Complaint Case No. CC/22/138 | ( Date of Filing : 12 May 2022 ) |
| | 1. Satyaprakash Motilal Saroj Through Shri.Dhammadeep Indrajeet Meshram | Samta nagar ward kra.6,Urjanagar ,Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Legency Java Showroom | Showroom 63/1,Wadgaon pata,Nagpur road,Chandrapur | Chandrapur | Maharshtra | 2. Classic Lengdas Pvt ltd | 1 foor,D-1 block,plot kra.18/2,M.I.D.C,Chinchwad,Pune | pune | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक १४/१२/२०२२) - प्रस्तुत तक्रार तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता हे पंजाब येथे सी.एस.आय.एफ. मध्ये नोकरी करतात व त्यांना कोर्टात हजर होणे शक्य नसल्याने त्यांनी प्रस्तुत प्रकरण खास मुखत्यारमार्फत दाखल केलेले आहे. विरुध्द पक्ष क्रमांक १ हे विक्रेता असून जावा कंपनीचे दुचाकी वाहन विकण्याचा व्यवसाय चंद्रपूर येथे करतात तर विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना चंद्रपूर शहरात जावा दुचाकी वाहन विक्री करण्याकरिता प्राधिकृत केले आहे.
- तक्रारकर्त्याने दिनांक ९/१/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे जावा कंपनीची दुचाकी वाहन खरेदी करण्याकरिता, बुकींग केले होते आणि बुकींग करतेवेळी तक्रारकर्त्याने त्यांच्या पसंतीचे कलर व मॉडेल सांगितले होते तेव्हा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे ते वाहन उपलब्ध नव्हते म्हणून विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी १५ दिवसांत वाहन बोलवून देतो असे आश्वासन दिल्याने तक्रारकर्ता यांनी त्यांचेवर विश्वास ठेवून वाहन बुकींग दिनांक ०९/०१/२०२१ रोजी रुपये ५०,०००/- व त्यानंतर दिनांक ११/०१/२०२१ रोजी रुपये ५०,०००/- असे एकूण रुपये १,००,०००/- वाहन खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ कडे जमा केले. उपरोक्त वाहन बुकींग करतेवेळी तक्रारकर्त्याचे पोस्टींग कश्मीर येथे होते आणि ते सुट्टीवर चंद्रपूर येथे आलेले होते परंतु बुकींग केलेले वाहन उपलब्ध करुन दिले नाही. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास विनंती केल्यामुळे तक्रारकर्त्यानी दोनवेळा १५ दिवसाची मुदत वाढवून दिली परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ हे तक्रारकर्त्यास बुकींग केलेले वाहन उपलब्ध करुन देऊ शकले नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याची पंजाब येथे बदली झाल्याने तक्रारकर्त्यास नाईलाजास्तव वाहनाची बुकींग रद्द करावी लागली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना वाहन बुकींगची रक्कम परत मागितली असता त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून टाळले व प्रत्येक वेळी रक्कम परत करण्याकरिता तारीख देत होते. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिवाळी २०२१ मध्ये रक्कम परत देतो व त्यानंतर डिसेंबर २०२१ पर्यंत रक्कम देण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये जावा कंपनीसोबत चर्चा करुन रक्कम परत करतो असे सांगितले आणि दिनांक २८/२/२०२२ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी त्यांचे भागिदारासोबत चर्चा करुन सांगतो असे सांगितले. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास दिनांक १०/०३/२०२२ रोजी शोरुममध्ये बोलविले असता तक्रारकर्त्याचे प्रतिनिधी श्री धम्मदिप मेश्राम तेथे गेले असता पहिल्यांदा ३ टक्के कपात, दुस-यांदा रुपये १०,०००/- आणि नंतर रुपये २०,०००/- रक्कम कपात करुन रक्कम परत केल्या जाणार असे सांगितले त्यावेळी तक्रारकर्त्याने बुकींगच्या संपूर्ण रकमेची मागणी केली. तक्रारकर्त्याची कोणतीही चुक नसतांना विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना बुकींग रक्कम रोखुन ठेवण्याचा किंवा कपात करण्याचा कायदेशीर अधिकार नाही. उपरोक्त वाहनाची बुकींग विरुध्द पक्ष क्रमांक १ चे चुकीमुळे रद्द केली होती. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास वाहन बुकींग करतेवेळी कोणतीही माहिती दिली नव्हती की कोणत्याही कारणाने बुकींग रद्द झाली तर रक्कम परत मिळणार नाही किंवा बुकींग रकमेत कपात केली जाईल. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास रक्कम परत न दिल्याने तक्रारकर्ता यांनी दिनांक २३/०३/२०२२ रोजी अधिवक्ता श्री मनसफ अली यांचे मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोंदणीकृत डाकेने पोच पावतीसह नोटीस पाठविला. विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक ०१/०४/२०२२ रोजी नोटीसला खोटे उत्तर पाठविले. विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी उत्तर दिले नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास बुकींग रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षांविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की विरुध्द पक्षांनी वाहन बुकींगची रक्कम रुपये १,००,०००/- द.सा.द.शे. १८ टक्के व्याजासह परत द्यावे तसेच तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये १,००,०००/- आणि तक्रार खर्च रुपये २०,०००/- तक्रारकर्त्यास देण्याचे आदेशित व्हावे अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना आयोगामार्फत नोटीस पाठविली असता नोटीस प्राप्त होऊन सुध्दा आयोगासमक्ष उपस्थित न झाल्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांचे विरुध्द दिनांक १३/१०/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ, तोंडी युक्तिवाद यावरुन खालिलमुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
कारणमीमांसा - तक्रारकर्त्याने दिनांक ०९/०१/२०२१ रोजी विरुध्द पक्ष क्रमांक २ यांनी प्राधिकृत केलेल्या विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडून जावा कंपनीचे मॉडेल जावा ४२ ल्युमोस लाईम रंगाची बाईक/दुचाकी वाहन खरेदी करण्याकरिता बुकींग केले व त्याकरिता दिनांक ०९/०१/२०२१ रोजीच रुपये ५०,०००/- आणि त्यानंतर दिनांक ११/०१/२०२१ रोजी रुपये ५०,०००/- असे एकूण रक्कम रुपये १,००,०००/- विरुध्द पक्ष क्रमांक १ यांना दिले याबाबत विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास पावत्या दिलेल्या आहेत. तसेच विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी दिनांक ०१/०४/२०२२ रोजी पाठविलेल्या उत्तर नोटीसमध्ये सुध्दा ही बाब मान्य केली. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे ही बाब स्पष्ट होते. तक्रारकर्त्याची तक्रार व तक्रारीत निशानी क्रमांक २ वर दाखल पावत्या, नोटीस, उत्तर नोटीस इत्यादी दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे बुकींग केलेली ल्युमोस लाईम रंगाची जावा ४२ बाईक/दुचाकी ही बुकींगच्यावेळी उपलब्ध नव्हती व विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास १५ दिवसांत उपलब्ध करुन देतो असे आश्वासन दिल्यानंतरच तक्रारकर्त्याने उपरोक्त बाईक खरेदी करण्याकरिता विरुध्द पक्ष क्रमांक १ यांचेकडे बुकींग रक्कम रुपये १,००,०००/- जमा केले परंतु दिलेल्या १५ दिवसाचे मुदतीत तसेच त्यानंतर परत १५ दिवसाच्या वाढवून दिलेल्या मुदतीत सुध्दा विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी जावा ४२ बाईक उपलब्ध करुन दिली नाही तसेच तक्रारकर्त्याची पंजाब येथे बदली झाल्याने त्यांनी वाहन घेण्याचे रद्द केले व बुकींगची रक्कम रुपये १,००,०००/- परत मागितली परंतु विरुध्द पक्ष क्रमांक १ यांनी तक्रारकर्त्यास रक्कम नंतर देतो असे सांगितले व काही कारणे सांगून रक्कम देण्याचे टाळले व त्यानंतर पहिल्यांदा रकमेच्या ३ टक्के रक्कम कपात करुन नंतर रुपये १०,०००/- व शेवटी रुपये २०,०००/- कपात करुन परत करतो असे सांगितले परंतु तक्रारकर्त्यास बुकींगची संपूर्ण रक्कम आजपर्यंत परत केली नाही. विरुध्द पक्षांनी दिनांक १/४/२०२२ रोजी दिलेल्या उत्तर नोटीस मध्ये तक्रारकर्त्यास हव्या असलेल्या ल्युमोस लाईम रंगाची बाईक ही फक्त मागणीनुसार उत्पादित केली जाते आणि मागणीनुसार उत्पादित केलेल्या ऑर्डरचे वाहन रद्द करु शकत नाही असे तक्रारकर्त्यास सुचित केले असे नमूद केलेले आहे परंतु ल्युमोस लाईम रंगाच्या वाहनाची निर्मिती ही मागणीनुसारच होते व नंतर ती रद्द करता येत नाही असे अटी व शर्ती असलेले माहितीपञक वा दस्तावेज तक्रारीत उपस्थित होऊन दाखल केलेले नाही तसेच बुकींग रद्द करता येत नाही व बुकींगच्या रकमेमधून काही रक्कम कपात करावी लागते वा पूर्ण रक्कम देता येत नाही याबाबत सुध्दा काही दस्तावेज दाखल नाही आणि पावतीवर सुध्दा तसे नमूद नाही तसेच प्रकरणात उपस्थित राहून आपले बचावापृष्टर्थ अभिलेखावर काहीही दाखल केलेले नाही त्यामुळे विरुध्द पक्षाचे उत्तर नोटीस मधील कथन ग्राह्यधरणे योग्य नाही. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास आश्वासित केल्याप्रमाणे ल्युमोस लाईम रंगाची बाईक आश्वासित केलेल्या मुदतीत उपलब्ध करुन न दिल्याने तक्रारकर्त्याने बुकींग रद्द करुन बाईकच्या बुकींगची संपूर्ण रक्कम परत मागितली असता विरुध्द पक्षांनी रक्कम परत न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा दिल्याचे सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांकडून त्याने ल्युमोस लाईम रंगाच्या जावा ४२ करिता जमा केलेली बुकींगची संपूर्ण रक्कम रुपये १,००,०००/- परत मिळण्यास तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम व तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्यांची तक्रार क्र. १३८/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्याला जावा ४२ ल्युमोस लाईम रंगाची बाईक खरेदी करण्याकरिता बुकींगच्या वेळी जमा केलेली रक्कम रुपये १,००,०००/- परत करावी.
- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २५,०००/- व तक्रार खर्च १०,०००/- अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |