Maharashtra

Ahmednagar

CC/17/190

Bhima Balkrushna Nagare - Complainant(s)

Versus

Laxmi Lawns & Mangal Karyalay, Prop.Pandhurang Bhikaji Sangale - Opp.Party(s)

Barhate B. B.

31 Jan 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/17/190
( Date of Filing : 12 Jul 2017 )
 
1. Bhima Balkrushna Nagare
A/P-Shiblapur,Mataji Nagar,Nagapur, Tal-Sangamner,
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Laxmi Lawns & Mangal Karyalay, Prop.Pandhurang Bhikaji Sangale
A/P- Ashvi-Shiblapur Road,Shiblapur, Tal-Sangamner
Ahmednagar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:Barhate B. B. , Advocate
For the Opp. Party: Exparty. P.M.Gujal, Advocate
Dated : 31 Jan 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.विजय सी.प्रेमचंदानी-मा.अध्‍यक्ष)

1.   तक्रारकर्ता यांनी सदरील तक्रार कलम 12 ग्राहक संरक्षण कायदा 1986 अन्‍वये दाखल केली आहे.

2.   तक्रारकर्ताने तक्रारीत असे कथन केलेले आहे की, तक्रारकर्ताने त्‍याचे पुतणीचे विवाहाची तारीख 07.05.2017 ही निश्‍चीत केली असल्‍याने सामनेवालाचे लक्ष्‍मी लॉन्‍स्‍ व मंगल कार्यालय विवाहासाठी रु.1,41,000/- या रकमेची सुपारी तक्रारकर्ताने सामनेवाला यांना दिली. त्‍याप्रमाणे सामनेवालाने तक्रारकर्ताचे पुतणीचे लग्‍नाची तारीख बुक करुन तक्रारकर्ता यांच्‍याकडून अॅडव्‍हान्‍स रक्‍कम रु.11,000/- स्विकारुन तक्रारकर्ता यांना तारीख 01.12.2016 ची पावती दिली. सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांचे पुतणीचे लग्‍नासाठी मंगल कार्यालय, नातेवाईकांसाठी जेवण व इतर सेवा देण्‍याचे मान्‍य करुन त्‍यापोटी अॅडव्‍हान्‍स रक्‍कम स्विकारली. तक्रारकर्ता यांनी सामनेवाला यांचे कार्यालय बुक केले. ठरलेल्‍या अटी व शर्तीनुसार तक्रारकर्ता यांनी बाकी राहीलेली रक्‍कम रुपये 1,30,000/- विवाहाचे पुर्वी दोन दिवस म्‍हणजेच तारीख 05.05.2017 रोजी सामनेवाले यांना द्यावयाची ठरली आहे. तक्रारकर्ताने मंगल कार्यालय बुक केले असल्‍याने मंगल कार्यालयाचा पत्‍ता देऊन पुतणीच्‍या लग्‍नासाठी लग्‍नपत्रीका देखील छापल्‍या. सामनेवाला यांचा मुलगा नामे संजय यांनी तक्रारदार यांना सांगितले की, “ तुमचे दिनांक 07.05.2017 रोजीचे बुकींग आम्‍ही रद्द केले आहे व सामनेवाले यांनी वाढीव दराने दुसरे बुकींग मिळाल्‍याचे सामनेवाले यांनी तक्रारकर्ता यांना दाखविले. त्‍यावर तक्रारकर्ता हे सामनेवाला यांना म्‍हणाले की, आम्‍ही पुर्वीच बुकींग केलेले आहे. आम्‍हाला हे मंगलकार्यालय सोचीचे आहे, तुम्‍ही आमचे बुकींग रद्द करु नका अशी विनंती केली असता, सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना स्‍पष्‍ट सांगितले की, तुमचे बुकींग रद्द केले आहे, तुम्‍हांला काय करावयाचे ते करा, अशा प्रकारे बोलून तक्रारकर्ता यांना तेथुन हाकलुन दिले. ” सदर गोष्‍टीमुळे तक्रारकर्ता यांना मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्ता यांना संगमनेर येथील दुसरे मंगल कार्यालय बुक करावे लागले. ते कार्यालय 22 किलोमिटर असल्‍याने त्‍यांचे नातेवाईकांना जाण्‍यायेण्‍यासाठी प्रवासी वाहनाची सोय केली असल्‍याने त्‍यासाठी तक्रारकर्ता यांना रक्‍कम रुपये 30,000/- इतका खर्च वेगळा करावा लागला. त्‍याचप्रमाणे संगमनेर येथील मंगल कार्यालय अर्जंट बुक केल्‍यामुळे तक्रारकर्ता यांना ज्‍यादा भाडे रु.21,000/- द्यावे लागले. लॉन्‍स व मंगल कार्यालय यांचा पत्‍ता बदलल्‍याने तक्रारकर्ता यांना पुर्वी सामनेवाले यांचे मंगल कार्यालयाचा पत्‍ता बदलून नविन मंगल कार्यालयाचा पत्‍ता देऊन लग्‍न पत्रीका छापाव्‍या लागल्‍या. त्‍याकरीता तक्रारकर्ता यांना रक्‍कम रुपये 10,000/- इतका खर्च करावा लागला. सामनेवालाने कोणतीही माहिती न देता व बुकींगची रक्‍कम स्विकारुनही तक्रारकर्ता यांचे बुकींग रद्द केले व सेवेत त्रुटी दिली असल्‍याने तक्रारकर्ताने सामनेवाला यांना वकीलामार्फत दिनांक 13.04.2017 रोजी नोटीस पाठविली. सदर नोटीसीची सामनेवाला यांनी कोणतीही दाखल घेतली नाही. म्‍हणून तक्रारकर्ताने सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

3. तक्रारकर्ताने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, तक्रारकर्ताने सामनेवाला यांना दिलेली रक्‍कम व तक्रारकर्ता यांना नुकसान भरपाई म्‍हणून 2,00,000/- रुपये व्‍याजासह द्यावेत. तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक, मानसिक त्रासाबाबत नुकसान भरपाई व या तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.

4. तक्रारकर्ताची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीस काढण्‍यात आली. सामनेवाला हे नोटीस प्राप्‍त होऊन ते प्रकरणात हजर झाले नाही. सबब त्‍यांचे विरुध्‍द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचे आदेश निशाणी 1 वर पारीत करण्‍यात आले.

5. तक्रारकर्ताने दाखल तक्रार, दस्‍तावेज, शपथपत्र साक्षीपुरावा, व तोंडी युक्‍तीवादावरुन मंचासमक्ष खालील निष्‍कर्षाप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

निष्‍कर्ष

6.   तक्रारकर्ताने त्‍याचे पुतणीचे विवाहाकरीता सामनेवालाकडे दिनांक 01.12.2016 रोजी मंगल कार्यालय बुक केले होते. व त्‍याकरीता अॅडव्‍हान्‍स रक्‍कम म्‍हणून रुपये 11,000/- सामनेवालाला दिली आहे, ही बाब निशाणी 6 वरील दाखल केलेले दस्‍त क्रमांक 1 वरील पावतीवरुन सिध्‍द होते. सबब तक्रारकर्ता हे सामनेवालाचे ग्राहक आहेत असे सिध्‍द होते. त्‍याकरीता तक्रारकर्ताने त्‍या कार्यालयाचा पत्‍ता नमुद करुन लग्‍न पत्रीका छापल्‍या होत्‍या ही बाब निशाणी 6 वर दस्‍त क्रमांक 2 वरुन सिध्‍द होते. सामनेवाला यांना नोटीस प्राप्‍त होऊन ते प्रकरणात हजर झाले नाही व त्‍यांची बाजु मांडली नाही. निशाणी 1 वर सदर प्रकरण त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा चालविण्‍याचे आदेश पारीत करण्‍यात आले असून तक्रारकर्ताने तक्रारीत लावलेले आरोप सामनेवाला विरुध्‍द सिध्‍द होतात. तक्रारकर्ताला सामनेवालाने बुकींग रद्द केले असल्‍याने नविन मंगल कार्यालय बुक करावे लागले व त्‍याकरीता नविन लग्‍न पत्रीका छापाव्‍या लागल्‍या. सामनेवाला यांना नोटीस पाठविली होती, त्‍याची दखल सामनेवाला यांनी घेतली नाही. तक्रारकर्ताला नविन मंगल कार्यालय बुक केल्‍यावर ते 22 किलोमीटर अंतर असल्‍याने तक्रारकर्ता यांचे नातेवाईकांना जाण्‍यायेण्‍यासाठी प्रवासी वाहनाची सोयीसाठी खर्च 30,000/- रुपये आला. तसेच दुसरे मंगल कार्यालय बुक केल्‍यामुळे त्‍यांना ज्‍यादा भाडे रु.21,000/- द्यावे लागले, तसेच रुपये 10,000/-  नविन लग्‍न पत्रीका छापण्‍याकरीता खर्च आला.तक्रारकर्ताने दाखल निशाणी 20 व 21 वर साक्षीपुराव्‍याचे शपथपत्राव्‍दारे सिध्‍द होते की, सामनेवालाने तक्रारकर्ताने बुकींग केलेले मंगल कार्यालय कोणतीही सुचना न देता रद्द केले ही बाब सामनेवालाने तक्रारकर्ताप्रति अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे सिध्‍द होते. सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारकर्ताची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना रक्‍कम रु.72,000/- (रक्‍कम रु.बाहत्‍तर हजार फक्‍त) तक्रारकर्तास झालेल्‍या नुकसान भरपाईपोटी द्यावे.

3.   सामनेवाला यांनी तक्रारकर्ता यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- (रक्‍कम रु.दहा हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 5,000/- (रक्‍कम रु.पाच हजार फक्‍त ) तक्रारकर्ताला द्यावे.

4. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

5. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

6. तक्रारकर्ता यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.