Maharashtra

Solapur

CC/10/33

Upay rajaram Nanjkar - Complainant(s)

Versus

Krushidhan seeds Ltd. 2.phatate aggrig and selce - Opp.Party(s)

06 Jan 2011

ORDER


1Behind District Treasury Office, Near Central Administrative, Building, Solapur.
Complaint Case No. CC/10/33
1. Upay rajaram Nanjkarmangarul tal.akkoltsolapurmaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Krushidhan seeds Ltd. 2.phatate aggrig and selce 1.m.i.d.c.aria Auranbad road jalana 2.98 budhawarpeth solapursolapurmaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude ,PRESIDENTHONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 06 Jan 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

        

ग्राहक तक्रार क्रमांक : 33/2010.

 

                                                                    तक्रार दाखल दिनांक:01/02/2010.    

                                                                    आदेश दिनांक : 06/01/2011.   

 

उदय राजाराम नान्‍नजकर, वय 42 वर्षे, व्‍यवसाय : शेती,

रा. मंगरुळ (पा.), ता. अक्‍कलकोट, जि. सोलापूर.                    तक्रारदार

 

                        विरुध्‍द

 

1. व्‍यवस्‍थापक, कृषिधन सीडस् लि., कृषिभवन,

   डी-3, डी-6, अति. एम.आय.डी.सी. एरिया,

   औरंगाबाद रोड, जालना - 431 213.

2. व्‍यवस्‍थापक, फताटे अग्रो अन्‍ड सेल्‍स एजन्‍सी,

   98, बुधवार पेठ, सोलापूर.                                          विरुध्‍द पक्ष

 

               गणपुर्ती  :-  सौ. संगिता एस. धायगुडे,  ध्‍यक्ष

                                सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्‍य

 

 

 

 

                   तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्‍ता :  एस.एस. मचाले

                   विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचेतर्फे अभियोक्‍ता : व्‍ही.एन. कुलकर्णी

 

आदेश

 

सौ. संगिता एस. धायगुडे, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

1.     तक्रारदार यांची थोडक्‍यात अशी तक्रार आहे की, ते व्‍यवसायाने शेतकरी असून त्‍यांची मौजे मंगरुळ, ता. अक्‍कलकोट येथे गट नं.576/2, क्षेत्र 2 हे. 80 आर. शेतजमीन आहे. त्‍यांनी मंगरुळ येथील नवोदय कृषि विज्ञान मंडळ यांच्‍यामार्फत सूर्यफूल मार्शनल 675 बियाणे प्रतिपॉकेट 2 किलो याप्रमाणे एकूण 16 पाकिटे खरेदी केली आणि त्‍यापैकी 7 पाकिटे दि.28/8/2009 रोजी योग्‍य मशागत करुन 7 एकर क्षेत्रामध्‍ये पेरणी पध्‍दतीने लागवड केले. साधारणत: दोन महिन्‍यानंतर पिकाची पाहणी केली असता, झाडांच्‍या उंचीमध्‍ये असमानता व 20 ते 25 टक्‍के झाडांना 4/5 फुले आल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे त्‍यांनी जिल्‍हा कृषि विकास अधिकारी, सोलापूर यांच्‍याकडे तक्रार केली आणि दि.19/11/2009 रोजी प्रत्‍यक्ष पिकाची पाहणी करुन दिलेल्‍या अहवालामध्‍ये सूर्यफूल बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. भेसळयुक्‍त बियाण्‍यामुळे त्‍यांना केवळ रु.7,500/- ते रु.8,000/- चे उत्‍पन्‍न मिळाले आणि इच्छित उत्‍पन्‍नापासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार यांनी प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडून नुकसान भरपाईपोटी रु.2,00,000/- व्‍याजासह मिळावेत आणि तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केली आहे.

 

2.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी रेकॉर्डवर म्‍हणणे दाखल केले असून तक्रार अमान्‍य केली आहे. तक्रारदार व त्‍यांच्‍यामध्‍ये 'ग्राहक व विक्रेता' असे नाते निर्माण झालेले नाही. तक्रारदार यांनी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडून बियाणे खरेदी केल्‍याचा पुरावा सादर केलेला नाही. तसेच तक्रारदार यांनी मे. नवोदय कृषि विज्ञान मंडळ यांच्‍याकडून बियाणे खरेदी केल्‍याचा पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार हे 'ग्राहक' संकल्‍पनेत बसत नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेला जिल्‍हास्‍तरीय बियाणे चौकशी समितीचा अहवाल विरुध्‍द पक्ष यांनी अमान्‍य केला आहे. तसेच तक्रारदार यांनी सूर्यफूल बियाण्‍याची रिकामी पिशवी व लेबल दाखल केलेले नाही. त्‍यांनी उत्‍पादीत केलेले बियाणे तक्रारदार यांनी पेरणी केल्‍याबाबत कोणताही पुरावा नाही. तसेच ते विक्री करीत असलेले बियाणे प्रयोगशाळेमध्‍ये तपासणी केल्‍याशिवाय बाजारात वितरीत करण्‍यात येत नाही. बियाण्‍याचा नमुना ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कलम 13 (1) (सी) अन्‍वये तपासणीकरिता प्रयोगशाळेकडे पाठविलेला नाही. तक्रारदार यांची तक्रार खोटी असल्‍यामुळे तक्रार खर्चासह रद्द करण्‍याची त्‍यांनी विनंती केली आहे.

 

3.    विरुध्‍द पक्ष क्र.2 यांना मंचाच्‍या नोटीसची बजावणी झालेली आहे. त्‍यांना उचित संधी देऊनही ते मंचासमोर उपस्थित झाले नाहीत आणि म्‍हणणे दाखल केलेले नाही. त्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्‍यात येऊन तक्रार सुनावणीसाठी घेण्‍यात आलेली आहे.

 

4.    तक्रारदार यांची तक्रार, विरुध्‍द पक्ष क्र.1 यांचे म्‍हणणे व दाखल कागदपत्रांचे अवलोकन करता, तसेच तक्रारदार यांचा युक्तिवाद ऐकल्‍यानंतर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

            मुद्दे                              उत्‍तर

 

1. तक्रारदार हे विरुध्‍द पक्ष यांचे ग्राहक आहेत काय ?             होय.

2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना विक्री केलेले सूर्यफूल

   बियाणे दोषयुक्‍त असल्‍याचे काय ?                                     होय.          

3. तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत काय ?       होय.

4. काय आदेश ?                                     शेवटी दिल्‍याप्रमाणे.

 

 

 

निष्‍कर्ष

 

5.    मुद्दा क्र. 1 ते 4 :- सर्वप्रथम विरुध्‍द पक्ष क्र.1 यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार विरुध्‍द पक्ष क्र.2 यांनी विक्री केलेल्‍या मे. नवोदय कृषि विज्ञान मंडळाकडून तक्रारदार यांनी  बियाणे खरेदी केल्‍याचा पुरावा नसल्‍यामुळे तक्रारदार 'ग्राहक' संकल्‍पनेत येत नसल्‍याचे नमूद केलेले आहे. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर शपथपत्र दाखल करुन नवोदय कृषि विज्ञान मंडळ ही नोंदणीकृत संस्‍था असल्‍याचे व ते संस्‍थेचे अध्‍यक्ष असल्‍याचे नमूद करुन मंडळामार्फत गावातील शेतक-यांकरिता बियाणे, खते, औषधे मागवून वितरीत करण्‍याचे कार्य करीत असल्‍याचे म्‍हटले आहे. तक्रारदार हे मंडळाचे सभासद व अध्‍यक्ष असल्‍यामुळे मंडळाच्‍या नांवे जरी बियाणे खरेदी केले तरी तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या जमिनीमध्‍ये पेरणी केल्‍यामुळे ते 'ग्राहक' होत असल्‍याचा युक्तिवाद तक्रारदार यांच्‍या अभियोक्‍त्‍यांनी केलेला आहे. तक्रारदार यांनी रेकॉर्डवर नवोदय कृषि विज्ञान मंडळ, मु.पो. मंगरुळ, ता. अक्‍कलकोट, जि. सोलापूर संस्‍थेचे नोंदणी प्रमाणपत्र व लेटरहेड दाखल केले आहे. त्‍यानुसार तक्रारदार हे मंडळाचे अध्‍यक्ष असल्‍याचे निदर्शनास येते. संस्‍थेचा उद्देश विचारात घेता, नवोदय कृषि विज्ञान मंडळ हे बियाणे, खते, औषधे खरेदी करुन त्‍यांच्‍या सभासदांना वितरीत करण्‍याचे कार्य करीत असल्‍याचे निदर्शनास येते. तसेच तक्रारदार हे स्‍वत: संस्‍थेचे अध्‍यक्ष आहेत. जरी नवोदय कृषि विज्ञान मंडळाकडून त्‍यांना बियाणे प्राप्‍त झाल्‍याची पावती तक्रारदार यांनी रेकॉर्डवर दाखल केलेली नसली तरी मंडळाचा उद्देश पाहता मंडळाने खरेदी केलेले बियाणे तक्रारदार यांना वितरीत केल्‍याचे मान्‍य करावे लागते.

 

6.    ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 2 (1) (‍डी) असे स्‍पष्‍ट करते की,

 

      (d)        "consumer" means any person who—

 

      (i)         buys any goods for a consideration which has been paid or promised   or partly paid and partly promised, or under any system of deferred payment      and includes any user of such goods other than the person who buys such       goods for consideration paid or promised or partly paid or partly promised, or under any system of deferred payment when such use is made with the      approval of such person, but does not include a person who obtains such       goods for resale or for any commercial purpose; or

 

      (ii)        hires or avails of any services for a consideration which has been paid or promised or partly paid and partly prom­ised, or under any system of       deferred payment and includes any beneficiary of such services other than the    person who 'hires or avails of the services for consideration paid or promised, or partly paid and partly promised, or under any system of deferred payment,     when such services are availed of with the approval of the first mentioned       person but does not include a person who avails of such services for any commercial purposes;

 

      Explanation.— For the purposes of this clause, “commercial purpose” does   not include use by a person of goods bought and used by him and services    availed by him exclusively for the purposes of earning his livelihood by       means of self-employment; 

7.    वरील तरतुदीनुसार वस्‍तु किंवा सेवा घेणारा व्‍यक्‍ती लाभार्थी असल्‍यास 'ग्राहक' होतो, परंतु सदर सेवा प्रथम व्‍यक्‍तीच्‍या संमतीने देण्‍यात आलेली असणे आवश्‍यक आहे. प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये तक्रारदार यांनी जरी विरुध्‍द पक्ष क्र.2 यांच्‍याकडून थेट बियाणे खरेदी केलेले नसले तरी नवोदय कृषि विज्ञान मंडळाने त्‍यांच्‍याकरिता खरेदी केलेले बियाणे खरेदी केलेले असून तक्रारदार हे 'ग्राहक' संज्ञेत येतात, या मतास आम्‍ही आलो आहोत. त्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

 

8.    तक्रारदार यांनी सूर्यफूल बियाण्‍याची पेरणी केल्‍यानंतर उंची समान नसणे, वाढ व्‍यवस्थित न होणे, 25 टक्‍के झाडांना 4 ते 5 पेक्षा जास्‍त फुले येणे, उत्‍पादनात 80 टक्‍के घट येण्‍याची शक्‍यता निर्माण होणे इ. कारणाची चौकशी होण्‍यासाठी जिल्‍हा कृषि विकास अधिकारी, जि.प., सोलापूर यांच्‍याकडे अर्ज दिलेला आहे. त्‍यांच्‍या अर्जानुसार जिल्‍हास्‍तरीय निविष्‍ठा तक्रार निवारण समितीने दि.19/11/2009 रोजी पिकाची प्रत्‍यक्ष पाहणी करुन अहवाल दिलेला आहे. अहवालामध्‍ये त्‍यांनी खालीलप्रमाणे निष्‍कर्ष नोंदविला आहे.

 

      निष्‍कर्ष :- सदरहु क्षेत्राचे निरीक्षणाअंती सूर्यफुलाच्‍या मार्शल 675 या संकरीत जातीचे बियाणे 100 टक्‍के भेसळयुक्‍त आहे.

 

9.    विरुध्‍द पक्ष क्र.1 यांनी जिल्‍हास्‍तरीय निविष्‍ठा तक्रार निवारण समितीचा अहवाल विविध कारणे देऊन फेटाळला आहे. तसेच पिकाच्‍या असमानतेकरिता चुकीचे पीक व्‍यवस्‍थापनासह, जमिनीची अवस्‍था, आद्रता, हवामान, मशागत इ. बाबीकारणीभुत असू शकतात, असे त्‍यांनी नमूद केलेले आहे.

 

10.   तक्रारदार हे व्‍यवसायाने शेतकरी असून वर्षानुवर्षे शेती करतात. शेती व्‍यवसायामध्‍ये अनेक पिके घेण्‍याचा त्‍यांचा अनुभव आहे. जिल्‍हास्‍तरीय निविष्‍ठा तक्रार निवारण समितीच्‍या निरिक्षणामध्‍ये प्रामुख्‍याने झाडांची असमान वाढ, बहुफली व मादी झाडे येणे, कणसातील दाणे कमी भरणे इ. दोष निदर्शनास असल्‍याचे नमूद केले आहे. सदर दोष निर्माण होण्‍यास चुकीचे पीक व्‍यवस्‍थापन, जमिनीची अवसथा, आद्रता, हवामान, मशागत इ. बाबी कारणीभुत असू शकतात, हे विरुध्‍द पक्ष यांनी पुराव्‍याद्वारे सिध्‍द केलेले नाही.

 

11.      शासनाच्‍या आदेशानुसार जिल्‍हास्‍तरीय निविष्‍ठा तक्रार निवारण समिती गठीत करण्‍यात आलेली आहे आणि समितीचे सदस्‍य हे कृषि क्षेत्रातील विविध तज्ञ व्‍यक्‍ती आहेत.  तसेच त्‍यांचा अहवाल पिकाची पाहणी करणारा प्रत्‍यक्षदर्शी अहवाल आहे आणि त्‍यांच्‍या कृषि शैक्षणिक अर्हता व अनुभवावरुन त्‍यांनी निश्चित अनुमान अहवालामध्‍ये दिलेले आहे.  त्‍यामुळे समितीने दिलेला अहवाल मान्‍य करावा लागतो.  

 

12.   मा. महाराष्ट्र राज् आयोगाने 'नोव्हार्टीज इंडिया लि. इतर /विरुध्/ अनिल संभाजीराव कोडरे', 2 (2004) सी.पी.जे. 283 मध्ये नमूद निवाडयात असे म्हटले आहे की,

 

       Para. 10 : However, District Forum accepted the Report of the Expert Committee of the Zilla Parishad and in our view rightly since the said committee is a Statutory Committee duly authorised and empowered to render such reports.

 

13.   तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्‍द/ भीम रेड्डी मल्‍ली रेड्डी', 1 (2008) सी.पी.जे. 492 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे म्‍हटले आहे की,

 

      Para.7 : What we see is that both the lower Forums have, in our view, rightly relied upon the reports of the Agriculture Officers after visiting the field of the respondent/complainant indicating loss of crop on account of seed supplied by the petitioner.

 

14.      मा. राष्‍ट्रीय आयोगाने 'प्रथम बायोटेक प्रा.लि. /विरुध्‍द/ सईद जावेद सईद अमीर व इतर', 4 (2008) सी.पी.जे. 119 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे नमूद केले आहे की,

 

     Para. 8 : With regard to the second contention, it is to be stated that farmers are not expected to assume that seeds supplied by the petitioners would be defective or adulterated. Normally, they rely upon the broucher or its advertisement. Hence, before sowing the seeds they would not keep some seeds reserved for their testing. Hence, the contention that the District Forum ought to have sent the seeds for testing to a laboratory is of no substance. In any set of circumstances, the procedure prescribed under the Seeds Act is followed and the District Seeds Committee had held the necessary inquiry and had given its report. That report cannot be brushed aside on the contention that the seeds were not sent for testing to a laboratory.

 

15.   उपरोक्‍त निवाडयांतील तत्‍व पाहता, जिल्‍हास्‍तरी निविष्‍ठा तक्रार निवारण समितीचा अहवाल अमान्‍य करता येऊ शकत  नाही आणि तो ग्राह्य धरणे भाग पडते. तक्रारदार यांना पुरवठा केलेले 100 टक्‍के बियाणे भेसळयुक्‍त असल्‍याचे जिल्‍हास्‍तरीय निविष्‍ठा तक्रार निवारण समितीच्‍या अहवालावरुन सिध्‍द होते. त्‍या अनुषंगाने तक्रारदार यांना सूर्यफुल पिकापासून उत्‍पन्‍न मिळू शकलेले नाही, हे स्‍पष्‍ट होते.

 

16.   तसेच ज्‍यावेळी वस्‍तुमध्‍ये दोष असल्‍याची तक्रार प्राप्‍त होते, त्‍यावेळी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13 (1) (सी) अन्‍वये दोषयुक्‍त वस्‍तु उचित प्रयोगशाळेकडे परिक्षणासाठी पाठविणे आवश्‍यक असल्‍याची तरतूद आहे.  सूर्यफुल बियाण्‍याविषयी मंचासमोर प्रस्‍तुत तक्रार दाखल आहे आणि सदर तरतुदीनुसार संबंधीत लॉटच्‍या बियाणे उचित प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविणे अत्‍यावश्‍यक आहे, हेही स्‍पष्‍ट आहे.  भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी जे बियाणे खरेदी करुन पेरणी करतात, त्‍याची किंमत मोठी असते आणि एका अर्थाने ते मौल्‍यवाण असते.  त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍याकडून बियाणे जतन करुन ठेवण्‍याची कार्यवाही अपेक्षीत ठरणार नाही.  आमच्‍या मते, ज्‍यावेळी बियाण्‍याची तक्रार प्राप्‍त होते, त्‍यावेळी संबंधीत उत्‍पादक कंपनीने तक्रारयुक्‍त बियाणे तात्‍काळ प्रयोगशाळेकडे तपासणीची कार्यवाही करणे गरजेचे ठरते.  

 

17.   मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'साऊथ इस्‍टर्न सीड्स कार्पोरेशन /विरुध्‍द/ आर. शेखर उर्फ श्रीधर', 1 (2008) सी.पी.जे. 158 (एन.सी.) मध्‍ये नमूद निवाडयात असे म्‍हटले आहे की,

 

      Para.5 : A very untenable plea has been taken before us by the learned Counsel for the petitioner that the procedure under section 13 of the Consumer Protection Act, has not been adopted by the lower Fora in getting the seeds tested. We have held in catena of judgments that, a farmer cannot be expected to retain any part of high value seed to get it tested in case of unforeseen contingency like the one we are facing in the case. The learned Counsel for the petitioner was unable to satisfy us as to why the petitioners could not get the seeds tested especially when the lot number (15964) is available on the record. They being the seed producer would always have some quantity of seed left with them and which they could have got tested and brought before us. It is their failure to perform, than has to be held against them.

 

18.   तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने 'इंडिया सीड हाऊस /विरुध्‍द/ रणजीलाल शर्मा व इतर', 2008 सी.टी.जे. 696 (सी.पी.) (एनसीडीआरसी) मध्‍ये नमूद निवाडयात असे म्‍हटले आहे की,

     

      Para. 7 : Secondly, it is not expected from every buyer of the seeds to set apart some quantity of seeds for testing on the presumption that seeds would be defective and he would be called upon to prove the same through laboratory testing. On the other hand a senior officer of the Government had visited the field and inspected the crop and given report under his hand and seal, clearly certifying that the seeds were defective.

­

19.   तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने ''नॅशनल सिड्स कार्पोरेशन लि. /विरुध्/ नेम्मी पती नागी रेड्डी'', 1 (2003) सी.पी.जे. 241 (एन.सी.) या निवाडयामध्ये असे म्हटले आहे की,

 

       Para. 5 : The learned Counsel appearing for the petitioner argues that in order to comply with Section 13 (1) (c) of the Consumer Protection Act, 1986 a sample should have been preserved by the complaint.  We are not at all impressed with this argument.  A farmer buyer seeds at a fairly high costs and the seed bags do not contain any warning that sample out of each bags should be preserved for subsequent decision. 

 

20.       तसेच मा.राष्ट्रीय आयोगाने '' शाम बीज भांडार /विरुध्/ दरिया सिंग'', 1 (2003) सी.पी.जे. 263 (एन.सी.) या निवाडयामध्ये असे म्हटले आहे की,

 

       Para.4 : In similar situation we have held that when there is no residual seed with the cultivator, the requirement of section 13 relating to obtaining a test report from notified Analysis Laboratory cannot be fulfilled.  Firstly, there is no requirement of sale by the petitioner in this case that certain percentage of seed sold should be retained to meet such a contingency.  Seed as a high value item and farmer should not be expected to retain any part.  He sows to the last grain.  Secondly, we fail to appreciate as to what prevented the petitioner from getting the stock of the same batch getting tested from a notified laboratory.  Since the requirement is unimplementable it cannot be enforced and in such circumstances cannot be held against the complainant.

 

21.   तसेच मा.सर्वोच् न्यायालयाने ''मे. महाराष्ट्र हायब्रीड सिड्स कं. लि. /विरुध् / अलवलापतीचंद्रा रेड्डी'', 3 (1998) सी.पी.जे. 8 (एस.सी.) या निवाडयामध्ये शेतक-याने खरेदी केलेले संपूर्ण बियाणे पेरले असल्याची शक्यता असल्यामुळे बियाणे परिक्षणाकरिता पाठविण्याच्या स्थितीत नसतात आणि त्यावेळी बियाणे उत्पादकाने बियाणे प्रयोगशाळेकडे तपासणीस पाठविण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे, असे म्हटले आहे.

 

22.   तसेच मा.राष्‍ट्रीय आयोगाने ''.आय.डी. पॅरी (इं) लि. /विरुध्‍द/ गौरीशंकर व इतर'', 4 (2006) सी.पी.जे. 178 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये बियाणे सदोष व निकृष्‍ठ असल्‍याचे सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार यांनी बियाणे परिक्षणास पाठविले नसल्‍यास तक्रारदाराविरुध्‍द प्रतिकूल अनुमान काढता येणार नाही, असे तत्‍व विषद केलेले आहे.

 

23.   मा.राष्‍ट्रीय आयोगाने ''श्री. रामा एंटरप्रायजेस व इतर /विरुध्‍द/ व्‍यंकट रेड्डी'',      3 (2003) सी.पी.जे. 14 (एन.सी.) या निवाडयामध्‍ये असे म्‍हटले आहे की,

 

      3. The only point argued before us relates to not following the procedure laid down under Section 13(1)(c) of C.P. Act, 1986.

     In similar cases, on similar point being raised by the seed companies, we have held :

       The question of sending seed for testing as per provisions i.e. Section 13(1)(c) as pointed out by the petitioner, has been gone into by us in several cases wherein we have held that this is expensive seed and farmer uses the last grain for use in the field. The farmer is not obliged to keep any part of it foreseeing such a contingency. He purchases the seed on good faith. If any quantity of the same seed was with the petitioner they could have got it tested. It has also not been done. Since, it is not possible to get it tested, Section 13(1)(c) of C.P.A. becomes inapplicable in such a case.”

 

20.   उपरोक्‍त निवाडयातील तत्‍वे पाहता, प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये सूर्यफुल बियाणे सदोष असल्‍याची तक्रार असल्‍यामुळे त्‍याचे परिक्षण करण्‍याची जबाबदारी विरुध्‍द पक्ष यांच्‍यावर असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  त्‍याप्रमाणे बियाण्‍याचे निर्दोषत्‍व सिध्‍द करण्‍यास विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 असमर्थ ठरले आहेत आणि त्‍यांनी अत्‍यावश्‍यक जबाबदारी व कर्तव्‍य पूर्ण केलेले नाही, या मतास आम्‍ही आलो आहोत.

 

21.   वरील सर्व विवेचनावरुन विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदार यांना विक्री केलेले बियाणे दोषयुक्‍त असल्‍याचे सिध्‍द होते आणि तक्रारदार नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र ठरतात. तक्रारदार यांनी मागील हंगामामध्‍ये प्रतिएकर 10 ते 15 पोती पीक घेतल्‍याचे व रु.2,500/- प्रतिक्विंटल दर असल्‍याचे नमूद करुन रु.1,75,000/- उत्‍पन्‍नापासून वंचित रहावे लागल्‍याचे म्‍हटले आहे. तसेच त्‍यांना केवळ रु.7,500/- ते रु.8,000/- उत्‍पन्‍न मिळाल्‍याचे त्‍यांनी कबूल केलेले आहे. तक्रारदार यांनी पिकापासून मिळणारे सरासरी उत्‍पादन व दर या विषयी उचित पुरावा सादर केलेला नाही. त्‍यामुळे आम्‍ही योग्‍य विचाराअंती तक्रारदार हे रु.60,000/- नुकसान भरपाई मिळविण्‍यास पात्र आहेत, या मतास आलो आहोत.

 

22.   शेवटी आम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.

 

आदेश

 

      1. तक्रारदार यांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.

      2. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदार यांना रु.60,000/- नुकसान भरपाई या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावी.

      3. विरुध्‍द पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्‍या प्राप्‍तीपासून तीस दिवसाच्‍या आत द्यावेत.

 

 

 

(सौ. प्रतिभा प्र. ज‍हागिरदार)                               (सौ. संगिता एस. धायगुडे÷)

सदस्‍य                                            अध्‍यक्ष

  जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर.

                    ----00----

(संविक/स्‍व/6111)

 

 

 

 

 

 


[HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Miss Sangeeta S Dhaygude] PRESIDENT