जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 678/2010. तक्रार दाखल दिनांक : 15/12/2010. तक्रार आदेश दिनांक : 28/04/2011. श्रीमती उषाबाई संजय शेळके, वय सज्ञान, व्यवसाय : घरकाम, रा. मु.पो. बोंडले (शिंदे वस्ती), ता. माळशिरस, जि. सोलापूर. तक्रारदार विरुध्द भारतीय जीवन बिमा निगम, रा. पुणे डि.ओ. 2, चौथा मजला, महावीर पार्क, एस.एन. 688, ए.बी.2, पुणे-सातारा रोड, बिबवेवाडी, पुणे – 411 037. (नोटीस / समन्स डिव्हीजनल मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष यांचेतर्फे अभियोक्ता : सी.डी. कदम आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, त्यांचे पतीने विरुध्द पक्ष यांच्याकडून रु.50,000/- चा विमा घेतला असून पॉलिसी क्रमांक 957253062 असा आहे. दि.26/1/2009 रोजी त्यांचे पती किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यू पावले. त्यानंतर तक्रारदार यांनी विमा रक्कम मिळविण्यासाठी क्लेम फॉर्म व आवश्यक कागदपत्रे पाठवून दिली. परंतु दि.18/3/2010 च्या पत्राद्वारे विरुध्द पक्ष यांनी त्यांचा विमा क्लेम नाकारला आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.50,000/- विमा रक्कम व्याजासह मिळावी आणि मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार खर्च रु.5,000/- मिळावा, अशी विनंती केली आहे. 2. विरुध्द पक्ष यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांचे पतीने पॉलिसी प्रस्तावामध्ये आवश्यक माहिती देण्याचे लपवून ठेवले आहे. मयत संजय शेळके यांच्या मृत्यूनंतर चौकशी केली असता ते शाह हॉस्पिटल येथे फेब्रुवारी 2007 महिन्यात अडमीट असल्याचे निदर्शनास आले. तसेच श्री.नृसिंह डायग्नोस्टीक सेंटर येथे दि.22/1/2007 रोजी त्यांची अल्ट्रा-सोनोग्राफी करण्यात आल्याचे आढळून आले. दि.11/3/2008 च्या प्रस्तावामध्ये त्यांनी सदर बाब नमूद केली नाही. त्यांनी योग्य कारणास्तव विमा क्लेम नाकारला असून त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 3. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच युक्तिवाद ऐकल्यानंतर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? होय. 2. तक्रारदार विमा रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 4. मुद्दा क्र. 1 ते 3 :- मयत संजय शेळके यांनी पॉलिसी क्रमांक 957253062 अन्वये विरुध्द पक्ष यांच्याकडे विमा उतरविल्याविषयी विवाद नाही. तसेच दि.26/1/2009 रोजी संजय शेळके यांचा मृत्यू झाल्याविषयी विवाद नाही. विमा पॉलिसीची रक्कम मिळविण्यासाठी तक्रारदार यांनी विमा दावा सादर केल्याविषयी विवाद नाही. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी दि.18/3/2010 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदार यांचा विमा दावा नाकारल्याविषयी विवाद नाही. 5. प्रामुख्याने, विरुध्द पक्ष यांच्या क्लेम नाकारणा-या पत्रामध्ये संजय शेळके यांनी आरोग्याविषयी दिलेल्या वैयक्तिक माहितीमध्ये चूक उत्तरे दिल्याचे व खरी माहिती लपवून ठेवल्यामुळे क्लेम नाकारल्याचे निदर्शनास येते. 6. विरुध्द पक्ष यांच्या म्हणण्यानुसार संजय शेळके हे शाह हॉस्पिटल येथे फेब्रुवारी 2007 महिन्यात अडमीट असल्याचे व तसेच श्री.नृसिंह डायग्नोस्टीक सेंटर येथे दि.22/1/2007 रोजी त्यांची अल्ट्रा-सोनोग्राफी करण्यात आल्याचे आढळून आल्याचे नमूद केले आहे. 7. संजय शेळके यांनी शाह हॉस्पिटल येथे वैद्यकीय उपचार घेतल्याचे व श्री.नृसिंह डायग्नोस्टीक सेंटर येथे अल्ट्रा-सोनोग्राफी केल्याचे सिध्द करणारी कोणतीही कागदपत्रे रेकॉर्डवर उपलब्ध नाहीत. विरुध्द पक्ष यांच्या कथनानुसार जरी संजय शेळके यांनी प्रस्तावामध्ये माहिती चूक माहिती दिल्याचे व खरी माहिती लपवून ठेवल्याचे नमूद केले असले तरी त्याबाबत सबळ कागदोपत्री पुरावे सादर करण्यास ते असमर्थ ठरले आहेत. 8. मा.राष्ट्रीय आयोगाच्या 'गुर्राम वरलक्ष्मी /विरुध्द/ एल.आय.सी. ऑफ इंडिया', 3 (2006) सी.पी.जे. 304 (एन.सी.) या निवाडयामध्ये मा.आयोगाने असे नमूद केले आहे की, Para. 15 : In our view, as the burden of proof is on the insurer to establish that there was suppression of material facts on the part of the insured and unless the insurer is able to do so, there is no question of the policy being avoided on the ground of mis-statement of facts. There is not evidence on record establishing that the deceased has suppressed the material disease at the time of taking the inusrance policy. The Insurance Company has failed to produce on record the certificate given by the Doctor who examined the insured at the time of proposal, (b) the Insurance company has failed to bring on record any documentary evidence to indicate that the insured had taken the treatment for diabetes and that dibetes finally led to his cardiac arrest. 9. तसेच मा.राष्ट्रीय आयोगाच्या 'नॅशनल इन्शुरन्स कं. लि. /विरुध्द/ बिपूल कुंडू', 2 (2005) सी.पी.जे. 12 (एन.सी.) या निवाडयामध्ये मा.आयोगाने असे नमूद केले आहे की, It is settled law that Insurance Company cannot avoid consequences of insurance contract by simply showing inaccuracy or falsity of the statement made by a policy holder. Burden is cast on the insurer to show that statement on a fact had been suppressed which was material for the policy holder to disclose. It is further to be proved by the insurer that that statement was fraudulently made by the policy holder with the knowledge of falsity of that statement or that the suppression was of material fact which had not been disclosed 10. वरील सर्व विवेचनावरुन संजय शेळके यांनी पॉलिसी घेण्यापूर्वी त्यांना आजार असल्याची माहिती लपवून ठेवल्याचे सिध्द होत नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम अत्यंत तांत्रिक व अनुचित कारणास्तव नाकारुन तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी केली आहे. त्यामुळे तक्रारदार हे पॉलिसी क्र. 957253062 अन्वये देय विमा रक्कम त्या अनुषंगाने असलेल्या सर्व लाभांसह क्लेम नाकारल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.18/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने मिळविण्यास तक्रारदार पात्र ठरतात. 11. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना पॉलिसी क्र. 957253062 अन्वये देय विमा रक्कम त्या अनुषंगाने असलेल्या सर्व लाभांसह दि.18/3/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. 3. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना उपरोक्त रक्कम तीस दिवसाचे आत न दिल्यास देय रक्कम मुदतीनंतर द.सा.द.शे. 12 टक्के दराने द्यावी. (सौ. संजीवनी एस. शहा) (सौ. संगिता एस. धायगुडे÷) सदस्य अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/29411)
| [HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT | |