नि. १५
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचे समोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १९६७/२००९
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख : १३/७/२००९
तक्रार दाखल तारीख : २१/०७/२००९
निकाल तारीख : ३०/०९/२०११
------------------------------------------------------------
श्री राजेंद्र लक्ष्मण झेंडे
व.व.४२, धंदा व्यापार
रा.शिवनेरी नगर, गणपती देवालयाजवळ,
मिरज ता.मिरज जि. सांगली ..... तक्रारदारú
विरुध्दù
१. लक्ष्मी इलेक्ट्रीकल्स ऍण्ड इलेक्ट्रॉनिक्स तर्फे
प्रोप्रा.एन आचार्य, रा.शॉप नं.१५, लक्ष्मी मार्केट
मिरज ता.मिरज
२. बजाज फायनान्स, बजाज ऍटो फायनान्स लि.
पेठ भाग, हरभट रोड, सांगली .....जाबदारúö
तक्रारदारतर्फेò : +ìb÷.श्री.व्ही.एम.कुलकर्णी
जाबदार क्र.१तर्फे : +ìb÷. श्री. के.बी.घेवारे
जाबदार क्र.२ : एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- अध्यक्ष- श्री.अनिल य.गोडसे
१. तक्रारदार यांनी सदरचा तक्रार अर्ज जाबदार यांनी दिलेल्या सदोष सेवेबाबत दाखल केला आहे.
२. सदर तक्रार अर्जाचा थोडक्यात तपशील पुढीलप्रमाणे –
तक्रारदार यांना टीव्ही खरेदी करावयाचा होता. त्यामुळे तक्रारदार हे जाबदार क्र.१ यांचेकडे दि.३१/७/२००६ रोजी गेले. तक्रारदार यांनी शार्प कंपनीचा कलर टीव्ही पसंत केला परंतु सदर टीव्हीची एक रक्कम नसलेने जाबदार यांचेकडे हप्त्याने टीव्ही खरेदीबाबत विचारणा केली असता जाबदार क्र.१ यांनी जाबदार क्र.२ यांचेमार्फत फायनान्स उपलब्ध करुन देतो त्याचे हप्ते आपण भरावेत असे सांगितले. जाबदार क्र.१ यांनी तक्रारदार यांच्या को-या कागदावर सहया घेतल्या व कोरे चेक व बॉण्ड घेतले व तक्रारदार यांचेकडून ऍडव्हान्स म्हणून रु.३,३५९/-इतकी रक्कम भरुन घेतली. जाबदार यांनी तक्रारदार यांचेकडून सर्व पूर्तता करुन घेतली परंतु प्रत्यक्षात टीव्हीची डिलीव्हरी तक्रारदार यांना दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडील पुढील हप्ते भरले नाहीत. त्यामुळे जाबदार क्र.२ यांना दिलेले चेक न वटता परत आले. त्यावेळी जाबदार यांनी तक्रारदार यांना टीव्हीची डिलीव्हरी त्वरित देतो चेक बाऊंस करु नयेत असे सांगितले. त्यामुळे तक्रारदार यांनी रोखीने रक्कम रु.१,०४२/- असे एकूण रु.२,०८४/- जाबदार यांचेकडे जमा केले तथापि, टीव्हीची डिलीव्हरी दिली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी पुढील हप्ते भरले नाहीत. जाबदार नं.२ यांनी तक्रारदार यांना दि.११/५/२००९ रोजी थकीत कर्ज नोटीस पाठविली. थकीत नोटीस अर्जदार यांना पोचल्यावर तक्रारदार यांच्या असे लक्षात आले की, जाबदार यांनी कर्जखात्याच्या स्टेटमेंटला टीव्हीचे मॉडेल वेगळे दाखविले आहे सदरचे मॉडेल हे जास्त किंमतीचे आहे. जाबदार यांनी दिलेल्या या सदोष सेवेमुळे तक्रारदार यांनी जाबदार यांना दि.१५/६/०९ रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस मिळूनही जाबदार यांनी त्याचे उत्तर पाठविले नाही व मागणीप्रमाणे रक्कम अदा केली नाही, त्यामुळे तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जासोबत नि.३ ला शपथपत्र व नि.५ चे यादीने ८ कागद दाखल केले आहेत.
३. जाबदार क्र.१ यांनी याकामी नि.९ ला आपले म्हणणे दाखल केले आहे. जाबदार यांनी तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारला आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांनी टीव्ही मॉडेल नं.२१एफए३३०१ हा पसंत केला होता. परंतु आपली पसंती बदलून २१एनई६० हा टीव्ही खरेदी केला व सदर टीव्हीचीच डिलीव्हरी अर्जदारांना दिली. त्याबाबतच्या डीलीव्हरी चलनाची सत्यप्रत याकामी दाखल केली असून त्यावर अर्जदारची सही आहे. जाबदार क्र.२ यांनी सदर टीव्ही खरेदीसाठी फायनान्स केला असून जाबदार क्र.१ यांना टीव्हीच्या किंमतीपैकी मार्जिन मनी वगळता उर्वरीत रकमेचा चेक अदा केला आहे व त्यानुसार अर्जदार यांनी ठरलेल्या हप्त्यांपैकी दोन हप्ते भरले आहेत. अर्जदार म्हणतात त्याप्रमाणे टीव्हीच दिला नसता तर त्याने मार्जिन मनी व दोन हप्ते भरले नसते. तक्रारदार याने खोडसाळ बुध्दीने सदरचा तक्रारअर्ज केला आहे. तक्रारदार यांना शार्प कलर टीव्ही मॉडेल नं. २१एफए३३०१ चे त्यांचेकडे असलेले डीलीव्हरी चलन तक्रारदार याच्या मागणीनुसारच रद्द केले व मागणी करुनही तक्रारदार याने ते डिलीव्हरी चलन परत केले नाही व नवीन मॉडेल पसंत करुन २१एनई६० हा टीव्ही रक्कम रु.१२,५००/- चा ता.१/८/२००६ रोजी खरेदी केला. अर्जदारांना टीव्ही दिला नसता तर त्यांनी सन २००६ मध्येच तक्रार केली असती परंतु तक्रारदारांनी जाबदार यांचे कर्ज बुडविण्याच्या हेतूने सदरचा तक्रारअर्ज केला आहे. तरी तक्रारदार यांचा तक्रारअर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी नि.१० ला शपथपत्र व नि.११ चे यादीने ५ कागद दाखल केले आहेत.
४. जाबदार क्र.२ यांना नोटीस मिळूनही ते याकामी हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.१ वर करण्यात आला आहे.
५. तक्रारदार यांनी नि.१४ ला आपला लेखी युक्तिवाद दाखल केला आहे. जाबदार यांनी कोणताही लेखी युक्तिवाद दाखल केला नाही. तक्रारदार यांनी लेखी युक्तिवादाप्रमाणेच तोंडी युक्तिवाद आहे असे नमूद केले.
६. तक्रारदार यांचा तक्रारअर्ज, दाखल करण्यात आलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी आपल्या तक्रारअर्जामध्ये जाबदार यांनी ठरल्याप्रमाणे आपल्याला टी.व्ही.दिला नाही असे नमूद केले आहे. तक्रारदार व जाबदार यांचेतील व्यवहार पाहता सदरचा व्यवहार हा २००६ सालातील आहे. तक्रारदार यांनी याकामी डीलीव्हरी चलन क्र.९३५३ ची प्रत दाखल केली आहे. सदर चलनावर तक्रारदार यांची सही नाही. परंतु सदर चलन तक्रारदार यांचेकडे कसे आले हा प्रश्न उपस्थित होतो. जाबदार यांनी याकामी नि.११/१ वर दि.१/८/२००६ रोजीच्या क्रेडीट मेमोची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये तक्रारदार यांचे नावे शार्प कलर टीव्ही रक्कम रु.१२,५००/- किंमतीची खरेदी दाखविली आहे व त्याच्या लगत डिलीव्हरी चलन ९३५१ जोडली आहे. जाबदार यांनी आपल्या म्हणण्यामध्ये तक्रारदार यांना दि.३१/७/२००६ रोजी डिलीव्हरी चलन दिले होते ते त्यांनी परत केले नाही, रद्द केले असे नमूद केले आहे व तक्रारदार यांनी पसंत केलेला टीव्ही रद्द करुन मॉडेल क्र.२१ एनई ६० दि.१/८/२००६ रोजी देण्यात आला. तक्रारदार या बाबीस आक्षेप घेतला आहे व सदरची बाब जाबदार यांनी नंतर दाखविली आहे असे नमूद केले आहे. जाबदार क्र.१ यांनी दाखल केलेले क्रेडीट मेमो व डीलीव्हरी चलनाची प्रत याचे अवलोकन केले असता क्रेडीट मेमोवर Sharp colour TV Model No. 21 NE 60 नमूद आहे. तक्रारदार यांनी याकामी जाबदार यांचेकडे भरलेल्या दि.१६/१०/२००६ व ३१/१०/२००६ रोजीच्या हप्त्याच्या पावत्या दाखल केल्या आहेत. तक्रारदार यांस जाबदार यांनी दि.१/८/२००६ रोजी टीव्हीच दिला नसेल तर व टीव्ही देण्याबाबत वाद असेल तर तक्रारदार यांनी त्यानंतर जवळजवळ २ ते ३ महिन्यांनी सदर हप्त्याची रक्कम जाबदार यांना का अदा केली ? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. सदर हप्त्याची रक्कम अदा केल्यानंतरही २००६ पासून २००९ पर्यंत तक्रारदार यांनी कोणतीही तक्रार केली नाही. जाबदार क्र.२ यांनी ११ मे २००९ रोजी थकबाकीची नोटीस पाठविलेनंतर तक्रारदार यांनी दि.१५/६/२००९ रोजी टीव्ही मिळाला नाही वगैरे कथन करुन दोन्ही जाबदारांना नोटीस पाठविली आहे. जाबदार क्र.२ यांच्याकडून नोटीस येईपर्यंत आपणाला टीव्ही मिळाला नाही अशी तक्रार तक्रारदार यांनी कुठेही लेखी केलेली दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी नमूद केल्याप्रमाणे त्यांना टीव्हीच मिळाला नाही या त्यांच्या कथनामध्ये तथ्य दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार यांची मागणी मंजूर करणे संयुक्तिक होणार नाही असे या मंचाचे मत झाले आहे.
७. तक्रारदार व जाबदार यांचेतील व्यवहार २००६ सालातील आहे. तक्रारदार यांनी जाबदार क्र.२ यांचेकडे दोन हप्ते जमा केलेले आहे. सदरचा हप्ता हा दि.३१/१०/२००६ रोजी भरला आहे. २००६ नंतर तक्रारदार यांनी सदरचा तक्रारअर्ज २००९ मध्ये दाखल केला आहे. तक्रारदार यांना टीव्ही मिळाला नसेल तर त्यांना तक्रारअर्ज करण्यास कारण २००६ मध्येच घडले आहे. तक्रारीस कारण घडल्यापासून २ वर्षाचे आत तक्रारअर्ज दाखल करणे गरजेचे असताना तक्रारदार यांनी विलंबाने तक्रारअर्ज दाखल केला आहे. तो मुदतबाहय झाला आहे असे या मंचाचे मत आहे.
वरील सर्व विवेचनावरुन सदरचा मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहेत.
२. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
सांगली
दि. ३०/०९/२०११
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली.
प्रत: तक्रारदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११
जाबदार यांना हातपोहोच/रजि.पोस्टाने दि.//२०११