Maharashtra

Thane

CC/328/2015

Mr. Hemant N Yadav - Complainant(s)

Versus

kRISHNA ERRECTORS PVT lIMITED, tHROUGH tHE DIRECTORS - Opp.Party(s)

Adv A B Jhaghirdhar

24 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/328/2015
 
1. Mr. Hemant N Yadav
At. Lokmanya Nagar, Pada No 1, Trambakeshwar Apt, Room No 303, 3rd floor, Opp Maruti Mandir, Thane west
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. kRISHNA ERRECTORS PVT lIMITED, tHROUGH tHE DIRECTORS
At. Lokmanya Nagar, Pada No 1, Trambakeshwar Apt, Room No 303, 3rd floor, Opp Maruti Mandir, Thane west
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

Dated the 24 Jun 2015

 

                                                

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)

           

  1. तक्रारदार श्री ओम डाय वर्क्‍सचे प्रोप्रायटर असून सामनेवाले यांचेकडे श्री. राधेकृष्ण इंडस्‍ट्रीयल पार्क येथे 675 चौ.फू. क्षेत्रफळ असलेला गाळा (shop) रु. 9 लाख एवढया रकमेचा घेण्‍यासाठी एकूण रक्‍कम रु. 3,51,000/- चेकद्वारे जमा केली. परंतु सामनेवाले यांनी यासंदर्भात पोचपावती दिली नाही. दुकान खरेदीचा करार केला नाही. सामनेवाले यांनी दुकान खरेदीपोटी तक्रारदारांकडून रु. 3,51,000/- एवढी रक्‍कम घेऊन दुकानाचा ताबा दिला नाही. परंतु वेगवेगळया चेकद्वारे सदर रक्‍कम तक्रारदारांना परत (Refund) केली. तक्रारदारांनी सदर चेक अंडर प्रोटेस्‍ट स्विकारले व बँकेत वटविण्‍याकसाठी टाकले. असता खात्‍यात पुरेशी रक्‍कम उपलब्‍ध नसल्‍याचे कारणास्‍तव न वटता परत आले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना यासंदर्भात दि. 15/02/015 रोजी पाठविलेली नोटीस त्‍यांनी स्विकारलेली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

  2. तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन सामनेवाले यांना रु. 1,00,000/-, 2,00,000/-, 51,000/- चेकद्वारे दिल्‍याचे दिसून येते. तसेच श्री ओम डाय वर्क्‍सच्‍या नांवे दिलेले रु. 51,000/- व रु. 1,00,000/- एवढया रकमेचे चेक बँकेच्‍या खात्‍यात पुरेशी रक्‍कम नसल्‍याचे कारणावरुन dishonored झाल्‍याचे दिसून येते.

  3. तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये चेकद्वारे पैशांची देवाण घेवाण व्‍यवहार झाल्‍याचे तक्रारीत दाखल पुराव्‍यानुसार आढळते. परंतु तक्रारदारांनी सामनेवाले यांना दुकानाच्‍या खरेदीपोटी रक्‍कम अदा केल्‍याबाबतचा पुरावा तक्रारीत दाखल नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दुकानाच्‍या खरेदीपोटी रक्‍कम दिल्‍याची बाब ग्राहय धरली तरी तक्रारदारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार सामनेवाले यांनी सदर रक्‍कम चेकद्वारे परत (Refund) केली आहे. तक्रारदारांनी सदर रकमेचे चेक स्विकारुन वटविण्‍यासाठी बँकेत टाकले आहेत. यावरून सामनेवाले यांनी करार रद्द केला व तक्रारदारांनी करार रद्द झाल्‍याची बाब (accept) मान्‍य केली आहे. अशा परिस्थितीत तक्रारदार व सामनेवाले यांचेमधील करार रद्द झाल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार सामनेवाले यांनी तक्रारदारांना परत केलेल्‍या (refund) रकमेचे चेक न वटता परत आल्‍यामुळे दाखल केली आहे. यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून रक्‍कम वसुली करण्‍यासाठी (Recovery) तक्रार दाखल केल्‍याचे दिसून येते.

  4. वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये कोणताही करार अस्तित्‍वात नाही. तक्रारदार हा ग्रा.सं. कायदा कलम 2(1)(डी) नुसार ग्राहक या संज्ञेत येत नाही. तसेच तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार सामनेवाले यांचेकडून प्राप्‍त झालेले चेक न वटता परत आल्‍याचे कारणास्‍तव दाखल केली आहे. सदरची बाब ग्राहक मंचाच्‍या अधिकारक्षेत्रात येत नाही. तक्रारदारांनी योग्‍य त्‍या न्‍यायालयात यासंदर्भात दाद मागता येईल असे मंचाचे मत आहे.

          सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

                आ दे श

  1. तक्रारदारांची तक्रार ग्रा.सं. कायदा कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्‍यात येत आहे.

  2. खर्चाबाबत आदेश नाही.

  3. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनामुल्‍य पोष्‍टाने पाठविण्‍यात याव्‍यात.

  4. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

     

     

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.