Maharashtra

Kolhapur

CC/10/104

Smt. Jyoti Rajesh Patane - Complainant(s)

Versus

L.I.C. of India - Opp.Party(s)

Shital Potdar

02 Aug 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/104
1. Smt. Jyoti Rajesh Patane A/p Kale Tal. Panhala Dist. Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. L.I.C. of India Centre Point, Station Road Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Shital Potdar , Advocate for Complainant
N.G.Kathale, Advocate for Opp.Party

Dated : 02 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.02/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्‍या)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला त्‍यांचे वकीलांमार्फत हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले. उभय पक्षांचा युक्‍तीवाद ऐकणेत आला. 

 

           सदरची तक्रार तक्रारदारास जीवनसाथी पॉलीसीच्‍या नियमाप्रमाणे सामनेवालांनी बॉन्‍ड न दिलेमुळे दाखल करणेत आली आहे.

          

(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी:-अ) सामनेवाला हे विमा व्‍यवसाय करणारी कंपनी असून तक्रारदाराचे पती मयत राजेश पांडूरंग पाटणे यांनी स्‍वत:करिता व पत्‍नीकरिता सामनेवालांकडे जीवनसाथी विमा पॉलीसी उतरविलेली आहे. नमुद पॉलीसीचा क्र.946991675असून त्‍याचा कालावधी हा दि.2005-2030 असा आहे.

 

           ब) नमुद पॉलीसी कालावधीत 15/09/2007 रोजी तक्रारदाराचे पती मयत झालेने तक्रारदाराने सामनेवालांकडे क्‍लेम मागणी केली व सदर मागणी दि.23/12/2008 रोजी नाकारलेने सामनेवालांविरुध्‍द मे.मंचासमोर ग्राहक तक्रार क्र.216/08 दाखल केलेला होता. सदर तक्रारीत दि.07/10/2009 रोजी तक्रारदारास‍ विमा रक्‍कम देणेबाबत आदेश पारीत केला होता. त्‍याप्रमाणे सामनेवालांने आदेशीत रक्‍कम तक्रारदारास अदा केली. मात्र नमुद जीवनासाथी पॉलीसीप्रमाणे तक्रारदारास उर्वरित बॉन्‍ड दिलेला नाही. म्‍हणून प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली.

 

           क) प्रस्‍तुत नियमाप्रमाणे विमाधारक पती अथवा पत्‍नी दोघांपैकी एकाचा मृत्‍यू झाल्‍यास उर्वरित व्‍यक्‍तीस 2030 पर्यंतचे प्रिमियम माफ तसेच पॉलीसीच्‍या अंतिम तारखेस म्‍हणजेच मॅच्‍यूरीटीनंतर विमा रक्‍कम अधिक बोनस अधिक अंतिम अतिरिक्‍त बोनस असा बॉन्‍ड तयार करुन दिला जातो. तक्रारदाराने सामनेवालांकडे वारंवार चौकशी केली असता उडवाउडवीची उत्‍तरे दिली त्‍यामुळे दि.29/12/2009 रोजी बॉन्‍ड मागणी साठी वकील नोटीस दिली असता दि.04/01/2010 रोजी सामनेवाला यांनी त्‍यास नकार दिला आहे. पतीच्‍या मृत्‍यूनंतर तक्रारदार या निराधार विधवा आहेत व त्‍यांचेवर दोन लहान मुलाच्‍या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी आहे. सामनेवालांच्‍या या कृत्‍यामुळे पॉलीसीचा उद्देशच संपुष्‍टात आला आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झाला आहे. सबब तक्रारदराची तक्रार मंजूर करुन पॉलीसीतील फायदयाप्रमाणे बॉन्‍ड करुन देणेबाबत आदेश व्‍हावा व मानसिक त्रासापोटी रु.25,000/-व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे.

(3)        तक्रारदाराने आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍टयर्थ ग्राहक तक्रार क्र.216/08 चे सदर मंचाचे निकालपत्र, वकील नोटीस, सामनेवालांचे नोटीसीस आलेले प्रतिउत्‍तर, सामनेवालांचे पॉलीसीचे वैशिष्‍टयेबाबतचे पत्रक इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

(4)        सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या लेखी म्‍हणणेनुसार-अ) तक्रारदाराचे तक्रार अर्जातील पॉलीसीचा तपशील व मे.मंचाचा निर्णय व त्‍याचे सामनेवाला यांनी केलेली अंमलबजावणी वगळता इतर विधाने मान्‍य व कबूल केलेली नाहीत.

 

           ब) पॉलीसी क्र.946991675 जीवनसाथी पॉलीस बाबत पतीचा मृत्‍यू दावा मंजूर करुन पॉलीसीची रक्‍कम यापूर्वीच अदा केलेली आहे. तसेच सामनेवालांच्‍या वरिष्‍ठांच्‍या आदेशानुसार जीवनसाथी पॉलीसीचे इतरही फायदे तक्रारदाराला देणेची योग्‍य ती कारवाई सामनेवाला लवकरात लवकर करत आहेत. मात्र मानसिक त्रासाबद्दल मागितलेली रक्‍कम रु.25,000/-सामनेवाला यांना मान्‍य व कबूल नाही.तक्रारदाराची सदरची मागणी बिनखर्ची नामंजूर करावी अशी विंनती सामनेवालांनी सदर मंचास केली आहे.

 

(5)        सामनेवाला यांनी आपल्‍या लेखी म्‍हणणेच्‍या पुष्‍टयर्थ दि.26/07/2010 रोजी पुरसीस दाखल केलेली आहे. सदर पुरसीसीसोबत नमुद पॉलीसीच्‍या फायदयाप्रमाणे पुढील हप्‍ते माफ करणेत आलेले आहेत. तसेच अंतिम मुदतीपर्यंतची तक्रारदाराचे नांवे मूळ पॉलीसी पाठविलेली आहे याबाबतचे दि.21/07/2010 चे पत्र, तक्रारदारास पाठविलेली मूळ पॉलीसीची सत्‍यप्रत तसेच फॉर्म नं.5148 ची सत्‍यप्रत प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केली आहे.

(6)        तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्‍हणणे, सामनेवाला यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुरसीस इत्‍यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्‍वाचे मुद्दे निष्‍कर्षासाठी येतात.

अ) प्रस्‍तुत तक्रारीतील पॉलीसी क्र.946991675 असून यापूर्वी दाखल केलेली व निर्णित झालेली तक्रार क्र.216/08 मधीलही पॉलीसी क्रमांक तोच आहे. सबब तक्रारदाराने पूर्वीच्‍याच तक्रारीमध्‍ये नमुद जीवनसाथीच्‍या पॉलीसीप्रमाणे विमा रक्‍कमेबरोबरच नमुद पॉलीसीचे फायदे मिळणेबाबत मागणी करावयास हवी होती. त्‍यावेळी सदर मागणी न करता पुन्‍हा त्‍याच पॉलीसी संदर्भात तक्रार दाखल केलेली आहे हे कायदयास धरुन नाही.

 

ब) सामनेवालांनी नमुद पॉलीसीप्रमाणे दि.15/04/2008 पासूनचे पुढील सर्व हप्‍ते माफ केलेले आहेत. तसेच तक्रारदारास मूळ पॉलीसीची प्रतही पाठवून दिलेली आहे. तसेच इन्‍डॉर्समेंट क्र.5146 पाठवून‍ दिलेला आहे व त्‍याप्रमाणे तक्रारदाराचे नांवे पॉलीसी प्रभावीत केलेली आहे. तसेच पॉलीसीप्रमाणे अन्‍य असणारे फायदे देण्‍याचे तयारी दर्शविली आहे.

 

क) मुद्दा अ व ब मधील विस्‍तृत विवेचनाचा विचार करता नमुद जीवनसाथी पॉलीसीच्‍या कोष्‍टक क्र.89 क्‍लॉज II प्रमाणे तक्रारदार हे पात्र आहेत. वास्‍तविक तक्रार क्र.216/08 मधील विमा रक्‍कम देवून सामनेवालांनी निर्णयाची अंमलबाजवणी केली त्‍याचवेळी प्रस्‍तुतचे नमुद फायदे हे वास्‍तविक विमा रक्‍कमेबरोबरच स्‍वत:हून विमा कंपनीने दयावयास हवे होते ते दिलेले नाहीत. त्‍याबाबत तक्रारदाराने दि.24/12/2009 रोजी नोटीस दिलेली होती. सदर नोटीसीस सामनेवालांनी प्रस्‍तुत आदेशात नमुद मागण्‍यांचा उल्‍लेख नसल्‍याने प्रस्‍तुत फायदे तक्रारदारास देय होत नसलेबाबत कळवलेले आहे. त्‍यामुळेच प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली प्रस्‍तुत तक्रार दाखल केल्‍यानंतर सामनेवाला विमा कंपनीने वर नमुद क्‍लॉज ब मध्‍ये नमुद केलेप्रमाणे प्रस्‍तुत फायदे दिलेले आहेत व युक्‍तीवादाच्‍या वेळेस सामनेवालांच्‍या वकीलांनी नमुद पॉलीसीच्‍या तक्रारदारास दयावयाच्‍या फायदया संदर्भात उर्वरित कार्यवाही करणेची दर्शव‍लेली तयारी विचारात घेता नमुद जीवनसाथी पॉलीसी कोष्‍टक क्र.89 व क्‍लॉज II प्रमाणे  सर्व फायदे तक्रारदारास देणेबाबत सामनेवाला कारवाई पूर्ण करतील अशी अपेक्षा हे मंच व्‍यक्‍त करत आहे. मात्र सदरची पूर्तता ही तक्रारदाराने तक्रार दाखल केल्‍यानंतरच सामनेवाला विमा कंपनीने केलेली आहे. वास्‍तविक विमा रक्‍कमेबरोबरच स्‍वत:हून विमा कंपनीने नमुद जीवनसाथी पॉलीसीचे फायदे दयावयास हवे होते ते दिलेले नाहीत त्‍यामुळेच प्रस्‍तुतची तक्रार दाखल करावी लागली ही वस्‍तुस्थिती असली तरी प्रस्‍तुत मागणी त्‍यांनी मूळ तक्रारीबरोबरच करणे क्रमप्राप्‍त होते. सामनेवालांनी नमुद पॉलीसीप्रमाणे फायदे दिलेले आहेत व उर्वरित फायदे देणेची तयारी दर्शविलेली आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                           आदेश

 

(1) तक्रारदाराची तक्रार निकाली काढणेत येते.

 

(2) खर्चाबद्दल काही आदेश नाही.

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER