Maharashtra

Pune

cc/2010/207

Pradhnya P. Edake - Complainant(s)

Versus

Kunte Developer - Opp.Party(s)

Abhijit Deshmkh

07 Feb 2011

ORDER


PUNE District Forum.Consumer Disput Redressal Forum Pune District, 692/6, Bibawadi Corner, Pune Satrara Road, Pushpa Hights, Pune-37
Complaint Case No. cc/2010/207
1. Pradhnya P. EdakeRaviwar Peth Pune ...........Appellant(s)

Versus.
1. Kunte DeveloperShukrawar Peth Pune 02 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Anjali Deshmukh ,PRESIDENTHONABLE MR. J H NAIK ,MEMBERHONABLE MRS. S G Joshi ,MEMBER
PRESENT :

Dated : 07 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, मा. अध्‍यक्षा

                        :-   नि का ल प त्र   :-  

                          दिनांक 07/02/2011

 

 1.        तक्रारदारानी सामनेवालाकडून सदनिका क्षेत्रफळ 418 स्‍के.फूट, सी टी एस 279 बी, नवी सदाशिव पेठ, पुणे, विकत घेण्‍याचे ठरविले.  त्‍यानुसार दिनांक 2/11/2007 रोजी नोंदणीकृत करारनामा करण्‍यात आला.  सदनिकेची एकूण किंमत रुपये 9,19,600/- ठरली.  करारनामा झाल्‍यापासून 18 महिन्‍यांच्‍या आत सदनिकेचा ताबा दयावयाचा होता.  तक्रारदारानी सामनेवालेस रुपये 9,09,000/- दिले. सामनेवाला यांनी सोसायटी / अपार्टमेंट फॉर्मेशन, तसेच विद्युत मिटर पोटीही तक्रारदाराकडून रक्‍कम स्‍वीकारली.  तक्रारदारानुसार उर्वरित रक्‍कम प्रोफेशनल स्‍कील पोटी अॅडजेस्‍ट करण्‍याचे ठरले.  बांधकामाची प्रगती पहाण्‍यास गेले असतांना काम संपूर्णपणे झाले नसल्‍याचे दिसून आले.  तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास तक्रारदारानी मागूनही सदनिकेचा ताबा न देता, करारनाम्‍यातील अटी व शर्तींची पुर्तता न करता, मुळ जमीन मालकाच्‍या नातेवाईकास त्‍यांच्‍या सदनिकेचा ताबा दिल्‍याचे दिसून आले.  याबद्यलची विचारणा केली असता सामनेवाला व जमीन मालकामध्‍ये काही वाद चालू असल्‍याचे कळाले.  सामनेवाला यांनी करारनाम्‍यानुसार म्‍हणजेच 18 महिन्‍यात सदनिकेचा ताबा दिला नाही. त्‍यासाठी तक्रारदारास दरमहा रुपये 5000/- भाडे देऊन दुसरीकडे रहावे लागत आहे.  यासर्वांमुळे तक्रारदारास आर्थिक, मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे.  म्‍हणून सदरील तक्रार.  तक्रारदार सामनेवाला यांचेकडून सध्‍याचा बाजारभावाप्रमाणे सदनिकेची किंमत रुपये 15,00,000/- 18 टक्‍के व्‍याजासह मागतात. रुपये 5,00,000/- नुकसान भरपाई मागतात.  तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र व कागदपत्रे दाखल केली.

 

2.    सामनेवाला यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही मंचात हजर राहिले नाही.  लेखी जबाब दाखल केला नाही.  म्‍हणून सामनेवाला यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश मंचानी दिनांक 30/8/2010 रोजी पारीत केला. 

 

3.    तक्रारदारानी दाखल केलेल्‍या कागदपत्रांची मंचानी पहाणी केली.  तक्रारदार व सामनेवाला यांच्‍या दिनांक 2/11/2007 रोजी नोंदणीकृत करारनामा झाला.  करारानुसार सदनिकेची किंमत रुपये 9,19,600/- ठरली. एकूण किंमतीपैकी तक्रारदारानी सामनेवाला यांना रुपये 9,09,000/- अदा केली. त्‍या पावत्‍या रेकॉर्डवर दाखल करण्‍यात आलेल्‍या आहेत.  करारातील कलम 9 नुसार सदनिकेचे बांधकाम झाल्‍यानंतर 18 महिन्‍यात ताबा दयावयाचा होता.  असे असतांनाही सदनिकेचा ताबा सामनेवाला यांनी तक्रारदारास न देता तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यानुसार जमीनमालक वा नातेवाईकास दिला, या सामनेवाला यांच्‍या या कृत्‍यावरुन त्‍यांनी अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍याचे दिसून येते.  सदनिकेचा ताबा न मिळाल्‍यामुळे तक्रारदारास भाडयानी रहावे लागत आहे.  दरमहा भाडयापोटी रक्‍कम रुपये 5000/- भरावी लागत आहे.  या विधानाच्‍या पुष्‍टयतेसाठी तक्रारदारानी श्री. गोपी अम्‍माराम चौधरी यांचे प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला यांच्‍या या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला.  सदनिकेची किंमत रक्‍कम रुपये 9,09,000/- सन 2007 मध्‍ये  देऊनही घरापासून वंचित रहावे लागले. ही रक्‍कम सामनेवाला स्‍वत:साठी वापरत आहेत. घर घेणे हे प्रत्‍येकाचे आयुष्‍यातील एक स्‍वप्‍न असते.  त्‍यासाठी ती व्‍यक्‍ती स्‍वत: काडी काडी जमवून पैसे जमविते, वित्‍तीय संस्‍था, नाईवाईक यांचेकडून अर्थसहाय घेते.  बिल्‍डरनी घराचा ताबा जर दिला नाही, तर निश्‍चीतच त्‍या व्‍यक्‍तीचे स्‍वप्‍न भंग पावते.  त्‍याचा सर्व बाबींवर परिणाम होतो. तक्रारदार सामनेवाला यांचेकडून सध्‍याच्‍या बाजारभावाप्रमाणे सदनिकेची किंमत व्‍याजासह मागितली आहे. परंतू मंचाचे मत असे आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदार यांचेकडून स्विकारलेली रक्‍कम रुपये 9,09,000/- द.सा.द.शे 9 टक्‍के व्‍याजासह, दिनांक 2/9/2008 तक्रारदारानी शेवटची रक्‍कम भरल्‍याचा दिनांकापासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यन्‍त तक्रारदारास दयावी.  तसेच नुकसान भरपाई पोटी रक्‍कम रुपये 25,000/- व तक्रार खर्च रुपये 1,000/- तक्रारदारास दयावे. 

      वरील सर्व विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे-

                        :-     आ दे श    :-

1.     तक्रार अंशत: मान्‍य करण्‍यात येत आहे.

2.    सामनेवाला यांनी आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून सहा आठवडयात तक्रारदारास रक्‍कम रुपये 9,09,000/- द.सा.द.शे 9 टक्‍के व्‍याजासह दिनांक 2/9/2008 पासून संपूर्ण रक्‍कम अदा होईपर्यन्‍त दयावी.  वेळेत न दिल्‍यास त्‍यावर  द.सा.द.शे 12 टक्‍के दराने व्‍याज आकारले जाईल.

3.    सामनेवाला यांनी तक्रारदारास रक्‍कम रुपये 25,000/- नुकसान भरपाई पोटी व तक्रारखर्च रुपये 1,000/- या आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून सहा आठवडयात दयावी.

4.    आदेशाची प्रत दोन्‍ही पक्षास विनामूल्‍य देण्‍यात यावी.

 

 

[जवाहर एच.नाईक]           [सुलभा ग. जोशी]          [अंजली देशमुख]

    सदस्‍य                     सदस्‍या                 अध्‍यक्षा

 


[HONABLE MR. J H NAIK] MEMBER[HONABLE MRS. Anjali Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. S G Joshi] MEMBER