Maharashtra

Nagpur

CC/07/391

Vijay Raj Towers Condominium Association - Complainant(s)

Versus

Laxmin Keshav Builders - Opp.Party(s)

ADV.MRS.S.M.AMBULKAR

31 Mar 2012

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/07/391
 
1. Vijay Raj Towers Condominium Association
24/2, Kinkhede Layout, Bharat Nagar, Nagpur
Nagpur
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. Laxmin Keshav Builders
3-001, Royal Enclave Tikekar Rd. Dhantoli, Nagpur. and Other.
Nagpur
Maharastra
2. MRS. ANITA W/O SUDHIR GOVERDHAN
THROUGH THEIR DULY CONSTITUTED POWER OF ATTORNEY, SHRI. MADHAV CINTAMAN KINKHEDE POWER OF ATTORNEY, BHAGIRATHI NIWAS, KINKHEDE BUNGLOW, AMRAVATI ROAD, BHARAT NAGER. NAGPUR-400 033
. NAGPUR
MAHARASHTRA
3. M/S. KINKHEDE DEVELOPERS,
THROUGH SHRI MADHAV CHINTAMAN KINKHEDE, POWER OF ATTORNEY, BHAGIRATHI NIWAS, KINKHEDE ,BUNGLOW AMRAVATI ROAD, BHARAT NAGAR, NAGPUR-33
NAGPUR
MAHARASHTRA
4. SMT. VIJAYATAI WD/O VISHWANATH KINKHEDE AND FIVE OTHERS (1) MRS. SHARDA W/O MOHAN VIGHNEY,(2) MRS. LATA W/O DR.Y.N.KULKARNI,(3) MRS. KIRAN W/O ANIL DESHPANDE,(4) MRS. KANCHAN W/O DATTATRAYA KHANZODE,
NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MRS. Jayashree Yende MEMBER
 
PRESENT:ADV.MRS.S.M.AMBULKAR, Advocate for the Complainant 1
 ADV.PRASHANT VIADYA, Advocate for the Opp. Party 1
 ADV.SWAPNIL KHATI, Advocate for the Opp. Party 1
ORDER

 

::निकालपत्र::
(पारीत द्वारा- श्री विजयसिंह ना.राणे, मा.अध्‍यक्ष)
(पारीत दिनांक 31 मार्च,2012 )
1.   अर्जदार/तक्रारकर्ते यांनी उपरोक्‍त नमुद संस्‍थे मार्फतीने  ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली गैरअर्जदार प्रस्‍तूत तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
 
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
2.   यातील तक्रारकर्त्‍यांचे गैरअर्जदार विरुध्‍द थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्रं 1 हे बिल्‍डर आहेत व गैरअर्जदार क्रं 2 हे डेव्‍हलपरस आहेत. तक्रारकर्त्‍या तर्फे फलॅट ओनर असोसिएट संस्‍थेने प्रस्‍तुत तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदारा कडून फलॅट विकत घेतले. गैरअर्जदारांनी फलॅट संबधाने विविध आश्‍वासने दिलीत, त्‍या संबधीचे ब्राऊचर दिले. मात्र आवश्‍यक त्‍या सोयी सुविधा त्‍या ठिकाणी करुन दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे संबधित सदनिकेच्‍या मालकांनी एकत्र येऊन व गैरअर्जदाराशी संपर्क करुन एकत्रित सभा घेतली व गैरअर्जदार कडे त्‍या संबधीची मागणी केली. मात्र गैरअर्जदारानी त्‍या संबधिची दखल घेतली नाही. शेवटी त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
3.    तक्रारकर्त्‍यांच्‍या म्‍हणण्‍या नुसार बांधकामा मध्‍ये अनेक दोष आहेत, कमतरता आहे. सोयी सुविधा या बाबी गैरअर्जदारानी कबुल करुनही दिल्‍या नाहीत. म्‍हणून तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार क्रं 1 विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात.
      1) पार्कींगसाठी पुरेशी जागा उपलब्‍ध करुन द्यावी.
      2) बाल्‍कनीला जोडणारी पाईपलाईन टेरेस पासून ते विंग ए च्‍या ग्राऊंड
         फलोअर पर्यंत उपलब्‍ध करुन द्यावी.
      3) ट्रान्‍सफॉर्मरला कुंपण लावून द्यावे.
      4) प्रथम सागवान दारा संबधी प्रत्‍येक फलॅट ओनरला रुपये-10,000/-
         द्यावे
      5) फलश डोअरसाठी प्रत्‍येकी रुपये-5000/- द्यावे.
      6) कम्‍पाऊंड वॉल बांधण्‍यासाठी रुपये-1.00 लक्ष द्यावे.
      7) बोअरवेलसाठी तक्रारकर्त्‍यांना आलेल्‍या खर्चाचे रुपये-31,000/-द्यावे.
      8) Water Sump साठी रुपये-1.00 लक्ष द्यावे.
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
      9) विंग बी वरील टेरेसचे आर्यन ग्रीलसाठी रुपये-20,000/- द्यावेत.
     10) जमीनीवर व टेरेसवर वॉटर टँक बांधण्‍यासाठी प्रत्‍येकी-
          रुपये-1.00 लक्ष द्यावेत.
     11) लोखंडी शिडीसाठी रुपये-10,000/- द्यावेत.
         या सर्व मागण्‍या तक्रारकर्त्‍यांनी गैरअर्जदार क्रं 1 विरुध्‍द केल्‍यात
         तसेच गैरअर्जदार क्रं 2 ने मेन्‍टनन्‍सची थकबाकी पोटी रुपये-70,000/- द्यावेत.गैरअर्जदारानी तक्रारकर्त्‍यांना झालेल्‍या मानसिक त्रासा बद्यल                     प्रत्‍येकी रुपये-10,000/-  या प्रमाणे एकूण 18 फलॅट धारकांना                    रुपये-1.80 लक्ष द्यावेत. रुपये-1.00 लक्ष पेन्‍टींग इतर दुरुस्‍तीसाठी गैरअर्जदार क्रं 1 ने द्यावे. रुपये-50,000/- खर्चा दाखल द्यावेत.  गैरअर्जदार क्रमांक 1 ने विज बिलाचे फरकापोटी रुपये-7562/- द्यावेत अशा मागण्‍या केल्‍यात.
4.    प्रस्‍तुत प्रकरणात वि.जिल्‍हा न्‍यायमंचाचे मार्फतीने यामधील गैरअर्जदारांना नोटीसेस पाठविण्‍यात आल्‍या असता त्‍या सर्व गैरअर्जदारांवर तामील झाल्‍यात. परंतु गै.अ.क्रं 1 व्‍यतिरिक्‍त इतर गैरअर्जदारांनी लेखी उत्‍तर दाखल केले नाही.
5.    गैरअर्जदार क्रं 1 ने न्‍यायमंचा समक्ष हजर होऊन आपले लेखी उत्‍तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं 1 ने आपल्‍या उत्‍तरामध्‍ये तक्रारकर्त्‍यांनी त्‍याचे विरुध्‍द केलेली सर्व विपरीत विधाने नाकबुल केलीत. गै.अ.क्रं 1 चे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ते आणि गैरअर्जदार यांचेमध्‍ये, तक्रारकर्ते म्‍हणतात त्‍या प्रमाणे सोयी सुविधे संबधाने कोणताही करार झालेला नव्‍हता. तक्रारकर्ते म्‍हणतात त्‍या प्रमाणे कोणत्‍याही  सोयी  सुविधा  करुन द्यावयाच्‍या राहिलेल्‍या
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
नाहीत. त्‍यांचे तर्फे सेवेत कोणत्‍याही प्रकारची त्रृटी नाही. त्‍यांनी पूर्ण सोयी सुविधा उपलब्‍ध करुन दिलेल्‍या आहेत. तक्रारकर्त्‍यांनी निष्‍कारण त्‍यांना त्रास देण्‍याचे हेतूने प्रस्‍तुत खोटी तक्रार दाखल केलेली आहे, सबब तक्रार खारीज व्‍हावी असा उजर गैरअर्जदार क्रं 1 ने घेतला.
6.    तक्रारकर्त्‍यां तर्फे संस्‍थेनी तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत  निशाणी क्रं 3 वरील यादी नुसार एकूण 21 दस्‍तऐवज दाखल केले असून त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने डीड ऑफ डिकलरेशन, ठराव प्रत, स्‍पेसिफीकेशन प्रत, त्रृटी यादी, सभेचे इतिवृत्‍त, गैरअर्जदारास केलेल्‍या पत्रव्‍यवहाराच्‍या प्रती , महापालीके कडून प्राप्‍त झालेले पत्र, सहकारी संस्‍थेस दिलेले पत्र, बोअरवेलसाठी वर्गणी गोळा केल्‍याचे दर्शविणारे पत्र, मेन्‍टनन्‍स संबधीचे पत्र, मा.एम.एल.ए. यांना दिलेले पत्र, छायाचित्रांच्‍या प्रती, पत्रव्‍यवहार इत्‍यादीचा समावेश आहे. तसेच तक्रारकर्त्‍या तर्फे निशाणी क्रं 33 वर शपथपत्र दाखल करण्‍यात आले.
7.    गैरअर्जदार क्रं 1 ने निशाणी क्रं 32 वर लेखी उत्‍तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.
8.    प्रस्‍तुत प्रकरणात उभय पक्षां तर्फे वकीलांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.
9.    तक्रारकर्त्‍यांची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, गै.अ.क्रं 1 चे प्रतिज्ञालेखावरील उत्‍तर आणि प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवज व उभय पक्षां तर्फे वकीलांचा  युक्‍तीवाद यावरुन न्‍यायमंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-
::निष्‍कर्ष ::
10.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍यांनी त्‍यांचे कथनाचे पुष्‍टयर्थ्‍य योग्‍य असा
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
सबळ पुरावा जसे ब्राऊचर इत्‍यादी दाखल केलेले नाही. त्‍याच बरोबर गैरअर्जदारानी सुध्‍दा योग्‍य ते दस्‍तऐवज दाखल केले नाहीत.
11.    अशा परिस्थितीत प्रकरणाचा योग्‍य निकाल लागावा यासाठी कमिश्‍नरांची नियुक्‍ती प्रस्‍तुत प्रकरणात करण्‍यात आली आणि त्‍यांचे कडून तक्रारकर्त्‍यांचे तक्रारीतील तथ्‍य जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात आला. कमिश्‍नरांनी आपला सखोल अहवाल न्‍यायमंचा समक्ष सादर केला. कमिश्‍नरांचे अहवालावर तक्रारकर्ते व गैरअर्जदार या दोन्‍ही पक्षांनी कोणतेही आक्षेप घेतले नाही व एकप्रकारे सदर अहवाल मान्‍य केला.
12.   कमिश्‍नरांचे अहवाला नुसार खालील बाबी नमुद करण्‍यात आल्‍यात.
      1)  सदर ठिकाणी पार्कींगची योग्‍य व्‍यवस्‍था नाही व पार्कींगची जागा
          पुरेशी नाही. मात्र त्‍या ठिकाणी उजवी कडील जागेवर व्‍यवस्‍था
          केल्‍यास हा प्रश्‍न सुटू शकतो व त्‍यासाठी रुपये-50,000/- एवढा
          खर्च अपेक्षीत आहे.
2)          टेरेस पासून  विंग ए चे ग्राऊंड फलोअर पर्यंत पाईप लाईन
    कनेक्‍शन साठीची गरज असून त्‍यासाठी रुपये-6000/- खर्च
    अपेक्षीत आहे.
      3)  ट्रान्‍सफॉर्मरला काटेरी तारेचे कुंपण घालण्‍यासाठी रुपये-10,000/-
          खर्च अपेक्षीत आहे.
      4)  सागवानी दार चांगले असल्‍याचा निष्‍कर्ष काढला.
      5)  आतमधील फलश दरवाज्‍या संबधी प्रत्‍येकी रुपये-1000/- प्रमाणे
          एकूण रुपये-18,000/- खर्च अपेक्षीत आहे.
      6)  कम्‍पाऊंड वॉलसाठी रुपये-90,000/- खर्च अपेक्षीत आहे.
      7)  बोअरवेलसाठी रुपये-25,000/- खर्च अपेक्षीत आहे.
 
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
 
      8)  या व्‍यतिरिक्‍त Water Sump आहे परंतु त्‍यासाठी बाजूचे जमीन
          मालकाचे ना-हरकत-प्रमाणपत्र घेणे गरजेचे असल्‍याचे कमिश्‍नरांनी
          नमुद केले.
      9)  विंग बी मधील टेरेसवर आर्यन ग्रील नाही.
     10)  संभाव्‍य आगी पासून संरक्षणासाठी स्‍वतंत्र पाण्‍याचे टाके असणे
          गरजेचे आहे.
11)        विंग ए आणि बी यांचे मधील डक्‍ट मध्‍ये प्रवेशासाठी आर्यन
     लॅडरची गरज असून त्‍यासाठी रुपये-10,000/- खर्च अपेक्षीत आहे.
     त्‍या ठिकाणी असलेल्‍या Sumpचे बाजूने ड्रेनेज असल्‍याची बाब
     नमुद केली. आत मधील भिंतीवर मायनर क्रॅक असल्‍याचेही नमुद
     केले.
 
13.   कमिश्‍नरांचे अहवालात नमुद केल्‍या बाबी गैरअर्जदाराने नाकारलेल्‍या नाहीत व खोडूनही काढलेल्‍या नाहीत. वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारकर्त्‍यांच्‍या तक्रारीमध्‍ये तथ्‍य असल्‍याचे आढळून येते.
14.   वरील सर्व वस्‍तूस्थितीचा विचार करुन, मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श 
1) तक्रारकर्त्‍याची तक्रार गैरअर्जदार क्रं 1 विरुध्‍द अंशतः मंजूर करण्‍यात येते.
2)  गैरअर्जदार क्रं 1 ने, कमिश्‍नर अहवाला नुसार बांधकाम त्रृटींची पुर्तता
    करण्‍यासाठी रुपये-2,09,000/-(अक्षरी रुपये दोन लक्ष नऊ हजार फक्‍त )
    तक्रारकर्त्‍यानां द्यावेत.
3)  Water Sump संबधाने बाजूचे जमीन मालका कडून ना-हरकत-प्रमाणपत्र
    गैरअर्जदार क्रं 1 ने तक्रारकर्त्‍यानां मिळवून द्यावे. हे शक्‍य नसल्‍यास
    नविन Water Sump तयार करुन द्यावे.
 
ग्राहक तक्रार क्रमांक: 391/2007
4) Water Sump भोवती असलेले ड्रेनेज हटवून त्‍याची अन्‍यत्र व्‍यवस्‍था
      गैरअर्जदार क्रं 1 ने करुन द्यावी.
5) तक्रारकर्त्‍यानां झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्यल प्रत्‍येकी
    रुपये-10,000/- या प्रमाणे एकूण 18 तक्रारदारांसाठी रुपये-1,80,000/-
    (अक्षरी रुपये एक लक्ष ऐंशी हजार फक्‍त ) गै.अ.क्रं 1 ने द्यावेत.
6) गैरअर्जदार क्रं 1 ने तक्रारकर्त्‍यास प्रस्‍तुत तक्रारीचे खर्चा दाखल
    रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त ) द्यावेत.
7)  तक्रारकर्त्‍यांच्‍या इतर मागण्‍या योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी नामंजूर
    करण्‍यात येत आहेत.
8)  गैरअर्जदार क्रं 1 व्‍यतिरिक्‍त अन्‍य गैरअर्जदारांना सदर प्रकरणातून मुक्‍त
    करण्‍यात येते.
9)  गैरअर्जदार क्रं 1 ने सदर आदेशाचे अनुपालन आदेश प्राप्‍त झाल्‍या पासून
    तीस दिवसांचे आत करावे. अन्‍यथा गैरअर्जदार क्रं 1 हे प्रत्‍येक
    तक्रारदारास प्रतीदिन रुपये-200/- (अक्षरी प्रत्‍येकी प्रतिदिन रुपये दोनशे
    फक्‍त ) या प्रमाणे एकूण 18 तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्‍यासाठी
    जबाबदार राहतील याची नोंद घ्‍यावी.
10)  निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व संबधित पक्षांना विनामुल्‍या द्याव्‍यात.
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MRS. Jayashree Yende]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.