Maharashtra

Beed

CC/12/15

Ishwarlal Avatrai Tekwani - Complainant(s)

Versus

Krishna Fright Movers, - Opp.Party(s)

28 Oct 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/15
 
1. Ishwarlal Avatrai Tekwani
Karanja Road Beed
Beed
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Krishna Fright Movers,
C-7,Industrail Area,Lawarance Road Dehli
Dehli
Dehli
2. Krishna Fright,Movers,
Near Patel Hospital,Opp SP Office,Barshi Road Beed
Beed
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'ABLE MRS. Manjusha Chitalange MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

निकालपत्र
                            दिनांक 28.10.2013
                    (घोषित द्वारा ः-श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष )
            तक्रारदार ईश्‍वरलाल आवतराय टेकवानी यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले यांनी सेवेमध्‍ये कसूर केल्‍याबददल नुकसान भरपाई मिळण्‍यासाठी म्‍हणून दाखल केली आहे.
            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे व्‍यापारी असून ते विज उपकरणे विकण्‍याचा व्‍यवसाय करतात. तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचे दूकानातून विज उपकरणे खरेदी केली. खरेदी केलेल्‍या विज उपकरणाचा तपशील तक्रारीत पॅरा क्र.3 मध्‍ये नमूद केलेला आहे. तक्रारदार यांनी रक्‍कम रु.17,090/- चे विद्युत उपकरणे मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचेकडून खरेदी केला. सामनेवाल क्र.1 हे माल वाहून नेण्‍याची सेवा करतात.  सामनेवाले क्र.1 यांची शाखा बीड येथे असून ती सामनेवाले क्र.2 होय. मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी तक्रारदार यांनी घेतलेला माल लाकडी खोक्‍यात बंद केला व तो माल सामनेवाले क्र.1 यांचेकडे तक्रारदार यांना पोहच करण्‍यासाठी ताब्‍यात दिला. सदरील माल दि.16.09.2010 रोजी सामनेवाले क्र.1 यांचे ताब्‍यात देण्‍यात आला व त्‍यांचा ताबा सामनेवाले क्र.2 मार्फत तक्रारदार यांना देण्‍यासाठी पाठविला. सामनेवाले क्र.1 यांनी माल पोहच करण्‍यासाठी रक्‍कम रु.243/- ची आकारणी केली. तक्रारदार यांनी तक्रारीत पूढे असे कथन केले आहे की,सामनेवाले क्र.1 यांचे मार्फत पाठविलेला माल तक्रारदार यांना मिळाला नाही म्‍हणून तक्रारदार यांनी दि.17.01.2011 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठविली व माल ताब्‍यात देण्‍या बाबत कळविले. सदरील नोटीस सामनेवाला यांना मिळाली परंतु सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे ताब्‍यात माल दिला नाही अगर नुकसान भरपाई दिली नाही. सबब, तक्रारदार यांचे कथन की, सामनेवाले यांनी तक्रारदार यांना माल देण्‍यास कसूर केला आहे त्‍यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सबब, सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रु.17,000/-, तक्रारीचा खर्च व शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
            सामनेवाले क्र.1 यांना मंचाची नोटीस प्राप्‍त झाली, ते मंचासमोर हजर झाले नाही. सबब, सामनेवाले क्र.1 यांचे विरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
            सामनेवाले क्र.2 हे मंचासमोर हजर झाले व त्‍यांनी लेखी म्‍हणणे नि.9 वर दाखल केले आहे. सामनेवाले क्र.2 यांनी तक्रारदार यांचे तक्रारीतील सर्व कथन नाकारलेले आहे. सामनेवाले क्र.2 यांचे कथन की, तो सामनेवाले क्र.1 चे शाखा नाही. सामनेवाले क्र.1 यांची कूठे शाखा आहे याबददल सामनेवाल क्र.2 यांना काहीही माहीती नाही.सामनेवाले क्र.1 या कंपनीचा काही माल बीड येथे पोहचावयाचा असेल तर तो माल सामनेवाले क्र.1 यांचे राज ट्रान्‍सपोर्ट या कंपनीच्‍या नांवाने माल येतो. सामनेवाले क्र.2 यांचे राज ट्रान्‍सपोर्ट नांवाचे ट्रान्‍सपोर्ट कंपनी आहे. सामनेवाले यांचेकडून येणारा माल हा राज ट्रान्‍सपोर्ट वर येतो.त्‍यामुळे तक्रारीतील नोटीस ही चूकीच्‍या नावांच्‍या शाखेवर बजावणी केली होती. सामनेवाले क्र.2 यांनी असे कथन केले आहे की,तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचेकडून कोणता माल खरेदी केला या बाबत तक्रारदार यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही.तसेच तक्रारदार व सामनेवाले क्र.1 यांचेकडे काही वाद उपस्थित झाल्‍यास तो वाद निवारण करण्‍याचा अधिकार दिल्‍ली येथील न्‍यायालयालाच आहे.. सबब, या मंचास तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. सामनेवाले यांनी पूढे असे कथन केले आहे की,तक्रारदार यांनी मालाचे वर्णन दिलेले नाही व त्‍यासंबंधी कोणताही दस्‍ताऐवज दाखल केलेला नाही.तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचेकडे माल सूर्पूद केल्‍या बाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 ज्‍यांच्‍याकडून माल विकत घेतला त्‍यांचेकडे चौकशी करावयायस हवी होती. तक्रारदार यांनी ज्‍या दूकानातून माल घेतला त्‍या दूकानादारास तक्रारीत सामील केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात यावी.
            तक्रारदार यांनी दाखल केलेला पुराव्‍याचे अवलोकन केले. सामनेवाले क्र.2 यांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍याचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयसाठी खालील मुददे उपस्थित होतात.
      मुददे                                                     उत्‍तर
1.     तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांच्‍याकडून माल
      विकत घेऊन तो सामनेवाले क्र.1 ट्रान्‍सपोर्ट कंपनीकडे तक्रारदार यांना
      पाठवणे कामी दिला होता ही बाब तक्रारदाराने सिध्‍द केली आहे काय ? नाही.
2.    सामनेवाले यांनी तक्रारदार यांचा माल न देऊन सेवेत त्रूटी
      ठेवलेली आहे काय ?                                         नाही.
3.    तक्रारदार हे नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत काय ?                नाही.
4.    आदेश काय ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.
 
                              कारणमिंमासा 
मुददा क्र. 1 ते 4 ः-
             तक्रारदार यांचे वकील श्री. टेकवानी यांनी यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 येथून विज उपकरणे खरेदी केले. मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी सदरील माल लाकडी खोक्‍यात सिल बंद केले व तो माल सामनेवाले क्र.1 ट्रान्‍सपोर्ट सर्व्‍हीस कंपनीकडे तक्रारदार यांना पाठविण्‍यासाठी पाठविला. तो माल तक्रारदार यांना मिळाला नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे. तसेच तक्रारदार यांचे वकिलांनी असाही यूक्‍तीवाद केला की, सामनेवाले क्र.2 ही सामनेवाले क्र.1 यांचे शाखा कार्यालय आहे. तो माल सामनेवाले क्र.2 यांचेकडे मिळाल्‍यानंतर त्‍यांचा ताबा तक्रारदार यांना देणे क्रमप्राप्‍त होते. तक्रारदार यांचे वकिलांनी या मंचाचे लक्ष तक्रारीसोबत दाखल केलेले पावतीवर वेधले. तसेच माल विकत घेतल्‍या बाबत एक पावती हजर केली. त्‍यांचेही संदर्भात यूक्‍तीवाद केला. तक्रारदार यांचे वकिलांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालय यांनी दिलेल्‍या न्‍यायनिवाडयावर या मंचाचे लक्ष वेधले.
2000 DGLS (Soft.) 598, 2000 AIR SUPREME COURT Page no.1461.
 
IN THE SUPREME COURT OF INDIA
 
                                                Patel Roadways Limited
                                                            Versus
                                                Birla Yamaha Limited.
 
                        In this cited case, their Lordship of Supreme Court has observed that, the proceeding before Consumer Forum comes within the term “Suit” and therefore, provisions of section 9 of the Carriers Act will apply. The liability of the common carrier is as of insurer. When the goods entrusted are damaged, there is no burden on the consignor to prove negligence of the insurer. The absolute liability of the carrier is subject to two exceptions, an act of God and a special contract which the carrier may choose to enter with the customer. 
 
                   वरील न्‍यायनिर्णयाचा हवाला देऊन तक्रारदार यांचे वकिलानी यूक्‍तीवाद केला की,तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत.
            सामनेवाले क्र.2 यांचे वकील श्री.पटेल यांनी असा यूक्‍तीवाद केला की, सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे शाखा कार्यालय नाही. सामनेवाले क्र.2 राज ट्रान्‍सपोर्ट या नांवाने ट्रान्‍सपोर्टचा व्‍यवसाय करतात. दिल्‍ली येथील कृष्‍णा फ्राईट मूव्‍हर्स या कंपनीकडून माल राज ट्रान्‍सपोर्ट वर येतो व तो माल मिळाल्‍यानंतर ते वितरण करतात. सामनेवाले क्र.2 यांनी सदरील माल प्राप्‍त झाला नाही त्‍यामुळे तक्रारदार यांना तो माल वितरण करण्‍याचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. सामनेवाले क्र.2 यांनी कोणतीही सेवेत त्रूटी ठेवली नाही.तसेच सामनेवाले क्र.2 यांचे वकिलानी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 येथील दूकानातून माल विकत घेतल्‍या बाबत कोणतीही पावती दाखल केलेली नाही. अगर तो माल सामनेवाले क्र.2 ट्रान्‍सपोर्ट कंपनीकडे पाठविल्‍या बाबत कोणताही दस्‍ताऐवज हजर केला नाही. सामनेवाले यांचे वकिलांनी असा यूक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.2 यांचे संबंधी जी पावती हजर केलेली आहे त्‍या पावतीवर ज्‍याने माल पाठविला आहे. त्‍यांचा उल्‍लेख व्‍ही.बी. असा केलेला आहे व ज्‍याला माल पाठविला आहे त्‍या बबात बी.जे.बी.डी. असा उल्‍लेख केलेला आहे. कनसायनर म्‍हणून मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 असा उल्‍लेख केलेला आढळतो. कनसायनी म्‍हणून कोणाचे नांव आहे या बाबत स्‍पष्‍टता नाही. तसेच तक्रारदार यांनी जो माल विकत घेतला आहे असे कथन केले आहे त्‍यांचे वर्णन पावतीत नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पावतीमध्‍ये मालाचे वजन 60 किलो असे लिहीलेले आहे व त्‍या वस्‍तूची किंमत रु.4050/- अशी दर्शवलेली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत कथन केलेला माल त्‍यांची किंमत, वर्णन हे पावतीमध्‍ये कूठेही केलेले आढळून येत नाही. तसेच माल विकत घेतल्‍या बाबत मुळ पावती मंचासमोर नाही. त्‍यामुळे खरोखरच तक्रारदार यांनी सदरील माल मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी पाठविला होता किंवा काय हे स्‍पष्‍ट होत नाही. तो माल तक्रारदार यांना दयावा, या बाबत कोणताही दस्‍ताऐवज दाखल केलेले नाही. सबब, तक्रारदार यांची तक्रार रदद होण्‍यास पात्र आहे.
            तक्रारदार यांचे वकिलांनी केलेला यूक्‍तीवाद, तक्रारीत दाखल केलेले दस्‍ताऐवज व तक्रारीतील कथन यांचे बारकाईने अवलोकन केले. तसेच सामनेवाले यांचे वकिलांनी केलेला यूक्‍तीवाद व दाखल केलेले पुराव्‍याचे बारकाईने अवलोकन केले.
            तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 येथील दूकानातून तक्रारीत नमूद केलेला माल खरेदी केला आहे ही बाब शाबीत करणे क्रमप्राप्‍त ठरते. ते शाबीत करण्‍यासाठी तक्रारदार हे तक्रारीसोबत  दाखल कागद ज्‍यावर बॉलपेनने मजकूर लिहीलेला आहे. त्‍यावर विसंबून आहेत. सदरील कागदाचे अवलोकन केले असता त्‍यावर मे.ए.जी.अँन्‍ड सन्‍स असे लिहीलेले आहे व दि.14.9.2010 रोजी ही दिनांक लिहीलेली आहे व खाली काही वस्‍तूचे नांव लिहीलेले आहे व त्‍यापूढे त्‍यांची किंमत लिहीलेली आहे. एकूण किंमत रु.17,000/- असे लिहीलेले आहे. सदरील पावतीची छाननी केली असता तो माल तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 या दूकानातून घेतल्‍याचे सिध्‍द होत नाही. त्‍या पावतीवर मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 या दूकानाचे नांव नाही व माल विक्री करणा-याची सही सुध्‍दा नाही. तसेच कृष्‍णा फ्राईट मूव्‍हर्स या नांवाची जी पावती दाखल केली आहे त्‍या पावतीतील मजकूर वाचला असता त्‍यांचे संदर्भ वर नमूद केलेल्‍या चिठठीतील मजकूराशी मिळजातुळता नाही. पावतीमध्‍ये मालाचे वर्णन लिहीलेले नाही. पावतीत मालाची किंमत रु.4050/- अशी लिहीलेली आहे. तक्रारदार यांनी तो माल देण्‍या बाबत कूठलाही उल्‍लेख आढळून येत नाही. कनसायनर म्‍हणून मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 असे नांव आहे. कनसायनी म्‍हणून ज्‍या व्‍यक्‍तीचे नांव लिहीलेले आहे ते स्‍पष्‍ट वाचता येत नाही. त्‍या संबंधी तक्रारदार यांनी मुळ पावती हजर केलेली नाही. जर खरोखरच तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचेकडून माल घेतलेला असेल व मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी तो माल सामनेवाले क्र.1 मार्फत तक्रारदार यांना देण्‍यासाठी सामनेवाले क्र.2 यांचेकडे पाठविला असेल तर त्‍यासंबंधी कागदपत्र दाखल करणे क्रमप्राप्‍त होते.ते कागदपत्र तक्रारदार यांनी दाखल केलेले नाही. तसेच मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचे मालक यांनाही तक्रारीत पक्षकार म्‍हणून सामील केलेले नाही अगर दूकानदाराचे शपथपत्र या मंचासमोर हजर केलेले नाही. सबब, पुरेसा पुरावा तक्रारदार यांनी सादर न केल्‍यामुळे तक्रारीत नमूद केलेला माल सामनेवाले क्र.2 यांचेकडे तक्रारदार यांनी पाठविल्‍या कामी दिला होता व तो माल तक्रारदार यांना मिळाला नाही ही बाब तक्रारदार शाबीत करु शकले नाहीत. तक्रारदार यांनी मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 या दूकानातून विशिष्‍ट वर्णनाचा माल घेतलला आहे या बाबत ही कोणताही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदार यांना तो पुरावा सहच उपलब्‍ध करता आला असता. परंतु तक्रारदार यांनी तो पुरावा या मंचासमोर उपलब्‍ध करुन दिला नाही. तक्रारदार यांनी दाखल केलेला कृष्‍णा फ्राईट मूव्‍हर्स यांची जी पावती आहे त्‍या पावतीचे अवलोकन केले असता जो करार कृष्‍णा फ्राईट मूव्‍हर्स बरोबर मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांचा झाला होता त्‍या कराराचे स्‍वरुप  at owners risk  अशा स्‍वरुपाचा आहे. तसेच माल हा बंद पेटीत असल्‍यामुळे कृष्‍णा फ्राईट मूव्‍हर्स यांची कोणतीही जबाबदारी राहणार नाही असे नमूद केलेले आहे. त्‍यामुळे मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी नेमका कोणता माल लाकडी खोक्‍यात बंद करुन पाठविला होता या बाबतही पुरावा उपलब्‍ध नाही. त्‍यामुळे तक्रारदार यांनी तो माल विकत घेतला होता व तो माल सामनेवाले क्र.1 यांचे मार्फत ट्रान्‍सपोर्ट केला होता ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाहीत. तसेच सामनेवाले क्र.2 हे सामनेवाले क्र.1 यांचे शाखा कार्यालय असल्‍या बाबत कोणताही पुरावा उपलब्‍ध नाही. सामनेवाले क्र.2 हे राज ट्रान्‍सपोर्ट नांवाची कंपनी चालवतात ते सामनेवाले क्र.1 यांचेकडून आलेला माल त्‍यांचे ट्रान्‍सपोर्ट कंपनीवर येतो केवळ त्‍या कारणास्‍तव ते सामनेवाले क्र.1 यांची शाखा आहे असे म्‍हणता येत नाही. दोन्‍हीही ट्रान्‍सपोर्ट कंपनीचे कायदेशीर व्‍यक्‍तीमत्‍व भिन्‍न आहे. सबब, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1 यांचे मार्फत माल ट्रान्‍सपोर्ट केला होता व तो सामनेवाले क्र.1 व 2 यांनी तक्रारदार यांना पोहचवला नाही ही बाब तक्रारदार शाबीत करु शकलेले नाहीत. त्‍यामुळे सामनेवाले यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे असे म्‍हणता येणार नाही.
            ट्रान्‍सपोर्ट कंपनी जबाबदार धरण्‍यासाठी तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केलेल्‍या वर्णनाचा माल सामनेवाले क्र.1 या ट्रान्‍सपोर्ट कंपनी मार्फत पाठविला आहे हे सिध्‍द करणे गरजेचे आहे. तो माल मे.विनोद इक्‍यूपमेंटस दिल्‍ली-6 यांनी पाठविला होता हे ही सिध्‍द करणे आवश्‍यक होते. परंतु तक्रारदार यांनी सदरील बाबी सिध्‍द केल्‍या नाहीत. या मंचाचे असे मत झाले आहे की, तक्रारदाराची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे.
            मुददा क्र.1 ते 3 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.
            सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
                     आदेश
1.     तक्रारदाराची तक्रार खारीज करण्‍यात येते.
2.    खर्चाबददल आदेश नाही.
      3.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
                       (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
 
 
 
                       श्रीमती मंजुषा चितलांगे             श्री.विनायक लोंढे                                      
                                सदस्‍य                    अध्‍यक्ष     
                                                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड.
 
 
[HON'ABLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Manjusha Chitalange]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.