जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/48. प्रकरण दाखल तारीख - 08/02/2010 प्रकरण निकाल तारीख – 07/05/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, - सदस्या. मा.श्री.सतीश सामते - सदस्य कमलेश विठठलराव एंगडे वय 26 वर्षे, धंदा शिक्षण अर्जदार रा.हर्ष नगर, नांदेड. विरुध्द. 1. कूरेशी मो. आसीफ मो. निजाम ए.टी.आय. कॉलेज, एन.टी.सी., कॉम्प्लेक्स, होशी रोड, न्यू हस्सापूर, नांदेड गैरअर्जदार 2. कूरेशी मो.आसीफ मो. निजाम रा. ए.टी.आय. कॉलेज ऑफ मेडीकल इंजिनीअरींग आणि व्यवस्थापक कॉलेज, आझाद चौक, सिडको, एन-8, औरंगाबाद. अर्जदारा तर्फे वकील - अड.शिवराज पाटील गैरअर्जदार 1 व 2 तर्फे वकील - अड.शेख अशफाक ताहेर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार ए.टी.आय. कॉलेज ऑफ मेडीकल इंजिनिअरिंग अन्ड मॅनेजमेंट कॉलेज यांचे सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी त्यांचे शैक्षणीक वर्ष वाया गेले म्हणून रु.10,00,000/- नूकसान भरपाईसाठी हा अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांची शैक्षणीक संस्था ए.टी.आय. कॉलेज ऑफ मेडीकल इंजिनिअरिंग अन्ड मॅनेजमेंट कॉलेज न्यू हस्सापूर नांदेड येथील महाविद्यालयात दि.28.09.2007 रोजीच्या वर्तमानपञातील जाहीरातीनुसार बी.ए.एम.एस. या मेडीकल अभ्यासक्रमासाठी आवश्यक त्या मूळ कागदपञासह अर्ज भरुन दिला. माहीती पूस्तकात नमूद केल्यानुसार प्रत्येक सेमीस्टर साठी रु.60,000/- असे एकूण रु.6,50,000/- लागतील व सूरुवातीला रु.25,000/- एवढी रक्कम भरावी लागेल असे गैरअर्जदार यांनी सांगितले वरुन व अर्जदार यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचे असल्याने त्यांने रु.2,50,000/- भरुन महाविद्यालयात प्रवेश घेतला. यानंतरची रक्कम हप्त्याहप्त्याने भरावे व रक्कम पूर्ण भरल्यावर पावती मिळेल असे सांगितले. अर्जदार यांनी यावीषयी संशय येऊन आपण फसवले गेलो आहोत असे वाटू लागले. गैरअर्जदार हे महाराष्ट्र शासन मान्य आहे परंतु गैरअर्जदाराने अनूचित प्रकाराचा अवलंब करुन नांदेड येथील महाविद्यालय बंद केले. त्यामूळे अर्जदार यांना बी.ए.एम.एस. वैद्यकीय पदवीचा अभ्यास घेता आला नाही, त्यांचे शैक्षणीक वर्ष वाया गेले. गैरअर्जदार यांचेकडे वारंवार रु.2,50,000/-रक्कमेची मागणी केली असता बराच पाठपूरावा केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास रु.2,50,000/- चा धनादेश दिला. परंतु वटला नाही, गैरअर्जदाराने खोटे धनादेश देऊन फसवणूक केली आहे. त्यामूळे अर्जदाराने एन.आय.सी अक्ट कलम 138 नुसार त्यांना नोटीस पाठविली तरी देखील गैरअर्जदाराने रक्कम न देऊन अनूचित पध्दतीचा अवलंब केला. म्हणून अर्जदाराने ही तक्रार नोंदविली आहे. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. त्यांनी सूरुवातीला आक्षेप घेऊन अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी असे म्हटले आहे. ही तक्रार त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचेशी हातमिळवणी करुन खोटी तक्रार दाखल करण्यात आली आहे व त्यांची हराशमेंट केली. कलम 138 खाली जी तक्रार केली आहे ती ही खोटया दस्ताऐवजा खाली केलेली आहे. त्यामूळे त्यांचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे, दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील अनूचित प्रकार अर्जदार सिध्द करतो काय ? होय. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी बी.ए.एम.एस.या वैद्यकीय शिक्षणासाठी गैरअर्जदार यांचे नांदेड येथील संस्थेच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला व त्यांचेपोटी गैरअर्जदार यांना रु.2,50,000/- दिले. नंतर नांदेड येथील महाविद्यालयात बंद झाले. आपले म्हणण्यात गैरअर्जदार यांनी अर्जदार यांनी आक्षेप घेतला आहे की, त्यांचे नांदेड येथील महाविद्यालय हे शासन मान्य आहे काय ? यांचे उत्तर देण्यास जाणीवपूर्वक टाळलेले आहे. तसेच त्यांचे नांदेड येथील महाविद्यालय बंद झाले ? किंवा ते का बंद झाले ? किंवा ते बंद झाले किंवा नाही ? यांचे त्यांनी जाणीवपूर्वक उत्तर दिलेले नाही. यांचा अर्थ नांदेड येथील महाविद्यालय बंद झाले. त्यामूळे आता अर्जदार यांना पूढील वैद्यकीय शिक्षण घेणे अशक्य आहे. त्यांना दि.25.09.2007 च्या गैरअर्जदार यांच्या acknowledgement प्रमाणे मूळ 12 वीची टी.सी. मार्कमेमो, कास्ट व्हॅलिडीटी प्रमाणपञ, बी.ए.एम.एस. चे मार्क शिट हे दिल्या बददलची पोहच त्यांचेकडे आहे. त्यामूळे या कागदपञाशिवाय त्यांना दूसरीकडे वैद्यकीय प्रवेश मिळणे अशक्य होते. त्यामूळे त्यांचे शैक्षणीक वर्ष वाया गेले, यावीषयी वाद नाही. गैरअर्जदारांशी हे कागदपञ त्यांना वापस करावयास पाहिजे होते. याशिवाय दि.15.7.2009 रोजी अर्जदाराच्या नांवे रु.2,50,000/- चा लोकविकास नागरी सहकारी बँक लि. शाखा औरंगाबाद यांचा चेक नंबर 012070 हे ए.टी.आर. कॉलेज ऑफ मेडीकल, इंजिरिंअरिंग अन्ड मॅनेजमेंट औरंगाबाद यांचे सहीने दिलेला चेक, तो चेक पास न होता वापस आला व यांचे मागे डेथ गैरअर्जदार यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे, Amount refunded due to cancellation of Admissions to B.A.M.S. Course as per the request of student. असे म्हटले आहे. त्यामूळे एकदा चेक दिलेला असताना त्यांना ती रक्कम वापस करावयास पाहिजे होती परंतु ही रक्कम त्यांचे खात्यातून चेक वटला गेला नाही म्हणजे गैरअर्जदारांनी सेवेत अनूचित प्रकार केला हे अर्जदाराने सिध्द केलेले आहे. अर्जदाराच्या दि.26.10.2009 च्या नोटीसला ही अर्जदार यांनी उत्तर दिलेले नाही. अर्जदार हे एन.आय.ऐ. नुसार कलम 138 खाली गैरअर्जदार यांचेवर दावा करु शकले असते परंतु ते नोटीस देऊन का थांबले ? यांचा त्यांनी खूलासा केलेला नाही. तरी देखील अर्जदार यांना ग्राहक या संज्ञेखाली या मंचात तक्रार दाखल करता येते. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मान्य करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीते आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 1. 2. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकञितरित्या व संयूक्तरित्या अर्जदार यांना चेकची रक्कम रु.2,50,000/- व त्यावर दि.15.7.2009 पासून 12 टक्के व्याजाने आजपर्यत होणारे पूर्ण रक्कम दयावी, असे न केल्यास दि.08.06.2010 पासून यावर दंडणीय व्याज 15 टक्के प्रमाणे पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह दयावेत. 2. 3. अर्जदाराचे झालेले एक वर्षाचे शैक्षणीक नूकसानी बददल त्यांस नूकसान भरपाई म्हणून रु.2,50,000/- दयावेत व दाव्याचा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्यात. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर. लघूलेखक. |