(द्वारा- श्रीमती रेखा कापडिया, सदस्य) अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांच्याकडून विमा पॉलीसी घेतली होती. पतीच्या निधनानंतर अर्जदाराने विमा रक्कम देण्याची मागणी गैरअर्जदार यांनी मान्य न केल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांचे पती भारत माणिकराव मतसागर यांनी दि.28.12.2004 रोजी गैरअर्जदार यांच्याकडून 50,000/- रुपयाची विमा पॉलीसी घेतली. दि.03.05.2006 रोजी त्यांचे निधन झाले. अर्जदाराने गैरअर्जदार यांना कळविले व विमा रकमेची मागणी केली. अर्जदाराने त्यांना आजार असल्याची माहिती दिली नाही असे कारण सांगून गैरअर्जदार यांनी विमा रक्कम देण्यास नकार दिला. गैरअर्जदार यांच्या या कृती विरुध्द अर्जदाराने मंचात तक्रार दाखल केली असून, विमा रक्कम व नुकसान भरपाईची मागणी केली आहे. (2) त.क्र.150/09 गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांनी भारत मतसागर यांनी दि.24.12.2004 रोजी विमा पॉलीसी काढल्याचे मान्य केले आहे. सदरील पॉलीसी 50,000/- रुपयाची असून, अर्जदार या नॉमिनी असल्याचे त्यांना मान्य आहे. अर्जदाराच्या पतीस मानसिक आजार असल्याची माहिती पॉलीसी काढताना लपवून ठेवण्यात आली. भारत मतसागर यांचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाला असून, ते आजारपणामुळे दि.10.06.2004 ते 04.07.2004 पर्यंत सुटटीवर होते, असे ग्रामिण रुग्णालय, पाचोड यांनी दिलेल्या अहवालावरुन स्पष्ट होत असल्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. अर्जदाराच्या पतीने पॉलीसी काढताना त्यांना असणा-या आजाराबाबतची माहिती न दिल्यामुळे त्यांना नियमानुसार विमा रक्कम नाकारण्यात आली असल्याचे गैरअर्जदार यांनी आपल्या जवाबात म्हटले आहे. गैरअर्जदार यांनी, डॉ.निखील मारुतराव खेडकर यांनी भारत मतसागर यांच्यावर दि.23.06.2005 रोजी मानसिक रोगासाठी उपचार केल्याचे शपथपत्र सोबत जोडले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदाराच्या पतीने गैरअर्जदार यांच्याकडे दि.28.12.2004 रोजी 50,000/- रुपयाची विमा पॉलीसी काढली आहे. सदरील पॉलीसीचा क्रमांक 980993937 असा असून, कालावधी दि.28.12.2004 ते 15.12.2019 असा नमूद केलेला दिसून येतो. अर्जदाराच्या पतीने दि.03.05.2006 रोजी आत्महत्या केली. त्याचे मृत्यू प्रमाणपत्र, पोलीस पंचनामा, वारसा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे तक्रारीसोबत जोडलेली आहेत. अर्जदाराचे पती भारत मतसागर हे मानसिक आजाराने त्रस्त होते व या रोगाच्या उपचारासाठी दि.10.06.2004 ते 04.07.2004 रोजी पाचोड येथील ग्रामिण रुग्णालयात व दि.26.06.2005 रोजी डॉ.निखील मारुतराव खेडकर काम करीत असलेल्या शांति नर्सिंग होम येथे उपचार करुन घेतला असल्यामुळे त्यांनी हे विमा पॉलीसी काढताना जाहिर न केल्यामुळे गैरअर्जदार यांनी विमा रक्कम देण्याचे नाकारले असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. विमा पॉलीसी काढताना आधी असलेला आजार जाहिर न करणे, किंवा जाणूनबुजून लपविल्यास विमा रक्कम नाकारण्याचा अधिकार विमा कंपनीस असतो. माणिक मतसागर यांनी जुलै 93 मध्ये (पॉलीसी क्र.980363252) तसेच ऑक्टोबर 98 मध्ये (पॉलीसी क्र.981745799) अशा दोन विमा पॉलीसी काढल्या आहेत व या आधारेच त्यांना 980993977 ही विमा पॉलीसी देण्यात आलेली दिसून येते. गैरअर्जदार यांनी भारत मतसागर यांना जुलै 93 व ऑक्टोबर 98 या पॉलीसीची रक्कम नोव्हेंबर 2006 (3) त.क्र.150/09 मध्ये मुदत पूर्ण झाल्यानंतर दिलेली दिसून येते. वैद्यकीय अधिकारी जिल्हा पाचोड ग्रामिण रुग्णालय यांनी भारत मतसागर हे सर्व्हायकल स्पॉन्डिलायसीसमुळे त्यांच्या रुग्णालयात दि.10.06.2004 पासून उपचार घेत असल्याचे म्हटले आहे, व त्यांना चार आठवडयासाठी बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला असल्याचे त्यांच्या दि.10.06.2004 रोजीच्या पत्रावरुन दिसून येते. शांति नर्सिंग होम येथे दि.23.06.2005 ते 02.07.2005 या कालावधीत भारत मतसागर यांच्यावर मानसिक आजारपणावर उपचार करण्यात आल्याचे दिसून येते. भारत मतसागर यांच्या नावे काढण्यात आलेली विमा पॉलीसी ही दि.24.12.2004 रोजी काढण्यात आलेली आहे. म्हणजेच शांती नर्सिंग होम मधील उपचार, पॉलीसी काढल्यानंतरचा आहे. दि.10.06.2004 रोजीची सर्व्हायकल स्पॉंन्डिलायसीस या आजारपणाची माहिती जरी पॉलीसी घेताना जाहिर केलेली नसली तरी, या कारणामुळे त्यांचे निधन झालेले नाही. त्यांचा मृत्यू आत्महत्या केल्यामुळे झाला असल्याचे मेडीकल ऑफीसर, पाचोड यांच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे विमा रक्कम न देण्याचे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. भारत मतसागर यांना दि.23.06.2005 ते 02.07.2005 या काळात शांती नर्सिंग होम येथे उपचारासाठी दाखल केले होते, हा आजार त्यांना विमा पॉलीसी काढलेल्या तारखे अगोदर म्हणजेच दि.24.12.2004 आधी होता हे गैरअर्जदार सिध्द करु शकलेले नाहीत, किंवा याबाबत त्यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे अर्जदाराच्या पतीने आजारपणाबददलची माहिती जाहिर केली नाही हे गैरअर्जदार यांचे म्हणणे मंच मान्य करीत नाही. आदेश 1) गैरअर्जदार यांनी अर्जदारास पॉलीसी क्र.980993937 ची रक्कम क्लेम दाखल केल्यापासून ते रक्कम मिळेपर्यंत 9% व्याजाने 30 दिवसात द्यावी. 2) गैरअर्जदार यांनी अर्जदारास मानसिक त्रास व खर्चाबददल रु.2500/- 30 दिवसात द्यावे. श्रीमती ज्योती पत्की श्रीमती रेखा कापडिया श्री.डी.एस.देशमुख सदस्य सदस्य अध्यक्ष
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |