(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीक रित्या तक्रार कलम 9 मध्ये नमूद केल्याप्रमाणे रु.5,00,000/- मिळावेत, अन्य न्याय्य व योग्य हुकूम व्हावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.29 लगत लेखी म्हणणे, पान क्र.30 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे. सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.37 लगत इंग्रजी भाषेमध्ये लेखी म्हणणे, पान क्र.38 अ लगत मराठी भाषेमध्ये लेखी म्हणणे, पान क्र.38 लगत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे.
मुद्देः
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?-होय.
तक्रार क्र.153/2011
2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय?- होय. सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे.
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला नं.2 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून पत्रव्यवहाराचे खर्चापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. अर्जदार हे सामनेवाला नं.2 यांचेकडून पत्रव्यवहाराचे खर्चापोटी व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत.
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे व अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
विवेचन
याकामी अर्जदार यांनी पान क्र.73 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला नं.1 यांनी पान क्र.49 लगत व सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.79 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी यांनी त्यांचे लेखी म्हणणे कलम 8 मध्ये अर्जदार हे सन 1988 पासून सामनेवाला यांचे ग्राहक आहेत ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.16 ते पान क्र.18 लगत गॅस बुकची झेरॉक्स प्रत हजर केलेली आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, व पान क्र.16 ते पान क्र.18 ची गॅसबुकची झेरॉक्स यांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांना तक्रार दाखल करण्यास काहीही कारण घडलेले नाही. अर्जदार हे सामनेवाला यांचेविरुध्द सतत तक्रारी करत असतात. अर्जदार हे महाराष्ट्र लोकहीत पंचायतीचे सेक्रेटरी आहेत असे दिसते. अर्जदार यांच्या स्वतःच्या तक्रारी सदर संस्थेमार्फत मांडत असतात. अर्जदार यांनी प्रस्तुत तक्रारी ज्या ज्या तक्रारी उपस्थित केलेल्या आहेत त्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच एच पी सी एल कंपनीचे वरीष्ठ अधिकारी यांचेकडे आहे. अर्जदार यांनी पोलिसांपर्यंत तक्रारी केलेल्या आहेत परंतु त्यात तथ्य आढळून न आल्यामुळेच सामनेवाला यांचेविरुध्द
तक्रार क्र.153/2011
कारवाईचा प्रश्नच आला नाही. सर्व तांत्रीक बाबीत निर्दोष ठरल्यानंतर ग्राहक मंचाकडे तक्रार केलेली आहे. ती कायद्याने चालु शकत नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदाराला कंपनीने दोन गॅस सिलेंडर पुरविलेले आहे. त्यामुळे अर्जदाराकडे कायम एक गॅस सिलेंडर उपलब्ध असते. अर्जदार यांनी नंबर लावल्यानंतर उशीरात उशीरा दहा दिवसात गॅस मिळालेला आहे. गॅस सिलेंडरचा अवैध वापर चालु असेल तरच गॅस कमी पडु शकतो अन्यथा घरगुती स्वयंपाकाकरीता गॅस पुरवला असल्यास अर्जदाराकडे कायम एक भरलेले सिलेंडर उपलब्ध आहे. ग्राहकांना दोन सिलेंडर पुरवण्याचा उद्देश तोच आहे. सबब अर्जदारास काहीही त्रास झालेला नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांनी अर्जदारास नेहमीच विलंबाने गॅस दिला हे म्हणणे खरे नाही. ग्राहकाची मागणी आणि गॅस सिलेंडरची उपलब्धता यात तफावत पडते. त्यामुळे गॅसचा नंबर लावल्याबरोबर लगेच गॅस सिलेंडर उपलब्ध होतेच असे नाही. या कारणाने एच पी सी एल कंपनीच्या नियमानुसार ज्याप्रमाणे गॅस सिलेंडरची नोंदणी होइ्रल त्याप्रमाणे नोंदणी रजिष्टर ठेवणे सक्तीचे आहे. तसेच त्यावर कोणत्या क्रमाने गॅस सिलेंडर दिले गेले ही माहितीही नमूद केलेली असणे गरजेचे आहे हे रजिष्टर कोणत्याही ग्राहकाला केव्हावी पाहता येते. ज्या क्रमाने गॅसची मागणी नोंदली त्याच क्रमाने गॅसचा पुरवठा करणे या सामनेवालावर बंधनकारक आहे. त्यामुळे गॅस सिलेंडर देण्यात नंबर लावल्यापासून काही कालावधी लागु शकतो. परंतु गॅस ग्राहकाकडे दुसरा सिलेंडर उपलब्ध असल्यामुळे अडचण येत नाही. गॅस ग्राहकाने गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर करु नये या उद्देशानेच घरगुती गॅसच्या बाबतीत पहिला गॅस सिलेंडर घेतल्यावर 21 दिवसपर्यंत दुसरा सिलेंडर देवु नये असा संकेत आहे.अर्जदाराने त्याहीपेक्षा लवकर सिलेंडर घेतलेले आहे. सामनेवाला यांचे सर्व रजिष्टर कधीही तपासता येतील ते पाहिले तर प्रतिक्षायादीतील क्रमाप्रमाणे गॅस सिलेंडर दिलेले असल्याने सामनेवाला यांचे सेवेत त्रुटी नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी कमी गॅस पुरवला जातो अशी तक्रार वजनमाप खात्याकडे केल्यामुळे त्यांनी सामनेवाला यांचे गोडावून मधील उपलब्ध सिलेंडर्सचे वजन तपासले असता जेवढे वजन असायला हवे त्यापेक्षा किंचीत जास्तच भरले आहे. ही बाब दोन तपासण्यात लक्षात आलेली आहे.” असे म्हटलेले आहे.
तक्रार क्र.153/2011
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “सामनेवाला यांचे कर्मचारी यांचेविरुध्द ते उध्दट वागतात अशी तक्रार कोणीही केलेली नाही. उलटपक्षी अर्जदारच सामनेवाला यांचेकडून डिलीव्हरी देण्याकरीता गेलेल्या गरीब मुलांशी अरेरावीने वागतात. त्यांना दहा मिनीटे बाहेर उभे करुन ठेवतात. गॅस बदलायला स्वयंपाकघरात पाय ठेवु देत नाहीत. सामनेवाला यांचेकडे ग्राहकांची संख्या 22,000 पेक्षा जास्त आहे. या सर्व ग्राहकांना उत्तम सेवा दिली जाते. अर्जदाराच्या मानसिक छळाला कंटाळून सामनेवाला यांनी शेवटी अर्जदार यांना तुमच्या पसंतीच्या दुस-या गॅस सिलेंडर वितरकाकडे तुमचे कनेक्शन वर्ग करुन देतो असे सांगून सुध्दा अर्जदार यांनी ते ऐकले नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी दि.6/7/2009 रोजी गॅसचा नंबर लावला आणि त्याच्या दुस-या दिवशी म्हणजे दि.7/7/2009 रोजी गॅस सिलेंडर प्राप्त झाला मात्र गॅस पुरवठा पावतीवर अर्जदाराने काहीही तक्रार नमून न करता सिलेंडर चांगल्या स्थितीत मिळाल्याचे कबूल केलेले आहे. त्यावेळी अर्जदार यांनी सिलेंडर मुदतबाहय असल्याची तक्रार केलेली नाही. तसेच गॅस सिलेंडर ताब्यात घेतेवेळी त्यावर ए 2008 लिहीलेले आहे त्यामुळे हा मुदत बाहय सिलेंडर आहे असे सांगून डिलीव्हरी घेण्याचे नाकारलेही नाही. याशिवाय नंतरही या सामनेवाला यांचेकडे गॅस सिलेंडर हा मुदतबाहय आहे बदलून द्यावा अशी तक्रार केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचा तक्रार अर्ज खरा नाही व सामनेवाला यांस कबूल नाही. सामनेवाला हे अर्जास आवश्यक पक्षकार नाहीत. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(कंपनी) हे संपुर्ण देशभर एल पी जी गॅस सिलेंडरकरता वितरकांची नियुक्ती करतात. प्रस्तुत तक्रारीतील दुसरे सामनेवाला हे सामनेवाला क्र.1 यांचे डिलर आहेत. त्यांचेसोबत गॅस वितरणाचा करार केलेला आहे. या करारातील कलम 18 मधील मजकुरानुसार ग्राहकासोबत जे व्यवहार होतात त्याबाबतीत सामनेवाला क्र.1 हा प्रिन्सीपल आहे व या कारणाने अर्जदाराला सामनेवाला विरुध्द तक्रार अर्ज करण्यास काहीही कारण घडलेले नाही. 1994(2) सी पी आर 651 मध्ये सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेल्या निकालानुसार प्रस्तुत तक्रारीप्रमाणे तक्रारी या सामनेवाला विरुध्द या मंचामध्ये चालु शकत नाहीत. यात ग्राहकाबरोबरच्या व्यवहारात डिलर हाच प्रिन्सीपल असतो असे तत्व निश्चीत करण्यात आलेले आहे.” असे म्हटलेले आहे.
तक्रार क्र.153/2011
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “गॅस सिलेंडरच्या बाबतीत कायमच मागणीपेक्षा पुरवठा कमी असतो त्यामुळे त्याबाबतीतील नियम असा आहे की प्रत्येक डिलरने वेटींग लिस्ट ठेवली पाहीजे आणि गॅस सिलेंडरचे वाटप करतेवेळी प्रतिक्षायादीतील क्रमानुसारच वाटप केले पाहीजे बहुसंख्य ग्राहकांना दोन सिलेंडर पुरविलेले असतात यामुळे ग्राहक साधारण एक सिलेंडर पुरवले गेल्याच्या 20 ते 25 दिवसानंतर पुढील सिलेंडरची मागणी नोंदवतात त्यामुळे अडचणी येत नाहीत. आजमितीस प्रतिक्षायादीची पध्दत वापरली जाते. ती त्या एजन्सीच्या सर्व ग्राहकांना तपासण्याकरता उपलब्ध असते.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “उशीरा पुरवठयाबाबतच्या तक्रारीबाबत चौकशी सामनेवाला यांनी केलेली आहे. त्यामध्ये प्रतिक्षा यादीप्रमाणेच ग्राहकांना गॅस दिलेला आढळून आला. प्रस्तुतच्या ग्राहकालाही प्रतिक्षायादी प्रमाणेच गॅस पुरवण्यात आलेला आहे. अर्जदाराने अर्जामध्ये ज्या तारखा सिलेंडरला नंबर लावल्याच्या आणि सिलेंडर मिळाल्याच्या दिल्या आहेत त्या पाहता 16 वेळा तर त्यामध्ये कोणताही उशीर झालेला दिसत नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “ग्राहकास सिलेंडरमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळून आल्यास असे सिलेंडर स्विकारणे त्याचेवर बंधनकार नाही. एकदा सिलेंडर ग्राहकाने स्विकारला की डिलरने दिलेल्या गॅस सिलेंडरविषयीच पुढील तक्रार आहे काय याची शहानिशा करता येणे शक्य नाही. अर्जदार यांनी विनातक्रार गॅस स्विकारला आहे. अर्जदार यांनी तक्रार केल्यानंतर सामनेवाला नं.2 यांनी डिलीव्हरी दिलेल्या त्या सिलेंडरची पावती तपासली. त्या पावतीवर सिलेंडरचे वजन तपासले आहे व सिलेंडर सुस्थितीत मिळाला आहे असा मजकूर आहे. सामनेवाला यांनी मुदतबाहय सिलेंडर दिला हे म्हणणे खरे नाही. 17 ते 18 महिने एक्सपायरी झालेला स्टॉक दिला हे खरे नाही. सिलेंडरमधील गॅस हा औषधाप्रमाणे मुदतीबाहय होत नाही. एल.पी.जी. भरण्याकरीता कंपनीच्या कारखान्यात सदोष सिलेंडर स्विकारलेच जात नाही. कारण गॅस भरण्यापुर्वी सिलेंडरची तपासणी केली जाते.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी ज्या सिलेंडरबद्दल तक्रार करत आहे तो सिलेंडर नाशिक सि एस ओ यांनी तपासणीकरता प्रस्तुत सामनेवाला कडे दिला. त्या सिलेंडरची संपुर्ण तपासणी केल्यावर 1) सिलेंडरचा नंबर 31633, 2) स्टे प्लेटवर नमूद टेअरवेट 17.2 किलो. 3) सिलेंडरवर असलेले टेअरवेट, स्टेन्सील्ड 16.9 किलो, 4) सिलेंडरची फुटरीग तुटकी
तक्रार क्र.153/2011
क्षतीग्रस्त, 5) टॉप रिंगला बारीक चीर, 6) स्टे प्लेट मार्किंगवर काही ठिकाणी पुर्नलेखन, 7) प्रेशर तपासणीची नियत तारीख ए-08, 8) सिलेंडरचे एस.सी.व्हॉल्व्हवर बसवलेली कॅप ही एच पी गॅसची नसून इन्डेनची आहे. 9) पी.व्ही.सी. सिल हे अर्धवट तुटलेले आहे जे एच पी सी एल च्या सिलींग परिमाणाप्रमाणे नाही.10) सिलंगच्या दर्जावरुन असे दिसून येते की ते सिलींग हे हॉट एअर सिलींग मशिनद्वारे केलेले नाही. एच पी सी एल च्या प्लॅन्टमध्ये सिलेंडरचे सिलींग हे हॉटएअर सिलींग मशिनने केले जाते. हे मुद्दे आढळले.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “वरील मुद्दयांचा विचार करता असे स्पष्ट आहे की सदरचे सिलेंडरचा पुरवठा हा सामनेवाला नं.2 यांनी केलेला नाही. सिलेंडरची फुटरिंग ही मोडकी आहे. एच पी सी एल कडे सिलेंडरच पुर्नभरणाकरता पुर्णपणे स्वयंचलित यंत्रणा आहे. असे मोडके सिलेंडर सदर यंत्रणेमध्ये गॅस भरण्याकरता जरी गेले तरी ते एका बाजुने कलणारे असल्याने त्यामध्ये गॅस भरला जावु शकत नाही व त्यात त्यामुळे गॅस भरलाही जात नाही. सिलेंडरची फुट रिंग ही सुस्थितीत नसल्याकारणाने सिलेंडर ट्रकमध्ये एकावर एक ठेवणेही शक्य नाही. एच पी सी एल केवळ एच पी गॅस कॅप्सच वापरते. सिलेंडरवरील टेअरवेट व स्टेन्सील केलेले वजन हे भिन्न आहे. या सर्व त्रुटीवरुन स्पष्ट आहे की सदरचे सिलेंडर हे एच पी सी एल एल पी जी बॉटलिंग प्लान्ट सिन्नर नाशिक येथून रवाना केलेले नाही. वादातील सिलेंडर हे कंपनीने किंवा सामनेवाला नं.1 ने पुरवले आहे ही बाब तक्रारदार यांनी सिध्द केलेली नाही.” असे म्हटलेले आहे.
तसेच सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांनी यापुर्वी सामनेवाला विरुध्द ज्या ज्या वेळेस पुरवलेल्या गॅस बाबत तक्रारी होत्या त्या वेळेस त्यांनी ती बाब डिलीव्हरी रिसीटवर नमूद केलेली आहे. परंतु वादातील सिलेंडरबाबतची तक्रार तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार पहिल्यांना दि.13/7/2009 रोजी केलेली आहे. वरील तारखा व अर्जदार यांचे वर्तन या बाबी सांगड घातल्या असता अर्जदार यांचा तक्रार अर्ज खरा नाही. अर्जदार ज्या सिलेंडरबाबत तक्रार करीत आहेत ते सिलेंडर सामनेवाला यांनी पुरविलेले नाही.” असे म्हटलेले आहे.
या कामी पान क्र.11 लगत पुरवठा निरीक्षक अधिकारी यांनी केलेल्या दि.17/7/2009 रोजीचे पंचनाम्याची प्रत दाखल आहे या पंचनाम्यानुसार अर्जदार यांचेघरामधून सामनेवाला नं.2 कंपनीचा पिवळया पटटीवर ए-08 असे लिहीलेला व टाकीवर पिवळया अक्षरात 16.9 व काळया अक्षरात 14.2 के जी असे लिहीलेला गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेला आहे असे दिसून येत आहे.
तक्रार क्र.153/2011
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये वादातील सिलेंडर हा सामनेवाला क्र.2 यांचेकडे रिफील झालेला सिलेंडर नाही तसेच सामनेवाला नं.2 यांचे पान क्र.69 चे प्रश्नावलीमध्ये सामनेवालाचा सिलेंडर नाही असा उल्लेख आहे. पान क्र.41 लगत सामनेवाला क्र.2 यांचे प्लँट मॅनेजर यांचा अहवाल दाखल आहे. या अहवालामध्ये सुध्दा वादातील सिलेंडर सामनेवाला नं.2 यांचा नाही असाच उल्लेख आहे. परंतु पान क्र.11 चा पंचनाम्याचा विचार करता वादातील सिलेंडर हा सामनेवाला क्र.2 कंपनीचाच आहे हे स्पष्ट झालेले आहे अर्जदार यांचे ताब्यातून जप्त करण्यात आलेला सिलेंडर जर सामनेवाला नं.2 यांचा नाही असे सामनेवाला यांचे म्हणणे आहे तर पान क्र.11 चे पंचनाम्यात जप्त करण्यात आलेला सिलेंडर हा सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत अर्जदार यांना कसा काय पुरविण्यात आलेला आहे व सामनेवाला क्र.1 यांचे ताब्यात हा सिलेंडर कोणत्या परिस्थिती उपलब्ध झालेला आहे व सिलेंडर अन्य कोणत्या कंपनीचा आहे हे स्पष्ट करण्याकरीता सामनेवाला नं.2 यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत.
सामनेवाला नं.2 यांचे लेखी म्हणणे पान क्र.41 चा सामनेवाला क्र.2 यांचा अहवाल व पान क्र.69 ची प्रश्नावलीची उत्तरे याचा एकत्रीतरित्या विचार करीता सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणणे व पान क्र.41 चा अहवाल व 69 प्रश्नावलीचे उत्तरे ही एकमेकास विसंगत आहेत असे दिसून येत आहे. पान क्र.11 चे पंचनाम्यानुसार अर्जदार यांचे घरातून जप्त करण्यात आलेला सिलेंडर हा सामनेवाला क्र.2 कंपनीचाच आहे हे स्पष्ट झालेले आहे.
सामनेवाला क्र.2 यांचे लेखी म्हणण्यामधील कथन, पान क्र.41 चा अहवाल व पान क्र.68 ची प्रश्नावलीची उत्तरे याचा एकत्रीतरीत्या विचार करता सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचेवरील जबाबदारी अर्जदार व सामनेवाला क्र.1 यांचेवरच ढकलण्याचा प्रयत्न केलेला आहे असे दिसून येत आहे. पान क्र.41 च्या अहवालामध्ये इंडेन कंपनीचा गॅस आहे असा उल्लेख कोठेही दिसून येत नाही. याउलट सामनेवाला क्र.1 यांचे लेखी म्हणणेमध्ये गॅस सिलेंडरवरती इंडेनची कॅप आहे असा उल्लेख आहे. पान क्र.68 चे प्रश्नावलीचे उत्तरामध्ये व प्रश्न क्र.2 चे उत्तरामध्ये गॅस सिलेडर अर्जदारांना पुरविलेलाच नाही असा कोठेही उल्लेख नाही. याचा विचार होता व पान क्र.11 चे पंचनाम्याचा विचार होता सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादन केलेलाच गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर सामनेवाला क्र.1 मार्फत अर्जदार यांना पुरविण्यात आलेला आहे हे स्पष्ट होत आहे.
तक्रार क्र.153/2011
जरी सामनेवाला क्र.2 यांचे म्हणण्यानुसार गॅस सिलेंडर हा मुदतबाहय होत नसला तरी सुध्दा सामनेवाला क्र.2 यांचे म्हणण्यानुसारच गॅस प्रेशर तपासणीची तारीख ही गॅस सिलेंडरवर लिहीलेली असते व त्याप्रमाणेच गॅस सिलेंडर प्रेशर तपासणीची तारीख ए 2008 असा उल्लेख असलेला सिलेंडर सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 मार्फत अर्जदार यांना पुरविलेला आहे हे स्पष्ट होत आहे. गॅस सिलेंडरमध्ये गॅस भरणे गॅस सिलेंडरचे उत्पादन करणे, गॅस सिलेंडरची सुरक्षीतता पाहाणे व प्रेशर तपासणे याची संपुर्ण जबाबदारी ही सामनेवाला क्र.2 यांचेवरच येत आहे. अशा प्रकारे सामनेवाला क्र.2 यांचेवरच जबाबदारी असूनही सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांना सिलेंडरचे प्रेशर तपासणीची तारीख संपून गेलेला म्हणजेच सिलेडरचे वरील भागावर ए 2008 अशी नोद असलेला गॅस सिलेंडर सामेनवाला क्र.1 मार्फत पुरविलेला आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे.
वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला नं.2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 3 मध्ये सामनेवाला क्र.1 बाबत कलम 3 अ ते कलम 3 उ मध्ये काही तक्रारी केलेल्या आहेत. याबाबत अर्जदार यांनी पान क्र.5 ते पान क्र.18 लगत कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. परंतु सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.32 ते पान क्र.36 लगत कागदपत्रांच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. पान क्र.32 ते पान क्र.36 चे कागदपत्रांच्या व पत्रव्यवहाराच्या प्रती याचा विचार होता सामनेवाला क्र.1 यांनी अर्जदार यांचे सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचा योग्य तोच प्रयत्न केलेला आहे असे स्पष्ट दिसून येत आहे. सामनेवाला क्र.1 हे गॅस पुरवठा करणारे डिलर आहेत. गॅसचे सिलेंडरचे उत्पादन, गॅस सिलेंडरची सुरक्षीतता, गॅस सिलेंडरचे वजन या सर्व बाबी सामनेवाला क्र.2 यांचेशी निगडीत आहेत. सामनेवाला क्र.2 यांचेकडून मिळालेल्या गॅस सिलेंडरचे वितरण अर्जदार व अन्य ग्राहकांना करणे इतकीच जबाबदारी सामनेवाला नं.1 यांचेवर आहे वरील सर्व कारणांचा विचार करता सामेनवाला क्र.1 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कोणतीही कमतरता केलेली नाही असे या मंचाचे मत आहे. याचा विचार होता अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचेविरुध्द नामंजूर करण्यात येत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
2012 एन.सी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 287. रामा शंकर यादव विरुध्द
मे.जे.पी.असोसिएटेड लि.
तक्रार क्र.153/2011
वर उल्लेख केल्यानुसार सिलेंडरचे प्रेशर तपासण्याची तारीख ए-2008 संपून गेल्या नंतरचा सिलेंडर सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 मार्फत अर्जदार यांना वितरीत केलेला आहे. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे. सामनेवाला क्र.2 यांचे कृत्यामुळे अर्जदार यांना सामनेवाला बरोबरच अनेकवेळा पत्रव्यवहार करावा लागलेला आहे. तसेच सामेनवाला विरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागलेली आहे. वरील सर्व कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
आर्थिक नुकसान भरपाईचे मागणीबाबत अर्जदार यांनी योग्य तो पुरावा दिलेला नाही.
पान क्र.5 ते पान क्र.15 लगतचे पत्रव्यवहारांच्या प्रती विचारात घेता अर्जदार यांनी सामनेवाला क्र.1 व 2 बाबत वेळोवेळी प्रादेशीक व्यवस्थापक व विक्री अधिकारी, मुख्य व्यवस्थापक, जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत तसेच पोलिसांचेकडे फिर्यादी अर्ज व तक्रारी दाखल केलेल्या आहेत असे स्पष्ट दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडून पत्रव्यवहाराचे खर्चापोटी रक्कम रु.1500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.2 यांचे कृत्यामुळे अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचामध्ये तक्रारी अर्ज दाखल करुन दाद मागावी लागलेली आहे व तक्रारी अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.2 यांचेकडून तक्रारी अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1500/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असेही या मंचाचे मत आहे
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तिवाद, तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तिवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 यांचे विरुध्द नामंजूर करण्यात येत
तक्रार क्र.153/2011
आहे.
2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.2 यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात
येत आहे.
3) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.2 यांनी अर्जदार यांना पुढीलप्रमाणे
रकमा द्याव्यात.
अ) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- द्यावेत
ब) पत्रव्यवहाराचे खर्चापोटी रु.1500/- द्यावेत.
क) तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1500/- द्यावेत.