- फी देवूनही अॅनिमेशन कोर्स कायम करावा लागला असे तक्रारदाराने म्‍हणणे दाखल केले आहे.  तथापि सदरचे नुकसान भरपाईपोटी मागणी केलेचे अनुषंगाने तक्रारदारांनी कोणताही कागदोपत्री पुरावा आयोगात दाखल केलेला नाही.  तथापि वरील सर्व कागदपत्रांवरुन तक्रारदारांना सदरचे लॅपटॉपचा उपभोग घेता आलेला नाही.  त्‍या कारणाने सदरचे नुकसान भरपईपोटी तक्रारदार हे रक्‍कम रु. 10,000/- मिळणेस पात्र आहेत तसेच तक्रारदार यांना सदरची तक्रार आयोगात दाखल करणे भाग पडले व तक्रारीसाठी खर्च करावा लागला.  त्‍या कारणाने तक्रारदार हे वि.प. यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.5,000/- मिळणेस पात्र आहेत.  सबब, मुद्दा क्र. 3 व 4 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.5  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो. 

 

  1. वि.प. यांनी तक्रारदार यांना वादातील दोषयुक्‍त लॅपटॉप बदलून त्‍याऐवजी Lenovo Legion 5i, 151 MHSO5, Sr.No.S/N PF 2 PYYRL हा लॅपटॉप त्‍वरित द्यावा. तसेच तक्रारदार यांनी वि.प. यांना तक्रारदारांचे ताब्‍यातील दोषयुक्‍त लॅपटॉप परत द्यावा.

 

  1. वि.प. यांनी तक्रारदारांना शैक्षणिक नुकसान भरपाईपोटी रक्‍कम रु.10,000/- अदा करावी. 

 

  1. वि.प. यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.8,000/- व तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु.3,000/- अदा करावी. 

 

  1. वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेश पारीत तारखेपासून 45 दिवसांत करावी.

 

  1. विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदयामधील तरतुदीप्रमाणे वि.प. विरुध्‍द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.

 

  1. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 
 
[HON'BLE MRS. Savita P. Bhosale]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.