(आदेश पारित द्वारा मा. अध्यक्ष, श्री. अतुल दि. आळशी)
(पारित दि. 30 ऑगस्ट, 2014)
तक्रारकर्ता हा गोंदीया येथे राहात असून Cause of action गोंदीया येथे घडल्यामुळे तसेच विरूध्द पक्ष कुरिअर सर्व्हीसद्वारे तक्रारकर्त्याच्या वस्तु दिलेल्या पत्त्यावर न पोहोचविल्यामुळे नुकसानभरपाई मिळण्यासाठी सदरहू तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याच्या पत्नीने तिचे जावई श्री. अंकितजी बन्सल यांच्या नावाने सुधीर सिंथेटिक, गोंदीया येथून रू. 29,700/- किमतीच्या साड्या खरेदी केल्या. विरूध्द पक्ष 1 हे गोंदीया येथील कुरिअर सर्व्हीस असून ते विरूध्द पक्ष 2 ब्लेझफ्लॅश कुरिअर यांच्याकरिता काम करतात. विरूध्द पक्ष 3 हे विरूध्द पक्ष 2 चे वरिष्ठ कार्यालय आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना दिनांक 08/03/2012 रोजी कुरिअर बॉक्स अंकितजी बन्सल ह्यांना सिकर, राजस्थान येथे deliver करण्यासाठी दिली. तक्रारकर्त्याने delivery charges पोटी विरूध्द पक्ष यांना रू.600/- दिले. विरूध्द पक्ष यांनी त्यासंबंधात पावती तक्रारकर्त्यास दिली व 7 दिवसात Addressee ला वस्तुची delivery केल्या जाईल असे सांगितले.
3. दिनांक 16/03/2012 ला अंकितजी बन्सल यांना दूरध्वनीद्वारे विचारणा केली असता त्यांना कुरिअर मिळाले नाही असे त्यांनी तक्रारकर्त्यास सांगितले. तक्रारकर्त्याचे कुरिअर Addressee ला न मिळाल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे वारंवार चौकशी केली. परंतु Courier Box विरूध्द पक्ष यांना सुध्दा मिळून आला नाही असे विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास सांगितले.
4. तक्रारकर्त्याला Cause of action दिनांक 08/03/2012 रोजी गोंदीया येथे उद्भवल्यामुळे तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांनी केलेल्या सेवेतील त्रुटीबद्दल रू. 30,300/-, मानसिक त्रासापोटी रू. 5,000/- आणि तक्रारीच्या खर्चापोटी रू. 2,500/- मिळण्यासाठी सदरहू तक्रार न्याय मंचात दाखल केली आहे.
5. तक्रारकर्त्याची तक्रार विद्यमान न्याय मंचाने दिनांक 26/02/2013 रोजी दाखल करून घेतल्यानंतर विरूध्द पक्ष यांना मंचामार्फत नोटीसेस बजावण्यात आल्या.
विरूध्द पक्ष 1 यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दिनांक 23/04/2013 रोजी आपला जबाब मंचात दाखल केला.
विरूध्द पक्ष 2 व 3 यांना नोटीस मिळूनही ते सदरहू प्रकरणात हजर न झाल्यामुळे अथवा लेखी जबाब सुध्दा दाखल न केल्यामुळे विरूध्द पक्ष 2 व 3 यांच्याविरूध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 18/03/2014 रोजी पारित करण्यात आला.
विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे खंडन केले असून तक्रारकर्त्याने दाखल केलेली कुरिअरची पावती ही ओरिजनल नाही तसेच विरूध्द पक्ष 1 हे विरूध्द पक्ष 2 व 3 चे एजंट असल्यामुळे ते नुकसानभरपाई देण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे. विरूध्द पक्ष 2 व 3 यांच्या कुरिअर पावतीनुसार Domestic goods असल्यास व त्या वस्तूचा विमा काढला गेला नसल्यास विरूध्द पक्ष 1 हे रू. 100/- पर्यंत नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत. विरूध्द पक्ष 1 यांची कुठल्याही प्रकारे सेवेत त्रुटी नसल्यामुळे त्यांच्याविरूध्द सदरहू तक्रार खारीज करण्यात यावी.
6. तक्रारकर्त्याने तक्रारीसोबत सुधीर सिंथेटिक, गोंदीया येथील साडीचे बिल पृष्ठ क्र. 11 वर दाखल केले असून ब्लेझफ्लॅश कुरिअर लिमिटेड ची पावती पृष्ठ क्र. 12 वर दाखल केली आहे.
7. तक्रारकर्त्याचे वकील ऍड. एन. एस. पोपट यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याच्या पत्नीने सुधीर सिंथेटिक, गोंदीया येथून अंकितजी बन्सल यांना पाठविण्यासाठी 10 साड्या विकत घेतल्या होत्या व त्यासंबंधीचे दिनांक 04/02/2012 रोजीचे बिल सदरहू प्रकरणामध्ये पृष्ठ क्र. 11 वर दाखल केले आहे. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना कुरिअरने साड्या Addressee ला पाठविण्याकरिता दिल्या व त्याबद्दल विरूध्द पक्ष 1 यांनी दिनांक 08/03/2012 रोजीची रू. 600/- ची पावती क्रमांक 222401367 तक्रारकर्त्याला दिली. त्यामुळे क्रारकर्ता हा विरूध्द पक्ष यांचा ग्राहक असल्यामुळे व विरूध्द पक्ष 1 यांनी तक्रारकर्त्याचे कुरिअर Addressee ला आतापर्यंत न पोहोचविल्यामुळे तसेच त्याबाबत कुठलेही संयुक्तिक कारण न दिल्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर करण्यात यावी.
8. विरूध्द पक्ष 1 चे वकील ऍड. एस. बी. राजनकर यांनी असा युक्तिवाद केला की, तक्रारकर्त्याने सदर प्रकरणात ओरिजनल पावती दाखल केलेली नाही. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेले बिल हे अंकित बन्सल या नावाने असून सदरहू तक्रारीमधील तक्रारकर्ता हा दिलीप अग्रवाल आहे. त्यामुळे सदरहू तक्रार दाखल करण्याचा अधिकार तक्रारकर्त्यास नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात यावी. विरूध्द पक्ष यांच्या कुरिअरच्या पावतीवर कुरिअर सर्व्हीसची liability ही Domestic goods करिता रू. 100/- पर्यंत व International goods करिता रू. 1,000/- पर्यंत राहील असा clause बिलामध्ये समाविष्ट केला असल्यामुळे तक्रारकर्त्याच्या हरविलेल्या वस्तुकरिता विरूध्द पक्ष 1 हे रू. 100/- पर्यंत नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत. त्यामुळे तक्रारकर्त्याची अतिरिक्त नुकसानभरपाईची तक्रार खारीज करण्यात यावी.
9. तक्रारकर्त्याचा तक्रारअर्ज, तक्रारीसोबत दाखल केलेली कागदपत्रे, विरूध्द पक्ष 1 यांचा लेखी जबाब तसेच दोन्ही बाजूच्या वकिलांचा तोंडी युक्तिवाद यावरून खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निर्णय |
1. | तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? | होय |
2. | या तक्रारीचा अंतिम आदेश काय? | कारणमिमांसेप्रमाणे |
- कारणमिमांसा –
10. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष 1 यांना दिलेले कुरिअर हे Addressee च्या पत्त्यावर पोहोचविण्यात विरूध्द पक्ष 1 असमर्थ ठरले हे सिध्द होते. तसेच तक्रारकर्ता हा ग्राहक असल्याबद्दल विरूध्द पक्ष 1 यांनी दिलेल्या रू. 600/- च्या कुरिअर पावतीवरून सिध्द होते.
11. विरूध्द पक्ष 1 यांनी आपल्या जबाबात मान्य केले आहे की, विरूध्द पक्ष 1 हे विरूध्द पक्ष 2 व 3 यांचे एजंट आहेत. विरूध्द पक्ष 1 यांनी कबूल केले आहे की, कुरिअर पावतीमध्ये समाविष्ट केलेल्या clause नुसार domestic goods जर addressee ला deliver झाले नाही तर liability म्हणून रू. 100/- देण्यास ते बाध्य आहेत. विरूध्द पक्ष यांनी कुरिअर पावतीमध्ये समाविष्ट केलेला limited liability clause हा Law of contract च्या विरूध्द असल्यामुळे तो तक्रारकर्त्यावर बंधनकारक नाही. तक्रारकर्त्याने पाठविलेले कुरिअर Addressee ला न मिळाल्याबद्दल तक्रारकर्त्याने वारंवार विरूध्द पक्ष यांच्याकडे विचारणा केली असता त्याला न मिळालेले संयुक्तिक उत्तर म्हणजे विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी होय.
12. तक्रारकर्त्याने कुरिअर पाठवितांना कुरिअरमध्ये समाविष्ट केलेल्या articles चे प्रमाण सदर तक्रारीत सादर न केल्यामुळे व ते सिध्द न केल्यामुळे तक्रारकर्त्याने तक्रारीत केलेली साड्यांबद्दलच्या रकमेची मागणी मिळण्यास तक्रारकर्ता पात्र नाही. कारण तक्रारकर्त्याने Courier द्वारे कोणते Article पाठविले ह्याबद्दल Cogent evidence उपलब्ध नाही. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे कुरिअर Addressee ला तक्रार दाखल करेपर्यंत न पोहोचविणे व Courier article addressee ला न मिळाल्याचे कबूल केलेले असल्यामुळे म्हणजेच विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे विरूध्द पक्ष हे तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई देण्यास जबाबदार आहेत असे मंचाचे मत आहे.
करिता खालील आदेश.
-// अंतिम आदेश //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास नुकसानभरपाई म्हणून रू. 10,000/- द्यावे.
3. विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांना आदेश देण्यात येतो की, या तक्रारीचा खर्च म्हणून त्यांनी तक्रारकर्त्यास रू. 5,000/- द्यावे.
4. विरूध्द पक्ष 1, 2, 3 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी या आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांचे आंत करावे.