ग्राहक तक्रार अर्ज क्र.307/2010
तक्रार अर्ज दाखल दि.27/10/2010
अंतीम आदेश दि.14/10/2011
नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक
श्री.पांडुरंग रघुनाथ आव्हाड, अर्जदार
रा.मु.पो.निमगाव, ता.सिन्नर,जि.नाशिक (अँड.के.एस.शेळके)
विरुध्द
1.कृषीधन व्हेजिटेबल सिड्स(आय) प्रा.लि. सामनेवाला
कृषीधन भवन, प्लॉट नं.डी-13, (अँड.टी.एस.अत्तार)
अँडीशनल एम.आय.डी.सी. औरंगाबाद रोड,
जालना-431213
2.मे पायल कृषी सेवा केंद्र, सामनेवाला
निमगाव, ता.सिन्नर,जि.नाशिक. (अँड.बी.जी.चिताळकर)
(मा.सदस्या सौ.व्ही.व्ही.दाणी यांनी निकालपत्र पारीत केले)
नि का ल प त्र
अर्जदार यांना सदोष बियाण्याबद्दल सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाईपोटी रु.2,22,000/- मिळावेत, पिकासाठी खत, फवारणी, निंधणी, खुरपणी यासाठीचे खर्चापोटी रु.30,000/- मिळावेत, आर्थीक, शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- मिळावेत, अर्जाचा खर्चापोटी रु.5000/- मिळावे या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.20 लगत लेखी म्हणणे व पान क्र.66 लगत प्रतिज्ञापत्र तसेच सामनेवाला क्र.2 यांनी पान क्र.42 लगत म्हणणे व पान क्र.43 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत.
अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार होवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत.
1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय
2) सामनेवाला क्र.1 यांनी खराब व दोषयुक्त बियाण्याचे उत्पादन करुन
तक्रार क्र.307/2011
त्याची विक्री सामनेवाला क्र.2 मार्फत अर्जदार यांना करुन अवैध व्यापार
पध्दतीचा अवलंब केलेला आहे काय?- होय
3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून पिकाचे नुकसान भरपाई पोटी रक्कम
वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी
रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत काय?- होय
5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत
आहे.
विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.78 लगत व सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.73 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे.
सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “दि.03/07/2010 रोजी सामनेवाला क्र.1 या कंपनीचे फ्लॉवर जात ज्युलियाना कंपनीचे प्रती 10 ग्रॅम वजन व सिलबंद असलेले पाकिटे एकूण नग 60 असे 70 ग्रॅम बियाणे दिले होते.” असे म्हटलेले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेंखी म्हणणे कलम 3 मध्ये बियाणे खरेदी व्यवहार मान्य केलेला आहे. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत सामनेवाला क्र.2 यांनी दिलेली दि.03/07/2010 ची रक्कम रु.1400/- ची मुळ अस्सल पावती क्र.230 ची दाखल केलेली आहे. पान क्र.6 ची पावती व सामनेवाला यांचे लेखी म्हणणे याचा विचार करता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे.
अर्जदार यांनी पान क्र.8 लगत त्यांचे वडिलांचे नावावरील शेतजमीन गट नं.396 चा 7/12 चा उतारा व पान क्र.12 लगत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांचा म्हणजेच अध्यक्ष जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती, नाशिक यांचा अहवाल दाखल केलेला आहे.
या कामी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचे सदस्य व ज्यांनी अर्जदार यांचे शेतास व फ्लॉवर पिकास भेट देवून अहवाल तयार केलेला आहे ते साक्षीदार श्री.अंकूश डी. मोरे यांचे प्रतिज्ञापत्र पान क्र.54 लगत दाखल केलेले आहे व श्री. मोरे
तक्रार क्र.307/2011
यांनी त्यांचे प्रतिज्ञापत्रासोबत पान क्र.55 लगत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती यांचा अहवाल झेरॉक्स प्रत दाखल केलेली आहे.
पान क्र.54 चे श्री.मोरे यांचे प्रतिज्ञापत्र व त्यामधील मजकूर व पान क्र.55 व 12 लगतचा अहवाल चुकीचा आहे किंवा योग्य व बरोबर नाही हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही योग्य तो पुरावा दाखल केलेला नाही. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत बियाण्याचा पाऊच दाखल केलेला आहे. या पाऊचचे पाठीमागील बाजूस बियाण्याचे शुध्दतेबाबतचा मजकूर छापलेला आहे.
सामनेवाला यांनी पान क्र.21 चे यादीसोबत पान क्र.26 लगत सिड अँनॅलॅसिस रिपोर्ट, पान क्र.27 लगत स्टेटमेंट 1, पान क्र.28 लगत स्टेटमेंट 3, पान क्र.29 लगत अँप्लीकेशन फॉर्म, पान क्र.30 ते 35 ज्युलियाना संकरीत फ्लॉवर पिकाबाबतची माहितीपत्रके, पान क्र.36 लगत विक्रीबाबतचा अहवाल, पान क्र.37 लगत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे परिपत्रक, पान क्र.38 लगत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे परिपत्रक, पान क्र.39 महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे परिपत्रक, पान क्र.40 लगत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे परिपत्रक व पान क्र.41 लगत कोबी वर्गीय भाजीपाला लागवडचे माहितीपत्रक इ.कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “अर्जदार यांचे तक्रार अर्जामधील संपुर्ण हकीकत नाकारलेली आहे तसेच पिकासाठी आवश्यक ती मशागत करणे, नागरणी, वखरणी, लेंडीखत देणे, रोपाची पुर्नलागवड करणे इ.कामे करणे गरजेचे असते. नाशिक जिल्हयात अत्यल्प प्रमाणात झालेला पाऊस व 36 डिग्री सेल्सीयसपर्यंत वाढलेले तापमान, पिकाच्या अपोषक अवस्थेस कारणीभूत ठरलेले आहे. सदोष बियाण्यामुळे नुकसान झालेले नाही. जिल्हास्तरीय तक्रार समितीने बियाणे दोषपुर्ण होते असा निष्कर्ष काढलेला नाही. बियाणे रिलीज ऑर्डरमध्ये बियाण्याची शुध्दता दिलेली आहे. सामनेवाला यांचा कोणताही निष्काळजीपणा सिध्द झालेला नाही.” असे म्हटलेले आहे.
परंतु अर्जदार यांनी पान क्र.12 लगत जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचा जो अहवाल दाखल केलेला आहे त्यामधील परिच्छेद क्र.11 मध्ये जे निष्कर्ष दिलेले आहेत त्यामध्ये “प्रत्यक्ष भेटीच्या वेळी पीक 90 दिवसाचे वर झालेले होते. पिक पक्वतेचा कालावधी हा 65 ते 70 दिवस असतांना पिक पक्वता आढळून आली नाही. कंद (फुल) वाढ ही उंच व पसरट झालेली होती. प्रत्यक्षात कंदाचे वजन 250 ग्रॅम ते 500 ग्रॅम आढळून आले त्यामुळे बाजारभाव 15 ते 20 टक्के मिळाला असल्याने बियाण्याचे दोषामुळे शेतक-याचे 80 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.” असा
तक्रार क्र.307/2011
स्पष्ट उल्लेख आहे. या कामी पान क्र.54 लगत साक्षीदार श्री अंकूश डी.मोरे यांचे प्रतिज्ञापत्र दाखल आहे. तसेच श्री. मोरे यांनी पान क्र.72 लगत प्रश्नावलीस प्रतिज्ञापत्रासह उत्तरे दिलेली आहेत. श्री. मोरे यांचे पान क्र.54 चे प्रतिज्ञापत्र, पान क्र.72 ची प्रश्नावलीची उत्तरे व पान क्र.12 लगतचा अहवाल याचा एकत्रीतरित्या विचार करीता बियाण्यामध्ये दोष असल्यामुळेच अर्जदार यांचे पिकाचे नुकसान झालले आहे हे स्पष्ट होत आहे. सामनेवाला यांनी या कामी नंदकिशोर रमेश देशमुख, बद्रीनारायण हरीशंकर दुबे, किरण कचरु मांडे यांची प्रतिज्ञापत्रे अनुक्रमे पान क्र.66, पान क्र.67 व पान क्र.68 लगत दाखल केलेली आहेत. साक्षीदार श्री बद्रीनारायण दुबे यांनी पान क्र.69 नुसार प्रश्नावलीस उत्तरे दाखल केलेली आहेत. परंतु पान क्र.66, पान क्र.67, पान क्र.68 लगतचे प्रतिज्ञापत्रे व पान क्र.69 लगतचे प्रश्नावलीचे उत्तराचे प्रतिज्ञापत्र याचा एकत्रीत रित्या विचार करीता बियाण्यामध्ये कोणताही दोष नव्हता असे स्पष्टपणे शाबीत होत नाही
पान क्र.7 चे बियाण्याचे पाऊचचे पाठीमागील बाजुचे सिड सर्टिफिकेशनचा विचार करीता जरी पान क्र.7 चे पाऊचे पाठीमागील बाजुस बियाण्याची शुध्दता 98 टक्के, उगवण क्षमता 65 ते 70 टक्के असा उल्लेख असला तरीसुध्दा प्रत्यक्षात बियाण्यामध्ये दोषच होता ही बाब वर उल्लेख केलेले पान क्र.12 चा अहवाल, पान क्र.54 लगतचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.72 लगतचे उत्तरावली वरुन स्पष्ट झालेली आहे.
वरील सर्व कारणांचा विचार करता सामनेवाला क्र.1 यांनी दोषयुक्त बियाण्यांचे उत्पादन करुन त्याची विक्री अर्जदार यांना सामनेवाला क्र.2 यांचेमार्फत केलेली आहे व त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी अवैध व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला क्र.1 यांनी पान क्र.74 चे यादीसोबत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1) 2(2005) सि.पी.जे. सर्वोच्च न्यायालय. पान 13. हरीयाणा सिडस्
डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन विरुध्द साधु व इतर.
2) 2(2005) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 94. सोने किरण ग्लॉडीयर्स
ग्रोवर्स विरुध्द बाबुराम.
3) 2(2007) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 148. इंडोअमेरीकन हायब्रीड
सिडस विरुध्द विजयकुमार शंकरराव.
4) 1(2007) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 266. महाराष्ट्र हायब्रीड सिडस
तक्रार क्र.307/2011
विरुध्द गोवरीपेडन्ना.
5) 1(2009) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 180. महाराष्ट्र हायब्रीड सिडस
विरुध्द परचुरीनारायण.
6) 4(2005) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 47. हिंदुस्थान इन्सेक्टीसाईडस
विरुध्द कोपोलु सांभशिवा राव.
7) 3(2006) सि.पी.जे. महाराष्ट्र राज्य आयोग. पान 269. खामगाव तालुका
शेतकरी संस्था विरुध्द बाबु कुट्टी डॅनियल.
8) मा.राज्य आयोग मुंबई. (ऑरंगाबाद खंडपीठ) यांचे समोरील प्रथम अपील
क्र.2545/98. निकाल ता.15/2/2007. महेंद्र हायब्रीड सिडस विरुध्द
निलकांत पुंजाजी कवडे.
9) मा.राज्य आयोग मुंबई. यांचे समोरील प्रथम अपील क्र.993/2000
निकाल ता.21/03/2006 महाराष्ट्र हायब्रीड सिड विरुध्द संजय मुरलीधर
राव मनिकर
10) मा.राज्य आयोग मुंबई. यांचे समोरील प्रथम अपील क्र.1641/98 निकाल
ता.18/12/2006 महाराष्ट्र हायब्रीड सिड विरुध्द मारुती पांडुरग
जाधव
परंतु सामनेवाला यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जातील हकिकत यामध्ये फरक आहे. प्रस्तुत तक्रार अर्जाचे कामी पान क्र.12 चा अहवाल, पान क्र.54 लगतचे प्रतिज्ञापत्र व पान क्र.72 लगतचे उत्तरावलीचे प्रतिज्ञापत्र यावरुन बियाणे दोषयुक्त आहेत ही बाब स्पष्ट झालेली आहे. यामुळे सामनेवाला यांनी दाखल केलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे या कामी लागु होत नाहीत.
फ्लॉवर पिकाचे नुकसान भरपाई पोटी सामनेवाला यांचेकडून रु.2,22,000/- मिळावेत अशी मागणी अर्जदार यांनी केलेली आहे. अर्जदार यांनी तक्रार अर्ज कलम 8 मध्ये “सदरच्या क्षेत्रामधून साधारणपणे 5000 ते 6000 गठ्ठे काढले असते 2000 ते 2500 ग्रॅमचे कंद काढले असते, पीक पुर्णपणे नष्ट झालेले आहे दि.01/10/2010 ते 07/10/2010 या दरम्यान पिक मार्केटमध्ये विक्री केले असते व साधारणपणे 200 क्विंटल माल काढला असता पिकास 1100 रुपये प्रतिक्विंटल भाव होता.” असे म्हटलेले आहे
तक्रार क्र.307/2011
अर्जदार यांनी पान क्र.14 लगत कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा फ्लॉवर पिकाबाबतचे किमतीचा दाखला दाखल केलेला आहे. या दाखल्याचा विचार करता फ्लॉवर पिकास सरासरी एक हजार रुपये प्रतिक्विंटल इतका भाव होता असे दिसून येत आहे.
सामनेवाला यांनी अर्जदार यांचे वरील कथन त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्र कलम 9 नुसार नाकारलेले आहे. परंतु फ्लॉवर पिकाचा नक्की काय भाव होता व अर्जदार यांना नक्की किती उत्पादन मिळाले असते? याबाबतचा कोणताही योग्य तो पुरावा सामनेवाला यांनी दिलेला नाही. तसेच सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेमध्ये अर्जदार यांना नक्की किती उत्पादन मिळाले असते व ऑक्टोबर 2010 मध्ये फ्लॉवर पिकाचा काय भाव होता? याबाबतही कोणताही स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
अर्जदार यांनी 200 क्विटल फ्लॉवर पिकाचे उत्पादन घेतले असते व त्यानुसार अर्जदार यांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये यानुसार एकूण दोन लाख रुपयेचे उत्पन्न अर्जदार यांना मिळाले असते. पान क्र.12 चे अहवालामध्ये अर्जदार यांचे 80 टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे असा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजेच अर्जदार यांचे रु.1,60,000/-चे नुकसान झालेले आहे हे स्पष्ट होत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या फ्लॉवर पिकाचे नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,60,000/-इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचासमोर दाद मागावी लागली आहे यामुळे अर्जदार यांना निश्चितपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे व तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागलेला आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला क्र.1 व 2 यांचेकडून वैयक्तीक व संयुक्तीकरित्या मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- अशी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.
याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्राचा आधार घेतलेला आहे.
1) 2011 सि.टी.जे. राष्ट्रीय आयोग पान 60. पी.एच.आय. सिड्स लि.
विरुध्द रघुनाथ रेड्डी.
तक्रार क्र.307/2011
अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 व 2 यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, तसेच मंचाचे वतीने आधार घेतलेले व वर उल्लेख केलेले वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्र आणि वरील सर्व विवेचन यांचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला क्र.1 व 2 यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2) आजपासून 30 दिवसांचे काळात सामनेवाला क्र.1 व 2 यांनी वैय्यक्तीक व संयुक्तीक रित्या अर्जदार यांना पुढीलप्रमाणे रकमा दयाव्यात
अ) फ्लॉवर पिकाचे नुकसानीपोटी रक्कम रु.1,60,000/- दयावेत.
ब) मानसिक त्रासापोटी रु.15,000/- दयावेत.
क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- दयावेत.
(आर.एस. पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी)
अध्यक्ष सदस्या
ठिकाणः- नाशिक.