Maharashtra

Nagpur

CC/640/2021

SAU. SHITAL SURENDRA TIDKE - Complainant(s)

Versus

LATA INFRASTURCTURE PVT. LTD., THROUGH MANAGING DIRECTOR, SAU. PINKY VINODKUMAR TOMAR - Opp.Party(s)

ADV. MIR NAGMAN ALI/ SOHEL J. SHEIKH

01 Nov 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/640/2021
( Date of Filing : 10 Nov 2021 )
 
1. SAU. SHITAL SURENDRA TIDKE
R/O. 301, RUDRAKASHA APARTMENT, BALBUDHE LAYOUT, NEW NARSALA ROAD, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. LATA INFRASTURCTURE PVT. LTD., THROUGH MANAGING DIRECTOR, SAU. PINKY VINODKUMAR TOMAR
OFF.AT, PLOT NO.4, GAWANDE LAYOUT, KHMLA SQR. RING ROAD, NAGPUR-15
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. B.B. CHAUDHARI MEMBER
 
PRESENT:ADV. MIR NAGMAN ALI/ SOHEL J. SHEIKH, Advocate for the Complainant 1
 
Dated : 01 Nov 2023
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 35 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तिने सन 2017 मध्‍ये लता इन्‍फ्रास्‍ट्रक्‍चर प्रा.लि. यांच्‍याकडून प्‍लॉट क्रं. 80, संतोषी नगर, हुडकेश्‍वर पोलिस स्‍टेशन, रिंग रोड, नागपूर येथील जागेवर नागपूर सुधार प्रन्‍यास मार्फत मंजूर केलेल्‍या नकाशाप्रमाणे बांधलेल्‍या राम-लता अपार्टमेंट मधील 2BHK फ्लॅट क्रं. 301, एकूण क्षेत्रफळ 1200 चौ.फूट एकूण किंमत रुपये 19,00,000/- मध्‍ये खरेदी करुन दि. 09.01.2020 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्र करुन घेतले होते. विरुध्‍द पक्षाने प्रसिध्‍द केलेल्‍या माहितीपत्रका मध्‍ये फ्लॅटकरिता (24 X 7) अखंड पाणी पुरवठयाची सुविधा, वाहन तळ (पार्किंग एरिया) करिता जागा, 4 व्‍यक्‍ती जाण्‍या योग्‍य लिफ्ट सुविधा उपलब्‍ध राहील असे नमूद केले होते. सदरच्‍या फ्लॅटचा ताबा घेते वेळी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला  आश्‍वासित केले होते की, काही दिवसाने 4 व्‍यक्‍तीकरिता असणारी लिफ्ट लवकरच बसून देण्‍यात येणार आहे. म्‍हणून तक्रारकर्तीने अंदाजे रुपये 5,00,000/- सदरच्‍या फ्लॅटच्‍या  सजावटीकरिता खर्च केले.
  2.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याच्‍या 2 दिवसापूर्वी म्‍हणजेच दि. 07.01.2020 रोजी रुपये 1,00,000/-  जी.एस.टी. ची रक्‍कम म्‍हणून नगदी स्‍वरुपात वसूल केली, परंतु त्‍याची पावती दिली नाही. तक्रारकर्तीच्‍या घरी वयोवृध्‍द व्‍यक्‍ती असल्‍यामुळे त्‍यांना पाय-याने चढ-उतार करण्‍यास अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच तक्रारकर्तीने सदरच्‍या फ्लॅटच्‍या खरेदीकरिता व सजावटीकरिता इतक्‍या मोठया प्रमाणात रक्‍कम खर्च केली असल्‍यामुळे आता सदरचा फ्लॅट सोडून दुस-या ठिकाणी फ्लॅट घेणे शक्‍य नाही. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे लिफ्ट लावून देण्‍याबाबत  अनेक वेळा विनंती करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने प्रत्‍येक वेळी आश्‍वासन देऊन आजतागायत लिफ्टची सुविधा उपलब्‍ध करुन दिली नाही. म्‍हणून तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार आयोगा समक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द  पक्षाने मंजूर नकाशाप्रमाणे 1.55 X1.450 मीटर लिफ्टची  सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी अथवा लिफ्टकरिता येणा-या खर्चाची रक्‍कम देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन सुध्‍दा विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि.05.04.2023 रोजी पारित करण्‍यात आला.

 

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेजाचे अवलोकन केले व त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेतले.

         

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?                   होय

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय?             होय

 

  1. आदेशाबाबत काय ?                                अंतिम आदेशानुसार

 

निष्‍कर्ष

 

  1.  मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत –. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून  नागपूर सुधार प्रन्‍यास मार्फत मंजूर केलेल्‍या नकाशाप्रमाणे बांधलेल्‍या राम-लता अपार्टमेंट मधील 2BHK फ्लॅट क्रं. 301, एकूण क्षेत्रफळ 1200 चौ.फूट एकूण किंमत रुपये 19,00,000/- मध्‍ये दि. 09.01.2020 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्र करुन घेतले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची  ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्षाने प्रसिध्‍द केलेल्‍या माहितीपत्रका मध्‍ये फ्लॅटकरिता (24 X 7) अखंड पाणी पुरवठयाची सुविधा, वाहन तळ (पार्किंग एरिया) करिता जागा, 4 व्‍यक्‍ती जाण्‍या योग्‍य लिफ्ट सुविधा उपलब्‍ध राहील असे नमूद केले होते.
  2.   तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाने सदरच्‍या इमारतीत लिफ्ट उपलब्‍ध करुन देण्‍याची मागणी केली आहे. परंतु विरुध्‍द पक्षाने लिफ्टची सुविधा उपलब्‍ध करुन न दिल्‍यास  लिफ्टकरिता येणा-या खर्चाच्‍या रक्‍कमेची मागणी केली आहे. परंतु त्‍याकरिता येणा-या खर्चाबाबतचे कोणतेही कोटेशन अभिलेखावर दाखल केलेले नाही. तसेच तक्रारकर्तीने इमारती मधील इतर गाळेधारकांची अपार्टमेंट ऑफ डीड ऑफ डिक्‍लरेशन नोंदणीकृत केले नाही. किंवा तक्रारकर्तीने इमारती मधील गाळेधारंका तर्फे आममुख्‍यत्‍यार पत्र सुध्‍दा दाखल केले नाही.  त्‍यामुळे तक्रारकर्तीची लिफ्ट बसविण्‍याकरिता येणा-या खर्चाची रक्‍कमेची मागणी मंजूर करण्‍या योग्‍य नाही.  
  3.      तक्रारकर्तीकडे असलेल्‍या वयोवृध्‍द व्‍यक्‍तीनां लिफ्ट नसल्‍यामुळे पाय-याने चढ-उतार करण्‍यास अतिशय त्रास होत असल्‍यामुळे तिने विरुध्‍द पक्षाकडे लिफ्ट लावून देण्‍याबाबत  अनेक वेळा विनंती करुन सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने आजतागायत लिफ्टची सुविधा उपलब्‍ध करुन दिली नाही ही विरुध्‍द पक्षाच्‍या सेवेतील त्रुटी असल्‍याचे  दिसून येते असे आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.

     सबब खालील प्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द पक्षाने नागपूर सुधार प्रन्‍यास तर्फे मंजूर केलेल्‍या नकाशाप्रमाणे बांधलेल्‍या राम-लता अपार्टमेंट मध्‍ये 1.55 X1.450 मीटर लिफ्टची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी. 

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 20,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 10,000/- द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब  व  क फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SACHIN Y. SHIMPI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. B.B. CHAUDHARI]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.