:: निकालपत्र ::
(आयोगाचे निर्णयान्वये, श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ), मा. सदस्या,)
(आदेश पारीत दि. 23/3/2022)
तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत दाखल करून खालील प्रमाणे मागणी केली आहे-
- तक्रारकर्ता हे मुंबईला नोकरीला होते, त्याच दरम्यान त्यांची ऑक्टोंबर महीन्यात बदली झाली असल्यामुळे पॅकर्स अॅण्ड मुवर्स शोधात असतांना त्यांना गुगलवर VRL पॅकर्स अॅण्ड मुवर्स (श्री. कृष्णन कुमार रहार) हयांची माहीती मिळाली व त्यांनी त्यांचे सामान विरूध्द पक्ष तर्फे नेण्याचे ठरविले त्यावर विरूध्दपक्ष हयांनी सामान नेण्यासाठी रू. 22,000/-, सांगीतले त्यानंतर दि. 19/10/2020 रोजी ठरले की, 20 तारखेला विरूध्द पक्ष हयांना पाठविलेल्या यादीप्रमाणे दि. 20/10/2019 तारखेला सामान चंद्रपुर येथे सीस्टर कॉलनीत पोहचविण्याचे काम चालू करतील व 5 दिवसामध्ये सामान पोहचव तील व त्यावेळेस तक्रारकर्ता विरूध्द पक्ष हयांचेमध्ये ठरले की, सामान पोहचवितांना बिलाची सत्यप्रत व सामानाचा ट्रकींग नंबर लगेच दयावा. दि. 20/10/2020 रोजी विरूध्द पक्ष हयांची माणस तक्रारकर्त्याकडे आली व त्यांनी सुमारे 6.00 वाजताच्या सुमारास सामानाची बांधाबांध करून पोर्टर या प्रायव्हेट कंपनीच्या गाडयानी सामान गोडाऊन मध्ये हलविले, त्यादिवशी तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष हयांनी सांगीतल्याप्रमाणे रू. 5,000/-, विरूध्द पक्ष हयांच्या माणसांना दिले, व त्यानंतर विरूध्द पक्ष हयांना त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या फोन-पे अकाऊंटला रू. 17,200/-, पाठविले. परंतु त्यानंतर दि. 22/10/2020 पासुन दि. 13/12/2020 पर्यंत विरूध्द पक्ष हयांनी तक्रारकर्त्याचे सामान चंद्रपुर येथे पोहचलिे नाही. तक्रारकर्त्याची त्यानंतर वेळोवेळी विरूध्द पक्ष यांना संपर्क केला असता विरूध्द पक्ष हयांनी वेळकाढू उत्तर दिले, त्यानंतर फेसबुकवर तपास केला असता कृष्णन कुमार हे दुस-याच पॅकर्स अॅण्ड मुव्हर्सकडे काम करतात असहे समजले असुन त्यांनी असे अनेक लोकांना फसविले असे समजले. तक्रारकर्त्याने पुढे असे नमूद केले की, त्यांच्या 3 महिन्याच्या लहान मुलीचे कपडे, औषध त्या सामानात असुन महत्वाची कागदपत्रेही हयात आहे. विरूध्दपक्षांना पैसे देऊन सुध्दा त्यांनी सामान अजुनपर्यंत पोहचविले नसल्यामुळे हयांना मानसिक, शारिरिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
- तक्रारकर्त्याची मागणी अशी आहे की, हयाचे सामान लवकरात लवकर विरूध्द पक्ष हयांनी दयावे तसेच विरूध्द पक्ष हयांनी तक्रारकर्त्यासोबत केलेला गैरवर्तणुक व फसवणुक याबद्रदल विरूध्द पक्ष यांना जबाबदार धरण्यात यावे.
- विरूध्द पक्ष हयांना आयोगातर्फे नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर न झाल्यामुळे त्यांचे विरूध्द प्रकरण दि. 17/01/2022 रोजी प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले.
- तक्रारकर्ता यांची तक्रार, शपथपत्र व दस्तऐवजाचे अवलोकन करून तक्रार निकाली काढण्याकरीता कारणमिमांसा व त्यावरील निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेतः-
कारणमीमांसा
5) सदर तक्रारीत पक्ष यांच्याकडे त्यांचे मुंबई येथून चंद्रपूर येथे बदली झाल्यामुळे त्यांचे सामान चंद्रपूर येथे आणण्यासाठी विरुद्ध पक्ष यांच्या सोबत बोलून त्यांच्या तर्फे मुंबई येथील सामान चंद्रपूर येथे पोहोचण्याकरता तक्रार कर्ता व विरुद्ध पक्ष यांच्यामध्ये असा व्यवहार ठरला त्याबद्दलची विरुद्ध पक्ष यांनी तक्रारदाराला दिलेल्या बिल टॅक्स इंवोईस तक्रारदाराने तक्रारी दाखल केलेला आहे, सबब तक्रारदार व विरुद्ध पक्ष यांच्यात ग्राहक व सेवा दाता असा संबंध दिसून येतो.सदर टॅक्स इंवोईस चे अवलोकन केले असता विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्या चे सामान मुंबई येथून सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथे आणण्याकरिता 22,300/- रुपये दिनांक 20/10/2020 रोजी आकारले. ठरल्यानुसार विरुद्ध पक्ष यांची माणसं तक्रारकर्त्या कडे जाऊन सामानाची बांधाबांध करून सामान गोडाउन मध्ये पाठवले परंतु त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे सामान निर्णित स्थळी म्हणजे सिस्टर कॉलनी चंद्रपूर येथे पोहोचले नाही. त्यामुळे तक्रारदाराने वेळोवेळी विरुद्ध पक्ष यांना संपर्क साधून सामान लवकरात लवकर पोचविण्यास सांगितले परंतु विरुद्ध पक्ष यांनी त्याकडे दुर्लक्ष केले तक्रारकर्त्या चे सगळे सामान विरुद्ध पक्ष यांनी वेळेत पोहचविले नसल्यामुळे त्यांना रोजच्या दैनंदिन व्यवहारात अडचणी येऊ लागल्या ही बाब सहाजिक आहे. आयोगाच्या मते विरुद्ध पक्ष यांनी तक्रारकर्त्या कडून सामान पोचवण्याची रक्कम घेऊन सुद्धा सामान वेळेत न पोहचवून तक्रारकर्त्या प्रति सेवेत न्यूनता दिलेली असल्यामुळे तसेच त्यामुळे तक्रार कर्त्याला तक्रारकर्त्याला मानसिक-शारीरिक त्रास सहन करावा लागला असे आयोगाचे मत असल्यामुळे आयोग खालील आदेश पारित करीत आहे
अंतिम आदेश
१. तक्रार क्रमांक 159/21 अंशत मंजूर करण्यात येते.
२. विरुद्ध पक्ष ह्यांनी तक्रारदाराचे सामान वेळेत पोहचवून न दिल्यामुळे
विरुद्ध पक्ष ह्यांनी तक्रारदाराला झालेल्या शारिरीक तसेच मानसिक
त्रासापोटी रुपय 5,000/- द्यावेत.
३. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला तक्रारीचा खर्च रुपये 2,000/- द्यावा.
४. उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.