जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/208 प्रकरण दाखल तारीख - 31/08/2010 प्रकरण निकाल तारीख –14/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. यादवराव मुकूंदराव नेम्मानीवार वय 70 वर्षे, धंदा शेती अर्जदार. रा. वेलमापुरा, किनवट ता.किनवट जि. नांदेड. विरुध्द. 1. कुमारेश्वर, रिजनल मॅनेजर वरफुल (Whirlpool) इंडिया लि. रजिस्ट्रर्ड ऑफिस, ए-4, एम.आय.डी.सी. रांजनगांव ता.शिरुर जि.पुणे 2. शतंनुदास गुप्ता, उपाध्यक्ष, गैरअर्जदार मार्केटीग ऑफिस, ए-4, एमआयडीसी,राजंनगाव 2. ता.शिरुर जि.पुणे 3. महाराजा डिस्ट्रीब्युटर 3.6,7 – सहयोग चेंबर, श्रीनगर,नांदेड.-05 अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.एस.व्ही.मगरे गैरअर्जदार क्र.3 तर्फे वकील - स्वतः निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) 1. गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. 2. थोडक्यात अर्जदाराची तक्रार अशी की,अर्जदार हे जेष्ठ नागरिक असून त्यांनी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी उत्पादित केलेले Whirlpool India Ltd. चे Purafresh, R.O.water purifier नोंदणीकृत डिस्ट्रीब्यूटर गैरअर्जदार क्र.3 कडून Son a- 091660442 Model P-5200 RS हे रु..12,200/- ला दि.21.7.2009 रोजी विकत घेतले.ज्यांची पावती व बूकलेट सोबत जोडले आहे. विकत घेतल्यापासून त्यामध्ये दोष, त्रुटी व उणीवा आहेत. त्यामध्ये प्यूरिफायर मध्ये वॉटर प्रेसर साठी 0 – HP चे मोटार बसविलेले नव्हते, जे नंतर 15 दिवसांने आणून बसवून देण्यात आले.? त्या मोटारचे दिवसराञ आवाज येणे चालू झाल्याने प्युरिफायरचा वापर काही काळासाठी बंद ठेवण्यात आला, सुरुवातीचे दोन महिन्यापर्यत मोटार मधील आवाज व पाईप मध्ये पाणी चोकअप होण्याची तक्रार चालूच होती. कंपनीचे कर्मचारी येऊन पाण्याचे टेस्टींग केले असता पुरवठा पाणी मधील टीडीएस चे प्रमाण 800 होते व फिल्टर्ड पाणी हे 90 ते 95 टीडीएस च्या जागी, 180 टिडीएस होते. परत कंपनीकडे तक्रार केल्यावर कंपनीकडून एकही प्रतीनधी आला नाही. एक कर्मचारी येऊन गेले परंतु त्यांनी प्यूरिफायरला हातही लावला नाही. प्यूरिफायर मधील प्रिफिल्टर हे दि.12.4.2010 रोजी व प्लस कार्बन फिल्टर दि.19.4.2010 रोजी एका व्यक्तीने बदलून अनूक्रमे रु.250/- व रु.350/- नेले त्यांची पावती दिलेली नाही? प्यूरिफायर मध्ये अनेक ञूटी होत्या म्हणून कटाळून अर्जदाराने दि.6.5.2010 रोजी गैरअर्जदार क्र.3 कडून गेरअर्जदार क्र.1 यांना संपर्क केला असता पाच दिवसांत तक्रारी सोडवितो असे म्हणाले पण एकही प्रतीनीधी आला नाही व तक्रारही सोडवीली नाही. गैरअर्जदार यांनी खरेदीच्या वेळी दिलेल्या शर्थीचा भंग केलेला आहे. दि.14.5.2010 रोजी लेखी तक्रार दिली परंतु त्यांचीही दखल घेतली नाही. म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, वस्तू दूरुस्त करुन दयावे किंवा नवीन वस्तू बदलून दयावी तसेच मानसिक ञासाबददल रु.5,000/- व शारीरिक ञासाबददल रु .5,000/-,आर्थिक झळ व झालेला खर्च रु.1800/-, फायदयापासून वंचित राहिल्याने झालेले नूकसान रु.2000/-, तक्रारीचा खर्च रु.3,000/- व इतर नूकसान भरपाई रु.5,000/- असे एकूण रु.21,800/- मिळावेत. 3. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदया अंतर्गत नसून ती खोटी व बनावट आहे म्हणून ती फेळाटण्यात यावी असे म्हटले आहे. दर तिन महिन्याला प्यूरिफायरचे चेक तज्ञ लोकच करतात व ते त्यांनी केलेले आहे. अर्जदाराचे म्हणणे हे खोटे असून वाटर प्रेशर 0 एचपी ची मोटर नसून बुस्टर पंप बसविण्यात आलेला असतो व सदर बूस्टर पंप बसविल्याशिवाय प्यूरिफायर चालूच शकत नाही. प्यूरिफायरमध्ये कूठलीही मोटार नसल्यामूळे आवाज येण्याच प्रश्नच निर्माण होत नाही व पाणी चोकअप होण्याची तक्रार ही बनावट असून काल्पनिक आहे. हे खोटे आहे की, कंपनीच्या प्रतिनीधी ने असे म्हटले की, प्यूरिफायर बददल माहीती नाही व त्याबददल मला ट्रेनिग नाही. कारण कंपनी फक्त योग्य अनुभवी टेकनिशियन नियुक्त करतात. प्यूरिफायर मध्ये सर्वात महत्वाचे पार्टस हे फिल्टर आहे व ते फिल्टर हे कंपनीने दिलेल्या वॉरंटी कार्ड प्रमाणे मूदतीत बदलणे फार आवश्यक आहे व त्यांची सर्व जबाबदारी ही ग्राहकावर असते व तसे कार्डवर दर्शविलेले आहे. असे असून सूध्दा अर्जदाराने प्यूरिफायरचे फिल्टर बदलले नाही हा त्यांचा स्वतःचा निष्काळजीपणा आहे. अर्जदाराची तक्रार ही कंपनीला ञास देण्यासाठी व कंपनीचे मार्केट मधील नांव खराब होण्यासाठी मूददामहून दिलेली आहे. आमच्या प्यूरिफायर बददल आजपर्यत कूठल्याही ग्राहकाची तक्रार नाही. गैरअर्जदार हे वॉटर प्यूरिफायरची वॉरंटी देत असते व कूठल्याही पकारची गॅरंटी देत नाही. त्यामूळे प्यूरिफायर बदलून देता येत नाही. अर्जदाराने स्वतः वॉरंटी नियमाचे पालन केलेले नाही. वाटर प्यूरिफायर मध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे त्यात सहा फिल्टर आहेत व ते कंपनीच्या नियमाप्रमाणे व वॉरंटी कार्ड प्रमाणे ते योग्य वेळेत बदलणे आवश्यक आहे व ती सर्व जबाबदारी ही अर्जदाराची असते. फक्त कंपनीचे तज्ञ कर्मचारी वेळोवेळी प्यूरिफायर चेकअप साठी येत असतात व ते आलेले होते हे अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये मान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांच्या सेवेत कोणतीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार ही खर्चासह नामंजूर करावी असे म्हटले आहे. 4. गैरअर्जदार क्र.3 हे स्वतः हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. गैरअर्जदारास हे मान्य आहे की, अर्जदारानी त्यांचे दूकानातून वॉटर प्यूरिफायर विकत घेतले होते. सदर वॉटर प्यूरिफायर हा विक्री केल्यानंतर अर्जदाराच्या घरी कंपनीच्या लोकांनी व्यवस्थीत बसवून दिलेला आहे. सदर यूनिटमध्ये दोष असल्याचे अर्जदाराने सांगितल्यानंतर ताबडतोब कंपनीचा माणूस पाठवून दोष दूर केलेला आहे. निर्माते कंपनीच्या ज्या काही वस्तू आम्ही विकतो त्यानंतरच्या विक्री पश्चात सेवा ही कंपनी देत असते. त्यामूळे सेवेमध्ये ञूटी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. मी तक्रारदार व कंपनी यांच्या मध्ये समन्वय घडवून आणलेला आहे व माझे कर्तव्य पार पाडलेले आहे.गैरअर्जदार यांनी कोणत्याही कराराचा भंग केलेला नाही. सदर तक्रारीबददल गेरअर्जदार यांची कोणतीही चूक व दायित्व नसल्यामूळे त्यांचे विरुध्दचा दावा फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. 5. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञावरुन व दोन्ही बाजूचा यूक्तीवाद ऐकून जे मूददे उपस्थित होतात, ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे पूढील प्रमाणे. मूददे उत्तर 1. अर्जदार हा गैरअर्जदार यांचा ग्राहक आहे काय ? होय. 2. अर्जदाराने मागणी केलेली नूकसान भरपाई देण्यास गैरअर्जदार बांधील आहेत काय ? अंशतः. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे मूददा क्र.1 6. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 3 यांचेकडुन व गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तयार केलेले Purafresh water Purifier व रु.12,200/- दि.21/07/2009 रोजी घेतले हे गैरअर्जदार यांनाही मान्य आहे. या मुद्यावर उभय पक्षात कुठेही वाद नाही. म्हणुन क्र. 1 चे उत्तर सकारात्मक देण्यात येतो. मूददा क्र.2 7. अर्जदारांनी सदरील वॉरट प्युरीफायरची खरेदी पावती तक्रार अर्जासोबत जोडलेली आहे. अर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे प्युरीफायर हे 6 स्टेजमध्ये काम करते व पाण्यातील क्षार 90 टीडीएस पर्यंत कमी करते व प्रती तास 7.9 लिटर शुध्द पाणी पुरवते. अर्जदार लिहीतात की, प्युरीफायर मध्ये तीन फिल्टर सहा महिने गॅरंटीचे असून तीन फिल्टर 12 महिने गॅरंटीचे आहेत. हयापुर्वी जर फिल्टर वॉटर परसेंटेज कमी झाल्यास कंपनी स्वखर्चाने फील्टर बदलून देतील पण अर्जदारास सदरील प्युरीफायरमधुन शुध्द पाणी मिळेना व वॉटर प्रेशर बसवलेली O.H.P.. मिटर खुपच आवाज करु लागली? पाईपमधील पाणी चोक अप होणे हे त्रास अर्जदारास झाले? कंपनीकडे तक्रार करुनही कुणीही त्यांचे फिल्टर दुरुस्त करुन दिले नाही. श्री.क-हाळे हे कंपनीचे अतांत्रिक कर्मचारी प्रवीण पाटील हयांना घेऊन आले होते एवढे कथन अर्जदार करतात. प्युरीफियर मधील फिल्टर हे दि.12/04/04/2010 रोजी व प्लस कार्बन फील्टर हे दि.19/04/2010 रोजी श्री.क-हाळे यांचे सोबत एक व्यक्ति येऊन रु.250/- व रु.350/- घेऊन बदलून दीले. 8. एकतर फिल्टर खरेदीत पैसा अडकवूनही अर्जदारास शुध्द पाणी मिळाले नाही ही अर्जदाराची खरी परीस्थिती समोर दिसत आहे. कंपनीने अर्जदारास योग्य सेवा दिली नाही असेही अर्जदाराचे म्हणणे आहे की, कंपनीने केलेल्या कारारानुसार कंपनीचे वर्तन नव्हते व त्यांनी करार केल्याप्रमाणे शर्थीचे पालन केले नाही, असे अर्जदार म्हणतात दि.21/07/2009 रोजी अर्जदाराने सदरील फिल्टर खरेदी केले. अर्जदार यांना संपुर्ण ज्ञात आहे की, तीन फिल्टर सहा महिने गॅरंटीचे व तीन फील्टर हे बारा महीने गॅरंटीचे असतात, दि.21/07/2009 रोजी घेतलेले फिल्टर मधील सहा महीने गॅरंटीच्या फिल्टर हया फेबु्वरी 2010 बदलने आवश्यक आहे व एक वर्ष गॅरंटी फिल्टरच्या जून 2010 मध्ये बदलने आवश्यक आहे. यापुर्वी अर्जदाराने दि.12/04/2010 रोजी फिल्टर प्रिन्टर रु.250/- देऊन व प्लस कार्बन फिल्टर हे दि.19/04/2010 रोजी रु.350/- घेऊन बदलून दिले. म्हणजेच फेब्रुवारी मध्ये जे फिल्टर बदलने आवश्यक होते ते अर्जदाराने एप्रीलमध्ये बदलले आहेत. पाणी शुध्द होण्याची प्रोसेस ही पुर्णतः फिल्टरवर अवलंबून असल्यामुळे वॉटर प्युरीफायरचा महत्वाचा पार्ट फिल्टर आहे. गैरअर्जदार यांनी युक्तीवाद करते वेळी असे मान्य केले आहे की, ते अर्जदाराचा प्युरीफायर व्यवस्थीत चालू करुन देण्यास तयार आहेत. अर्जदारास प्युरीफायर व्यवस्थीत मिळाले असते तर आज त्यांची तक्रार मंचा समोर आली नसती म्हणुन गैरअर्जदार क्र. 3 यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 हयांचे साहयाने अर्जदाराचा प्युरीफायर व्यवस्थीत चालू करुन द्यावा, त्यातील फिल्टर खराब झाले असल्यास एक वेळा त्यांना नवीन फिल्टर दोन्हीही गैरअर्जदार त्यांचे खर्चाने बदलून देऊन फिल्टर व्यवस्थीत चालु करुन द्यावे, त्या निर्णयापर्यात हे मंच आलेले आहे. गैरअर्जदार यांनी तांत्रीक कर्मचारी अर्जदार यांना सेवा देण्यासाठी पाठवणे गरजचेचे होते, ती गैरअर्जदार यांनी अट पाळली नाही. एवढी त्रुटी गैरअर्जदार हयांच्या सेवेत दिसुन येत आहे. म्हणून अर्जदारास जो मानसिक त्रास झाला त्याबद्यल रु.1,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत. फिल्टर दुरुस्ती संपुर्ण गैरअर्जदार यांनी एक वेळ स्वतःचे खर्चाने एक महिन्यात करुन द्यावी व रु.1,000/- मानसिक त्रासाबद्यल रक्कम ही एक महिन्यात द्यावी असे न केल्यास फिल्टर दुरुस्त होईपर्यंत प्रतीदिवस रु.50/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत, असा आदेश मंच पारीत करीत आहे. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी फिल्टर दुरुस्ती एक वेळ स्वतःचे खर्चाने एक महिन्यात करुन द्यावी व रु.1,000/- मानसिक त्रासाबद्यल एक महिन्यात द्यावेत. असे न केल्यास फिल्टर दुरुस्त होईपर्यंतत प्रतीदिवस रु.50/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास द्यावेत. 3. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |