Maharashtra

Thane

CC/326/2015

D P Shetye ,Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd - Complainant(s)

Versus

Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd - Opp.Party(s)

18 Jun 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/326/2015
 
1. D P Shetye ,Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd
At Shop No 8, Mira village Mira Rd, Thane 401104
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Krishansthal Shrikripa Coop Hsg Soc Ltd
At Mira village Mira Road, Thane 01104
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 18 Jun 2015

           तक्रार दाखलकामी आदेशः

 

  1. तक्रारदार यांना तक्रार दाखल सुनावणीकामी ऐकण्‍यात आले होते.

  2. तक्रार व त्‍यासोबतची कागदपत्रे पाहण्‍यात आली. तक्रारदार व त्‍यांची बहीण हे दुकान क्र.8, इमारत क्र. 2 मधील ताबेदार आहेत व हे दुकान सामनेवाले गृहनिर्माण संस्थेत आहे. तक्रारदार हे सामनेवाले यांचे सदस्‍य आहेत. तक्रारदारांनी त्‍यांचे दुकानामध्‍ये पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा व्‍हावा याकरीता अर्ज केला व महानगर गॅस कंपनी लि.चे व्‍यक्‍ती दि. 27/06/2014 रोजी गॅस जोडणी करीता आले असतांना त्‍यांना सामनेवाले संस्‍थेचे मानद सचिव श्री. ए.के. उपाध्‍ये यांनी ‘दुकानात पुरवठा करु नये’, असे कोणतेही कारण न देता सांगितले व त्‍यांना धमकी देऊन जबरदस्‍तीने तेथून काढून दिले. तक्रारदारांना या घटनेबाबत काशिमिरा पोलिस स्‍टेशन येथे त्‍याचदिवशी रिपोर्ट दाखल केला. तक्रारदारांनी ही तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी सेवा देण्‍यामध्‍ये कसूर केल्‍यामुळे त्‍यांना मानसिक त्रास व इतर मागण्‍यांकरीता दाखल केली आ

  3. तक्रारीमधील घटना ही दि. 27/06/2014 रोजीची आहे. या घटनेबद्दल त्‍याचदिवशी पोलिस रिपोर्ट देण्‍यात आला होता. त्‍यामध्‍येसुदा ही घटना नमूद आहे. वरील घटना लक्षात घेता, ती पूर्णतः फौजदारी स्‍वरुपाची आहे. आमच्‍यामते त्‍याबाबत हा मंच दखल घेऊ शकत नाही. तक्रारदार यांचेप्रमाणे जर सामनेवाले यांनी धमकी व जबरदस्‍ती केली असेल तर ती सेवा देण्‍यात कसूर केला असे म्‍हणता येणार नाही. हा वाद ग्राहक वाद म्‍हणता येणार नाही.

 

              सबब खालील आदेशः

 

                      आ दे श

 

  1. तक्रार क्र. 326/2015 ही ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) प्रमाणे फेटाळण्‍यात येते.

  2. तक्रारदार लिमिटेशन कायदयाच्‍या तदतूदीच्‍या अधिन राहून योग्‍य त्‍या न्‍यायालयात घटनेबाबत तक्रार करु शकतात.

  3. या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना टपालाने निःशुल्‍क पाठविण्‍यात याव्‍यात.

     

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.