नि.43 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 281/2010 नोंदणी तारीख – 24/12/2010 निकाल तारीख – 23/3/2011 निकाल कालावधी – 90 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. लिलावती भाऊसो सावंत 2. श्रीकांत भाऊसो सावंत 3. कु.निखिल अशोक सावंत अ.पा.क. वडील अशोक भाऊसो सावंत सर्व.रा. मु.पो. जुळेवाडी, ता.कराड जि.सातारा सध्या रा.मु.पो. काळमवाडी, ता.वाळवा जि.सांगली ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आनंद कदम) विरुध्द 1. श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा तर्फे चेअरमन श्री दादासो सहदेव सोमदे 2. चेअरमन श्री दादासो सहदेव सोमदे श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 3. व्हा. चेअरमन, श्री विलास किसन खोत श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 4. संचालक, श्री काशिनाथ केशव सोमदे श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 5. संचालक, श्री शंकरराव सखाराम काशिद श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 6. संचालक, अस्लम पापालाल मुल्ला श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 7. संचालक, श्री बबनराव परसू पाटील श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 8. संचालक, श्री बबनराव बाबूराव हिनुकले श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 9. संचालक, श्री कोंडीबा बाबूराव बाकले श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 10. संचालक श्री शंकर पांडुरंग साळुंखे श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 11. संचालक, शब्बीर अब्दुल पटेल श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 12. संचालक, श्री तानाजी आण्णा भोसले श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 13. संचालिका, सौ जयमाला जालिंदर पाटील श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा 14. संचालिका, सौ बनूबाई वसंतराव काळे श्री क़ृष्णामाई ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. जुळेवाडी, ता.कराड जि. सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री ) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार पतसंस्थेत तीन वेगवेगळया ठेवपावत्यांन्वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्हणून ठेवलेल्या आहेत. यापैकी एका ठेवपावतीची मुदत संपलेली आहे. उर्वरीत दोन पावत्यांची मुदत संपलेली नाही. अर्जदार यांना घरगुती कारणासाठी रकमेची आवश्यकता असल्याने त्यांनी ठेव रकमेची मागणी केली असता जाबदार यांनी रक्कम परत दिली नाही. सबब ठेव रक्कम व्याजासह मिळावी, तसेच मानसिक त्रास व तक्रारीचा खर्च मिळावा म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.2,4,5 व 14 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.27 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. अर्जदार यांना ठेवीची मुदत संपणेपूर्वी रक्कम मागणेचा अधिकार नाही. अर्जदार हे ठेवीची रक्कम मागणेसाठी कधीही आले नव्हते. जाबदार संस्थेवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. जाबदार हे अर्जदार यांना रक्कम देणे लागत नाहीत. संस्थेचे व्यवहार प्रशासकांकडे आहेत. महाराष्ट्र शासनाचे कर्जमाफीचे आदेशामुळे कर्जदार यांनी जाणीवपूर्वक कर्ज भरलेले नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी परत करता येत नाहीत. वसूलीची कार्यवाही सुरु आहे. संस्थेकडे जसजशा रकमा येतील तसतशा त्या परत देण्याचे काम चालू आहे. प्रशासकास याकामी पक्षकार करुन रक्कम वसूल करुन घ्यावी. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.3,6,7,8,9,10 व 11 यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.33 कडे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.1 चे चेअरमन, नंबर 2 दादासो सहदेव सोमदे व सचिव यांनी सहकार कायदयातील नियम डावलून स्वतः व नातेवार्इक यांनी कर्ज घेतलेले आहे. त्याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था यांना कळविलेले आहे. संस्थेवर प्रशासकांची नेमणूक झाल्याने जाबदार यांचा पतसंस्थेशी संबंध राहिलेला नाही. प्रशासकांना याकामी पक्षकार करणे आवश्यक होते. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 4. जाबदार क्र.1 व 12 यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 5. जाबदार क्र. 13 यांना अर्जदारचे नि.41 वरील अर्जावरील आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले. 6. जाबदार यांनी असे कथन केले आहे की, अर्जदार यांना ठेवीची मुदत संपणेपूर्वी ठेवरक्कम परत मिळण्याचा अधिकार नाही. परंतु सदरचे कथनाचे पृष्ठयर्थ जाबदार यांनी रिझर्व्ह बँक अगर इतर कोणत्याही सक्षम अधिका-या आदेश/परिपत्रक हजर केलेले नाही. प्रचलित नियमानुसार ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांना कायद्यानेच अधिकार आहे. अर्जदारच्या इच्छेविरुध्द जाबदार अर्जदारची ठेवरक्कम अडवून ठेवू शकत नाही. त्यामुळे जाबदार यांचे याबाबतचे कथन ग्राहय मानता येणार नाही. 7. कर्जदारांनी कर्जे थकीत ठेवली म्हणून ठेवीदारांच्या रकमा परत देता येत नाहीत हे जाबदार यांचे कथन कायदेशीर कारण ठरु शकत नाही. तसेच संस्थेवर प्रशासकांची नेमणूक सन 2010 साली केलेली दिसते. अर्जदार यांनी ज्या कालावधीत ठेवी ठेवल्या त्या काळात जाबदार हे संबंधीत संस्थेवर पदाधिकारी या नात्याने कार्यरत होते. त्यामुळे संस्थेच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांची जबाबदारी त्यांचेवरच येते. केवळ प्रशासकांची नेमणूक केली म्हणून चेअरमन व संचालकांना त्यांची जबाबदारी टाळता येणार नाही. 8. अर्जदार यांनी नि.1 सोबत नि.2 ते 4 कडे शपथपत्र दाखल केले असून नि. 7 सोबत नि.8 कडे ठेव पावत्यांच्या मूळ प्रती दाखल केल्या आहेत. प्रस्तुत ठेव पावतींचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी जाबदार संस्थेत ठेव ठेवलेचे स्पष्ट होते. सबब, नि. 2 ते 4 कडील अर्जदार यांचे शपथपत्र पाहिले असता अर्जदार यांनी ठेव रकमेची वेळोवेळी मागणी केली आहे हे स्पष्ट दिसते. सबब अर्जदारने वेळोवेळी ठेव रकमेची मागणी करुनही जाबदार यांनी ठेव रक्कम न देवून सेवेत त्रुटी केली आहे हे शाबीत होत आहे. सबब जाबदारने अर्जदारच्या प्रस्तुत तक्रारीतील फेरिस्त नि. 7 सोबतच्या नि. 8 कडील ठेवींच्या रकमा व्याजासह द्याव्यात व ठेवींची मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने होणा-या व्याजासह द्याव्यात या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. निर्विवादीतपणे नि.9 कडील ठेवपावती क्र.2154 पाहता ठेवीदाराचे नाव सावंत निखिल अशोक असे दिसते व तक्रार अर्जावरुन निखिल अज्ञान आहे. सबब अ.पा.क. म्हणून वडील अशोक भाऊसो सावंत यांचे नाव नमूद करुन तक्रार दाखल केलेचे दिसते. निर्विवादीतपणे निखिल सावंत या अज्ञानाचे नावावरती ठेव रक्कम ठेवताना निखिल अज्ञान आहे ही माहिती ठेव ठेवणा-यांनी संस्थेस देणे पाहिजे होती व संस्थेने त्याच वेळेस निखिल याचे नावानंतर अ.पा.क. म्हणून दुसरे नाव नमूद करणेस पाहिजे होते. परंतु तसे ठेवपावतीवरुन दिसत नाही. ठेवपावतीवरती अ.पा.क. चे नाव नाही ही घटना म्हणजे दोघांचाही हलगर्जीपणा आहे. सबब अज्ञान पालन कर्ता बाबत सदर ठेवपावतीवरती योग्य ती दुरुस्ती संस्थेकडून करुन घेवून पुन्हा तक्रार दाखल करु शकतात. 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र. 1 ते 12 व 14 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र. 1765 कडील रक्कम ठेव ठेवलेल्या तारखेपासून ठेवीची मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवरील नमूद व्याजासह द्यावी तसेच मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावी. 3. जाबदार क्र. 1 ते 12 व 14 यांनी स्वतंत्र व संयुक्तरित्या अर्जदार यांना त्यांची ठेव पावती क्र.2059 कडील रक्कम मुदतपूर्व ठेवपावतीवर नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. 4. जाबदार यांनी मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी अर्जदार यांना रक्कम रु. 5,000/- द्यावी. 5. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 6. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 22/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |