// जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, अमरावती //
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
दाखल दिनांक : 05/11/2014
निर्णय दिनांक : 06/05/2015
नामदेव दादुजी राठोड
वय 45 वर्षे, धंदा – शेतकरी
रा. बोडना तपनेश्वर, पो. पोहरा बंदी
ता.जि. अमरावती. : तक्रारकर्ता
// विरुध्द //
- कृषि समृध्दी तर्फे प्रोप्रा.
कॉटन मार्केट रोड, अमरावती
- महाबीज सिडस्
महाराष्ट्र स्टेट सीडस् कार्पोरेशन लि.
महाबिज भवन, कृषि नगर,
अकोला जि. अकोला : विरुध्दपक्ष
गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. ए. पुरोहीत
विरुध्दपक्ष 1 तर्फे : अॅड. आर. कलंत्री
विरुध्दपक्ष 2 तर्फे : अॅड. ठाकरे
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..2..
: : न्यायनिणर्य : :
(पारित दिनांक 06/05/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्य ः
1. तक्रारदाराने सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे विरुध्दपक्षा विरुध्द दाखल केली आहे.
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, त्यांनी दि. १६.६.२०१४ रोजी सोयाबीन बियाणेच्या 4 बॅंग विरुध्दपक्ष क्र. 1 कडून लॉट क्र.१३-३-३८०६-जी०११२ एकंदर रु. ९५४०/-, पावती क्र.८२४८ व ८२४६ नुसार विकत घेतल्या. तक्रारदाराने वरील बियाणे दि. १८.७.२०१४ रोजी त्यांचे शेतात सर्व्हे नं. १९४ व २४३ मौजे बोडना येथे पेरणी केली.
3. काही दिवसानंतर तक्रारदाराने शेताची पाहणी केली असता विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विकत घेतलेले बियाणे खराब असल्यामुळे त्यांची उगवण झाली नाही. तक्रारदाराने नंतर तालुका कृषि अधिकारी अमरावती यांचेकडे लेखी तक्रार नोंदविली त्यानुसार दि. २८.७२०१४ रोजी कृषि अधिका-यांच्या चमुने तक्रारदाराच्या शेताचे सर्व्हेक्षण करुन खराब असलेल्या बियाण्याच्या उगवण शक्तीमुळे झालेल्या नुकसान विषयी अहवाल सादर केला. नंतर
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..3..
तक्रारदाराने दि. ९.९.२००४ रोजी विरुध्दपक्षाला कायदेशीर नोटीस पाठवून झालेल्या नुकसान भरपाईची मागणी केली परंतु विरुध्दपक्षाने सदर नोटीस मिळुन सुध्दा नुकसान भरपाई देण्याविषयी काहीही कार्यवाही केली नाही, म्हणुन शेवटी तक्रारदाराने सदर तक्रार वि. मंचात दाखल करुन प्रार्थना केली की, विरुध्दपक्षाने केलेल्या सेवेतील त्रुटीमुळे नुकसान भरपाई म्हणुन बियाणे किंमत रु. ९५४०/- व आर्थिक नुकसान रु. २०००००/- तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई रु. १०००००/- व तक्रार खर्च रु. १५०००- विरुध्दपक्षाकडून मिळण्यात यावा अशी विनंती केली. तक्रारकर्ताने तक्रारीसोबत निशाणी 2 प्रमाणे दस्तऐवज 1 ते 10 दाखल केले.
4. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी निशाणी 14 प्रमाणे लेखी जबाब सादर करुन परिच्छेद क्र. 1, 2 व 3 मधील म्हणणे मान्य करुन परिच्छेद क्र. 4 अमान्य केला आहे. परिच्छेद क्र. 5 हा माहिती अभावी अमान्य करण्यात येऊन कृषि अधिका-यांच्या निरीक्षणाच्या वेळी विरुध्दपक्षाला कळविले नव्हते. तसेच तक्रारदाराचे आर्थिक नुकसान झाल्याचे अमान्य करुन परिच्छेद 6,7,11,12 मधील म्हणणे अमान्य करुन परिच्छेद 8,9,10 विषयी काहीही वाद नसल्याचे म्हटले.
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..4..
5. विरुध्दपक्ष क्र. 1 ने पुढे अतिरिक्त जबाबात नमुद केले की, ते स्वतः तक्रारदाराला विकलेल्या बियाण्याचे उत्पादक नसुन, विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर बियाण्याचा पुरवठा विरुध्दपक्ष क्र. 1 ला केला आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 हे त्यासाठी एकटे जबाबदार राहू शकत नाही. तसेच तक्रारदाराच्या तक्रारी मध्ये बियाणे विकत घेतल्याच्या बॅग मधील लॉट मध्ये बरीच तफावत असुन त्यामुळे कोणत्या बॅग मधील बियाणे खराब होते हे समजणे कठीण आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर बियाणेची उगवण शक्ती ही 70 टक्के दर्शविली होती, त्यामुळे कृषि अहवाल 75 टक्के नुकसानीचा चुकीचा व खोटा आहे. तसेच तक्रारदाराने सादर केलेल्या पावती नं. ८२४८ वरील लॉट क्र. ४०४९ चे बियाणे हे खराब नव्हते तसेच इतर ब-याच शेतक-यांनी लॉट क्र. ४०४९ चे बियाणे विकत घेऊन त्यांचे शेतात पेरले असता ते चांगले उगवले व तक्रारदाराला सोडून इतर कोणाचीही तक्रार नाही. तसेच तक्रारदाराने बियाण्याची पेरणी करतांना कंपनीच्या व शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीचे पालन केले नाही, त्यामुळे तक्रारदाराच्या शेतात उगवण शक्ती कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्यासाठी तक्रारदारहे स्वतः जबाबदार असुन, सदर तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्याची विनंती वि. मंचासमोर केली आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..5..
6. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी निशाणी 17 प्रमाणे लेखी जबाब सादर करुन परिच्छेद क्र. 1 व 3 हे माहिती अभावी अमान्य करण्यात येऊन, इतर परिच्छेद व तक्रारदाराच्या वकीलांनी पाठविलेल्या नोटीस मधील पावती व लॉट मध्ये बरीच तफावत आहे. सदर बॅग वर बियाणे उत्तम असल्याचे नमुद केले आहे.
7. परिच्छेद 5 हा रेकॉर्डचा एक भाग असल्यामुळे व तक्रारदाराने विकत घेतलेले व पेरलेल्या बियाणेच्या लॉट मध्ये तफावत आढळल्यामुळे सदर कृषि निरीक्षण अहवाल हा विरुध्दपक्षाला लागु होत नाही. तक्रारदाराचे इतर परिच्छेद 6,7,9,10 ते 14 मधील म्हणणे विरुध्दपक्ष क्र. 2 ने अमान्य करुन परिच्छेद क्र. 8 हा वादग्रस्त नाही व पुढे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्र. 2 ने सदर बियाणे बाजारात विकण्यापुर्वी सीड सर्टीफीकेट एजंसी अकोला तर्फे तांत्रीक दृष्टया तपासणी करण्यात आली व अशा वेळी सदर एजंसीला तक्रारीमध्ये पार्टी करणे आवश्यक होते. तसेच सदर बियाणे पेरण्यापुर्वी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे जे पालन करणे जरुरी होते ते तक्रारदारातर्फे करण्यात आले नाही व पुरेशा पर्जन्यमाना अगोदरच पेरणी केल्यामुळे तक्रारदाराच्या बियाणेचे उगवण शक्ती कमी राहिल्यामुळे तक्रारदाराने हे स्वतः त्यास जबाबदार आहेत त्यामुळे
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..6..
तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार खोटी असुन विरुध्दपक्ष क्र. 2 ची बदनामी करणारी असल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्याची विनंती वि. मंचासमोर केली.
8. विरुध्दपक्ष क्र. 2 ने निशाणी 18 प्रमाणे दस्त 1 ते 10 दाखल केले.
9. तक्रारदारातर्फे अॅड. पुरोहीत यांनी निशाणी 19 प्रमाणे सिव्हील प्रोसीजर कोड आदेश 6 नियम 17 अनुसार अर्ज सादर करुन त्यांच्या मुळ अर्जात काही सुधारणा करण्याची विनंती केली. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 तर्फे त्या अर्जावर आक्षेप नोंदवुन दि. ४.२.२०१५ रोजी वि. मंचाने सदर अर्ज रद्द करण्यात आल्याचा आदेश पारीत केला.
10. तक्रारदाराने निशाणी 22 प्रमाणे प्रतीउत्तर दाखल करुन, त्यांच्या मुळ अर्जातील वक्तव्याचा पुर्नउल्लेख करुन म्हटले की, विरुध्दपक्ष क्र. 1 ने त्यांच्या मुळ पावती क्र. ८२४८ वर चुकीचा लॉट नंबर दर्शविला. सदर बॅग विरुध्दपक्षावर विश्वास दर्शवुन तक्रारदाराने विकत घेतल्या. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारा सोबत विश्वासघात करुन पावतीवर चुकीचा लॉट नंबर दर्शविला. तसेच कृषि अधिका-यांच्या कमिटीला तक्रारदाराने वास्तविक खाली बॅग दाखविल्या व खरा लॉट नं. Oct 13-3-3806-
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..7..
4002 असल्याचे सांगितले व त्यानुसारच त्या कमीटीने निरीक्षण अहवाला दिला.
11. सदर बियाणे विकत घेतांना विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी ते खात्रीशीर, योग्य व चांगले बियाणे असल्याची खात्री दिली होती. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांच्या अतिरिक्त जबाब नाकबुल करुन तक्रारदाराने घेतलेले बियाणे खराब व अयोग्य असल्यामुळे तक्रारदार हा प्रार्थनेतील विनंतीप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे. त्यामुळे तक्रार अर्ज मंजूर करण्याची विनंती वि. मंचाकडे केली. तक्रारदाराने निशाणी 24 प्रमाणे अतिरिक्त 4 दस्त सादर केले.
12. तक्रारकर्ताची तक्रार व दाखल केलेले दस्ताऐवज, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा लेखी जबाब, दाखल असलेले कागदपत्र तसेच तक्रारदाराचे प्रतिउत्तर व अतिरिक्त कागदपत्र, तक्रारदाराच्या वकीलांचा व विरुध्दपक्षाच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद, यावरुन खालील मुद्दे विचारात घेण्यात आली.
मुद्दे उत्तर
- तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 ने निर्मीत
केलेले व विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विकत
घेतलेले बियाणे अयोग्य व खराब होते
हे सिध्द केले काय ? ... नाही
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..8..
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने सेवेत त्रुटी
केल्या आहेत का ? ... नाही
- तक्रारदार हा नुकसान भरपाई मिळण्यास
पात्र आहे का ? ... नाही
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
13. तक्रारदारा तर्फे अॅड. पुरोहीत यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात तक्रारी मधील व प्रतिउत्तरातील नमुद केलेल्या वक्तव्याचा पुर्नउच्चार करुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने बिलावर चुकीचे लॉट नंबर दर्शविल्याचे विधानावर अधिक जोर दिला तसेच बियाणे शेतात पेरतांना शासनाच्या मार्गदर्शक तत्वाचे पुर्णपणे पालन केल्याचे म्हटले. म्हणुन कृषि अधिका-यांच्या अहवाला प्रमाणे तक्रारदाराला नुकसान भरपाई मिळण्यास पात्र असल्यामुळे, तक्रार अर्जा प्रमाणे प्रार्थना मान्य करण्याची विनंती वि. मंचाकडे केली.
14. विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे अॅड. आर. कलंत्री यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन, तक्रारदाराने त्यांच्या शेतात कोणते बियाणे कोणत्या क्षेत्रात पेरले व कृषि अधिका-यांनी कोणत्या क्षेत्राचा अहवाल दिला व सदर निरीक्षणाच्या वेळी विरुध्दपक्ष क्र. 1 ला का
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..9..
कळविले नाही असे काही प्रश्न उपस्थित करुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला विकलेल्या बियाण्याचाच लॉट नंबर बिलावर नमुद केला. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदर बियाणे विरुध्दपक्ष क्र. 2 ने निर्मीत केलेले तक्रारदाराला विकले त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 वर त्याची जबाबदारी येत नाही म्हणून तक्रारदाराचा अर्ज खर्चासह रद्द करण्याची विनंती केली.
15. विरुध्दपक्ष क्र. 2 तर्फे अॅड. ठाकरे यांनी त्यांच्या तोंडी युक्तीवादात त्यांच्या लेखी जबाबातील वक्तव्याचा पुर्नरुच्चार करुन म्हटले की, बियाणेची पेरणी करतांना तक्रारदाराने शासन मार्गदर्शक तत्वाचे पालन केले नाही. हयासाठी सादर केलेले दस्त 8 चा आधार घेऊन, पेरणी करतांना पर्जन्यमानची स्थिती लक्षात घेतली नाही. पेरणीचे क्षेत्र व 7/12 जुळत नाही. कृषि अधिकारी निरीक्षणाचे वेळी उपस्थितांचे नांवे नमुद केले नाही, पेरणीच्या दुस-याच दिवशी अर्ज केला, नंतर 6 दिवसांनी दुसरा अर्ज असे बरेच मुद्दे उपस्थित करुन त्यांनी सदर बियाणाचा मुक्तता अहवाल सादर केला व ते बाजारात विकण्यापुर्वी सक्षम अशा प्रयोग शाळेतून तपासुन घेण्यात आले होते. अशा प्रकारे सदर तक्रार ही आधारहीन व खोटी असून खर्चासह रद्द होण्यास पात्र आहे.
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..10..
16. मुद्दा क्र. 1 चा विचार करता, तक्रारदाराने दाखल केलेले दस्त 2(1), 2/2 प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 कडून महाबिज कंपनीचे लॉट क्र.४०४९ च्या 4 बॅग खरेदी केल्याचे दिसुन येते व त्याच दस्ताप्रमाणे इतर कंपनीचे पण 4 बॅग खरेदी केल्याचे दिसते. परंतु तक्रारदाराने लॉट क्रमांक ४००२ चे विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मीत खरेदी केल्याचे त्यांचे तक्रार अर्जात आहे व लॉट क्र. ४००२ चीच पेरणी तक्रारदाराने शेतात २४३/१ व १९४ हया सर्व्हे नंबर मौजे बोदना येथे केल्याचे म्हटले. कृषि तज्ञांचा अहवाल दस्त 2/3 चे अवलोकन केले असता, त्यावर कॉलम नं. 7 वर बिला प्रमाणे लॉट क्र. ४०४९ नमुद करुन कॉलम 14 वर लॉट क्र. ४००२ नमुद केला आहे व सर्व्हेक्षण पण ४००२ लॉट क्रमांकाचे केले आहे. तक्रारदाराने दस्त निशाणी 24/1 ते 4 प्रमाणे त्यांचे शेतात लॉट क्र. ४००२ चे बियाणे पेरल्याचे दिसुन येते. परंतु सदर ४००२ लॉट क्रमांकाचे बियाणे तक्रारदाराने कोणत्या विक्रेत्याकडून कोणत्या कंपनीचे घेतले हे सिध्द करण्यासाठी कोणताही कागदोपत्री पुरावा सादर केला नाही.
17. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी जबाबात म्हटले की, तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 2 निर्मीती केलेले सोयाबीन बिज हे लॉट नं. ४०४९ चे सादर केलेल्या पावती प्रमाणे
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..11..
विकत घेतले. तक्रारदाराने ४००२ लॉट क्रमांकाचे बिज विरुध्दपक्ष क्र. 1 कडून विकत घेतल्याचे दोन्ही विरुध्दपक्षांनी त्यांच्या लेखी जबाबात नाकारले. निशाणी 19 प्रमाणे तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडून घेतलेल्या सोयाबीन बियाणेच्या लॉट क्रमांकामध्ये दुरुस्ती करण्याचा अर्ज दिला. परंतु वि. मंचाने सदर अर्ज नामंजूर केल्यामुळे, तक्रारदाराने लॉट क्रमांक ४००२ चे बियाणे विरुध्दपक्षाकडून विकत घेतल्याचे सिध्द होऊ शकत नाही व तक्रारदाराची लॉट क्र. ४०४९ विषयी काहीही तक्रार नाही. तसेच कृषि अधिका-यांचे चमुने पण ४०४९ सोयाबीन बियाणेचे चाचणी केली नसुन ती फक्त ४००२ लॉट क्रमांकच्या बियाण्याची चाचणी केली. वरील सर्व विवेचन व विरुध्दपक्षाच्या वकीलांचा युक्तीवाद ग्राहय धरण्यात येऊन मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
18. मुद्दा क्र. 2 व 3 चा विचार करता, ज्याअर्थी तक्रारदाराने लॉट क्र. ४००२ चे बियाणे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचे कडून विकत घेतल्याचे सिध्द होऊ शकले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून सेवेत त्रुटी झाल्याचे म्हणता येणार नाही. त्यामुळे तक्रारदार हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 कडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून मुद्दा
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2014
..12..
क्र. 2 व 3 ला पण नकारार्थी उत्तर देण्यात येते. व खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज खारीज करण्यात येतो.
- खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 06/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष