::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, विजय चं. प्रेमचंदानी मा. अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 21/01/2015 )
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आापल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून देवई गोविंदपूर स्थित भूमापन क्रं. 100/1 च, आराजी 864 चौ. मि. हि मालमत्ता व डुप्लेक्स तयार करुन देण्याचे कबुल करुन दि. 4/8/10 रोजी करारनामा केला. सदर बांधकाम 10,40,000/- रु. 6 महिण्याचे आत गैरअर्जदाराने अर्जदाराला करुन देण्याचे कबुल केले. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 ला रु. 5,40,000/- नगदी दिलेले आहे. परंतु गैरअर्जदाराने तक्रार दाखल पर्यंत कोणतेही बांधकाम पूर्ण केलेले नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे तगदा लावलेला असता गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदाराचे लाभांत दि. 7/1/11 रोजी अविभक्त जागेचे विक्रीपञ करुनदिलेले आहे परंतु अर्जदाराचे डुप्लेक्स घराचे बांधकाम गैरअर्जदाराने सुरु केलेले नाही. या दरम्यान गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांच्यात भांडण होवून गैरअर्जदार क्रं. 2 ने गैरअर्जदार क्रं.1चे विरुध्द दिवाणी दावा दाखल केलेला आहे. माञ दोन्ही गैरअर्जदाराच्या भांडणाशी अर्जदाराचा काहीही संबंध नाही. गैरअर्जदाराने उर्वरित मोबदला देण्याची पूर्ण तयारी दर्शविली असून गैरअर्जदाराने 5,40,000/- रु. मोबदल्याचे भागपोटी घेवून सुध्दा अर्जदाराच्या घराचे बांधकाम सुरु केलेले नाही. म्हणून अर्जदाराने गैरअर्जदारांना दि. 16/1/12 रोजी डुप्लेक्स घराचे बांधकाम करुन दयावे म्हणून नोटीस पाठविली सदर नोटीस प्राप्त झाल्यानंतर गैरअर्जदार क्रं. 2 ने 25/1/12 ला खोटया आशयाचे खोटे उत्तर पाठविले व आपली जबाबदारी झटकली. गैरअर्जदाराने मोबदला घेवून सुध्दा अर्जदाराचे डुप्लेक्स घराचे बांधकाम करुन दिले नाही म्हणून गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति न्युनतम सेवा देवून अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली आहे. सबब तक्रार अर्जदारातर्फे मंचासमक्ष दाखल करण्यात आली आहे.
2. अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारास विक्री केलेल्या जागेवर डुप्लेक्सचे बांधकाम करुन दयावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं. 1 व 2 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 हे हजर होवून नि. क्रं. 25 वर त्याचे लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 1 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 यांनी डुप्लेक्स करीता गुंतवणूकिलाती सक्षम नाही असे कळविले. व गैरअर्जदार क्रं. 2 ने गुंतवलेली रक्कम मागणीस सुरु करुन तिचे नाव भागिदार म्हणून करण्यात यावे असे कळविले. तेव्हा दि. 7/1/11 रोजी अर्जदार याचे नावे विक्रीपञ करुन देण्यात आले त्याच दिवशी गैरअर्जदार क्रं. 2 हीला तिचे गुंतवणूक पैकी रु. 2,00,000/- परत देण्यात आले. पुढे गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांचे असे ठरले कि, गैरअर्जदार क्रं. 2 याचे गुंतवणुकीतील शिल्लक रक्कम दि. 15/1/11 पर्यंत परत करण्यात येईल परंतु गैरअर्जदार क्रं. 2 हीने दि. 14/1/11 रोजी कोणतेही कारण न सांगता बांधकामाबद्दल नगर परिषद व तलाठी कार्यालयातील फेरबदलाबद्दल आक्षेप नोंदवून अडथळे निर्माण केले. त्यामुळे बांधकामाची कार्यवाही सुरु होवू शकली नाही त्यावर गैरअर्जदार क्रं. 1 ची कोणतीही चूक नाही. गैरअर्जदार क्रं. 1 ने पुढे असे कथन केले आहे कि, अर्जदाराला ञास दयायचे नसल्यामुळे गैरअर्जदार क्रं. 2 हीचे सोबत दि. 2/4/12 रोजी समझोता करुन तो वाद संपुष्टात आणला. ही बाब अर्जदाराला माहीत असून सुध्दा अर्जदाराने प्रकरणात लपविलेली आहे तसेच अर्जदार यांनी ठरविलेल्या वेळी गैरअर्जदार क्रं. 1 कडे रक्कम अदा केली नाही व त्यांनी स्वतः करारनाम्याचा भंग केलेला आाहे. अर्जदाराने फक्त रु. 3,50,000/- गुंतवलेली आहे परंतु त्यांनी दिशाभूल करण्याकरीता रु. 5,40,000/- चा उल्लेख केलेला आहे. गैरअर्जदार क्रं. 1 यांनीउपरोक्त 3,50,000/- पैकी 1,90,000/- किंमतीचे प्लॉट व विक्रीपञ करुन देण्याकरीता मुद्रांक शुल्क रु. 11,500/- नोंदणी खर्च रु. 2,180/- व इतर रु. 2,200/- असे एकूण 2,05,880/- रु. ची भरणा दि. 7/1/11 चे आधी केलेली आहे. जर अर्जदार बांधकाम, बांधकाम साहित्य, मंजूर व इतर वाढलेल्या किंमतीत बराबरीने सहकार्य करण्यास तयार नसेल तर शिल्लक रक्कम रु. 1,44,120/- अर्जदारास परत करण्यास तयार आहे. तसेच गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदाराप्रति कोणतीही न्युनतम सेवा तसे अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नसून सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे.
4. गैरअर्जदार क्रं. 2 हे हजर होवून नि. क्रं. 18 वर लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्रं. 2 ने आपल्या लेखीउत्तरात असे कथन केले आहे कि, अर्जदाराने तक्रारीत लावलेले आरोप हे खोटे असून नाकबुल केले आहे. गैरअर्जदार क्रं. 1 ने डुप्लेक्स बांधून देण्याच्या कराराबद्दल गैरअर्जदार क्रं. 2 ला कोणतीही माहीती दिली नाही. गैरअर्जदार क्रं. 1 च्या चुकीचे बेकायदेशिर व फसवणुकीच्या कृत्यामुळे गैरअर्जदार क्रं.2 ला गैरअर्जदार क्रं. 1 चे विरुध्द प्रस्तुत जागेबद्दल दिवाणी कोर्टात मामला दाखल करावा लागला व सदर मामल्यात गैरअर्जदार क्रं. 2 ने गैरअर्जदार क्रं. 1 च्या लाभात वरील जागेची विक्रीपञ लिहून घेवून आपले संपूर्ण संबध गैरअर्जदार क्रं. 1 शी समाप्त केलेले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदाराशी कोणताही करार/ सौदा केला नसून तिचेकडून कोणताही मोबदला घेतला नाही. तसेच अर्जदाराने पाठविलेल्या नोटीसचे गैरअर्जदार क्रं.2 ने उत्तर दिले आहे. गैरअर्जदार क्रं. 2 ने कोणतीही अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केली नसून अर्जदाराची तक्रार गैरअर्जदार क्रं. 2 चे विरुध्द खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदारांचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 व 2 चा ग्राहक आहे काय ? होय.
(3) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(4) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय.
(5) आदेश काय ? अंतीम आादेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून देवई गोविंदपूर स्थित भूमापन क्रं. 100/1 च, आराजी 864 चौ. मि. हि स्थित घेतलेली मालमत्ता वर गैरअर्जदार क्रं. 1 ने डुप्लेक्स तयार करुन देण्याचे कबुल करुन दि. 4/8/10 रोजी करारनामा केला. सदर बांधकाम 10,40,000/- रु. 6 महिण्याचे आत गैरअर्जदाराने अर्जदाराला करुन देण्याचे कबुल केले. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्रं. 1 चा ग्राहक आहे असे सिध्द होते. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ – 2 वर दाखल कराराची पडताळणी करतांना असे दिसले कि, अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 कडून देवई गोविंदपूर स्थित भूमापन क्रं. 100/1 च, आराजी 864 चौ. मि. हि स्थित घेतलेली मालमत्ता दि. 7/1/11 रोजी घेतली होती. म्हणून अर्जदार हे गैरअर्जदार क्रं. 2चे ही ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः-
7. गैरअर्जदार क्रं. 1 ने त्याच्या लेखीबयाणात असे कथन केले आहे कि, त्यांनी अर्जदारासोबत दि. 4/8/10 रोजी सदर प्लॉटवर बांधकाम करण्याकरीता करार केलेला होता व असेही कबुल केलेले आहे कि, सदर करार करतेवेळी अर्जदारापासून 3,50,000/- रु. घेतले होते. अर्जदाराने दाखल नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ- 2 ची पडताळणी करतांना असे दिसले कि, सदर प्लॉट गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी अर्जदारास दि. 7/1/11 रोजी विकलेला आहे. म्हणून गैरअर्जदार क्रं. 2 चे लेखीबयाणत असे म्हणणे कि, गैरअर्जदार क्रं. 1 ने अर्जदारास सदर प्लॉटामधील बांधकामाकरीता कोणता करार केला होता याबाबत माहीती नाही हे ग्राहय धरण्यासारखे नाही तसेच अर्जदाराने सदर विक्रीपञानुसार गैरअर्जदार क्रं. 1व 2 यांना मालमत्तेची विक्री रक्कमरु. 1,90,000/- दिली होती असे नि. क्रं. 4 वर दस्त क्रं. अ- 2 वरुन सिध्द होत आहे. गैरअर्जदार क्रं. 2 चे त्यांच्या बचावात असे म्हणणे कि, रु. 3,50,000/- मधून रु. 2,05,880/- चा भरणा आधीच केलेला आहे हे ग्राहय धरण्यासारखे नाही. अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांना सदर जमिनीवर बांधकामा करीता रु. 5,40,000/- दिले होते हे सिध्द करु शकले नाही परंतु अर्जदाराने बांधकामाकरीता केलेल्या करारामध्येअसेसिध्दहोते अर्जदाराने गैरअर्जदार क्रं. 1 ला 3,50,000/- रु दिले होते. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून सदर प्लॉटची किंमतघेवून व सदर प्लॉटवर बांधकाम करुन देवू असे करार करुन सुध्दा अर्जदाराला प्लॉटवर डुप्लेक्स बनवून दिले नाही ही गैरअर्जदारांचे अर्जदाराप्रति न्युनतम सेवा व अनुचित व्यवहार पध्दती दर्शवित आहे असे सिध्द होत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 व 3 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 व 2 यांनी सुयंक्तिक किंवा वैयक्तिक रितीने अर्जदारास
रु. 3,50,000/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(3) अर्जदाराला झालेल्या शारीरिक मानसिक ञासापोटी गैरअर्जदार क्रं. 1 व 2
यांनी सुयंक्तिक किंवा वैयक्तिक रितीने रु.10,000/-
आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावे.
(4) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 21/01/2015