Maharashtra

Nagpur

CC/10/650

Smt. Shaila Rakesh Sakhare - Complainant(s)

Versus

Ku.Shruti Vijay Kukade After Marrage Sau. Shruti S. Saraf, Prop. - Opp.Party(s)

Adv. R.S. Vyas and Adv. Rahul Khaparde

29 Jul 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/650
1. Smt. Shaila Rakesh SakhareFlat No. 106, Baba Santosh Palace No. 4, Bhonsalewadi, Lashkaribagh, Nagpur 17NagpurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Ku.Shruti Vijay Kukade After Marrage Sau. Shruti S. Saraf, Prop.S.S. Financial Services, 2nd floor, Uma Smruti, Dr.Baxi Building, Modi No. 1, Sitabuldi, NagpurNagpurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MRS. Jayashree Yende ,MEMBER
PRESENT :Adv. R.S. Vyas and Adv. Rahul Khaparde, Advocate for Complainant

Dated : 29 Jul 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. विजयसिंह राणे - अध्‍यक्ष यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक :29/07/2011)
 
 
1.           प्रस्‍तुत तक्रार तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 26.10.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
                       
2.          यातील तक्रारकर्तीची थोडक्‍यात गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रार अशी आहे की, गैरअर्जदारांनी रु.30,000/- एवढी रक्‍कम दि.12.09.2008 रोजी तक्रारकर्तीकडून स्विकारुन एक वर्षानंतर व्‍याजासहीत रु.39,000/- मिळेल असे सांगितले आणि त्‍याबाबतची पावती लिहून दिली. तक्रारकर्तीने एक वर्षानंतर गैरअर्जदारांशी संपर्क साधला तेव्‍हा रु.39,000/- चा धनादेश क्र.136490 दि.12.09.2009 रोजी दिला, तक्रारकर्तीने तो धनादेश बँकेत जमा केला असता तो न वटता परत आला. त्‍यामुळे तिने गैरअर्जदारांशी पुन्‍हा संपर्क साधला व गैरअर्जदारांनी पुन्‍हा नवीन धनादेश दिला व तो सुध्‍दा त्‍याच कारणामुळ परत आला, त्‍यामुळे तक्रारकर्तीने वकीला मार्फत गैरअर्जदारांस नोटीस दिला. तो जाणून-बुजून गैरअर्जदाराने स्विकारला नाही म्‍हणून परत आला, म्‍हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल करुन रु.39,000/- दि.12.03.2010 पासुन रक्‍कम मिळेपर्यंत 30% व्‍याजासह परत मिळावे, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्‍या खचापोटी रु.10,000/- मिळावे अश्‍या मागण्‍या केल्‍या आहेत.
 
3.          यातील गैरअर्जदाराला नोटीस देण्‍यांत आला असता त्‍यांनी मंचात हजर होऊन सर्व विपरीत विधाने नाकबुल केली. गैरअर्जदारांचे म्‍हणणे असे आहे की, तक्रारकर्तीकडून त्‍यांनी वैयक्तिक कारणावरुन रु.30,000/- मागितले आणि तक्रारकर्तीने तेवढी रक्‍कम दिली व अशी अट घातली की, तीवर 30% व्‍याज लागेल तसेच त्‍या संबंधीचे दस्‍तावेज गैरअर्जदार फायनान्‍शीयल सर्व्‍हीसेसच्‍या नावाने करुन द्यावे लागतील, त्‍यामुळे त्‍यांनी तसे दस्‍तावेज करुन दिले. तक्रारकर्ती म्‍हणते त्‍याप्रमाणे ही तक्रार खोटी आहे. सदर प्रकरण हे सावकारी स्‍वरुपाचे ठरत असुन मुंबई सावकारी कायद्यांचे तरतुदींप्रमाणे ते खारिज होण्‍यांस पात्र आहे आणि तक्रारकर्तीची तक्रार खारिज करावी असा उजर घेतला आहे.
 
4.          तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रारीसोबत निशानी क्र.3 वर दस्‍तावेजांची यादी जोडलेली असुन त्‍यात अनुक्रमांक 1 ते 7 पेमेंट रशीद, प्रॉमीसरी नोट, माहितीपत्रक, धनादेश परत आल्‍याचे मेमो, वकीला मार्फत पाठविलेली नोटीस व नोटीस परत आल्‍याचा लिफाफा इत्‍यादी दस्‍तावेजांच्‍या छायांकित प्रती जोडलेल्‍या आहेत.
 
 
 
 
5.          प्रस्‍तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.19.07.2011 रोजी आली असता तक्रारकर्तीचे वकील हजर त्‍यांनी युक्तिवादा दाखल तक्रार व दस्‍तावेज विचारात घेण्‍यात यावे असे सांगितले, गैरअर्जदार गैरहजर. तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांचे व युक्तिवादाचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
               -// नि ष्‍क र्ष //-
 
 
6.          सदर प्रकरणात तक्रारकर्तीने दाखल केलेला दस्‍तावेज क्र.1 हा एस.एस. फायनान्‍शीयल सर्व्‍हीसेस, प्रोप्रायटर या नावाने दिलेला आहे व त्‍यावर शिक्‍का, सही आहे. दस्‍तावेज क्र.2 यावर कोणाचीही सही दिसत नाही, त्‍यामुळे तो विचारात घेता येत नाही. दस्‍तावेज क्र.3 सुध्‍दा जाहीरात पत्रक आहे आणि त्‍यामध्‍ये एक वर्षाकरीता कमीतकमी रु.25,000/- ठेवल्‍यास 30% प्रति वर्ष व्‍रूाज देण्‍यांत येईल असे नमुद आहे. आणि हा दस्‍तावेज एस.एस. फायनांन्‍शीयल सर्व्‍हीसेस या नावाचा आहे. दि.12.09.2009 रोजीचा दस्‍तावेज क्र.4 हा धनादेश आहे व तो तक्रारकर्तीला गैरअर्जदारांनी दिलेला आहे, त्‍याचप्रमाणे दुसराही एक धनादेश तक्रारकर्तीला दिलेला दिसुन येतो. तक्रारकर्तीने पाठविलेला नोटीस गैरअर्जदारांनी सुचना मिळूनही स्विकारला नाही या शे-यासह परत आला. आणि व्‍याजाच्‍या संबंधाने गैरअर्जदारांनी घेतलेला सावकारी व्‍यवसायासंबंधीचा बचाव पुराव्‍या अभावी विचारात घेण्‍याजोगा नाही. गैरअर्जदारांनी आपल्‍या म्‍हणण्‍याचे पृष्‍ठयर्थ कोणताही दस्‍तावेज दाखल केलेला नाही व आपला बचाव सिध्‍द सुध्‍दा केला नाही.
 
7.          वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करता गैरअर्जदारांनी सेवेत त्रुटी दिलेली असुन आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहोत. 
 
                  -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला रु.39,000/- एवढी रक्‍कम आदेश पारित झाल्‍यापासुन     1 महिन्‍याचे आत द्यावी. सदर रकमेवर दि.12.09.2009 पासुन द.सा.द.शे. 9%     व्‍याजासह अदा होईपर्यंत येणारी रक्‍कम तक्रारकर्त्‍याला द्यावी.
3.    गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक त्रासापोटी रु.3,000/- व तक्रारीच्‍या      खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे.
4.    गैरअर्जदाराने वरील आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्‍याचे दिनांकापासुन 1  महीन्‍याचे आंत करावे.
 
 
 

[HONABLE MRS. Jayashree Yende] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT