ग्राहक तक्रार क्र. 66/2013
अर्ज दाखल तारीख : 06/04/2013
अर्ज निकाल तारीख: 12/08/2015
कालावधी: 02 वर्षे 04 महिने 08 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1. गोविंद साहेबराव गंभीरे,
वय - सज्ञान, धंदा – शेती,
रा.ईटकूर, ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ....तक्रारदार
वि रु ध्द
1. ललीत दत्तात्रय ठाकूर,
कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी, उस्मानाबाद.
2. नामदेव काशीनाथ सुतार, एन के. सुतार,
सहाय्यक कार्यकारी अभियंता,
म.रा.वि.वि. कंपनी, सब स्टेशन ईटकूर,
ता. कळंब, जि.उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विद्युलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.के.जी.बावळे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमूख.
न्यायनिर्णय
मा. अध्यक्ष श्री. एम.व्ही. कुलकर्णी यांचे व्दारा :
विरुध्द पक्षकार (विप) विज कंपनी कडून घरगुती वापरासाठी विज कनेक्शन घेतले मात्र विप यांनी अवास्तव विज बिल देऊन सेवेत त्रुटी केली म्हणून तक्रारकर्ता (तक) याने ही तक्रार दिलेली आहे.
तक चे तक्रारीतील कथन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे.
1. तक हा मौजे इटकूर ता.कळंब चा रहीवासी आहे व तो शेती करतो. आपले घरी घरगुती वापरासाठी विप कडून विज कनेक्शन घेतले त्यांचा ग्राहक 606240244921 असा आहे. तक हा नियमितपणे विज बिले भरत आलेला आहे. मात्र विप यांनी तक याला अवाजवी बिल दिले. त्यामुळे तक ने ग्राहक तक्रार क्र.370/2010 या मंचात दाखल केली होती. लोकअदालत मध्ये तक व विप यांचे मध्ये तडजोड झाली व विप यांनी बिल कमी करुन दिले. तथापि, सप्टेंबर, 2012 मध्ये विप यांनी तक ला अवास्तव रु.11,420/- बिज दिलेले आहे. तक ने बिल दुरुस्त करुन देण्याबाबत विनंती केली, विप यांनी काहीही ऐकून घेतले नाही. उलट विज पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. वाढीव वीज बिलामुळे तक यांला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे वाढीव विज बिल कमी करुन मिळावे व मानसिक त्रासाबद्दल रु.15,000/- मिळावे व तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत म्हणून विप विरुध्द ही तक्रार तक याने दि.06.04.2013 रोजी दाखल केलेली आहे.
2. तक यांनी तक्रारीसोबत सप्टेंबर 2012 चे विज बिल दाखल केलेले आहे. त्यानंतर तक्रार क्र.370/2010 मधील तडजोड पत्र तसेच आदेश दाखल केलेले आहे. त्याचप्रमाणे मे 2012, जुन 2012, जुलै 2012, ऑेगस्ट 2012, मे 2014, या महिन्याची विज बिले हजर केली आहेत.
3. विप यांनी हजर होऊन दि.06.06.2014 रोजी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. पुर्वी तक्रार क्र.370/2010 चे कामी लोकअदालत मध्ये तडजोड झाली हे मान्य आहे. सप्टेंबर 2012 मध्ये विप यांनी अवास्तव व बेकायदेशीर बिल दिले हे मान्य नाही. तक यांनी सप्टेंबर 2012 पुर्वी जवळजवळ दिड वर्ष विज वापरा प्रमाणे बिल न भरता कमी युनिटचे बिल भरले. सप्टेंबर 2012 मध्ये विप तर्फे प्रत्यक्ष वापराची नोंद केली असता एकूण 1089 युनिट वापर दिसून आला. त्याप्रमाणे तक यांना दिलेले बिल योग्य व बरोबर आहे. जो वापर आढळून आला तो एक महिन्यातील नसून पुर्वीपासूनचा वापर आहे. विप यांनी सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही त्यामुळे तक्रार रद्द होण्यास पात्र आहे.
4. विप यांनी जुन 2011 ते सप्टेंबर 2012 या कालावधीसाठी तयार केलेले दि.19.10.2014 चे बिल रिव्हीजन रिपोर्ट दाखल केलेले आहे. त्याच प्रमाणे कंझयूमर पर्सनल लेजर (सीपीएल) चा उतारा हजर केलेला आहे.
5. तक ची तक्रार, त्यांने दाखल केलेली कागदपत्रे, तसेच विप चे लेखी म्हणणे, व त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे यांचे अवलोकन करता आमचे विचारार्थ खालील मुद्दे निघतात आम्ही त्यांची उत्तरे त्यांचे समोर खालील दिलेल्या कारणासाठी लिहीली आहेत.
मुद्दे उत्तरे
- ? होय.
2. तक अनुतोषास पात्र आहे काय ? होय.अंशतः
3. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्र.1 व 2
6. तक ने विप कडून घरगुती वापरासाठी विज कनेक्शन घेतले याबद्दल वाद नाही. पुर्वी विप ने तक ला अवास्तव बिल दिले. म्हणून तक ने तक्रार क्र.370/2010 दाखल केली होती. त्यामध्ये लोकअदालत मध्ये तडजोड होऊन विप ने बिल कमी केले याबद्दल वाद नाही. तकार क्र.370/2010 मध्ये दि.10.04.2011 ची तडजोड हजर करण्यात आलेली आले. त्यापुर्वीच विप ने बिल कमी करुन रु.6,770/- केले होते. त्यापैकी रु.6,500/- तक ने भरलेले होते. उरलेले रु.270/- भरण्याचे तक ने कबूल केले. पुर्वी किती जास्त बिल दिले होते व त्यापैकी किती कमी केले हे पुर्वीची तक्रार रेकार्ड वर नसल्यामुळे कळून येत नाही. तडजोड पत्रामध्ये फक्त बिल कमी करुन रु.6,770/- केल्याचे म्हटलेले आहे. काहीही असले तरी पुर्वी विप ने जास्त बिल दिले होते व तडजोडीमध्ये ते कमी केले हे उघड आहे.
7. आता तक ची तक्रार आहे की, विप ने सप्टेंबर 2012 चे रु.11,420/- चे अवास्तव बिल दिलेले आहे. विप च्या म्हणण्याप्रमाणे एक ते दिड वर्षापासून तक ने कमी युनिटची बिले भरली. सप्टेंबर 2012 मध्ये प्रत्यक्ष वापर नोंदविण्यात आला व त्याप्रमाणे बिल देण्यात आले. सप्टेंबर 2012 चे बिल पाहिले असता चालु रिडींग 2249 दाखवली आहे. मागील रिंडीग 1160 वापर 1059 युनिट व मागणी रु.11,420/- अशी दाखवली आहे. मागील 11 महिन्यात नेांदवलेला विज वापर युनिट मध्ये पुढील प्रमाणे दाखवला आहे. 36, 38, 41, 44, 37, 32, 32, 31, 33, 36, 32, असा वापर दाखवला आहे. विप चे म्हणणे प्रमाणे हा विज वापर कमी दाखवला होता. यासाठी तक तसेच विप चे कर्मचारी दोघेही जबाबदार असणार.
8. विप ने बिल चेक रिपेार्ट हजर केले असून दरमहा वापर 100 युनिट असल्याचे त्यामध्ये म्हटलेले आहे. हे कशावरुन ठरवले हे स्पष्ट केलेले नाही. विप ने कंझयूमर पर्सनल लेजर चे उतारे हजर केले आहेत. ऑगस्ट 2010 मध्ये नवीन मिटर बसवल्याचे नोंद आहे. मात्र त्यानंतर सुध्दा दरमहाचा विज वापर 30-40 युनिटच नोंदवल्याचे दिसते. ऑगस्ट 2010 मध्ये अॅडजेस्टेड युनिट 3615 दाखवले व बिज रु.34,877/- दाखवले. एप्रिल 2014 मध्ये मागणी कमी करुन रु.30,268/- केल्याचे दिसते. त्यानतंरही मिटर वर वापर दरमहा 30 युनिटचे जवळपास दाखवला आहे. सप्टेंबर 2012 मध्ये मागील रिंडीग 1160 तर चालु रिंडीग 2240 अशा प्रकारे वापर 1089 युनिट असे दाखवले आहे.
9. पुर्वी विप तर्फे बरोबर मिटर रिंडीग नोंदवली नसेल तर त्यांला विप चे कर्मचारी सुध्दा जबाबदार आहेत. तक ने पण आपल्या घरात विजेचा काय वापर होता याबद्दल मौन बाळगले आहे. विप च्या म्हणण्याप्रमाणे पुर्वी सुध्दा तक चा विज वापर महिना 100 युनिट होता हे ठरवण्यास काय आधार आहे. याबद्दल विप ने मौन बाळगले आहे. आता जास्त वापर दाखवल्यामुळे विप ने जास्त दर आकारलेला असणार. पुर्वी भरलेले बिल वजा केले किंवा कसे यांचा खुलासा केलेला नाही. विज वापर दाखवला नसला तरीही कमीत कमी बिल वसूल केलेले असणार. ते वजावट होणे जरुरी आहे. या सर्वांचा विचार करता विप ने रु.4,420/- अवास्तव बिल आकारले असे आमचे मत आहे. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देतो व खालील प्रमाणे आदेश करतो.
आदेश
-
-
-
- (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
5) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विद्युलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.