जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड यांचे समोर …... ग्राहक तक्रार क्रमांक – 56/2010 तक्रार दाखल तारीख- 09/03/2010 निकाल तारीख - 03/09/2010 --------------------------------------------------------------------------------------- 1. संतोष पि. बन्सी गिरी वय- 27 वर्षे, धंदा – मजुरी रा. तेलगांव, ता. वडवणी, जि. बीड 2. शंकर पि. बन्सी गिरी, वय- सज्ञान, धंदा – मजुरी रा. वरील प्रमाणे. ....... तक्रारदार विरुध्द 1. जीवन विमा निगम लिमीटेड, (एल.आय.सी) मार्फत:- शाखा व्यवस्थापक, माजलगांव ता.माजलगांव जि. बीड 2. विभागीय व्यवस्थापक, जीवन विमाजिगम लिमीटेड (एल.आय.सी) वेस्टर्न झोनल ऑफिस, ‘ योगक्षेम ’, मुंबई, ता. व जि. मुंबई – 400 021 ........ सामनेवाले. को र म - पी.बी.भट, अध्यक्ष सौ. एम.एस.विश्वरुपे, सदस्या तक्रारदारातर्फे – वकील – वि.वि. जावळे, सामनेवालेतर्फे – वकील – ए.पी.कुलकर्णी, ।। निकालपत्र ।। ( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या ) तक्रारदार यांनी प्रस्तुतचीतक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदारांची आई भागुबाई बन्सी गिरी यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून विमा पॉलीसी क्रं.982241284 नुसार पॉलीसी काढली होती. सदर विमा पॉलीसीची रक्कम रु.969/- प्रमाणे एकुण 4 हप्ते भरल्या नंतर तक्रारदाराची आईचा ता.12.2.2003 रोजी हदयविकाराचे अजाराने मृत्यू झाला. तक्रारदार हे सदर विमापॉलीसीचे वारसदार आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडे कार्यालयात तक्रारदारांच्या आईचे कायदेशीर वारसदार म्हणुन विमा पॉलसीची जमा असलेली रक्कम योग्य त्या स्कीम व व्याजानुसार परत मिळण्यासाठी मागणी केली. त्यानंतर सामनेवाले नं.2 यांनी व्कॉसी ज्यूडीसीयल फोरम मुंबई यांचेकडे तक्रार करण्यासाठी पत्र दिले. तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे विमा दाव्याची रक्कम मिळण्यासंदर्भात सल्लाही मागीतला. सामनेवाले नंऋ1 याचे सल्या प्रमाणे सामनेवाले नं.2 यांचेकडे दावा मागणी संदर्भात अपिल करावे असे पत्र पाठविले. त्याप्रमाणे सामनेवाले नं.2 यांचेकडे विमा रक्कमेची मागणी केली असता तक्रारदारांचा दावा नामंजूर केल्याचे सामनेवाले नं.2 यांनी कळविले. तक्रारदारांनी शेवटी ता.8.1.2010 रोजी वकिला मार्फत विमा रक्कम मिळण्या संबंधी नोटीस पाठविली असता ता. 13.1.2010 रोजी पत्रपाठवून तक्रारदारांचा दावा नामंजूर करण्यात आला आहे. तरी तक्रारदारांची विंनती की, अ) विमा पॉलीसी रक्कम - रु. 3,876/- ब) गैरअर्जदारांकडे वेळोवेळी दावा मागणी करणेसाठी - रु. 5,000/- जाणे-येणेकरीता झालेला खर्च. क) मानसिक, आर्थीक व शारिरीक त्रासापोटी - रु. 10,000/- ड) नोटीस व तक्रारीचा खर्च - रु. 2,500/- एकूण - रु. 21,376/- एकुण रक्कम रु. 21,376 /- द.सा.द.शे 18 टक्के व्याजासह सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावे. सदर प्रकरणात सामनेवाले हे हजर झाले असून त्यांनी त्यांचा खुलासा न्यायमंचात ता. 7.6.2010 रोजी दाखल केला आहे. सामनेवाले यांचे खुलासा थोडक्यात असा की, कलम- 1 व 2 मधील मजकूर बरोबर असुन तक्रारदारांचे आईने पॉलीसी क्रं. 982241284 घेतली असुन त्याचा हप्ता रु.989/- असा होता. उर्वरीत मजकूर माहित नसल्यामुळे मान्य नाही. तक्रारदार हे सदर विमा पॉलीसीचे नॉमीनी नाहीत. तसेच तक्रारदारांनी कायदेशीर वारसा प्रमाणपत्रा प्रमाणे दाखल केलेले नाही. कलम-3 मधील मजकुराबाबत सामनेवाले यांनी तक्रारदारांचा विमा क्लेम ता. 31.03.2003 च्या पत्रानुसार रद्द केलेला आहे. तक्रारदारांनी सदर निर्णयास झोनल ऑफिस यांचेकडे अपिल दाखल केले होते. परंतु सदरचा निर्णय वरिष्ठ कार्यालयाने कायम ठेवला असुन त्याप्रमाणे तक्रारदारांना ता.25.07.2003 च्या पत्राअन्वये झोनल ऑफिसचा निर्णय कळविला आहे. कलम- 4 मधील मजकुर मान्य नाही. सामनेवाले यांनी तक्रारदारांना द्यावयाचे सेवेत कसुरी केलेली नसल्यामुळे नुकसान भरपाई देण्यास सामनेवाले जबाबदार नाहीत. कलम-5 मधील मजकुर तक्रारदारांनी झोनल ऑफिस येथे अपिल दाखल केल्या बाबत मान्य आहे. कलम-6 व 7 मधील मजकुर मान्य नाही. कलमल-8 मधील मजकुर सामनेवाले यांना माहिती नाही. कलम-9 मधील मजकुराबाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकिला मार्फत पाठविलेल्या नोटीसीस सामनेवाले यांनी ता. 13.01.2010 रोजी उतर दिले आहे. कलम-10 मधील मजकुर सामनेवाले यांना मान्य नाही. सामनेवाले यांनी त्यांच्या अतिरिक्त लेखी कैफियतीमध्ये नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांची आई विमेदार यांनी ता.20.03.2003 रोजी प्रोपोजल फॉर इंश्युरन्स ता.20.03.2003 रोजी प्रश्न क्रं.4 मध्ये खोटे उतर दिलेले आहे. विमेदारांनी पूर्वीच्या रद्द केलेल्या ता.01.10.2000 च्या प्रोपोजल बाबत माहिती दिली नाही. त्यांनी पूर्वीचे प्रोपोजल रद्द केल्याची माहिती न सांगीतल्यामुळे पॉलीसीच्या अटी व शर्तीचा भंग केलेला आहे. रद्द केलेल्या ता.01.10.2000 ची प्रत तसेच ता. 20.03.2003 च्या प्रोपोजल व क्लेम रद्द केल्याचे पत्र ता. 31.03.2003 रोजीचे खुलाशा सोबत दाखल आहे. सामनेवाले यांनी योग्य कारणास्तव तक्रारदारांचा विमा क्लेम रद्द केलेला असल्यामुळे सामनेवाले यांनी तक्रारदारांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाईची रक्कम देण्यास जबाबदार नाहीत. न्याय निर्णयासाठी मुद्दे उतरे 1. सामनेवाले यांनी तक्रारदारांची मयत आई भागुबाई बन्सी गिरी यांची विमा पॉलीसी क्रं. 982241284 नुसार मिळणारी विमा लाभ रक्कम तक्रारदारांना न देवून द्यावयाचे सेवेत कसूरी केल्याची बाब तक्रारदारांनी सिध्द केली आहे काय ? नाही. 2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? नाही. 3. अंतिम आदेश काय ? निकालाप्रमाणे. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, पुराव्याचे शपथपत्र, सामनेवाले यांचा खुलासा, दाखल कागदपत्र, शपथपत्र यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल वि.वि. जावळे व सामनेवाले यांचे विद्वान वकिल ए.पी.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदारांची आई भागुबाई बन्सी गिरी यांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून विमा पॉलीसी क्रं. 982241284 नुसार ता. 15.02.2002 रोजी रक्कम रु.50,000/- ची विमा पॉलीसी घेतली होती. सदर पॉलीसीची रक्कम रु.969/- प्रमाणे एकुण 4 हप्ते भरल्या नंतर तक्रारदारांच्या आईचा –हदयविकाराच्या अजाराने ता. 12.02.2003 रोजी मृत्यू झाला. तक्रारदार हे सदर विमा पॉलसीचे एकमेव वारसदार आहेत. तक्रारदारांनी आईच्या मृत्यूनंतर वर नमुद केलेल्या विमा पॉलीसीची रक्कम परत मिळण्यासाठी सामनेवाले नं.1 व 2 यांचेकडे चौकशी केली. तक्रारदारांनी सामनेवाले नं.2 यांचेकडे विमा पॉलीसीची रक्कम मागणी करण्या करीता ता. 31.03.2003 व 19.05.2003 रोजी पत्र पाठवून रक्कमेची मागणी केली. सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव ता.31.03.2003 च्या पत्रानुसार नामंजूर केला. सदर पत्रा प्रमाणे तक्रारदारांची आई भागुबाई बन्सी गिरी यांनी सदर पॉलीसी घेताना त्यांची जुनी विमा पॉलीसी बाबत माहिती उघड केली नाही. तक्रारदारांची आईची जुनी पॉलीसी त्यांनी रद्द केलेली होती. वर नमुद केलेली माहिती सदर पॉलीसी घेताना सांगीतली नसल्यामुळे तक्रारदारांचा क्लेम नामंजूर करण्यात आल्या बाबत नमुद केले होते. तक्रारदारांनी झोनल ऑफिस यांचेकडे यासंदर्भात तक्रार केली असता त्यांनी विभागीय कार्यालयाचा निर्णय कायम ठेवल्या बाबत तक्रारदारांना ता. 25.7.2003 च्या पत्रानुसार कळविले आहे. त्याच प्रमाणे तक्रारदारांना सदरचा निर्णय मान्य नसल्यास कॉजी ज्युडीशीयल फोरम, मुंबई यांचेकडे अपिला बाबत कार्यालयाने मार्गदर्शन केले. तक्रारदारांनी ता. 4.12.2009 रोजी कॉजी ज्युडीशीयल फोरम, मुंबई विमा रक्कमेची मागणी केली असता लेखी अर्जाद्वारे ता.15.12.2009 रोजी एका महिन्यात दावा दाखल करण्याबाबत कारण दाखवून विमा रक्कमेची जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला आहे अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सामनेवाले यांचे खुलाशात नमुद केल्याप्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव योग्य त्या कारणासाठी नामंजूर करण्यात आला असुन तक्रारदारांनी विमा लाभ रक्कम देण्याची जबाबदारी नाकारल्याबाबत नमुद केले आहे. तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांची आई विमा पॉलीसीधारक भागुबाई बन्सी गिरी यांचा ता. 12.2.2003 रोजी मृत्यू झाल्याचे दिसून येते. त्याच प्रमाणे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांनी ता. 31.3.2003 रोजी पूर्वीची विमा पॉलीसी ता.1.10.2000 रोजी रद्द केली होती. सदरची माहिती वर नमुद केलेली पॉलीसी घेताना सांगीतली नसल्यामुळे तक्रारदारांचा विमा प्रस्ताव नाकारण्यात आल्याचे दिसून येते. त्यानंतर विभागीय कार्यालय, औरंगाबाद यांच्या ता. 25.7.20003 च्या पत्रावरुन झोनल ऑफिस,मुंबई कमिटीने तक्रारदारांचा विमा प्रस्तावाची तपासणी केली असता विभागीय कार्यालयाने दिलेला निर्णय कायम ठेवण्यात आल्या बाबत नमुद केले आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी सदर निर्णया विरुध्द व्कॉसी ज्युडीशीयल फोरम, मुंबई येथे अपिल करण्या बाबतचे मार्गदर्शनही केल्याचे दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी ता. 4.12.2009 रोजी बीमा लोकपाल का कार्यालय, मुंबई यांनी देण्यात आल्याचे दिसून येते. सदर पत्राचे अवलोकन केले असता झोनल ऑफिस मुंबई ता. 25.7.2003 रोजीच्या पत्रानुसार तक्रारदारांचा अर्ज नामंजूर केल्याची बाब तक्रारदारांना मान्य आहे. सदर पत्रात मार्गदर्शन केल्याप्रमाणे तक्रारदारांनी बीमा लोकपाल का कार्यालय, मुंबई यांचेकडे अपिल दाखल केले नव्हे. तक्रारदारांनी ता. 4.12.2009 रोजी पाठविलेल्या पत्राचे उतर बीमा लोकपाल का कार्यालय, मुंबई यांनी ता. 15.12.2009 च्या पत्रानुसार कळविण्यात आल्याचे दिसून येते. सदर पत्रा प्रमाणे तक्रारदारांनी विमा कंपनीकडून ता.25.7.2003 रोजी आलेल्या निर्णया नंतर एक वर्षाच्या आत त्यांचेकडे तक्रार दाखल करणे आवश्यक होते, असे नमुद केल्याचे दिसून येते. वरिल परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांनी ता.25.7.2003 रोजी नामंजूर केला असून सामनेवाले यांचे मार्गदर्शना प्रमाणे तक्रारदारांनी बीमा लोकपाल का कार्यालय, मुंबई यांचेकडे ता.4.12.2009 पर्यन्त कोणतीही कार्यवाही केल्याचा खुलासा न्यायमंचा समोर नाही. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी त्यांचा विमा प्रस्ताव सामनेवाले यांनी ता. 25.7.2003 रोजी नामंजूर केल्यानंतर ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार कारण घडल्यानंतर 2 वर्षाच्या मुदतीत न्यायमंचाकडे दाखल करणे आवश्यक होते. तक्रारदारांनी तक्रारदारांचा विमा प्रस्ताव ता. 25.7.2003 रोजी नामंजूर केल्यानंतर ता.4.12.2009 रोजी बीमा लोकपाल का कार्यालय, मुंबई यांच्याकडे पत्र देवून विमा रक्कमेची मागणी केली आहे. त्याच प्रमाणे सामनेवाले यांनी ता.6.1.2010 रोजी नोटीस पाठवून विमा रक्कमेची मागणी केली आहे. तक्रारदारांना सदर प्रकरण दाखल करण्याचे कारण ता.25.7.2003 रोजी घडले असून सदर तारखेपर्यन्त 2 वर्षाच्या मुदतीत न्यायमंचात प्रकरण का दाखल केले नाही.? त्याच प्रमाणे सदर प्रकरण दाखल करण्यास विलंब का झाला याबाबतचा कोणताही खुलासा न्यायमंचा समोर नाही. तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मुदतीत तक्रार दाखल केलेली नसल्यामुळे तक्रारदारांची तक्रार मुदत बाहय असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार नामंजूर करणे उचित होईल, असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारदारांची तक्रार मुदतबाहय असल्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम देणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे. सबब, न्यायमंच खालील आदेश देत आहे. ।। आ दे श ।। 1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते. 2. सामनेवाले खर्चा बाबत आदेश नाही. 3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत. (सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट ) सदस्या, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड
| [HONORABLE Saw Madhuri Sandip Vishwarupe] Member[HONORABLE Pramod Bhalchandra Bhat] PRESIDENT | |