Maharashtra

Chandrapur

CC/21/54

Ravindra Ramanand singh Pawar - Complainant(s)

Versus

Lambodar Patra (Shri.Ganesh Enterprises) - Opp.Party(s)

SELF

15 Feb 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/54
( Date of Filing : 22 Mar 2021 )
 
1. Ravindra Ramanand singh Pawar
Kayarkar Nivas bramhakumari mandir jawal,Nana peth ward,Chandrapur,Maharashtra
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Lambodar Patra (Shri.Ganesh Enterprises)
Samantrapur Bhuvneshwar jawal,Smanta for the lisance fresh, Orisa
Samantrapur
Orisa
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 15 Feb 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

(आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्‍पना जांगडे (कुटे), मा. सदस्‍या,)

                      (पारीत दिनांक १५/०२/२०२२)

 

                       

  1. प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्‍वये दाखल केली

असून तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालिलप्रमाणे.

  1. तक्रारकर्ता हा चंद्रपूर येथील रहिवासी असून विरुध्‍द पक्ष यांचे शहर भुवनेश्‍वर, राज्‍य ओडिसा येथे  ‘श्री गणेश इंटरप्राईजेस’ या नावाने  दुकान असून ते डिस्‍टन्‍स फ्रॉम पेपर प्‍लेट मेकिंग मशीन, स्‍लीपर मेकिंग मशीन अशा प्रकारचे  आवश्‍यक मशीन पुरवठा करण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारकर्ता यांना स्‍क्रबर पॅकिंग मशीन विकत घ्‍यावयाची असल्‍याने त्‍यांनी सदर मशीन विकत घेण्‍याबाबत  ऑनलाईन माहिती काढली असता त्‍यांना विरुध्‍द पक्ष यांचे ‘श्री गणेश इंटरप्राईजेस’  या नावाने भुवनेश्‍वर ओडिसा बद्दल दिनांक ४/११/२०२० रोजी माहिती मिळाली व त्‍यांनी विरुध्‍द पक्ष यांचेसोबत दुरध्‍वनी व्‍दारे संपर्क करुन दिनांक ४/११/२०२० रोजी उपरोक्‍त मशीनबाबत सविस्‍तर माहिती प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाने दुरध्वनीद्वारे तक्रारकर्त्‍याला त्‍यांचे ‘श्री गणेश इंटरप्राईजेस’ या नावाचे आय.सी.आय.सी.आय. शाखा संञापूर या बॅंकेचे खाते क्रमांक ३०५४०५५००१११, आय.एफ.एस.सी. कोड ICIC०००३०५४, जी.एस.टी.आय.एन. क्रमांक २१DAUPP९५७८K१ZN यावर ऑनलाईन पेमेंट करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याने दिनांक १०/११/२०२० रोजी त्याचे  एच.डी.एफ.सी. बॅंक, चंद्रपूरमध्ये असलेल्या  खाते क्रमांक ५०१००१३२१७६३८७, आय.एफ.एस.सी. कोड एच.डी.एफ.सी. ०००१०५३ ंदपू.एफ.साीNाला ...एच.डी.एम  मार्फत विरुध्‍द पक्ष यांच्‍या खात्‍यात रुपये ३०,०००/- जमा केले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास सात दिवसात मशीन पाठविण्‍याचे मान्‍य केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना त्‍यांनी मागणी केल्‍याप्रमाणे सामान पाठविण्‍याची विनंती केली असता त्‍यांनी लवकरात लवकर मशीन देण्‍याचे कबूल केले होते. तक्रारकर्ता यांनी वारंवार विनंती करुनही विरुध्‍द पक्ष यांनी मशीन पाठविली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दिनांक २०/०२/२०२१ रोजी विरुध्‍द पक्ष यांना पोस्‍टाव्‍दारे पञ पाठवून मशीन लवकरात लवकर पाठविण्‍याची विनंती केली. विरुध्‍द पक्ष यांनी सदर नोटीस घेण्‍यास नकार दिला. त्‍यानंतरही तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांना दुरध्‍वनी वरुन मशीन पाठविण्‍याची विनंती केली परंतु त्‍याकडे सुध्‍दा त्‍यांनी दुर्लक्ष करुन मशीन पाठविण्‍यास टाळाटाळ केली. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास स्‍क्रबर पॅकिंग मशीन  न पाठविल्याने त्‍यांचा कच्‍चा माल कोणत्‍याही कामाकरिता वापरता येत नसल्‍यामुळे आणि तो तसाच पडून असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे दर दिवशी अंदाजे ८००/- रुपयाचे नुकसान होत आहे. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास रक्‍कम घेतल्‍यावरही मशीन न देता तक्रारकर्त्‍याप्रति न्‍युनतम सेवा दिली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचे विरुध्‍द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्‍यामध्‍ये अशी मागणी केली आहे की विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला स्‍क्रबर पॅकिंग मशीन दयावी तसेच तक्रारकर्त्‍याचे ४ महिण्‍यांचे झालेले नुकसान अंदाजे रुपये १५,०००/- व आतापर्यंतच्‍या झालेले नुकसानीबाबत तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १५,०००/- वा मुळ रक्‍कम परत देण्‍याचे आदेशीत व्‍हावे.
  2. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, दस्‍तावेज, तक्रारीतील मजकूर व दाखल दस्‍तावेज यांनाच शपथपञ समजण्‍यात यावी अशी पुरसिस दाखल आणि तक्रारकर्त्‍याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले व त्‍याबाबतची कारणमीमांसा आणि निष्‍कर्ष पुढीलप्रमाणे.

 

    अ.क्र.                 मुद्दे                         निष्‍कर्षे

    १.  तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत कायॽ     होय   

    २.  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति                    होय

       न्‍युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ

      ३.  आदेश कायॽ                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

  •  

मुद्दा क्रमांक १ बाबतः-

  1. तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडे स्‍क्रबर पॅकिंग मशीन विकत घेण्‍याकरिता त्‍याचे एचडीएफसी बॅंक चंद्रपूर येथे असलेल्या क्र.५०१००१३२१७६३८७च्या   खात्‍यातून वि.प.ने दुरध्‍वनी व्‍दारे कळविलेल्‍या श्री गणेश इंटरप्राईजेस या नावाने दिनांक १०/११/२०२० रोजी एनइएफटी द्वारे रक्कम रुपये ३०,०००/- जमा केले.  तक्रारकर्त्‍याने ऑनलाईन पेमेंट केल्‍याबाबत त्याच्या एच.डी.एफ.सी. बॅंकेमध्ये असलेल्या  खात्‍याच्‍या विवरणाची प्रत प्रकरणात नि.क्र.२ सोबत दस्‍त क्र.४ वर दाखल केली आहे. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा  ग्राहक आहे, हे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

 

मुद्दा क्रमांक २ बाबतः-

  1. तक्रारीत निशानी क्र. २ वर दाखल दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी दिनांक १०/११/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष यांचेकडून उपरोक्‍त मशीन खरेदी करण्‍याकरिता त्यांचे नांवे त्‍यांचे खात्‍यात नेफ्ट द्वारे रक्‍कम रुपये ३०,०००/- जमा केल्‍याची नोंद तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खाते विवरणामध्‍ये आहे. यावरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या खात्‍यामध्‍ये उपरोक्‍त मशीन विकत घेण्‍याकरिता ऑनलाईन पेमेंट केल्‍याचे सिध्‍द होते. विरुध्‍द पक्ष यांना रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावरही त्‍यांनी तकारकर्त्‍यास उपरोक्‍त मशीन पाठविले नाही. तक्रारकर्त्‍याने दिनांक १८/०२/२०२१ रोजी विरुध्‍द पक्ष यांना पोस्‍टाव्‍दारे पञ पाठवून मशीन पाठविण्‍याबाबत सांगितले. सदर पत्र व पोस्‍टाची पावती दस्‍त क्रमांक ३ वर प्रकरणात  दाखल आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी व्‍दारे सुध्‍दा विरुध्‍द पक्ष यांना सदर मशीन पाठविण्‍याबाबत विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याकडे दुर्लक्ष केले. खाते विवरणाच्‍या नोंद वरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षांचे नांवे रक्‍कम जमा केल्‍यावरही त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास मशीन पाठविली नाही.याशिवाय   आयोगाची नोटीस प्राप्त होऊनसुद्धा  विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित राहून  आपल्‍या बचावाचे समर्थनार्थ कोणतेही म्‍हणणेवा दस्तावेज प्रकरणात दाखल केले नाही. यावरुन विरुध्‍द पक्ष यांना रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यावरही त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास मशीन न पाठवून तक्रारकर्त्‍याप्रति सेवेत न्‍युनता दर्शविली आहे हे दाखल दस्‍तवेजांवरुन सिध्‍द होते या निष्‍कर्षाप्रत आयोग आले आहेत. त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचेकडून त्‍याने स्‍क्रबर पॅकिंग मशीन विकत घेण्‍याकरीता जमा केलेली रक्‍कम रु.३०,०००/- परत मिळण्‍यांस तसेच आर्थिक, शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्‍कम आणि तक्रार खर्च मिळण्‍यास पाञ आहे. परंतु तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्षाने  उपरोक्‍त मशीन वेळेवर उपलब्‍ध न करुन दिल्‍यामुळे त्‍यांचे त्‍या हंगामामध्‍ये किती नुकसान झाले याबाबतही कोणताही दस्‍तावेज दाखल केलेला नाही. परंतु तक्रारकर्त्‍यास मशीन न मिळाल्‍याने तक्रारकर्त्‍याचे आर्थीक नुकसान झाले त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्ष यांचेकडून उचीत नुकसान भरपाई मिळण्‍यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येते.

मुद्दा क्रमांक ३ बाबतः-

  1. मुद्दा क्रमांक १ व २ च्‍या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.  

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची  तक्रार क्र. २१/५४ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला मशीनचे किमतीपोटी भरलेली रक्‍कम  रु.३०,०००/-  परत करावी.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला आर्थीक नुकसान, शारीरिक व मानसिक ञासापोटी एकत्रीत नुकसान भरपाई रक्‍कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/-द्यावे.
  4. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात याव्‍यात.

 

    

 

     (किर्ती वैद्य (गाडगीळ))     (कल्‍पना जांगडे (कुटे))       (अतुल डी. आळशी)

            सदस्‍या                सदस्‍या                  अध्‍यक्ष

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.