जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/288 प्रकरण दाखल तारीख - 30/12/2009 प्रकरण निकाल तारीख – 05/03/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्री.सतीश सामते. - सदस्य सौ.कविता भ्र.प्रेमचंद भातावाले, वय 48 वर्षे, व्यापार व घरकाम, अर्जदार. रा.ईतवारा,नांदेड. मार्फत, मुख्यारनामा धारक, प्रेमचंद छबुलाल भातावाले. विरुध्द. क्रिपाल आर.कोटवाणी, वय 48 वर्षे, व्यवसाय व्यापार, गैरअर्जदार. रा.41/अ,केवडावाडी जेल रोड, जुनागढ, गुजरात. अर्जदारा तर्फे वकील - अड.ए.एस.चौधरी. गैरअर्जदार तर्फे वकील - एकतर्फा निकालपत्र (द्वारा- मा.श्री.सतीश सामते,सदस्य) गैरअर्जदार क्रिपाल आर.कोटवाणी रा.जुनागढ, गुजरात यांनी अर्जदार यांचे मे.मॉसाब दातार कोल्ड स्टोरेज या नांदेडमधील शितगृहास लागणारे यंत्रसामग्रीची पुरवठा केली नाही म्हणुन अर्जदार यांनी ही तक्रार नोंदविली आहे. अर्जदार यांना – 18 ते – 20 डीग्री सेल्सीअस तापमान असलेले एक शीतगृहासाठी दुग्ध विकास महामंडळाने अर्जदाराची निवीदा स्विकारली. दुग्ध उत्पादन साठविण्यासाठी शितगृह सुरु करावयाची होती म्हणुन त्यांनी गैरअर्जदार यांच्याशी संपर्क करुन शितगृह उभारणीसाठी येणारा खर्च रु.3,51,000/- असेल असे कोटेशन घेतले. याप्रमाणे दि.21/04/2009 रोजी करारनामा करण्यात आला व अर्जदाराने त्याच दिवशी रु.50,000/- दिले व उरलेले रक्कम रु.2,51,000/- ही दि.25/04/2010 व दि.25/05/2010 रोजी धनादेशद्वारे गैरअर्जदारास दिले व दि.07/05/2009 पर्यंत गैरअर्जदाराने शितगृह सुरु करुन द्यावे अन्यथा रु.2,000/- पती दिन देण्याचे मान्य केले. त्यांच्यावर विश्वास ठेवुन अर्जदाराने ऑडर्स घेतल्या. परंतु गैरअर्जदारांनी अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब करुन लागणारे यंत्रसामग्री ही जुनी पाठविली, जुने यंत्रसामग्री स्विकारण्यास अर्जदाराने स्पष्ट नकार दिला व तसे दि.04/06/2009 रोजी दुरध्वनीवरुन गैरअर्जदारास सांगीतले व पत्र पाठविले,शीतगृह हे वेळेत सुरु न झाल्यामुळे अर्जदार हे अडचणी आला व येणा-या समस्यांना तोंड देणे नुकसान भरपाई देणे अशा प्रकारच्या दाव्यांना समोर जावे लागले म्हणुन त्यांनी गैरअर्जदारांशी तडजोड करुन जुने यंत्रसामग्री स्विकारण्यासाठी दि.11/07/2009 रोजी एक करारनामा साक्षीदारा समक्ष नांदेड येथे करण्यात आला व या मोबदल्यात कबुल केलेल्या एकंदरीत किंमतीतुन रु.50,000/- कमी करावे असे ठरले व एक जुना एअर कटर विना मोबदला द्यावा असे ठरले व दि.21/04/2009 चे करारनामातील दंड रु.2,000/- ही अट शिथील करण्याचे ठरले व गैरअर्जदाराने दि.12/07/2009 पर्यंत शीतगृह सुरु करुन द्यावे असे मान्य केले. ठरल्याप्रमाणे दि.25/04/2010 चा एस.बी.आय.चा रु.00,000/- चा धनादेश व दुसरा रु.50,000/- चा धनादेश देण्यात आला परंतु गैरअर्जदार हे शीतगृह सुरु न करता निघुन गेले. अर्जदाराला शीतगृह कोणत्याही परिस्थीतीत सुरु करणे आवश्यक होते. त्यामुळे लोकल मेकॅनिकला बोलावुन शीतगृह दि.15/07/2009 ला सुरु केला. परंतु या मेकॅनिकास शीतगृह उभारण्याचा पुरेसे ज्ञान नसल्यामुळे सदरील शीतगृह सुव्यवस्थीतीत चालत नाही तसेच त्यामुळे -18 ते – 20 डिग्री तापमान नेहमी राहत नाही त्यामुळे अर्जदाराने दि.15/09/2009 ला गैरअर्जदारास नोटीस पाठविली, याचे गैरअर्जदाराने उत्तर दिले नाही. शीतगृह वेळेत सुरु न झाल्यामुळे व व्यवस्थित न झाल्यामुळे अर्जदाराचे अतोनात नुकसान झाले म्हणुन अर्जदाराची मागणी आहे की, गैरअर्जदाराने अर्जदाराचे शितगृह व्यवस्थीत व योग्यरित्या सुरु करावा, यासाठी निर्देश देण्यात यावे तसेच हे शीतगृह व्यवस्थीत चालेपर्यंत एस.बी.आय.चे दि.25/04/2010 चे रु.50,000/- धनादेश क्र.696781 व दि.25/05/2010 चे रु.76,000/- क्र.570565 दि.25/06/2010 चे रु.75,000/- धनादेश क्र.570565 हे वटविण्यासाठी मनाई हुकूम द्यावा. दि.07/05/2009 ला शीतगृह सुरु केले नाही म्हणुन प्रती दिन रु.2,000/- दंड असे दि.13/10/2009 पर्यंत रु.3,80,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळण्याचे आदेश व्हावेत व यासाठी पुढील प्रत्येक दिवसासाठी रु.2,000/- दंड करण्यात यावे. गैरअर्जदाराने करारातील अटी व शर्तींचा भंग केल्यामुळे व मानसिक त्रासापोटी रु.50,000/- देण्याचे आदेश व्हावे व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- असे एकुण रु.4,45,000/- या रक्कमेवर 12 टक्के व्याजही मिळावे अशी मागणी केली आहे. अर्जदाराने पुरावा म्हणुन आपले शपथपत्र व दाखल केलेले दस्तऐवज तसेच वकीला मार्फत केलेला युक्तीवाद ऐकुन खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदाराचे प्रकरण दाखल करुन घेण्यास कार्यक्षेत्र येते काय? होय. 2. गैरअर्जदाराच्या सेवेतील त्रुटी अर्जदार सिध्द करतात काय? होय. 3. अर्जदार हे नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र आहेत काय? होय. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्या क्र. 1 गैरअर्जदाराचे प्रतीनीधी नांदेड येथे येऊन त्यांनी शीतगृहासाठी लागणारी मशीनरी पुरविण्यासाठी व ती नांदेडलाच उभारण्यासाठी जे करार केला तो नांदेड येथे केला आहे व याची रक्कम अदायगी देखील नांदेड येथेच करण्यात आली जेंव्हा गैरअर्जदाराने मशीनचा पुरवठा नांदेड येथे करुन व ती व्यवस्थित उभारण करुन सुरु करुन द्यायची होती तेंव्हा कॉज ऑफ एक्शन ही नांदेड येथीलच असल्या कारणाने नांदेड मंचास कार्यक्षेत्र येते. मुद्या क्र. 2 गैरअर्जदार रुपको सेल्स यांनी दि.21/04/2009 ला अर्जदाराचे मे.मॉसाब दातार कोल्ड स्टोरेज या शीतगृहासाठी कोटेशन दिले जे की, रु.3,51,000/- चे आहे. यानंतर अर्जदाराने दोघात झालेला करारनामा दाखल केलेला आहे, या करारनामा प्रमाणे अर्जदाराने धनादेश क्र.570563,570564 व 570565 दि.25/04/2010 ला रु.2,51,000/- दिलेले आहेत. करारनामातील अटीप्रमाणे हे कोल्ड स्टोरेज दि.07/05/2009 पर्यंत उभारुन सुरु करुन द्यायची होती व असे गैरअर्जदार न केल्यास त्यास रु.2,000/- प्रती दिन दंड लावण्यात यावे असे ही करारनामात नमुद केलेले आहे, ती गैरअर्जदाराने असे केलेले नाही व अर्जदाराचे नियमाप्रमाणे त्यांना दि.04/06/2009 पर्यंत जुने यंत्रसामग्री पाठविली व हे घेण्यास अर्जदाराने नकार दिला. अर्जदाराचे दुग्ध विकास महामंडळ यांनी निवीदा स्विकारली होती. दुग्ध पदार्थ ठेवण्यासाठी शीतगृह सुरु करण्यास त्यांना सांगीतले हे काम वेळेत होणे शक्य होते हे जर वेळेस झाले नाही तर महामंडळ यांना दंड लावणार होते त्यामुळे नाईलाजास्तव शवेटी अर्जदाराने दुसरा एक करारनामा करुन जुने यंत्रसामग्री स्विकारण्याची तयारी दर्शविली व त्यासाठी गैरअर्जदार यांनी त्यांना रु.50,000/- एकुण रक्कमेतुन कमी करावेत असे म्हटले होते. हा दुसरा दि.03/07/2009 रोजी केलेला करारनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. या करारनामाप्रमाणे वर सांगीतलेल्याय गोष्टीस दुजोरा मिळतो व हेही काम गैरअर्जदाराने वेळेत पुर्ण न करता म्हणजे दि.12/07/2009 ला हे शीतगृह सुरु करुन देणे आवश्यक असतांना गैरअर्जदाराने निघुन गेला. त्यामुळे अर्जदाराचे नियमाप्रमाणे त्यांनी ते कोल्ड स्टोरेज लोकल मेकॅनिक यांचेकडुन सुरु करुन घेतला परंतु ते व्यवस्थीत चालत नव्हते व – 18 ते – 20 डीग्री तापमान मेंटेन होत नव्हते. वरील सर्व बाबी पाहीले असता, अर्जदार यांनी कबुल केल्याप्रमाणे त्यांना पुर्ण मशीनरी मिळालेले आहेत परंतु या मशीनची उभारणी व्यवस्थीत झाली नाही हे दिसुन येते, ही गैरअर्जदाराची जबाबदारी होती. एकंदरीत पहाता गैरअर्जदाराने करारनामातील अटी व शर्ती पुर्ण केल्या नाहीत व पुरविलेल्या मशीनचे इन्स्टॉलमेंट व्यवस्थीत केले नाही. त्यामुळे अर्जदारास नाहक मानसिक त्रास सोसावा लागला शिवाय नुकसान भरपाई सोसावी लागली हे स्पष्ट दिसुन येते. गैरअर्जदाराने आपले कर्तव्य पार न पाडुन सेवेत अनुचित प्रकार केलेलाच आहे व त्यासाठी त्यांना दंड लावणे अपेक्षित आहे. मुद्या क्र. 3 अर्जदार यांनी दिलेले चेक क्र. 570563,570564 व 570565 एस.बी.आय. हे वटवीणे थांबवणेसाठी म्हटले आहे परंतु यासाठी जवळपास पाच महिन्याचा काळ निघुन गेला आहे. गैरअर्जदाराने आतापर्यंत धनादेश वटविले असणार त्यामुळे असा आदेश करणे योग्य होणा नाही. यात प्रती दिन रु.2,000/- दंड करतो असे लिहले आहे परंतु गैरअर्जदाराने दि.15/07/2009 ला लोकल मेकॅनिकला बोलावून शीतगृह सुरु केला असे म्हटले आहे. हे शीतगृह सुरुच झाले नसते तर गैरअर्जदारास प्रती दिन रु.2,000/- करारनामातील अटीप्रमाणे दंड लावले असते परंतु आता अर्जदाराचे असे आक्षेप आहे की, ते व्यवस्थीत चालत नाही म्हणजे चालु आहे, ही मशीन व्यवस्थीत न झाल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदाराकडुन ही मशीन योग्यरित्या इन्स्टॉलेशन करुन घेण्यासाठी पात्र आहे व अर्जदार यांचे नुकसान त्यांच्यामुळे झाले म्हणुन नुकसान भरपाई देण्यासाठी बांधील आहेत. म्हणुन गैरअर्जदाराने अर्जदारास नुकसान भरपाई मानिसिक त्रास व इतर दंडापोटी रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहेत. वरील सर्व बाबींचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश. 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज मंजुर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत अर्जदार यांचे मे.मॉसाब दातार कोल्ड स्टोरेज एम.आय.डी.सी.नांदेड येथील शीतगृहासाठीचे त्यांनी पुरवठा केलेले यंत्र सामग्री टेक्नीकलरित्या व्यवस्थीत इन्स्टॉलेशन करुन सुरु करुन द्यावी व यासाठी पुढील सहा महिन्यासाठी ती व्यवस्थीत चालेल याची गॅरंटी द्यावी, यासाठी लागणारा सर्व खर्च गैरअर्जदाराने करावे. 3. अर्जदारास झालेल्या नुकसान भरपाई व मानसिक त्रास या पोटी गैरअर्जदाराने अर्जदारास रु.1,00,000/- द्यावेत, असे न केल्यास यावर यानंतर 12 टक्के व्याजाने पुर्ण रक्कम मिळेपर्यंत व्याजासह द्यावे. 4. गैरअर्जदारांनी अर्जदारास दावा खर्चा पोटी रु.2,000/- द्यावे. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष सदस्य गो.प.निलमवार.लघूलेखक. |