द्वारा – श्रीमती. स्नेहा म्हात्रे, अध्यक्षा
सदर प्रकरणामध्ये कन्फोनेट प्रणालीद्वारे पुढील तारीख 04/02/2022 वादसूचीवर दर्शविण्यात आली आहे. परंतु आजरोजी उभय पक्षाच्या वकीलांनी उभय पक्षानी स्वाक्षरीत केलेल्या Consent Terms अभिलेखावर घेऊन, उभय पक्षात Consent Terms स्वाक्षरीत करण्यात आल्याने प्रस्तूत प्रकरण निकाली काढण्यासाठी आजच्या वादसूचीवर घ्यावे अशी जॉईंट पुरसिस दाखल केली. त्यामध्ये नमूद कारण विचारात घेता, सदर प्रकरण पुन्हा आजच्या वादसूचीवर घेण्यात आले. सदर प्रकरणामध्ये तक्रारदारातर्फे वकील श्री. बिनॉय गुप्ता तसेच प्रस्तूत तक्रारीमधील तक्रारदार श्री. राजेंद्र कुमार जैन, श्री. विनोद केडिया तसेच श्री. रामशरण खेतान यांचे मुखत्यार श्री. Neeraj Sanghi हजर. सामनेवालेतर्फे वकील श्रीमती. दिप्ती शहा तसेच सामनेवाले यांचे अधिकृत प्रतिनिधी / संचालक श्री. लक्ष्मीनारायण क्रिष्णन हजर. सदर प्रकरणामध्ये आजरोजी वर नमूद तक्रारदारांनी त्यांचे मुखत्यार म्हणून श्री. निरज संघी यांना दिलेल्या दि.10/01/2022 रोजीच्या Power Of Attorney ची छायांकित प्रत, तक्रारदाराचे वकीलांनी आजरोजी अभिलेखावर दाखल केली. तसेच सदर प्रकरणामध्ये तक्रारीत नमूद तक्रारदार व सामनेवाले यांच्यात स्वाक्षरीत करण्यात आलेल्या दि. 11/01/2022 रोजीची Consent Terms आजरोजी उभय पक्षाच्या वकीलांनी अभिलेखावर दाखल केली, त्याखाली तक्रारदाराच्या वकीलांची स्वाक्षरी दिसून येते. तसेच POA Holder श्री. निरज संघी यांची स्वाक्षरी दिसून येते. तसेच सामनेवाले यांचेतर्फे त्यांचे वकील श्रीमती. दिप्ती शहा यांनी स्वाक्षरी केली आहे. तसेच सामनेवाले यांचे अधिकृत प्रतिनिधी श्री. लक्ष्मीनारायण क्रीष्णन आजरोजी आयोगासमक्ष हजर असून त्यांनी सदर प्रकरणामध्ये सदर Consent Terms वर सामनेवाले यांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी केल्याचे निवेदन केले.
(2) तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार सामनेवाले यांचेविरुध्द सन 2014 मध्ये तक्रारीत नमूद प्रार्थना कलमातील मागण्यांबाबत दाखल केली होती. त्यापैकी सदर Consent Terms च्या परिच्छेद क्रमांक 4 मधील अनु्क्रमांक Clause No. 4(a) (b) व (c) यांचेबाबत, उभय पक्षात Consent Terms मधील परिच्छेद 8 च्या अधीन राहून, सामनेवाले यांनी दि. 30/04/2022 पर्यंत सदर मागण्यांची पूर्तता करुन देणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच सदर Consent Terms च्या परिच्छेद क्र. 8 मध्ये सामनेवाले यांनी सदर Consent Terms मध्ये नमूद केल्याप्रमाणे 4(a) (b) व (c) मधील मागण्यांची पूर्तता सामनेवाले यांनी दि. 30/04/2022 पूर्वी किंवा पर्यंत करुन दिल्यास, तक्रारदार यांनी खालीलप्रमाणे नमूद केले आहे.
“8 It is hereby agreed, declared and confirmed by the Complainants that in case the Opposite Party provides relief relating to the membership of Society, Occupation Certificate and operationalizing of stack parking as stated above on or before 30th April, 2022, they shall give up their claim for remaining prayers”.
(3) सदर Consent Terms मध्ये नमूद केलेल्या अटी शर्ती विचारात घेऊन व उभय पक्षाच्या विनंतीवरुन प्रस्तूत तक्रार आजरोजी उभय पक्षात Consent Terms नुसार तडजोड झाली असल्याने निकाली काढण्यात येते. सदर Consent Terms मध्ये नमूद केलेल्या अटी शर्ती ह्या प्रस्तूत आदेशाच्या अविभाज्य भाग समजण्यात याव्यात. प्रकरण निकाली.