Maharashtra

Nagpur

CC/11/136

Shri Balraj Gulab Bahoriya - Complainant(s)

Versus

Kruti Builders - Opp.Party(s)

ADV,KIRAN MAHENDRU

31 Oct 2011

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/11/136
 
1. Shri Balraj Gulab Bahoriya
Plot No. 206, Rewati Nagar, Besa
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Kruti Builders
Zero Mile, Civil Lines
Nagpur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HONABLE MR. V.N.RANE PRESIDENT
 HONABLE MR. N.V.Bansod MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

(मंचाचा निर्णय: श्री. नरेश बनसोड - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                           -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 31/10/2011)
 
1.          प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्त्‍याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्र.1 ते 3 विरुध्‍द मंचात दिनांक 18.03.2011 रोजी दाखल करुन मागणी केली आहे की, तक्रारकर्त्‍यास प्‍लॉट नं.71, 72 व 73 चे खरेदीखत नोंदणीकरुन ताबा द्यावा व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.20,000/- देण्‍याबाबत मागणी केलेली आहे. प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          विरुध्‍द पक्षाने फेब्रुवारी-2007 चे दरम्‍यान दैनिक वर्तमान पत्रात जाहीराती व्‍दारे मौजा पांजरा, प.ह.नं.53, तह. नागपूर (ग्रामीण), जिल्‍हा नागपूर या गैरकृषी जमीनीवर नवीन ‘कार्तीक कॉलोनी’ या नावाने वसाहत उभारण्‍याचे सुचित केले होते व विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 हे कॉलनीचे मालक आहेत. गैरअर्जदार क्र.1 हे ‘कृति बिल्‍डर’ असुन विरुध्‍द पक्ष क्र.2 व 3 हे त्‍याचे मालक आहेत. विरुध्‍द पक्ष प्‍लॉट व फार्म हाऊस लोकांना हप्‍तेवारीने विकण्‍याचा व्‍यवसाय करतात, म्‍हणून तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचे कार्यालयात प्‍लॉट खरेदी करीता गेला होता व त्‍याने प्‍लॉट क्र.71, 72 व 73 खरेदी करण्‍यांकरीता दि.18.02.2007 रोजीला करारनामा क्र. एजी 774215 नुसार प्‍लॉट क्र.72 व 73 ची आराजी प्रत्‍येकी 5000 चौ.फूट, रु.35/- प्रति चौ.फूट प्रमाणे प्रत्‍येकी रु.1,75,000/- नुसार करार करण्‍यांत आला. तसेच दि.18.02.2007 रोजी करार क्र. एजी 774216 प्‍लॉट नं.71, आराजी 5000 चौ.फूट, रु.35/- प्रति चौ.फूट प्रमाणे विक्री किंमत रु.1,75,000/- होती. तक्रारकर्त्‍याने उपरोक्‍त तिन्‍ही प्‍लॉटची विक्रीची किंमत रु.5,25,000/- विरुध्‍द पक्षास दिली होती. त्‍यापुर्वी रु.1,00,000/- चा धनादेश दि.26.12.2009 रोजी, रु.3,08,000/- चा धनादेश दि.24.02.2010 रोजी, रु.1,14,000/- नगदी व रु.3,000/- विरुध्‍द पक्षास दिले व त्‍याने महावीर बिल्‍डर्स ऍन्‍ड डेव्‍हलपर्स यांचे नावाने दि.14.02.2008 ची पावती दिली. विरुध्‍द पक्षाने वरील तिन्‍ही प्‍लॉटची रक्‍कम प्राप्‍त झाली म्‍हणून तक्रारकर्त्‍याने तिन्‍ही प्‍लॉटचा ताबा देण्‍याबाबत व नोंदणीकृत विक्रीपत्र करुन देण्‍याबाबत विनंती केली होती. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास वेळोवेळी खोटी आश्‍वासने देऊन टाळाटाळ केली व विक्रीपत्र करुन दिले नाही ही विरुध्‍द पक्षाचे सेवेतील कमतरता आहे असे म्‍हटले आहे.
 
3.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षास वकीलामार्फत दि. 11.01.2011 रोजी नोटीस पाठविली व 10 दिवसांचे आत ताबा व विक्रीपत्र करुन देण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्षाने तिन्‍ही प्‍लॉटचा ताबा दिला नाही व विक्रीपत्र सुध्‍दा करुन दिलेली नाही, तक्रारकर्त्‍यानुसार त्‍याने शेवटचे पेमेंट दि.24.02.2010 ला केल्‍यामुळे तक्रारीचे कारण निर्माण झालेले आहे.
4.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत एकूण 14 दस्‍तावेज दाखल केले त्‍यामधे विरुध्‍द पक्षाची योजना, बयाणपत्र, रक्‍कम दिल्‍याचा तपशिल व पावत्‍या, बँकेचे खाते विवरण, नोटीस इत्‍यादी दस्‍तावेज अनुक्रमे पृष्‍ठ क्र.9 ते 45 वर दाखल केलेले आहेत.
 
5.          मंचाने तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्षास नोटीस बजावली असता दाखल दस्‍तावेजांवरुन विरुध्‍द पक्षास नोटीस प्राप्‍त झाल्‍याचे दिसुन येते. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 चे वकीलांनी तक्रारीस उत्‍तर दाखल करण्‍याकरीता वेळ मागण्‍याबाबत दि.27.04.2011 रोजी अर्ज दाखल केला. मंचाने अंतिम संधी देऊन सुध्‍दा लेखी उत्‍तर दाखल केले नाही व पुकारा केला असता ते गैरहजर, म्‍हणून मंचाने विना लेखी जबाब तक्रार चालविण्‍याचा आदेश दि.12.07.2011 रोजी पारित केला. विरुध्‍द पक्ष क्र. 3 यांना नोटीस प्राप्‍त झाली असुन पुकारा केला असता ते गैरहजर असल्‍यामुळे दि.22.08.2011 रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने पारित केला.
6.          तक्रारकर्त्‍याने तक्रारीत अतिरिक्‍त कथन दाखल करुन म्‍हटले आहे की, प्‍लॉट क्र.71,72 व 73 पैकी एक प्‍लॉट स्‍वतःचे उपयोगाकरीता, दुसरा प्‍लॉट विवाहीत मुलीकरीता व तिसरा प्‍लॉट अविवाहीत मुलाकरीता निवासी उपयोगाकरीता खरेदी केलेले आहेत.
7.          मंचाने तक्रारकर्त्‍याचा वकीलामार्फत केलेला युक्तिवाद ऐकला तसेच तक्रारीत दाखल दस्‍तावेजांचे सुक्ष्‍म अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षाप्रत पोहचले.
 
                                           -// निष्र्ष //-
 
8.          तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा पांजरा, प.ह.नं.53, खसरा नं.105/1 तह. नागपूर (ग्रामीण), जिल्‍हा नागपूर, ‘कार्तीक कॉलोनी’ येथील प्‍लॉट क्र.71,72 व 73 खरेदीचा करारनामा केला होता व त्‍याबाबत विरुध्‍द पक्षात तिन्‍ही प्‍लॉटची एकंदर रक्‍कम रु.5,25,000/- दिले होते, ही बाब दाखल दस्‍तावेजांवरुन सिध्‍द होते. त्‍यामुळे करारपत्रानुसार विरुध्‍द पक्षाची ही जबाबदारी होती की, रक्‍कम प्राप्‍त झाल्‍यानंतर करारनाम्‍याप्रमाणे तक्रारकर्त्‍यास तिन्‍ही प्‍लॉटचे विक्रीपत्र करुन ताबा द्यावा. परंतु विरुध्‍द पक्षाने तसे न करणे ही त्‍यांचे सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
9.          तक्रारकर्त्‍यास विरुध्‍द पक्षाने वरील प्‍लॉटचे विक्रीपत्र व ताबा न दिल्‍यामुळे निश्चितच त्‍याला मानसिक त्रास सहन करावा लागला व मंचासमक्ष तक्रार दाखल करावी लागली. म्‍हणून विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍यास प्‍लॉट क्र.71,72 व 73 चे विक्रीपत्र करुन देऊन ताबा देण्‍यांस बाध्‍य आहे व तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- देणे संयुक्तिक होईल असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.
 
            करीता वरील निष्‍कर्षांच्‍या आधारे मंच खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
 
-// अंति दे //-
 
 
 
1.         तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    विरुध्‍द पक्षांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास मौजा पांजरा,      प.ह.नं.53, खसरा नं.105/1 तह. नागपूर (ग्रामीण), जिल्‍हा नागपूर, ‘कार्तीक कॉलोनी’ येथील प्‍लॉट क्र.71,72 व 73 चे विक्रीपत्र करुन द्यावे व प्‍लॉटचा ताबा       द्यावा.
3.    विरुध्‍द पक्षांना आदेश देण्‍यांत येतो की, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारीरिक,      मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रु.2,000/- अदा करावे.
4.    वरील आदेशाची अंमलबजावणी विरुध्‍द पक्ष क्र.1 ते 3 यांनी संयुक्‍तपणे अथवा पृथकपणे करावी. आदेश क्र.1 ची अंमलबजावणी विरुध्‍द पक्षांनी आदेशाची प्रत     मिळाल्‍याचे  दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करुन न दिल्‍यास प्रति दिवस रु.50/- प्रमाणे दंडनीय रक्‍कम तक्रारकर्त्‍यास देण्‍यांस बाध्‍य राहील.
 
 
 
 
 
[HONABLE MR. V.N.RANE]
PRESIDENT
 
[HONABLE MR. N.V.Bansod]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.