जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 25/2012 तक्रार दाखल तारीख – 16/02/2012
निकाल तारीख - 26/03/2015
कालावधी - 03 वर्ष , 01 महिने, 10 दिवस.
1) श्रीमती सरीता रामहरी भोंग,
वय – 28 वर्ष, धंदा – घरकाम,
2) रवि रामहरी भोंग,
वय – 09 वर्ष, धंदा- शिक्षण,
3) रितेश रामहरी भोंग,
वय – 06 वर्षे, धंदा- शिक्षण,
4) सायली रामहरी भोंग,
वय – 05 वर्ष, धंदा – शिक्षण,
अर्जदार नं. 2 ते 4 अ पा क नं 1
सर्व रा. तांदुळजा ता. जि. लातूर. ....अर्जदार
विरुध्द
1) कृषी अधिकारी,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय,
लातूर.
2) मा. जिल्हा कृषी अधिकारी,
जिल्हाधिकारी कार्यालय,
लातूर.
3) डेक्कन इन्शुरन्स व रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.,
एल स्ववेअर ऑफिस नं 13,
तिसरा मजला, सांघवी नगर, परिहार चौक,
औंध, पुणे – 411 007.
4) दि न्यु इंडिया अॅशूरन्स कंपनी लिमिटेड.,
मंडल कार्यालय 153400, पहिला मजला
स्वातंत्र्यवीर सावरकर उदयोग भवन,
शिवाजी नगर, पुणे 411005.
5) शाखा अधिकारी,
दि न्यु इंडिया अॅशूरन्स कंपनी लिमिटेड,
चंद्र नगर लातूर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. एस.एस.रांदड.
गैरअर्जदार क्र. 4 व 5 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवान.
निकालपत्र
(घोषीत द्वारा –श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा,)
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार हे मयत रामहरी दगडू भोंग यांची कायदेशीर पत्नी आहे. मयत रामहरी दगडू भोंग यास मौजे तांदुळजा ता. जि. लातूर येथील गट नं. 341 मध्ये 60 आर जमीन आहे. शासनाने प्रत्येक शेतक-याचा विमा गैरअर्जदार क्र. 4 कडे काढलेला आहे. ( मयत रामहरी दगडू भोंग हे दिनांक 17/05/2011 रोजी संध्याकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात विहिरीवरील इलेक्ट्रीक बोर्डात हात घालून मोटार चालू करीत असताना त्यास लाईटचा शॉक लागून हा खाली जमीनीवर पडला ) व जोरात ओरडल्याने शेजारच्या शेतात असलेले लोक जमले व त्या एस आर टी आर मेडीकल कॉलेज व हॉस्पीटल अंबाजोगाई येथे उपचारासाठी शरीक करण्यात आले. त्यावेळी डॉक्टरानी रामहरी दगडू भोंग हा मयत झाल्याचे सांगितले. सदर घटनेची नोंद मुरुड ता.जि. लातूर येथे करण्यात आली. त्यानंतर अर्जदाराने सर्व कागदपत्रांची पर्तता करुन प्रस्ताव तयार करुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे पाठवला. परंतु त्यांनी अर्जदारास रक्कम दिली नाही. म्हणून गैरअर्जदारानी आजपर्यंत कोणतेही उत्तर अर्जदाराला दिलेले नसल्यामुळे त्यांनी अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून अर्जदारास गैरअर्जदारानी रु. 1,00,000/- व द.सा.द.शे 18 टक्के व्याजाने दयावेत. मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु. 10,000/- व व्याजाची रक्कम रु. 7,000/- असे एकूण 1,17,000/- देण्यात यावेत. व अर्जाच्या खर्चापोटी रु. 2,000/- देण्यात यावेत.
तक्रारदाराने तक्रारी सोबत पोलीस निरीक्षक मुरुड यांना दिलेला अर्ज, घटनास्थळ पंचनामा, आकस्मिक मृत्यूची खबर, मरणोत्तर पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, मृत्यूप्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, सात बारा,कायदेशरील नोटीस, पोस्टाच्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
दि. 03/12/2014 रोजी अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 3 ला पार्टी केले व त्यांची नोटीस दि. 27/01/2015 रोजी प्राप्त झाली. परंतु आजपर्यंत डेक्कन इन्शुरंन्स कडुन सदरच्या प्रस्तावाबाबत काही म्हणणे आलेले नाही.
गैरअर्जदार क्र. 4 चे म्हणणे सदर केसमध्ये आलेले असून ते अर्जदाराने गैरअर्जदार क्र. 1 कडे कोणतेही तक्रार अर्ज न देता न्यायमंचात सदरचा क्लेम दाखल केलेला असून तो प्रथमावस्थेत आहे. गैरअर्जदाराने पॉलिसी पिरीयड 15/08/2010 ते 14/08/2011 असा दिला आहे. परंतु सदरच्या तक्रार अर्जात 14/11/2011 रोजी आलेला आहे. म्हणजेच पॉलीसी पिरीयड 90 दिवसाचा संपल्यानंतर आलेले असल्यामुळे सदरची तक्रार ही फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तर
- तक्रारदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोषास पात्र आहे काय ? नाही
4) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदार क्र. 4 चा ग्राहक आहे. व त्याच्या शेतीचा गट क्र. 341 मध्ये 60 आर जमीन आहे.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असुन, सदर केसमध्ये अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा इलेक्ट्रीक शॉकने झालेला आहे. परंतु अर्जदाराने सदरचा क्लेम हा मुदतीत गैरअर्जदार क्र. 1,2,3 यांच्याकडे पाठवलेला नाही. हे म्हणणे संयुक्तीक वाटत नाही. अर्जदाराने कागदपत्रांमध्ये सदरचा क्लेम गैरअर्जदार क्र. 1 ते 4 यांच्याकडे पाठवला होता. याच्या पोस्टाच्या पावत्या न्यायमंचात त्यांनी दाखल केलेल्या आहेत. तसेच डेक्कन इंन्शुरन्स कंपनीला देखील पाठवल्याचे दिसुन येते. त्यांची तशी कागदपत्रे मिळाल्याचा अहवाल न्यायमंचात दाखल नाही. म्हणून सदर केस ही प्रथमावस्थेतच असल्यामुळे सदर केसमध्ये महाराष्ट्र शासनाच्या कराराप्रमाणे सदरचा क्लेम अर्ज हा गैरअर्जदार क्र. 1,2,3 कडे पोहचलेला आहे. तरीही ते हजर नाहीत व त्यांच्या विरुध्द नो से दि. 06/01/2013 रोजी करण्यात आलेला आहे. तसेच गैरअर्जदार क्र. 4 च्या म्हणण्यानुसार सदरचा क्लेम हा 90 दिवसानंतर पोहचला व तक्रार ही मंचातील तक्रारीच्या वेळेसच सर्व कागदपत्रे तीनही गैरअर्जदारांना मिळाले आहेत जरी सदरची कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 3 ला पोहचली. परंतु गैरअर्जदार क्र. 1,2 व 3 न्यायमंचात हजर होवून त्यांनी आपले म्हणणे दाखल केलेले नाही. मयत रामहरी दगडू भोंग यांचा मृत्यू हा दि. 17/05/2011 रोजीचा असला तरी सर्व कागदपत्रांची पूर्तता ही दि. 14/11/2011 रोजी गैरअर्जदार क्र. 4 कडे झालेली आहे. सदरचा मृत्यू हा अपघाती आहे. न्यायमंचाकडून सर्व गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांना सर्वकागदपत्र मिळूनही ते आपला खुलासा न्यायमंचात हजर होवून दाखल केलेला नाही याचा अर्थ गैरअर्जदारानी अर्जदाराच्या सेवेत केलेली दिसुन येत नाही. परंतु सदर केसमध्ये अर्जदारानेही सदरचा क्लेम हा नियमाप्रमाणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 कडे पाठवलेला दिसत नाही. म्हणून हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश
1) अर्जदाराचा अर्ज खारीज करत आहोत.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
(श्री.अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.