Maharashtra

Dhule

CC/11/255

Mhadu piran Patil At post Sonevade Dhule - Complainant(s)

Versus

krushi udog Bhandar candvad nashik - Opp.Party(s)

k R lohar

30 Oct 2013

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/11/255
 
1. Mhadu piran Patil At post Sonevade Dhule
...........Complainant(s)
Versus
1. krushi udog Bhandar candvad nashik
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MRS. S. S. Jain MEMBER
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.


 

 


 

                                 ग्राहक तक्रार क्रमांक    –  २५५/२०११


 

                                 तक्रार दाखल दिनांक  – ३१/१२/२०११


 

                                तक्रार निकाली दिनांक  – ३०/१०/२०१३


 

 


 

श्री. महादु पिरन पाटील


 

उ.वय – ६५ वर्षे, धंदा – शेती


 

राहणार – मु.पो. सोनेवाडी


 

ता.जि. धुळे ४२५००१                               ------------- तक्रारदार              


 

 


 

        विरुध्‍द


 

 


 

१) कृषी उदयोग भांडार म. प्रोपायटी


 

   मार्केंट यार्ड कॉम्‍लेक्‍स, चांदवड (नासिक)


 

२) अभिजीत सिडस प्रा.लि. म. प्रोप्रायटर


 

   ७/८ कृष्‍णवती अपार्टमेंट मानेक्षव नगर,


 

   काटे लाईन, द्वारका, नासिक.


 

३) म.कृषी विकास अधिकारी सो.


 

   बियाणे समिती, कृषी विभाग


 

   जिल्‍हा परिषद जि. धुळे.                        ------------ सामनेवाला


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

(मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

 (तक्रारदारा तर्फे – वकील श्री.के.आर. लोहार)


 

 (सामनेवाला नं.१ व ३ तर्फे – एकतर्फा)


 

(सामनेवाला नं.२ तर्फे – वकील श्री.एस.पी. कुलकर्णी व श्री.वैभव पुरोहित)


 

निकालपत्र


 


(दवाराः मा.सदस्‍या – सौ.एस.एस.जैन)


 

      सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सदोष बियाण्‍याची विक्री करून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला म्‍हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार या मंचात दाखल केली आहे.


 

 


 

१.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांची मौजे सोनेवाडी ता.जि.धुळे येथे सि.स.नं.३२/अ-१-ब-२अ, क्षेत्रफळ २.१२ हे.आर प्रमाणे शेतजमिन असून ते दरवर्षी शेती करतात. तक्रारदार चांदवड परिसरात कांदयाची मोठी मागणी असल्‍याने तेथे कांदा विक्रीसाठी गेले असता, सामनेवाला नं.१ व २ यांनी केलेल्‍या जाहीरातींनी प्रभावीत होवून त्‍यांनी सामनेवाला नं.१ यांचेकडे जावून भगवा कांदा (Light Red) च्‍या बियाणेची मागणी केली असता, सामनेवाला नं.१ यांनी सामनेवाला नं.२ तर्फे निर्माण बियाणे उत्‍तम व दर्जेदार असून भरपूर उत्‍पन्‍न देणारे असल्‍याबाबत हमी दिली. तसेच पॅकींग वरील ९८% शुध्‍दता असल्‍याचे निदर्शनास आणून दिल्‍याने तक्रारदारने सामनेवाला नं.१ कडून सामनेवाला नं.२ तर्फे निर्मित कांदी (नाशिक गावरान) भगवा कांदा लॉट नं.५४९, ३ मार्च २०११ पावेतो वैधता असेलेले ९८% शुध्‍दता नमुद असलेले कांदा बियाणे प्रत्‍येकी ५०० कि.ग्रॅ. वजनाचे ६ नग रोख रक्‍कम रू.३९००/- अदा करून खेरेदी केले.  


 

 


 

 


 

२.   सदर बियाणाची शेतात ०.४० हे.आर भागात सामनेवाला नं.१ यांनी दिलेल्‍या माहितीनुसार तसेच सामनेवाला नं.२ यांनी बियाणे पॅकिंगवर केलेल्‍या सुचनांना अनुसरून दक्षता घेवून दि.०८/१२/२०१० रोजी लागवड केली. तसेच १०x२६x२६च्‍या प्रत्‍येकी ५० कि.ग्रॅ. च्‍या ५ बॅग आणि १५x१५x१५ च्‍या प्रत्‍येकी ५० कि.ग्रॅ. च्‍या ७ बॅगा अशी खते योग्‍य वेळी दिल्‍यानंतर उत्‍पादन घेण्‍यासाठी कांदे काढले असता सदरचे उगवलेले कांदे हे गडद लाल रंगाचे, दुर्गन्‍धी युक्‍त व सडलेले निघून आले. त्‍यामुळे तक्रारदारचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. याबाबत पंचायत समिती व कृषि विकास अधिकारी यांचेकडे तक्रार दाखल केली असता दि.०८/०७/२०११ रोजीची दि. १५/०७/२०११ रोजी चौकशीस उपस्थित राहण्‍याबाबतची जिल्‍हा परिषद धुळे यांची नोटीस प्राप्‍त झाली. त्‍यानुसार तक्रारदार हे हजर झाले परंतु सामनेवाला नं.१ व २ हे गैरहजर होते. यावेळी जिल्‍हा स्‍तरीय पदाधिकारी व सदस्‍यांनी सदर कांदा पाहणी,निरीक्षण करून पंचनामा व अहवाल केला. त्‍यानुसार फक्‍त ७% भगवा कांदा व ९३% लाल कांदा आढळून आला.


 

 


 

 


 

३.   तक्रारदार यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी लागवड केलेल्‍या क्षेत्रावर १०० टन पर्यंत उत्‍पन्‍न अपेक्षीत होते. बाजारभावाप्रमाणे रू.१,००,०००/- चे नुकसान सामनेवाला यांनी भेसळयुक्‍त, सदोष बियाणे विक्री केल्‍याने आलेले आहे. याबाबत सामनेवाला नं.१ व २ यांना रजिस्‍टर नोटीस पाठविली असता, त्‍यांनी खोटे नोटीस उत्‍तर पाठवून जबाबदारी नाकारलेली आहे व नोटीसीप्रमाणे पुर्तता केलेली नाही.


 

 


 

 


 

४.   तक्रारदार यांनी शेवटी सामनेवाला यांचेकडून बियाणे उत्‍पन्‍नाचे नुकसानीपोटी रू.१,००,०००/-, सदरचे पिक घेण्‍यासाठी आलेला खर्च रू..५०,५००/- तसेच मानसिक, आर्थिक, शारिरिक त्रासापोटी रू.५०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.५०००/- ची मागणी केली आहे.


 

 


 

 


 

५.  तक्रारदार यांनी आपले महणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.२ वर शपथपत्र, नि.४ सोबत नि.४/१ वर ७/१२ उतारा, नि.४/२ वर बियाणे खरेदी पावती, नि.४/३ वर तक्रारी अर्ज, नि.४/४ वर चौकशी नोटीस, नि.४/५ वर पिक पंचनामा, नि.४/६ वर पिकपाहणी अहवाल, नि.४/७ वर साक्ष, नि.४/८ वर बियाणे पाकीट, नि.४/९ वर सडक्‍या कांदयाचे फोटो, नि.४/१० वर सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, नि.४/११ वर सामनेवाला नं.१ चे नोटीस उत्‍तर, नि.४/१२ वर सामनेवाला नं.२ यांचे नोटीस उत्‍तर तसेच नि.१० सोबत कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीची दर पावती, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.


 

 


 

 


 

६.   सामनेवाला नं.२ यांनी आपला खुलासा नि.६ वर दाखल केला आहे. त्‍यात त्‍यांनी तक्रारदारने सामनेवाला नं.२ यांचे अधिकृत विक्रेते सामनेवाला नं.२ यांच्‍याकडून कोणत्‍याही स्‍वरूपाचा माल (बियाणे) कधीही खरेदी केलेले नाहीत. त्‍यामुळे तक्रारदार सामनेवाला नं.१ व २ यांचे ग्राहक नाहीत.


 

 


 

७.   तक्रारदारने स्‍वतःचे शेतीमध्‍ये कशाप्रकारे व कोणत्‍या बियाण्‍यांची लागवड केली याची माहिती नाही. त्‍याचप्रमाणे खतांचा वापर कशाप्रकारे केला, पिकाची काळजी कशी घेतली, याबाबत माहिती नाही. तक्रारदारच्‍या झालेल्‍या नुकसानी संदर्भात सामनेवाला नं.२ यांचा कोणताही संबंध नाही. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक नसल्‍याने कृषि विकास अधिकारी यांच्‍या चौकशी वेळी हजर राहण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.


 

 


 

 


 

८.   सामनेवाला यांचे पुढे असे म्‍हणणे आहे की, कांदे सडण्‍याचे कारणे वेगवेगळी आहेत, त्‍याचा बियाण्‍यांच्‍या प्रतींशी कोणताही संबंध नाही. कांदयाचे पिक तयार झाल्‍यानंतर योग्‍य वेळेत न काढल्‍यास व पाण्‍याचे प्रमाण जास्‍त दिल्‍यास कांदयाचे पिक सडण्‍याची दाट शक्‍यता असते. त्‍यामुळे नुकसानीस सामनेवाला जबाबदार नाही. सामनेवाला कधीही भेसळयुक्‍त, सदोष बियाणे उत्‍पादने तयार करीत नाहीत. तक्रारदारने खोटी तक्रार दाखल केली असल्‍याने ती रद्द होण्‍यास पात्र आहे. तसेच सामनेवाला यांना खर्चास व त्रासास भाग पाडल्‍याने खर्च रक्‍कम देण्‍यास तक्रारदार पात्र आहे असे नमुद केले आहे.


 

 


 

 


 

९.   सामनेवाला नं.२ यांनी आपले म्‍हणण्‍याच्‍या पृष्‍टयार्थ नि.७ वर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.


 

 


 

 


 

१०. सामनेवाला नं.१ व ३ हे नोटीस मिळूनही हजर न झालेने, त्‍यांचे विरूध्‍द एकतर्फा आदेश पारित करण्‍यात आला आहे.


 

 


 

११. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचा खुलासा, वकिलांचा युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर व दाखल कागदपत्रे पाहता आमच्‍यासमोर निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍याची उत्‍तरे आम्‍ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.


 

 


 

          मुद्दे                                      निष्‍कर्ष


 

१.    तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ?               होय


 

२.     सामनेवाला यांनी तक्रारदारास भेसळयुक्‍त (सदोष)


 

बियाणे दिल्‍याचे सिध्‍द आहे काय ?                   होय  


 

३.     तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्‍यास पात्र आहे?    अंतिम आदेशाप्रमाणे 


 

४.     आदेश काय ?                                   खालीलप्रमाणे


 

विवेचन



 

१२. मुद्दा क्र.१-  सामनेवाला नं.२ यांनी आपल्‍या खुलाश्‍यात तक्रारदार यांनी त्‍यांचे अधिकृत विक्रेते सामनेवाला नं.१ यांचेकडून कोणत्‍याही स्‍वरूपाचा माल खरेदी केलेला नसल्‍याने तक्रारदार सामनेवाला नं.१ व २ यांचे ग्राहक नव्‍हते व नाही असे नमुद केले आहे. याबाबत तक्रारदार यांनी नि.४/२ वर बियाणे खरेदी केल्‍याची पावती दाखल केलेली आहे. आम्‍ही सदर पावतीचे अवलोकन केले आहे. त्‍यावर तक्रारदारचे नाव नमुद आहे. तसेच नि.५/८ वर बियाणे पाकीट दाखल केले आहे. सदर पाकीट सामनेवाला न.२ यांच्‍या नावाचे आहे. यावरून तक्रारदार हे सामनेवाला नं.१ व २ यांचे ग्राहक आहेत हया मतास आम्‍ही आलो आहोत. म्‍हणून मुदृा क्र.१ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहेात.    


 

 


 

 


 

१३. मुद्दा क्र.२- तक्रारदार यांची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍यांनी सामनेवाला नं.१ यांचेकडून सामनेवाला नं.२ तर्फे निर्मित कांदा (नाशिक गावरान) भगवा कांदा लॉट नं.५४९ हे बियाणे खरेदी केले व त्‍याची आपल्‍या शेतात पेरणी केली. सदर बियाण्‍यांची पेरणी केल्‍यानंतर त्‍यांची योग्‍य मशागत करून, योग्‍य प्रमाणात खते देवूनही कांदे गडद लाल रंगाचे, दुर्गन्‍धी युक्‍त व सडलेले निघाले. सदर म्‍हणणे सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारदार यांनी नि.२ वर स्‍वतःचे शपथपत्र, नि.४/५ वर जिल्‍हा बियाणे समितीने केलेल्‍या पंचनाम्‍याची प्रत, नि.४/६ वर पाहणी अहवाल, नि.४/९ वर फोटो, इत्‍यादी कागदपत्रे दाखल केले आहेत. या संदर्भात जिल्‍हास्‍तरीय बियाणे तक्रार निवारण समितीने केलेला पिक परिस्थितीचा पंचनामा पाहणे आवश्‍यक वाटते. सदर पंचनामा नि.४/५ वर दाखल आहे. त्‍यात कांदा बियाणेचा रॅन्‍डम पध्‍दतीने निरीक्षणे घेतली असता साठवणूक केलेल्‍या कांदयांमध्‍ये ७% भगवा रंगाची कांदे आढळून आली व ९३% लाल रंगाची कांदे आढळून आली. कांदाचाळी मध्‍ये मोठया प्रमाणावर सडलेला कांदा आढळून आला. यावरून शेतक-यास तक्रारीत प्रभागामध्‍ये ९३% भेसळयुक्‍त (इतर वाणाची) कांदे आढळून आली. पर्यायाने सदर कांदयाची साठवणूक क्षमता कमी असल्‍यामुळे शेतक-याचे आर्थिक नुकसान झाले असल्‍याचे समितीचे मत आहे. असे नमुद आहे.


 

 


 

१४. वरील विवेचन, तक्रारदार यांचा युकतीवाद व सामनेवाला यांचा खुलासा याचा विचार करता बियाण्‍यात दोष नाही हे सिध्‍द करण्‍यासाठी सामनेवाला नं.२ यांनी ग्राहक संरक्षण कायदयातील कलम १३ अन्‍वये वादातीत बॅचच्‍या बियाण्‍याचे सॅम्‍पल प्रयोगशाळेत पाठवून त्‍याबाबतचा अहवाल मागवणे आवश्‍यक होते. परंतु सामनेवाला यांनी या तक्रारीत असे काहीही केलेले नाही. तसेच सदर लॉटचे बियाणे बाजारात विक्रीकरता आणण्‍यापूर्वी सिडस् अॅक्‍ट १९६९ व सिडस् नियम १९६६ नुसार भारत सरकारने जारी केलेल्‍या नियमाप्रमाणे बियाण्‍याचे वाणाचे परिक्षणकरून बियाणे तज्ञ अधिका-यांचा अहवाल ही दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला यांच्‍या खुलाश्‍यातील हरकती मान्‍य करता येणार नाही. यावरून सामनेवाला यांनी तक्रारदारास भेसळयुक्‍त कांदा बियाणे दिल्‍याने भगवा कांदयाचे पूर्ण पीक अपेक्षीत असतांना ९३% पिक लाल कांदयाचे व तेही सडलेल्‍या स्थितीत आल्‍याने तक्रारदारचे नुकसान झाल्‍याचे सिध्‍द होत आहे.  या मतास आम्‍ही आलो आहोत.


 

 


 

 


 

१५.   या संदर्भात आम्‍ही पुढील वरिष्‍ठ कोर्टाच्‍या न्‍यायनिवाडयाचा आधार घेत आहोत.


 

 


 

II (2008) CPJ 165 (NC) Ankur Seeds Pvt. Ltd. V/s. Kondabrolu Hasan Rao & Ors.  यामध्‍ये असे मत व्‍यक्‍त केले आहे की,


 

 


 

Seeds – Defective growth of plants noticed-3-4 different type of plants observed – Report of Horticulture Officer. Produced in support – No expert report produced to counter report of Horticulture officer – Complaint allowed by forum- order upheld in appeal – Hence Revision –Quantum of compensation awarded by Forum, reasonable, upheld – Revision dismissed.


 

 


 

 


 

१६. वरील वि‍वेचनावरून व सर्व कारणांचा विचार करता, तसेच सामनेवाला यांनी प्रयोगशाळेचा अहवाल दाखल न केल्‍याने व जिल्‍हा समिती बियाणे समितीचा पंचनामा पाहता बियाणे भेसळयुक्‍त (सदोष) आहेत ही बाब स्‍पष्‍टपणे शाबित होत आहे असे आम्‍हांस वाटते. म्‍हणून मुद्दा क्रं.२ चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.


 

 


 

१७. मुद्दा क्र.३- तक्रारदार यांनी नुकसान भरपाईपोटी रू..१,००,०००/- पिक घेण्‍यासाठी आलेल्‍या खर्चापोटी रू.५०,५००/- तसेच आर्थिक, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रू.५०,०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू..५०००/- ची मागणी केली आहे. या बाबतीत विचार करता तक्रारदार यांनी तक्रारीत १०० टनापर्यंत उत्‍पन्‍न अपेक्षीत होते असे नमुद, केलेले आहे. परंतु तक्रारदारने यापूर्वी त्‍याला किती उत्‍पन्‍न मिळाले होते याबाबत पुरावा दाखल केलेला नाही. धुळे जिल्‍हयातील जमीन व वातावरण यांचा विचार करता एक एकराला किमान ५ टन कांदयाचे उत्‍पन्‍न अपेक्षीत आहे. तक्रारदारने नि.१० सोबत सन २०११ सालच्‍या कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या बाजार भावाचा तपशील दाखल केलेला आहे. सदर पावतीवर १ क्विंटलचा भाव रू.७३६/- याप्रमाणे गृहीत धरून ५० क्विंटलचे (५ टनाचे) रू.३६,८००/- व त्‍यावर तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो, द.सा.द.शे. ९% दराने व्‍याज सामनेवाला नं.१ व २ यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे. तसेच मानसिक त्रासापोटी भरपाई म्‍हणून रू.२०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.१०००/- सामनेवाला नं.१ व २ यांचेकडून मिळण्‍यास तक्रारदार पात्र आहे. तक्रारदार यांनी पिक खर्चापोटी रू.५०,५००/- ची मागणी केलेली आहे. परंतु सदर खर्चाबाबत तक्रारदारने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नसल्‍याने अंदाजे रक्‍कम देणे योग्‍य होईल असे आम्‍हांस  वाटते. तक्रारदार हे बियाणे खरेदीची रककम रू.३९००/- + इतर खर्च (खते, तननाशक, नांगरणी, लावणी, निंदणी, ट्रॅक्‍टर भाडे, इत्‍यादीसाठी आलेला खर्च) रू.१०,०००/- असे एकूण रू.१३,९००/- पिक खर्चापोटी मिळण्‍यास पात्र आहे असे आम्‍हांस वाटते.  तसेच सामनेवाला नं.३ हे शासकिय अधिकारी आहे. त्‍यांचा बियाणे उत्‍पादन व विक्री संदर्भात संबंध येत नसल्‍याने त्‍यांचे विरूध्‍द रक्‍कम देण्‍याचा आदेश करता येणार नाही.


 

 


 

१८. मुद्दा क्र.४- वरील सर्व विवेचनावरूनआम्‍ही खालीलप्रमाणे आदेश देत आहेात.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

आ दे श


 

 


 

१.         सामनेवाला नं.१ व २ यांनी तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्‍हणून रककम रू.३६,८००/- या आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाच्‍या आत वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावेत. तसेच सदर रकमेवर तक्रार दाखल तारीख दि.३१/१२/११ पासून संपूर्ण रक्‍कम फिटेपावेतो द.सा.द.शे. ६% दराने व्‍याज अदा करावे.


 

 


 

२.          सामनेवाला नं.१ व २ यांनी तक्रारदार यांनापिक खर्चापोटी रू.१३,९००/- या आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाच्‍या आत वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावेत.


 

 


 

३.          सामनेवाला नं.१ व २ यांनी मानसिक त्रासापोटी म्‍हणून रक्‍कम रू.२०००/- व तक्रारीचा खर्च रू.१०००/- या आदेशाच्‍या दिनांकापासून ३० दिवसाच्‍या आत वैयक्‍तीक व संयुक्‍तीकरित्‍या अदा करावेत.


 

 


 

 


 

धुळे.


 

दि.३०/१०/२०१३.


 

 


 

           (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.एस.एस. जैन)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                सदस्‍य           सदस्‍या            अध्‍यक्षा


 

                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. S. S. Jain]
MEMBER
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.