सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्रमांक 61/2010
तक्रार दाखल झाल्याचा दि. 21/08/2010
तक्रार निकाल झाल्याचा दि. 07/10/2010
श्रीमती हबीबा निसार मुल्ला
वय वर्षे 52, धंदा – नोकरी,
रा.मु.पो.ता. सावंतवाडी,
जिल्हा- सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
1) लावा इंटरनॅशनल लिमिटेड
ए – 56/सेक्टर 64, नोएडा,
उत्तरप्रदेश, इंडिया, पिन- 201 301
2) सिध्देश्वर एंटरप्रायझेस,
1630, तळवडे, ता.सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग
3) नेहा मोबाईल शॉपी,
श्री भरत निंबाळकर
संचयनी पॅलेस रोड,
जी- 863, सालईवाडा,
मु.पो.ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
- आदेश नि.1 वर -
1) विरुध्द पक्षाकडून खरेदी केलेला मोबाईल हँडसेट वॉरंटी कालावधीमध्ये बिघडल्यामुळे व त्याची दुरुस्ती न करुन दिल्यामुळे, तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे.
2) सदर तक्रारीचे नोटीस विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांना बजावण्यात आले. त्यानुसार विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 हे त्यांचे वकील प्रतिनिधीमार्फत नि.8/A वरील वकीलपत्राद्वारे मंचासमोर हजर झाले.
3) दरम्यान तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांचेमध्ये आपसी तडजोड होऊन तडजोडीची संयुक्त पुरसीस तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांचे वतीने नि.11 वर दाखल करण्यात आली. या तडजोड पुरसीसनुसार तक्रारदाराने खरेदी केलेल्या हँडसेटचा डिस्प्ले विरुध्द पक्षाने बदलून दिला असून नुकसान भरपाई रु.1500/- (रुपये एक हजार पाचशे मात्र) तक्रारदारास अदा केले आहेत. त्यामुळे सदरचे प्रकरण निकाली करावे, अशी विनंती तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांनी नि.12 वरील संयुक्त पुरसीसद्वारे केली आहे.
4) परंतु तक्रारदाराने आज मंचासमोर नि.13 वर वेगळा अर्ज दाखल करुन त्यांना डिस्प्लेची वॉरंटी लिहून दिली नाही, त्यामुळे केस निकाली काढू नये अशी विनंती केली आहे; परंतु आज मंचासमोर दाखल केलेल्या नि.12 वरील संयुक्त पुरसीसचे अवलोकन केल्यास तक्रारदाराने त्या पुरसीसमध्ये केस निकाली काढावी, अशी विनंती केल्याचे दिसून येते. तसेच यापूर्वी तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांनी नि.11 वर दाखल केलेल्या तडजोड पुरसीसचे अवलोकन केल्यास त्यामध्ये कुठेही वॉरंटीबाबतचा उल्लेख केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे ज्या कारणासाठी तडजोड झाली नाही, ती मागणी करता येत नाही.
5) तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्या दरम्यान झालेल्या नि.11 वरील तडजोड पुरसीसनुसार तक्रारदारास त्यांच्या मोबाईलचा डिस्प्ले बदलून दिला असल्यामुळे व नुकसान भरपाई रु.1500/-देण्यात आली असल्यामुळे, आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढत असून त्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदार व विरुध्द पक्षकार यांच्या नि.11 व 12 वरील तडजोड पुरसीसनुसार सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) तक्रारदाराने प्रकरणात दाखल केलेली मुळ बुकलेट तक्रारदारास परत करण्यात यावी.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 07/10/2010
Sd/- Sd/- Sd/-
(उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.
Ars/-