Maharashtra

Kolhapur

CC/13/98

Ayubali Ismail Patel - Complainant(s)

Versus

Krishnamai Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha Maryadit., through Manager, - Opp.Party(s)

Smita Mane/V.G.Sardesai

20 Nov 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, South Side, Second Floor,
Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. 0231-2651327, Fax No. 0231-2651127
Email- confo-ko-mh@nic.in, Website- www.confonet.nic.in
 
Complaint Case No. CC/13/98
 
1. Ayubali Ismail Patel
Aaurwad, Tal.Shirol
Kolhapur
2. Abdul Hamid Ayubali Patel
Aaurwad, Tal.Shirol,
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Krishnamai Gramin Bigarsheti Sahakari Patsanstha Maryadit., through Manager,
Aaurwad, Tal.Shirol,
Kolhapur
2. Dilip Phadnis Mangsule, Chairman
Aaurwad, Tal.Shirol
Kolhapur
3. Sachiv Vasant Ravan
Aaurwad, Tal.Shirol
Kolhapur
4. Mahavir Anna Kole
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
5. Rajendra Rupchand Jangam
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
6. Ananda Shivaji Patil
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
7. Ajit Anna kole
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
8. Manohar Shankar Gawade
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
9. Balalso Anna Rawan
Aaurwad, Tal.Shirol
Kolhapur
10. Balaso Shankar Awalekar
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
11. Badruddin Hussain Mulla
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
12. Balaso Ganapati Gangdhar
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
13. Dadu Ganapati Kambale
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
14. Sau.Asha Arun Shetty
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
15. Sau.Kanchan Ramesh Chandure
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
16. Ramchandra Ganapati Rawan
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
17. Asifali Usman Chougule
Aaurwad, Tal.Shirol
kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

निकालपत्र : (दिनांक: 20-11-2013 ) (व्‍दाराः- मा. श्री. संजय पी. बोरवाल, अध्‍यक्ष)  

1.     तक्रारदार यांनी सामनेवाले कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. औरवाड या पतसंस्‍थेत मुदत ठेवीं स्‍वरुपात गुंतवलेल्‍या रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा तक्रार अर्ज या मंचात दाखल केला आहे.

2.          तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की,  तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. औरवाड यांचेकडे ठेव स्‍वरुपात रक्‍कम  सामनेवाले क्र.1- (यापुढे संक्षिप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल) या पतसंस्‍थेत  मुदत ठेव  स्‍वरुपात रक्‍कम गुंतविली होती त्‍याचा तपशील खालीलप्रमाणेः-

अ.

क्र.

ठेव पावती क्र.

ठेव ठेवलेली रक्‍कम रु.

ठेव ठेवलेली

दिनांक

ठेवीची मुदत संपलेची दिनांक

व्‍याज दर

1

001432

80,000/-

21-07-2006

46 दिवस ते 1 वर्ष पुढे

8 %

 

2.

 

001425

 

1,00,000/-

 

20-07-2006

 

-“-

 

-“-

      
      
      

      
      
      
      

3.           तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1-पतसंस्‍थेकडे मुदत ठेव पावतीची  मुदत संपलेनंतर रक्‍कमेची मागणी व्‍याजासह केली असता पतसंस्‍थेने रक्‍कम दिली नाही तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणुक केली. तक्रारदारांना ठेवींच्‍या रक्‍कमेची निकड होती तेव्‍हा तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे मुदत संपलेनंतर रक्‍कमेची मागणी केली असता, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना ठेवीची रक्‍कम  दिली नाही. तथापि तक्रारदारांनी  दि. 19-11-2012 रोजी वकिलामार्फत रजि.ए.डी. ने नोटीस पाठवून देखील सामनेवाले यांनी वर नमूद ठेवीची रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली अशी तक्रारदार यांची तक्रार आहे. सबब, सामनेवाले यांनी तक्रारदारास सामनेवाले यांचेकडून ठेव पावतीची रक्‍कम तसेच त्‍यावरील व्‍याजाची मागणी केली. तक्रारदारांनी त्‍यांचे वर नमूद परिच्‍छेद कलम-2 नुसार आज अखेर होणारी व्‍याजासह  मुदत ठेव रकमा, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु. 5,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु. 3,000/-   अशी  मुदत ठेव पावत्‍यांचा रक्‍कमा आणि मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम तक्रारदारांना वसुल होऊन मिळावी अशी मागणी केलेली आहे.

4.    तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीसोबत मुदत ठेवींच्‍या ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस दि. 19-11-2012 व  तक्रारीसोबत शपथपत्र दाखल केली आहे. 

5.             सामनेवाले क्र. 2, 3, 5, 6, 8, 9, 10, 12, 14, व 15 यांचेवर  मंचाची नोटीसची बजावणी होऊनही ते हजर राहिले परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही.   तर उर्वरीत सामनेवाले क्र. 1, 4, 7, 11, 13, 16 व 17  यांचेवर  मंचाची नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले.  त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल केले नाही.   प्रस्‍तुतच्‍या तक्रारीत उभय पक्षकार गैरहजर असलेमुळे प्रस्‍तुतचे प्रकरण गुणदोषांवर निकाली करणेत येतो.

6.          या मंचाने तक्रारदारांची तक्रार दाखल कागदपत्रे तसेच अनुषांगिक कागदपत्रे यांचा विचार करता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे मंचापुढे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

 1

तक्रारदार हे ग्राहक आहे‍त काय ?

    होय

 2

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?

    होय

 3

तक्रारदार कोणता मानसिक त्रासापोटी / अनुतोष मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

अंतिम आदेशाप्रमाणे

 4

आदेश काय ?

तक्रार अंशतः मंजूर

विवेचन-

  मुद्दा क्र. 1 -   तक्रारदार यांनी मुदत ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमेची पावतीची छायांकित प्रत सादर केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची ठेव स्‍वरुपात भरलेली रक्‍कम सामनेवाले यांनी नाकारलेली नाही.  मुदत ठेव स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमेचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

 मुद्दा क्र. 2 -  प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार यांनी तक्रारीचे अनुषंगाने दाखल केलेली कागदपत्रे पाहता, तक्रारदार यांनी पतसंस्‍थेत मुदत ठेव स्‍वरुपात रक्‍कम गुंतविलेली आहे ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी सामनेवाले यांच्‍याकडे ठेवीच्‍या स्‍वरुपात गुंतविलेली रक्‍कम परत करणे हे पतसंस्‍थेचे कर्तव्‍य होते. परंतु मागणी करुनही रक्‍कम न देणे ही सामनेवाले यांची तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे मत आहे,  म्‍हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्‍तर मंच होकारार्थी देत आहे.

  मुद्दा क्र. 3तक्रारदार यांनी दाखल केलेली ठेव रक्‍कमेवर व्‍याजासह होणारी रक्‍कम सामनेवाले क्र.1 ते सामनेवाले क्र. 17 यांच्‍याकडून मिळावी अशी विनंती केली आहे.  या संदर्भात मा. मुंबई उच्‍च न्‍यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांनी रिट याचिका क्र.5223/09 सौ.वर्षा रविंद्र ईसाई विरुध्‍द राजश्री राजकुमार चौधरी  या न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये पुढीलप्रमाणे मत व्‍यक्‍त केले आहे.

“As has been recorded above, I am of the view that a society registered under the provision of Maharashtra Co-operative Societies Act 1960, although can be proceeded against and a complaint under the provision of Consumer Protection Act is entertain able against the society, the Directors of members of the managing committee cannot be held responsible in view of the scheme of Maharashtra Co-operative Societies Act. To hold the Directors of the banks/members of the managing committee of the societies responsible, without observing the procedure prescribed under the Act, would also be against the principles of co-operation, which is the very foundation of establishment of the co-operative societies”.

      वरील न्‍यायिक दृष्‍टांतामध्‍ये संचालकांना ठेवीची रक्‍कम देण्‍यासाठी वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्‍व विषद करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे सामनेवाले क्र. 2 ते 17 यांना वैयक्तिकरित्‍या जबाबदार ठरविता येणार नाही. तक्रारदार हे सामनेवाले क्र.1- कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. शिरोळ यांच्‍याकडून वर नमुद मुदत ठेवीत गुंतविलेली रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच मुदत ठेवीची रक्‍कम परत देण्‍यास सामनेवाले क्र.1- कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. शिरोळ हे जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे. 

      तसेच, तक्रारदार यांना सामनेवाले यांनी  मुदत ठेव खात्‍यातील रक्‍कम न दिल्‍याने सेवेत त्रुटी केली आहे, त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला तसेच सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले. त्‍यामुळे सामनेवाले क्र.1- कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. औरवाड यांच्‍याकडून मानसिक त्रासापोटी रु.1,000/- व अर्जाच्‍या खर्चापोटी रक्‍कम रु.1,000/- वसुल होऊन मिळण्‍यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे.

  मुद्दा क्र.4 -   सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

                              आदेश

1 .       तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.

2 .       सामनेवाले क्र. 1-, कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. औरवाड, ता. शिरोळ, जि. कोल्‍हापूर यांनी तक्रारदार यांना न्‍यायनिर्णयातील परिच्‍छेद कलम-2 मध्‍ये नमुद असलेली मुदत ठेवीत गुंतविलेली रक्‍कम ठरलेल्‍या व्‍याज दरानुसार अदा करावे.  

3.     सामनेवाले क्र. 1-, कृष्‍णामाई ग्रामीण बिगरशेती नागरी सहकारी पतसंस्‍था मर्या,. औरवाड, ता.शिरोळ,  जि. कोल्‍हापूर यांनी तक्रारदारला मानसिक त्रासापोटी रु.1,000/- (अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) तसेच या तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.1,000/-(अक्षरी रुपये एक हजार फक्‍त) अदा करावेत.

4.     आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.