1. तक्रार दाखल करुन घेण्याच्या मुद्यावर तक्रारकर्त्याच्या वकिलांचे म्हणणे ऐकले.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने वि.प.क्र. 1 च्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आय.टी.आय.) प्रवेश घेण्याकरीता प्रवेश शुल्क रु.12,000/- भरले व त्याच्या शैक्षणिक अर्हतेसंबंधीची मुळ कागदपत्रे संस्थेला दिली. सदर फिटर अभ्यासक्रम हा सेमिस्टर पध्दतीचा होता. तक्रारकर्त्याने प्रथम सेमिस्टर पूर्ण केले व दुस-या सेमिस्टरच्या प्रवेशासाठी बसणार होता. परंतू वि.प. संस्थेने काही कारण नसतांना त्याचेकडून परीक्षेचे प्रवेश पत्र हिसकावून घेतले आणि परिक्षेला बसू दिले नाही. याबाबत विचारणा केली असता वि.प.ने सांगितले की, त्याला रु.10,000/- भरावे लागणार. परीक्ष्ाा शुल्क रु.800/- असतांनाा रु.2000/- ची वि.प.नेे मागणी केली. तक्रारकर्त्याला द्वीतीय सत्राच्या परिक्षेला बसू न दिल्यामुळे त्याने वि.प.कडून त्याची मुळ कागदपत्रे परत मागितली. त्यावर वि.प.ने सांगितले की, रु.10,000/- भरल्यानंतरच त्याला मुळ कागदपत्रे परत मिळतील. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे वि.प.ची सदर कृती ही सेवेतील कमतरता आहे, म्हणून त्याने सदर तक्रार दाखल करुन रु.1,85,000/- नुकसान भरपाईची मागणी केली.
3. तक्रारक ने तक्रारीसोबत एकूण पाच दस्तऐवज दाखल केले असून त्यामध्ये वि.प.ने तक्रारकर्त्याच्या नोटीसला दिलेल्या उत्तराचा समावेश आहे. वि.प.ने सदर नोटीसला दिलेल्या उत्तरात, तक्रारकर्त्याच्या अभ्यासक्रमाचे वार्षिक शुल्क एकूण रु.1,20,000/- असल्याचे म्हटले आहे. परंतू तक्रारकर्त्याच्या विनंतीवरुन त्याने 50 टक्के शुल्क माफ केले होते. त्यामुळे तक्रारकर्त्याला केवळ वार्षिक रु.30,000/- फी भरावयाची होती. त्याने रु.10,000/- प्रवेश शुल्क व रु.3,000/- स्टेशनरी, गणवेश आणि इतर अभ्यासाच्या साहित्याकरीता भरले. उर्वरित फी रु.50,000/- पहिल्या सत्राच्या अगोदर भरण्याचे तक्रारकर्त्याने आश्वासन दिले. परंतू त्यानंतर तो दुस-या सेमिस्टरला आला नाही. तसेच प्रशिक्षणाकरीताही तो आला नाही. अशाप्रकारे तक्रारकर्त्याने वि.प.संस्थेमधील एका स्थानाचे नुकसान केले आहे. तक्रारकर्त्याने रु.50,000/- उर्वरित शुल्क जमा केले तर मुळ कागदपत्रे देण्यात येतील असे आश्वासन वि.प. संस्थेने नोटीसच्या उत्तरामध्ये दिले आहे.
4. तक्रार आणि नोटीस उत्तर यामधील वर उल्लेखित कथनावरुन स्पष्ट दिसून येते की, सदर वाद प्रवेश शुल्कासंबंधीचा आहे. तक्रारकर्तने नोटीसच्या उत्तरामधील मजकूर नाकारलेला नाही. त्यामुळे वि.प.ने नोटीसच्या उत्तरात जे काही म्हटले आहे ते बरोबर आहे असे ग्राह्य धरण्यास हरकत नाही.
Ravinder Bharti University Vs. Jaya J. Roy Choudhary 2017 (IV) CPR 805 (NC) या प्रकरणात असे म्हटले आहे की, प्रवेश, प्रवेश शुल्क इ.बाबत सेवेतील कमतरता हा प्रश्न उपस्थीत होत नाही. सबब अशा प्रकारचा वाद ग्राहक मंचाला चालविता येत नाही.
5. सबब, वरील कारणास्तव मंचाचे असे मत आहे की, सदर तक्रार ग्राहक तक्रार म्हणून चालविण्यायोग्य नाही. करिता खालीलप्रमाणे आदेश.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्विकृतीचे मुद्यावर खारिज करण्यात येते.
- खर्चाबद्दल कुठलेही आदेश नाहीत.