जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 171/2008. प्रकरण दाखल तारीख - 13/05/2008 प्रकरण निकाल तारीख - 27/08/2008 समक्ष - मा.श्री.विजयसिंह राणे. - अध्यक्ष. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य. प्रंशात काशिनाथराव ठाकरे वय 31 वर्षे धंदा नौकरी अर्जदार. रा.वसंतनगर माहूर ता. माहूर जि. नांदेड. विरुध्द. 1. अधिक्षक, डाकघर, शिवाजी नगर नांदेड वीभाग नांदेड गैरअर्जदार 2. उपवीभागीय निरीक्षक, किनवट उपवीभाग किनवट. अर्जदारा तर्फे वकील - अड.प्रवीण आयचित गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.ए.एस. बंगाळे निकालपञ (द्वारा - मा.श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष ) यातील तक्रारदार मारोती शिंदे यांची गैरअर्जदार क्र. 1 यांचे विरुध्दची तक्रार अशी आहे की, त्यांना अपघात झाला म्हणून ते दि.27.4.1999 रोजी ठाणे येथील हॉस्पीटल मध्ये दाखल झाले. येथे योग्य उपचार झाले नाही म्हणून त्यांनी सर्जन साहेब व जिल्हाधिकारी यांना आत्मदहनाची नोटीस दिली. जिल्हाधिका-याची भेट घेतली. त्यांना जे. जे. हॉस्पीटलमध्ये पाठविण्यात आले व पूढे ठाणे येथे नेण्यात आले. छञपती हॉस्पीटल कळव्याला पाठविण्यात आले. तेथे उपचार करण्यासाठी जास्त खर्च येईल असे समजल्यावरुन व त्यांचे बहीणीने गैरअर्जदार डॉ. दापकेकर यांच्याशी सल्लामसजत करुन डॉ. दापकेकर यांनी रु.15,000/- चे फी मध्ये चांगल्या प्रकारे ऑपरेशन करण्याची हमी घेतल्यामूळे नांदेड येथे गैरअर्जदार क्र.1 कडे उपचार करण्यात आले. तेथे त्यांचे ऑपरेशन करण्यात आले. त्यांना डॉक्टरांनी वेळोवेळी पूढील तपासणीसाठी बोलावले. ते तेथे एकूण पाच वेळा गेले व त्यांच्याकडे उपचार घेतले होते माञ एक वर्ष झाले तरी त्यांना चालता येत नव्हते. म्हणून त्यांनी पूण्याला जाऊन एक्सरे काढून तपासणी केली तेव्हा असे आढळून आले की, हाडामध्ये टाकलेली स्टील नळी व हाडाला वायर फिटींग बरोबर केली नाही. म्हणून नेहमी जखम कायम राहणार असे त्यांना सांगण्यात आले. त्यांनी ही माहीती डॉ. दापकेकर यांना दिली. ते योग्य उपचार करीत नाहीत. म्हणून ही तक्रार दाखल केली व डॉक्टराकडून खर्च व नूकसान भरपाई म्हणून रु.5,25,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. त्यांनी सूरुवातीस राज्य आयोगात तक्रार दाखल केली. परंतु पूढे या मंचाला जास्ती आर्थिक क्षेञाचे अधिकार आल्यामूळे तक्रार या मंचात वर्ग करण्यात आली. गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली होती, ते वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. त्यांनी गैरअर्जदाराची तक्रार ही खोटी व गैरकायदेशीर असल्यामुळे फेटाळावी अशी मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे असे की, त्यांचा अपघात झाला त्यावेळेस सदरचा अर्जदार हे ग्रेड वन कंपाऊंडीग फ्रॅक्चर टिबीया अन्ड फेब्यूला कम्यूनेटेडचे उपचारासाठी दाखल झाले होते. दूखापतीनंतर जवळपास एक महिन्यानी ते उपचारासाठी आले होते त्यांनी संपूर्ण तपासणी केली व त्यांनी त्यांना गूंतागूंतीची माहीती दिली, उपचाराची माहीती दिली आणि योग्य त्या पध्दतीने काळजी न घेतल्यास होणा-या परीणाबाबत सांगितले. गैरअर्जदारानी अर्जदारास ऑपरेशन झाल्यानंतर जखम भरुन येईपर्यत येण्यास सांगितले. त्यामुळे त्याची जखम भरुन आली. सहा आठवडयानंतर प्लॅस्टर काढण्यासाठी व पधंरा दिवसांनी पाठपूराव्यासाठी येण्यासाठी त्यांना सूचना दिल्या होत्या. गैरअर्जदारानी त्यांला संपूर्ण मदत केलेली आहे. अर्जदार उपचारा दरम्यान सूस्थीतीत होता त्यांस कूठल्याही प्रकारची गूंतागूंत झालेली नव्हती, व ऑपरेशनपोटी अत्यंत मोजकी व माफक फी आकारण्यात आली होती. दर पंधरा दिवसांनी उपचारासाठी येण्याची सूचना देण्यात आली होती. परंतु अर्जदार यांनी गैरअर्जदाराच्या सूचनांची योग्य दखल घेतली नाही. तो अनियमित येत होता व योग्य काळजी घेतली नाही त्यामुळे इन्फेक्शन झाले जे वैद्यकीय शास्ञाप्रमाणे ज्ञात आहे व संभाव्य आहे.त्यांस इन्फेक्शन जरी झाले असले तरी त्यांचे हाड पूर्वीप्रमाणेच योग्य जूळलेले आहे. थोडक्यात अर्जदाराची तक्रार ही चूकीची आहे म्हणून खारीज करावी असा उजर घेतला आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने हजर होऊन आपला लेखी जवाब दाखल केला आहे. या प्रकरणात डॉक्टराचा कोणताही दोष नाही म्हणून विमा कंपनी ही नूकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही असे दर्शविले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून स्वतःचे शपथपञ, तसेच उपचारासंबंधी सर्व कागदपञे, जे.जे. हॉस्पीटल मूंबई येथील रिपोर्ट, मा. जिल्हाधीकारी ठाणे यांना दिलेले पञ, कळवा, ठाणे येथील रुटीन ब्लड एझामिनेशन रिपोर्ट, यूरीन, ब्लड, शूगर चा रिपोर्ट, दि.4.6.1999 चे डॉ. दापकेकर यांचे प्रमाणपञ, राज्य आयोगाचे पञ, इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. गैरअर्जदार यांनी स्वतःची साक्ष शपथपञाद्वारे नोंदविली, तसेच रामनारायण बंग यांचे शपथपञ इन्शूरन्स कंपनीतर्फे दाखल केले आहे.त्यांनी आंतर रुग्ण केस पेपर संमती पञक, दि.25.5.1999, केस पेपर ओपन रिबोअर टेक्स बूक दि.25.5.1999, तसेच काबरा पॅथालाजी लॅबारेटरी रिपोर्ट दि.25.5.1999 इत्यादी कागदपञ दाखल केली आहेत. सदर प्रकरणात काही महत्वाचे मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार डॉ. दापकेकर यांनी अर्जदारास केलेले उपचार हे निष्काळजीपणाचे होते आणि त्यामूळे अर्जदार यांची दूखापत बरी झाली नाही व ते निष्काळजीपणासाठी दोषी आहेत काय ? नाही 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1 ः- यातील सर्वात महत्वाची बाब अशी आहे की, अर्जदाराने आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे गैरअर्जदाराकडे ते उपचार घेत होते. एक वर्षानंतर त्यांना चालता येत नव्हते म्हणून त्यांनी पूणे येथे जाऊन एक्सरे काढला व त्यात असे दिसून आले की, हाडामध्ये स्टील नळी व हाडाला वायर फिटींग बरोबर केली नाही. त्यामुळे उपचार बरोबर होत नाही व जखम कायम राहते असे सांगण्यात आले. अर्जदाराने दाखल केलेले सर्व दस्ताऐवजाचे अवलोकन केले असता त्यांनी पूणे येथे अशा प्रकारची तपासणी केली आणि तेथे वरील प्रकारे निष्कर्ष नीघाला, त्याद्वारे डॉ. दापकेकर यांनी योग्य रित्या ऑपरेशन केले नाही आणि त्यामुळे इन्फेक्शन होऊन ते अधू राहीले हे दर्शवीणारे कोणतेही दस्तऐवज अर्जदाराने रेकॉर्डवर दाखल केलेले नाही. त्यामुळे अर्जदाराच्या वरील वीधानास कोणताही आधार आहे असे आढळून आलेले नाही. याच संदर्भात अर्जदाराने प्रतिज्ञालेखात असे नमूद केले आहे की, तो आजार पूर्णपणे बरा होत नव्हता, पूर्णपणे त्यास स्वबळावर चालताही येत नव्हते व त्या पायातून सतत पू, रक्त, पाणी नीघत होते, म्हणून पून्हा पूण्याच्या दवाखान्यात तपासणीसाठी गेला व तेथून मूंबई येथे जे. जे. हॉस्पीटलमध्ये गेला पून्हा तेथे असे दिसून आले की, स्टील नळी, व हाडाला वायर फिटींग बरोबर केली नाही. तसेच जे. जे. हॉस्पीटलमध्ये तेथील डॉक्टराच्या सांगण्यावरुन त्यांला पून्हा शस्ञक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांचा पायावर माहे मे 2001 मध्ये दूस-यांदा शस्ञक्रिया करण्यात आली. त्यासाठी तो दि.11.5.2001 रोजी मूंबई येथे दाखल झाला. हे प्रकरण 2000 मध्ये महाराष्ट्र ग्राहक तक्रार मंचाकडे मूंबई येथे दाखल करण्यात आल्याने पहिल्या मूख्य तक्रारीत हया दूस-या शस्ञक्रियेचा उल्लेख नाही. या बाबतीत कोणताही ठोस दस्तऐवज पूरावा अर्जदाराने या तक्रारी सोबत दाखल केलेला नाही. केवळ त्यांच्या प्रतिज्ञापञाद्वारे ते सिध्द होणे शक्य नाही. या प्रकरणात अर्जदाराने यूक्तीवादाचे वेळी प्रतिज्ञापञ दाखल करुन असे दर्शविले की, त्यांला अल्प शूल्क आकारल्याचे कारणे सांगत कठीण व दूःखकारक अवस्थेत बाकावर झोपविले, शस्ञक्रियेनंतर वेळेपूर्वीच सूटी दिली आणि दूस-यावेळेस प्लॅस्टर करताना प्लॉस्टरमध्ये इंजेक्शन व्हायल चे काचेचा तूकडा निष्काळजीपणाने ठेवला, यांचा ञास जास्तच होऊ लागला. यांचा उल्लेख मूळ तक्रारीत आलेला नाही. शेवटी केवळ शपथपञाद्वारे असा आरोप केला आहे त्यामूळे या आरोपाची दखल घेणे आम्हास योग्य वाटत नाही. वैद्यकीय निष्काळजीपणा बाबत संबंधीत तक्रारदारास संबंधीत डॉक्टरांनी निष्काळजीपणा, उपचारा बाबत केला हे दर्शवीणारा सकृतदर्शनी पूरावा देणे गरजेचे असते आणि त्यानंतर डॉक्टराची हे दर्शविण्याची जबाबदारी येते की, त्यांनी योग्य ते उपचार योग्य त्या परिस्थीतीत केले व त्यात कोणताही निष्काळजीपणा केला नाही. येथे या प्रकरणात अर्जदार यांनी गैरअर्जदार डॉक्टर यांनी ऑपरेशन करताना निष्काळजीपणा केला हे दर्शवीणारा कोणताही सकृतदर्शनी पूरावा दाखल केलेला नाही. यास्तव अर्जदार हे या प्रकरणात योग्य त्या पूराव्याअभावी आपले प्रकरण सिध्द करु शकले नाही हे स्पष्ट होते. असे असले तरी अर्जदार यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात पूर्णतः निकाल देण्याचे झाल्यास व सर्व बाबतचा तपास करावा असे झाल्यास संबंधीत व्यक्तीना न्यायालय समोर हजर ठेवणे त्यांची साक्ष घेणे. संबंधीत दस्ताऐवज यांची तपासणी करणे, पूणे व जे. जे. येथील डॉक्टराना बोलावून त्यांची साक्ष घेणे, इत्यादी बाबी पूर्ण केल्यानंतर व सर्व गूंतागूंतीची चौकशी केल्यानंतर सर्व पूरावे समोर येतील व योग्य निकाल करता येईल हे या न्यायमंचाच्या मर्यादीत संक्षीप्त पध्दतीच्या अधिकार क्षेञात शक्य नाही. गैरअर्जदार यांनी आपले जवाबाच्या परिच्छेद नंबर 3 मध्ये सूध्दा हाच आक्षेप घेतला आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. तक्रार खारीज करण्यात येत आहे. 2. खर्च ज्यांचा त्यांनी आपआपला सोसावा. 3. अर्जदार हे आपल्या मागणीचा पाठपूरावा दिवाणी न्यायालयात जाऊ करुन शकतील आणि त्याठिकाणी निकालात मंचाने व्यक्त केलेली कोणतेही मत विचारात घेण्यात येऊ नयेत. अर्जदाराचे अधिकार या संदर्भात अबाधीत ठेवण्यात येत आहेत. 4. पक्षकाराना निकाल कळविण्यात यावा. श्री.विजयसिंह राणे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक |