// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 230/2014
दाखल दिनांक : 28/10/2014
निर्णय दिनांक : 25/02/2015
जितेंद्र डी. मेश्राम
रा. उत्तम नगर, अमरावती
ता.जि. अमरावती : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- लावा इंटरनॅशनल लि.
ए 56 सेक्टर 64.
नोयडा उत्तर प्रदेश स्टेट
इंडिया 201301
- द गुरुनानक मोबाईल सेंटर तर्फे प्रोप्रा.
सिटी कोतवालीचे बाजुला
- लावा सर्व्हीस सेंटर
श्री स्वामी समर्थ सर्व्हीसेस,
जय फोटोचे बाजुला, गजानन बुक डेपोजवळ
गांधी चौक, अमरावती : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. बिजवे
विरुध्दपक्ष 1 ते 3 तर्फे : अॅड. तांबटकर
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..2..
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 25/02/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याने विरुध्दपक्ष क्र. 2 कडून दि. १९.७.२०१४ रोजी लावा आयरीस 406 क्यु हा मोबाईल रु. ६,०००/- खरेदी केला. विरुध्दपक्ष क्र. 1 हे या मोबाईलचे उत्पादन करणारी कंपनी असून विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 ची सेवा पुरविणारी एजंसी आहे.
3. मोबाईल खरेदी नंतर लगेच काही दिवसात त्यात दोष निर्माण झाला त्यामुळे तक्रारदार हा दि. २०.८.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडे गेला असता विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे जाण्याचा सल्ला तक्रारदाराला दिला. दि. २०.८.२०१४ रोजी तक्रारदार हा त्याचा मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 कडे घेवून गेला त्यावेळी त्यात सॉप्टवेअर व स्क्रीन ब्लिंकींगचे दोष होते. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी तक्रारदारास असे सांगितले की, मोबाईल हा 2 दिवसा नंतर दुरुस्त करुन देण्यात येईल व त्याने तो मोबाईल ठेवून घेतला. 2 दिवसा नंतर तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला असतांना मोबाईल मधील दोष तसेच होते. मोबाईल
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..3..
मधील सर्व डाटा हा उडून गेला ज्यामुळे तक्रारदारास फार गैरसोय झाली. त्यानंतर दि. २६.९.२०१४ रोजी तकारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांना पुनश्च मोबाईल मधील दोषाबद्दल सांगितले व त्या दिवशी त्यास यासाठी सुटी काढावी लागली. दि. २६.९.२०१४ रोजी तकारदारास तो मोबाईल परत करण्यात आला परंतु त्यातील दोष हे दूर झालेले नव्हते. मोबाईल दुरुस्तीसाठी विरुध्दपक्षाने तक्रारदारास रु. ५००/- दुरुस्ती खर्च मागितला परंतु तो मोबाईल हा वारंटीमध्ये असल्याने मागता येत नव्हता.
4. तक्रारदाराने असे कथन केले की, त्याचा मोबाईल हा बाहेरच्या कोणत्याही कारणामुळे नादुरुस्त झालेला नाही. विरुध्दपक्ष यांची, मोबाईल हा वारंटी मध्ये असल्याने दुरुस्ती करुन देण्याची जबाबदारी होती परंतु त्याने ती पार पाडली नाही. तक्रारदारास दोषपुर्ण मोबाईल विकला आहे ज्यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व त्यामुळे त्याने हा तक्रार अर्ज दाखल करुन मोबाईल किंमत रु. ६,०००/- त्यावरील व्याजासह, रु. ७०,०००/- मानसिक त्रासाबद्दल व रु. ५,०००/- खर्च या मागणीसह हा तक्रार अर्ज दाखल केला.
5. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 9 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की,
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..4..
तक्रारदाराने मोबाईल दि. १९.७.२०१४ रोजी खरेदी केला होता व त्याबद्दलचे बिल ज्यावर अटी व शर्ती नमुद आहे हे देण्यात आले होते. तक्रारीतील इतर मजकुर नाकारुन असे कथन केले की, तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र. 2 कडे आला असतांना विरुध्दपक्ष क्र. 3 हे अधिकृत सेवा केंद्र असल्याने त्यांचेकडे त्यास पाठविण्यात आले. विरुध्दपक्ष क्र. 2 हा फक्त मोबाईल विक्रेता असून त्याचे मोबाईलचे दुरुस्तीचे काम त्याचे कडे नाही. त्यामुळे नुकसान भरपाई देण्यास तो जबाबदार नाही. त्याने हे नाकारले की, तक्रारदाराच्या मोबाईल मध्ये कोणताही दोष आहे. त्यांनी असे कथन केले की, तक्रारदाराचा मोबाईला कठीण वस्तु लागली असल्याने किंवा तो खाली पडल्याने नादुरुस्त झालेला असावा व त्याबद्दल नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी विरुध्दपक्षाची नाही. सबब तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी विनंती विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी केली.
6. विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी निशाणी 17 ला त्यांचा लेखी जबाब दाखल केला ज्यात त्यांनी हे कबुल केले की, तक्रारदाराने मोबाईल दि. १९.७.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 2 कडून रु. ६,०००/- खरेदी केला होता. त्यांनी हे कबुल केले की, दि. २०.८.२०१४ रोजी तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला होता व मोबाईल मध्ये स्क्रीन दोष असल्याचे त्यांनी सांगितले होते परंतु तो
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..5..
दोष हा मोबाईल खाली पडल्यामुळे झालेला होता. डिस्प्लेचा जो दोष होता तो वारंटी मध्ये अंतर्भूत नव्हता त्यामुळे तक्रारदार हा दुरुस्ती खर्च देण्यास जबाबदार होता. मोबाईल मध्ये जो दोष निर्माण झाला तो तक्रारदाराच्या स्वतः मुळे झालेला असल्यामुळे व त्याची वारंटी नसल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 हे तक्रारदारास कोणतीही नुकसान भरपाई देण्यास जबाबदार राहत नाही. तक्रारदार हा त्याचा मोबाईल परत घेवून गेला होता. त्याने हे नाकारले की, मोबाईल मध्ये सॉप्टवेअरचा कोणताही दोष होता. तक्रारदाराची मागणी त्यांनी नाकारली व तक्रार अर्ज रद्द करण्यात यावा अशी विनंती केली.
7. तक्रारदाराने निशाणी 20 ला प्रतिउत्तर दाखल दाखल केले ज्यात त्यांनी हे नाकारले की, दि. २०.८.२०१४ रोजी विरुध्दपक्ष क्र. 3 कडून मोबाईल परत घेवून गेला होता. लेखी जबाबात त्यांच्या विरुध्द ज्या बाबी नमूद आहे त्या त्यांनी नाकारल्या.
8. तक्रार अर्ज, लेखी जबाब दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्त तसेच तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. बिजवे व विरुध्दपक्षा तर्फे अॅड. तांबटकर यांचा युक्तीवाद ऐकला, त्यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आले.
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..6..
मुद्दे उत्तरे
- तक्रारदाराने खरेदी केलेला मोबाईल मध्ये
उत्पादनातील दोष असल्याचे तक्रारदाराने
शाबीत केले का ? .... नाही
- विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी
केली आहे का ? .. नाही
- आदेश ? ... अंतीम आदेशा प्रमाणे
कारणमिमांसा ः-
9. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारदारास दि. १९.७.२०१४ रोजी मोबाईल विकला होता तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 हे मोबाईल उत्पादक आहे. दि. २०.८.२०१४ रोजी तक्रारदार हा तो मोबाईल घेवून विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला होता व मोबाईल हा नादुरुस्त झाल्याची तक्रार त्यांनी केली होती.
10. तक्रारदाराच्या कथनानुसार मोबाईल मध्ये सॉप्टवेअर व स्क्रीनचा दोष निर्माण झाला होता व त्यासाठी त्याने तो मोबाईल प्रथम विरुध्दपक्ष क्र. 2 कडे व त्यांच्या सांगण्यावरुन नंतर विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दि. २०.८.२०१४ रोजी नेला होता. परंतु दोष दूर न करता तो मोबाईल तक्रारदाराला परत करण्यात आला. पुनश्च दि. २६.९.२०१४ रोजी तो मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 कडे
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..7..
नेला असतांना त्याला रु. ५००/- दुरुस्ती खर्च मागितला. परंतु मोबाईल हा वारंटी मध्ये असल्याने तो दुरुस्ती खर्च देण्यास जबाबदार नव्हता. अशा परिस्थितीत मोबाईल मध्ये उत्पादनातील दोष होता ही बाब शाबीत करण्याची जबाबदारी तक्रारदाराची येते.
11. तक्रारदाराने निशाणी 24 ला अविनाश सरदार यांचा रिपोर्ट दाखल केला ज्यात अविनाश यांनी असे कथन केले की, त्यांनी मोबाईल दुरुस्तीचा कोर्स केलेला असल्याने त्यांनी मोबाईल तपासला व त्याच्या आत मध्ये काही दोष असल्याचे आढळले. बाहेरील कोणत्याही कारणा शिवाय तो दोष निर्माण झालेला नाही. विरुध्दपक्षाने निशाणी 24 ला या शपथपत्रा विरुध्द विरुध्दपक्ष क्र. 3 चे शपथपत्र दाखल केले. ज्यात त्यांनी निशाणी 24 चा रिपोर्ट हा कसा चुकीचा आहे हे नमूद केले. अविनाश सरदार यांनी मोबाईल दुरुस्तीचा कोर्स केला असल्याबद्दल किंवा तो ज्या दुकानात काम करतो त्या दुकानाचे प्रमाणपत्र दाखल केले नाही. तसेच निशाणी 24 मध्ये त्यांनी कोणत्या मोबाईलची पाहणी केली त्या मोबाईल कंपनीचे नाव व नंबर नमूद केला नाही. मोबाईल मध्ये कोणते अंतर्गत दोष आहे हे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले नाही. तक्रारदाराच्या कथना प्रमाणे जर मोबाईल मध्ये सॉप्टवेअर व स्क्रीनचा दोष होता जर अविनाश सरदार यांनी तसे
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..8..
निशाणी 24 मध्ये स्पष्टपणे लिहावयास पाहिजे होते. या कारणावरुन निशाणी 24 चा त्याचा अहवाल हा स्विकारता येत नाही.
12. तक्रारदाराने निशाणी 2/2 ला विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी दिलेली पावती दाखल केली ज्यात डिस्प्ले प्राब्लेम असे लिहले आहे, ज्यात सॉप्टवेअरचा दोष असल्याचे नमूद नाही. तक्रारदाराच्या म्हणण्याप्रमाणे जर सॉप्टवेअरचा दोष होता तर त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 कडून या दोषाबाबतचे दस्ता मध्ये तसे लिहून घेणे उचित झाले असते. तक्रारदाराने दाखल केलेल्या दस्तावरुन हे शाबीत होत नाही की, त्याने खरेदी केलेल्या मोबाईल मध्ये तो म्हणतो त्या प्रमाणे दोष होता, मुख्यत्वे करुन उत्पादनातील दोष होते. यावरुन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदाराने हे शाबीत केले नाही की, मोबाईल मध्ये उत्पादनातील दोष होते. यावरुन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
13. मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात आल्याने विरुध्दपक्षाने सेवेत त्रुटी केली असा निष्कर्ष काढता येत नाही व त्यामुळे मुद्दा क्र. 2 ला नकारार्थी उत्तर देण्यात येऊन असा निष्कर्ष काढण्यात येतो की, तक्रारदार हा विनंती केल्या प्रमाणे नुकसान
ग्राहक तक्रार क्रमांकः 230/2014
..9..
भरपाई मिळण्यास पात्र नाही. सबब तक्रार अर्ज हा रद्द करण्यात येतो.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येतो.
- उभय पक्षांनी आपआपला खर्च सोसावा.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 25/02/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष