::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 03/11/2014 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराचे पति श्री. ईश्वरदास देविदास सावरकर हे गैरअर्जदार क्रं. 3 कडे नौकरीत होते. अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्रं. 3 च्या मार्फत गैरअर्जदार क्रं. 2 कडून विमा पॉलीसी काढली होती व गैरअर्जदार क्रं. 3 अर्जदाराचे पतीचे पगारातुन दरमहा विमा पॉलीसी हप्ता कपात करुन पाठवित होते. सदर विमा पॉलीसी ‘’ डबल अॅक्सीडेंट बेनिफिट पॉलीसी’’ होती. सदर पॉलीसी मध्ये विमा धारक अपघाताने मरण पावले तर पॉलीसीच्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कमेचे प्रावधान होते. अर्जदाराचे पती दि. 4/5/11 ला अपघाताने मरण पावले. गैरअर्जदाराने अर्जदाराला विमा क्लेम ची रक्कम रु. 50,000/- अर्जदाराला दिले परंतु सदर पॉलीसी डबल अॅक्सीडेंट बेनीफिट असून सुध्दा अर्जदाराला अतिरीक्त रक्कम रु. 50,000/- देण्यात आली नव्हती म्हणून अर्जदाराने दि. 3/1/12 ला गैरअर्जदार क्रं. 2 कडून सदर पॉलीसी संबंधीत समरी रिपोर्ट पूर्ण माहीतीसह मागितीली. गैरअर्जदार क्रं. 2 ने दि. 20/1/12 ला व त्यानुसार अर्जदाराला असे कळविले कि, अर्जदाराचे पतीचे अपघातावेळी सदर पॉलीसी लॅप्स झाली होती. त्यानंतर अर्जदाराने पुन्हा दि. 27/6/12 ला पूर्ण कागदपञासह अतिरिक्त अॅक्सीडेंट क्लेम करीता विनंती अर्ज केला. त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारांना दि. 5/11/12 ला डबल अॅक्सीडेंट बेनिफिट मिळण्याबाबत नोटीस पाठविले त्या नोटीसवर गैरअर्जदार क्रं. 3 ने खोटे उत्तर पाठविले व गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ने त्या पञ व नोटीसावर कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, अर्जदाराला गैरअर्जदाराकडून विमा पॉलीसीचे डबल अॅक्सीडेंट बेनिफिट चे रक्कम रु. 50,000/- व्याजासह मिळण्याचा आदेश व्हावा तसेच अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 च्या विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 हजर झाले व गैरअर्जदार क्रं. 3 यांना नि. क्र. 8 नुसार नोटीस मिळून सुध्दा ते मंचासमक्ष हजर झाले नाही. म्हणून नि. क्रं. 1 वर दि. 15/7/14 रोजी गैरअर्जदार क्रं. 3 यांच्या विरुध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश पारीत करण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी नि. क्रं. 12 व 13 वर त्यांचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 च्या लेखीउत्तरात असे नमुद आहे कि, अर्जदाराने त्यांच्या विरुध्द लावलेले आरोप खोटे असून नाकबुल आहे. सदर पॉलीसी अर्जदाराचे पतीचे मृत्युचे वेळी बंद झाली होती. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले आहे कि, पॉलिसी ही डबल अॅक्सीडेंट बेनिफिट पॉलीसी असली तर पॉलीसीच्या अट क्रं. 4 नुसार अर्जदाराला डबल बेनिफिट देता येत नाही. सदर पॉलिसीचे स्टेटस रिपोर्टनुसार जानेवारी 2011 ते एप्रिल 2014 पर्यत चार मासीक प्रीमीयम पॉलिसीधारकाने भरलेले नव्हते त्यामुळे पॉलिसी बंद झाली होती. म्हणून पॉलिसीच्या अट क्रं. 4 नुसार पॉलिसीची रक्कम देण्यात आली होती. गैरअर्जदाराने पुढे असे कथन केले कि, पॉलिसीतील असलेली अटी व शर्ती दोन्ही पक्षांचे सहमतीने असून दोन्ही पक्षांवर बंधनकारक आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति कोणतीही अनुचित व्यापार पध्दती किंवा न्युनतापूर्ण सेवा दिली नसून सदर तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
4. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) अर्जदार गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
4) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
5. अर्जदाराचे पति श्री. ईश्वरदास देविदास सावरकर हे गैरअर्जदार क्रं. 3 कडे नौकरीत होते. अर्जदाराचे पतीने गैरअर्जदार क्रं. 3 च्या मार्फत गैरअर्जदार क्रं. 2 कडून विमा पॉलीसी काढली होती व गैरअर्जदार क्रं. 3 अर्जदाराचे पतीचे पगारातुन दरमहा विमा पॉलीसी हप्ता कपात करुन पाठवित होते. सदर विमा पॉलीसी ‘’ डबल अॅक्सीडेंट बेनिफिट पॉलीसी’’ होती. अर्जदार ही मय्यत श्री ईश्वर सावरकार यांची वारसदार आहे. ही बाब गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना मान्य असून अर्जदार ही गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांची ग्राहक आहे असे सिध्द होत आहे सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
6. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 खाली दस्त क्रं. अ- 1 ते अ-12 गैरअर्जदार क्रं. 3 यांचे अर्जदाराचे अधिवक्त्याला दिलेले नोटीसचे पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराचे पती सदर पॉलिसी गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून त्याचे व्यक्तिगत आधाराने काढलेली होती व गैरअर्जदार क्रं. 3 ची कंपनीला त्याच्या पगारातुन पॉलिसीचे प्रिमियम कापून गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडे भरणा करावे अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने गैरअर्जदार क्रं. 3 याने जो पर्यंत अर्जदाराचे पती कामात होते तो पर्यत गैरअर्जदार क्रं. 3 ने अर्जदाराचे पतीच्या पगारातुन विमा पॉलिसीची प्रिमियम कापून त्याची भरणा केली होती. तसेच गैरअर्जदार क्रं. 3 याने अर्जदाराला कंपनीच्या नियमाप्रमाणे कामगार कल्याणच्या खात्यातुन 2,00,000/- रु. ही सुध्दा दिले होते. यावरुन असे सिध्द होते कि, अर्जदाराचे पति गैरअर्जदार क्रं. 3 कडे मरे पर्यंत कामात होते.
मा. राष्ट्रीय ग्राहक आायोग यांनी दिलेल्या न्यायनिर्णयाच्या अनुसार
[2009] CJ765 (N.C)
LIFE INSURANCE CORPORATRION OF INDIA AND OTHERS
V/S.
A.YASODAMMA AND ANOTHER
Decided on 6-2-2009
It was duty of insurer to inform employee about consequences of non-receipt of such premium from employer- Employer was obliged to inform employee that for some reason he is not in a position to perform his obligation whereupon latter could have paid premium directly to appellant- Employer as well as insurance company were bound to inform assured of consequences of non-payment of premium consequent to his retirement- impugned order passed by District forum and confirmed by State Commission just, fair and equitable and not calling for any interference- Revision petition dismissed.
गैरअर्जदार क्रं. 3 ने अर्जदाराच्या पगारातुन 4 महिण्याचे पगार न कपात करता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांच्याकडे विमा प्रिमियमची रक्कम भरली नाही तर गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचे प्राथमिक जबाबदारी होती कि, अर्जदाराचे पति व गैरअर्जदार क्रं. 3 यांना सदर प्रिमियम न भरण्याबाबत पॉलिसी बंद पडेल याची सुचना दयावी परंतु गैरअर्जदार 1 व 2 यांनी यासंदर्भात कोणतीही सुचना अर्जदाराचे पतीला दिली नाही असे दिसून येते. गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी सदर माहीती / सुचना अर्जदाराचे पतीला न देवून सेवेत ञुटी दर्शविली आहे व त्यानंतर अर्जदाराला डबल अॅक्सीडेंट बेनिफिट न देवून अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 4 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्रं. 3 हे अर्जदाराचे पतीचे मालक कंपनी होती व अर्जदार आणि गैरअर्जदार क्रं. 3 यांचे संबंध ग्राहक व विक्रेता यांचे नसून, गैरअर्जदार क्रं. 3 यांनी अर्जदार यांच्या पतीकडून कोणतीही सेवा देण्याकरीता कोणताही मोबदला घेतला नसून गैरअर्जदार क्रं. 3 यांचे विरुध्द कोणताही आदेश पारीत करण्यात येत नाही.
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदाराला डबल अॅक्सीडेंट बेनिफिट ची रक्क्म रु. 50,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आात दयावे.
3) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदाराला झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रु. 5,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आात दयावे.
4) उभयपक्षांनी आपआपला खर्च सहन करावा.
5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 03/11/2014