Maharashtra

Thane

CC/323/2015

Dhondinath P Shetye - Complainant(s)

Versus

Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd - Opp.Party(s)

18 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/323/2015
 
1. Dhondinath P Shetye
At. Shop no 8, krishnastal Shrikrupa co op Hsg Soc Ltd, Mira Village, Mira Rd, 401104 Thane
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd
A W E Highway, Mira village, Mira Rd Thane 401104
Thane
M
2. Shrikrishna Ganesh Utsav Mandal
At. Krishnastal Shrikrupa co op Hsg soc , Mira village, Mira Rd, Thane 401104
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 18 Jun 2015

 

  1. तक्रारदार यांना तक्रार दाखल सुनावणीकामी ऐकण्‍यात आले होते.

  2. तक्रार व त्‍यासोबतची कागदपत्रे पाहण्‍यात आली. तक्रारदार व त्‍यांची भगिनी हे सामनेवाले क्र.1 हे गृहनिर्माण संस्थेतील दुकान क्र.8 चे ताबेदार आहेत. ते सामनेवाले क्र. 1 यांचे सदस्‍य आहेत. सामनेवाले क्र. 1 व 2, जे सार्वजनिक गणेश उत्‍सव मंडळ आहे, यांनी गैरकायदेशीररित्‍या श्रीकृपा बिल्‍डींग क्र. 2, अ विंग यांच्‍या स्विचबोर्डमधून विजेची जोडणी केली व याप्रमाणे विजेची चोरी केली. ही घटना ऑगस्‍ट-सप्‍टेंबर, 2014 मधील आहे. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी केलेली ही चोरी मोठया प्रमाणावर असल्‍यामुळे तक्रारदारांनी याबाबत रिलायन्‍स एनर्जी व पोलिसांकडे तक्रार केली होती. याकरीता सामनेवाले क्र. 1 यांना दंडीत करण्‍यात यावे जेणेकरुन इतर सहकारी गृहनिर्माण संस्‍थांना तसेच सार्वजनिक उत्‍सव मंडळांना धडा मिळेल व असले प्रकार पुन्‍हा घडणार नाहीत. सामनेवाले यांचे कृत्‍यामुळे संस्‍थेच्‍या सदस्‍यांना विजेकरीता अधिक रक्‍कम भरल्‍यामुळे क्षती झालेली आहे. सामनेवाले क्र. 1 हे सेवा देण्‍यामध्‍ये कसूर केल्‍यामुळे व मानसिक त्रास दिल्‍यामुळे तसेच जाणून बुजून अपमान केल्‍यामुळे ते दोषी आहेत. तक्रारदारांनी याकरीता नुकसान भरपाई म्‍हणून रु. 1,00,000/- ची मागणी केली आहे.

  3. वर नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले क्र. 1 ही सहकारी गृहनिर्माण संस्‍था आहे व सामनेवाले क्र. 2 हे सार्वजनिक गणेश उत्‍सव मंडळ आहे. सामनेवाले क्र. 2 हे तक्रारदार यांचे सेवा पुरवठा करणारी संस्था किंवा तक्रारदार हे सामनेवाले क्र. 2 यांचे ग्राहक आहेत, हे तक्रारीवरुन दिसून येत नाही. त्‍यामुळे आमच्‍यामते त्‍यांचेविरुध्‍द ही तक्रार या मंचात चालू शकत नाही.

  4. तक्रारदार यांनी नमूद केले आहे की, सदस्‍यांना अतिरिक्‍त विजेचे देयक दयावे ला्गले म्‍हणून त्‍यांना या कृत्‍यामुळे क्षती झालेली आहे. परंतु तक्रारदारांचे हे म्‍हणणे फारच मोघम व सर्वसाधारण स्‍वरुपाचे आहे. तक्रारदारांनी या कृत्‍यामुळे विजेच्‍या देयकामध्‍ये किती वाढ झाली हे दर्शविण्‍याकरीता कोणतेही देयक सादर केलेले नाही. सबब त्‍यांचे निवेदनास पृष्ठी मिळत नाही.

  5. दुसरे महत्‍त्‍वाचे असे की तक्रारदारांनी नमूद केल्‍याप्रमाणे स्विचबोर्डमधून जोडणी करुन विजेची चोरी करण्‍यात आली आहे. जर विजेची चोरी करण्‍यात आली आहे, तर चोरीने वापरलेल्‍या युनिटकरीता सामनेवाले क्र. 1 यांना देयक येण्‍याचा प्रश्‍नच उद्भवत नाही व त्‍यामुळे तक्रारदार व इतर सदस्‍यांवर विज देयकाचा जादा बोजा पडण्‍याची शक्‍यताही नाही.

  6. तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीचे पृष्‍ठ क्र. 25 वर त्यांनी पाठविलेल्‍या पत्राचा रिलायन्‍स एनर्जी यांनी दि. 22/09/2014 रोजी दिलेल्‍या जबाबाची प्रत दाखल केली. त्‍याचे अवलोकन केले असता तयामध्‍ये त्‍यांनी त्‍याबाबत आवश्‍यक कारवाई केली आहे व अनधिकृत जोडणी खंडीत करण्‍यात आलेली आहे असे नमूद आहे. यावरुन असे दिसून येते की तक्रार दाखल करण्‍याचेदिवशी अनधिकृत विज जोडणी अस्तित्‍वात नव्‍हती.

  7. सबब वरील चर्चेवरुन आमच्‍यामते तक्रारदार यांना या मंचात तक्रार दाखल करण्‍याकरीता कोणतेही कारण उद्भवत नाही. अनधिकृत जोडणीबाबत रिलायन्‍स एनर्जी ही आवश्‍यक कारवाई करीत आहे.

              सबब खालील आदेशः

 

                      आ दे श

 

  1. तक्रार क्र. 323/2015 ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.

  2. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.

     

       

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.