जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 470/2011
तक्रार दाखल तारीखः- 15/11/2011
तक्रार निकाल तारीखः- 22/03/2013
1. श्री.रमेश वासुदेव सरोदे, .......तक्रारदार
उ व 66 धंदा काही नाही
2. सौ.वनिता रमेश सरोदे,
उ व सज्ञान धंदा घरकाम.
3. कु.रुपाली रमेश सरोदे उर्फ सौ.रुपाली सोमनाथ तौर,
उ व सज्ञान धंदा घरकाम.
4. कु.किशोरी रमेश सरोदे उर्फ सौ.किशोरी देवेंद
उ व सज्ञान धंदा घरकाम.
सर्व रा.वकीलगल्ली, म्यु.पार्क भुसावळ ता.भुसावळ,
जि.जळगांव.
विरुध्द
1. कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ, .........विरुध्दपक्ष.
ब्रम्हण संघा जवळ,न्यु.एरीया वार्ड,भुसावळ,
ता.भुसावळ,जि.जळगांव.
तर्फे मॅनेजर.
2. श्री.महेश उर्फ श्रीकांत गणेश यावलकर,
चेअरमन, कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि,
भुसावळ ब्रम्हण संघा जवळ,न्यु.एरीया वार्ड,भुसावळ,
ता.भुसावळ,जि.जळगांव.
कोरम –
श्री.विश्वास दौ.ढवळे. अध्यक्ष.
श्री.मनिष बी.वानखेडे. सदस्य.
श्रीमती.पुनम नि.मलिक. सदस्या
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.सौ.उज्वला कुलकर्णी.
विरुध्दपक्ष विनाखुलासा.
नि का ल प त्र
श्री.विश्वास दौ.ढवळे,अध्यक्ष.ः- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष पतसंस्थेत मुदत ठेव पावतीमधे गुंतवलेली रक्कम मागणी करुन ही परत दिली नाही म्हणुन त्यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष सहाकरमित्र कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ (यापुढे संक्षीप्तेसाठी पतसंस्था असे संबोधण्यात येईल) या पतसंस्थेत मुदत ठेव पावतीत रक्कम गुंतविली होती त्याचा तपशिल खालील प्रमाणे.
पावती/बचत खाते क्रमांक | ठेव रक्कम | ठेव दिनांक | देय रक्कम | देय दिनांक |
तक्रारदार क्र. 1 व 2 2177 | 15,000 | 26/03/04 | 30,000 | 26/09/09 |
843 | 25,000 | 24/02/03 | 50,000 | 24/11/07 |
840 | 25,000 | 24/02/03 | 50,000 | 24/11/07 |
तक्रारदार क्र.4 842 | 25,000 | 24/02/03 | 50,000 | 24/11/07 |
तक्रारदार क्र.3 841 | 25,000 | 24/02/03 | 50,000 | 24/11/07 |
3. तक्रारदार यांनी मुदत ठेव रक्कमेची मागणी विरुध्द पक्ष पतसंस्थेत केली असता रक्कमा देण्यास त्यांनी नकार दिला अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब विरुध्द पक्ष यांचेकडुन मुदतठेव व बचत खात्यातील व्याजासह होणारी संपुर्ण रक्कम तसेच मानसिक त्रास व अर्जाच्या खर्चापोटी भरपाई मिळावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 ते 2 यांना नोटीसची बजावणी झालेली आहे. त्यांनी हजर होऊन खुलासा दाखल न केल्यामुळे त्यांच्या विरुध्द विनाखुलासा आदेश करण्यात आला.
5. तक्रारदार यांची तक्रार पाहता तक्रारीच्या न्यायनिर्णयासाठी आमच्या समोर खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये. उत्तर.
1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या सेवेत त्रुटी
केली आहे काय? होय.
2 आदेश काय? खालीलप्रमाणे.
विवेचन
6. मुद्या क्र.1 – प्रस्तुत प्रकरणांत तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता त्यांनी पतसंस्थेमध्ये मुदत ठेव पावती/बचत खात्यातील रक्कम गुंतवली होती ही बाब सिध्द होते. तक्रारदार यांनी सदरची रक्कम मिळणेसाठी मागणी केली असता, सदर रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वास्तविक तक्रारदार यांनी मागणी केल्यानंतर तात्काळ विरुध्द पक्ष यांच्याकडील जमा असलेली रक्कम त्यांना परत करणे पतसंस्थेचे कर्तव्य होते. तक्रारदार यांनी मागणी करुनही संस्थेने रक्कम न देऊन सेवेत त्रुटी केली आहे या मतास आम्ही आलो आहोत. म्हणून मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
7. मुद्या क्र. 2 –– तक्रारदार यांनी त्यांच्या मुदत ठेव/बचत खात्यातील व्याजासह होणारी रक्कम कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ व संचालक मंडळ यांचेकडुन वैयक्तिक व संयुक्तीकरित्या मिळावी अशी मागणी केलेली आहे. परंतू मा.मुंबई उच्च न्यायालय खंडपिठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाइ विरुध्द राजश्री राजकुमार चौधरी या न्यायिक दृष्टांतामध्ये पुढील प्रमाणे मत व्यक्त केले आहे.
As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies.
8. वरील न्यायिक दृष्टांतामध्ये संचालकांना रक्कम देण्यासाठी वैयक्तीकरित्या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व विषद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना वैयक्तिकरित्या रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे विरुध्द पक्ष कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ यांचेकडुन पतसंस्थेत जमा असलेली व्याजासह होणारी रक्कम मिळण्यास पात्र आहेत. पतसंस्थेच्या कृतीमुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक व शारिरीक त्रास झाला आहे व मंचात तक्रारही दाखल करावी लागली आहे. तसेच त्यांना मानसिक त्रास होणे साहजिक आहे. त्यामुळे तक्रारदार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5,00/- व मानसिक त्रासापोटी रु.1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे आम्हास वाटते.
9. वरिल विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
(1) तक्रारदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) विरुध्द पक्ष कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ यांनी तक्रारदार यांना वरील निकालपत्राच्या परिच्छेद क्र. 2 मध्ये नमुद केलेल्या मुदत ठेव पावत्या व बचत खात्यातील मॅच्युअर्ड झालेल्या असल्याने त्यावरील मुदती अंती देय असलेल्या रक्कमेवर देय तारखेनंतर ( मुदत ठेवीचा कालावधी संपल्यापासून ) एकत्रित रक्कमेवर द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह तक्रारदार यांना या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
(3) विरुध्द पक्ष कुबेर अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि, भुसावळ यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व दावा खर्चापोटी रु.500/- या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत अदा करावेत.
(4) वर नमुद आदेश क्र.2 मधील रक्कमेपैकी दिलेल्या रक्कमा वजावट करुन उर्वरित रक्कम अदा करावी.
(श्री.विश्वास दौ.ढवळे) (श्री.मनिष बी.वानखेडे) (श्रीमती.पुनम नि.मलिक.) अध्यक्ष सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव