नि.नं. ३०
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
मा.सदस्या – श्रीमती सुरेखा बिचकर
ग्राहक तक्रार अर्ज क्र. १७३/२००८
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीख – १३/०२/२००८
तक्रार दाखल तारीखः – १५/०२/२००८
निकाल तारीखः - २०/०९/२०११
----------------------------------------------
१. श्री पांडुरंग रामचंद्र पाटील
वय वर्षे ६९, धंदा – शेती
रा.देवर्डे, ता.वाळवा, जि.सांगली .... तक्रारदार
विरुध्द
१. क्रांतीसिंह नाना पाटील नागरी सह. पतसंस्था मर्या. इस्लामपूर
ता.वाळवा तर्फे सचिव – श्री.परशुराम पांडूरंग पाटील
मु.पो.इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.
२. क्रांतीसिंह नाना पाटील नागरी सह. पतसंस्था मर्या. इस्लामपूर
ता.वाळवा तर्फे चेअरमन – श्री.आनंदराव शामराव पाटील
मु.पो.इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.
३. श्री संपतराव नारायण पाटील, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.पेठ, ता.वाळवा.
४. श्री विलासराव मारुती पाटील, व.व. सज्ञान, धंदा-नोकरी,
रा.देवकर पाणंद, कोल्हापूर, जि.कोल्हापूर.
५. श्री प्रतापराव मारुती पाटील, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.कासेगांव, ता.वाळवा, जि.सांगली.
६. श्री विश्वासराव शंकरराव पाटील (खेडकर डॉक्टर)
व.व. सज्ञान, धंदा – वैद्यकीय व्यवसाय
रा.पाटील गल्ली, उरुण इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.
७. श्री सतिश बहिरव चरापले, व.व. सज्ञान, धंदा-व्यापार,
रा.आदर्श बालक मंदिरजवळ, राजमाने दुकानाजवळ,
उरुण-इस्लामपूर, ता.वाळवा, जि.सांगली.
८. श्री बाबासो आनंदराव पाटील, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.तांदुळवाडी, ता.वाळवा जि.सांगली
९. श्री दिनकर धोंडी पाटील, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.करंजवडे, ता.वाळवा, जि. सांगली.
१०. श्री जगन्नाथ लक्ष्मण गुरव, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा. करंजवडे, ता.वाळवा जि.सांगली
११. श्री प्रतापराव पांडूरंग पाटील, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.मायाक्का देवाजवळ, आंबेडकर नाक्यानजीक, कॉर्नरला,
सांगली रोड इस्लामपूर, ता.वाळवा, जि. सांगली.
१२. श्री विलास पांडूरंग रोकडे, व.व. सज्ञान, धंदा-नोकरी,
रा.दत्त टेकडीजवळ, कामेरी रोड, इस्लामपूर,
ता.वाळवा, जि.सांगली.
१३. श्री सर्जेराव बाबुराव बोडरे, व.व. सज्ञान, धंदा-शेती,
रा.रामोशी गल्ली, कोर्टाजवळ,
इस्लामपूर, ता.वाळवा.
१४. सौ.आरती विजय पाटील, व.व. सज्ञान, धंदा-नोकरी,
रा.पाटील गल्ली, उरुण इस्लामपूर,
ता.वाळवा, जि.सांगली. ..... जाबदार
तक्रारदार तर्फेः +ìb÷. श्री व्ही.व्ही.कुलकर्णी
जाबदार क्र.१, व २ तर्फेः +ìb÷. श्री.जे.व्ही.पाटील
जाबदार क्र.३ ते १४ – एकतर्फा
नि का ल प त्र
द्वारा- मा. सदस्या- गीता घाटगे
१. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार पतसंस्थेने मुदत ठेवी अन्वये गुंतविलेली रक्कम परत दिली नाही म्हणून तक्रारदारांनी सदरहू तक्रार अर्ज दाखल केला आहे. याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदार यांनी जाबदार क्रांतीसिंह नाना पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. इस्लामपूर, ता.वाळवा (ज्यांचा उल्लेख यापुढे ‘पतसंस्था’ असा केला जाईल) यांचेकडे रक्कम गुंतविली होती. या ठेवीची मुदत पूर्ण झाली आहे. तक्रारदारांनी गुंतविलेल्या रकमेची पतसंस्थेकडे मागणी केली असता पतसंस्थेने ती देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे. सबब, आपल्याला रक्कम देवविण्यात यावी अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. तक्रारदारांनी तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ प्रतिज्ञापत्र व नि.५ अन्वये एकूण ३ कागदपत्रे मंचापुढे दाखल केली आहेत.
२. प्रस्तुत प्रकरणातील जाबदार क्र.३ ते १४ यांचेवर मंचाच्या नोटीसीची बजावणी होऊनसुध्दा ते प्रस्तुत प्रकरणी हजर झाले नाहीत. सबब, सदरहू प्रकरणी त्यांचेविरुध्द नि.१ वर एकतर्फा आदेश करण्यात आले.
३. प्रस्तुत प्रकरणी जाबदार क्र.१ व २ यांनी मंचाच्या नोटीसीची बजावणी त्यांचेवर झालेवर विधिज्ञांमार्फत हजर होवून त्यांचे म्हणणे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले. त्यांचे म्हणण्यामध्ये त्यांनी तक्रारदार यांचा तक्रार अर्ज व त्यातील कथने अमान्य केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार पतसंस्थेमध्ये ठेव काढणा-यांची संख्या जास्त असल्याकारणाने व कर्जदारांच्याकडून कर्ज वसूली करुन घेण्याचे काम चालू असल्याने त्यांना ठेवीदारांच्या ठेवी परत करणे अवघड होत आहे. तक्रारदारांची ठेव रक्कम देण्यास त्यांनी कधीही नकार दिलेला नाही परंतु सद्य परिस्थितीत सर्व ठेवीदारांचे पैसे परत करणे संस्थेला अशक्य आहे. ज्याप्रमाणे पतसंस्थेची कर्जवसूली होईल त्याप्रमाणे ते ठेवीदारांना पैसे देण्यास तयार आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी जी दुषीत सेवा दिल्याची तक्रार केली आहे ती त्यांनी अमान्य करुन तक्रारदारांचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. तसेच त्यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्णसेवा दिलेली नसल्याने व विनाकारण तक्रारदारांनी त्यांचेविरुध्द तक्रार अर्ज दाखल केला असल्याने सदरहू तक्रार अर्जाच्या खर्चाची मागणीही जाबदारांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये केलेली आहे. म्हणण्याच्या पृष्ठयर्थ जाबदार यांनी नि.१५ अन्वये प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
४. सदरहू प्रकरणी जाबदारांचे म्हणणे दाखल झाल्यानंतर तक्रारदाराने प्रतिउत्तर व त्यांचा लेखी युक्तिवाद दाखल केला. त्यानंतर नि.२७ अन्वये तक्रारदारांनी व्याजाचे लेखी निवेदन प्रस्तुत प्रकरणी दाखल केले.
५. तक्रार अर्जात तक्रारदार यांनी सर्व संचालकाविरुध्द आदेश करावा अशी केलेली मागणी याचा विचार करता तक्रारदार यांची रक्कम देण्यास जाबदार पतसंस्थेबरोबरच सर्व संचालक वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार राहतील किंवा कसे हा मुददा उपस्थित होतो. या मुद्याच्या अनुषंगाने सन्मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने रिट पिटीशन नं. ५२२३/०९ सौ.वर्षा इसाई विरुध्द राजश्री चौधरी या कामी दिनांक २२ डिसेंबर २०१० रोजी जो निर्णय दिला आहे. त्याचे अवलोकन करता त्यामध्ये पुढील प्रमाणे निष्कर्ष काढल्याचे दिसून येते. However, So far as members of the managing committee/directors are concerned, they stand on different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra co. op. societies act 1960 is followed and unless the liability is fixed against them they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.
सन्मा. उच्च न्यायालयाने वर दिलेल्या या निष्कर्षाचा विचार करता तक्रारदारांनी महाराष्ट्र सहकार कायदयातील कलम ८८ अन्वये चौकशी होऊन सर्व संचालकांना जबाबदार धरुन त्यांचे दायित्व निश्चित केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. ही बाब प्रस्तुत प्रकरणी लक्षात घेणे अत्यंत महत्वाचे असल्याचे मंचास वाटते आणि म्हणून जाबदार क्र. २ ते १४ यांना पुराव्या अभावी तक्रारदाराची रक्कम देण्यास संयुक्तिक अथवा वैयक्तिकरित्या जबाबदार धरता येणार नाही असा मंचाचा निष्कर्ष निघतो व पर्यायाने रकमेची मागणी करुनही ती न देवून पतसंस्थेने तक्रारदारांना दूषित सेवा दिल्याने ज्या पतसंस्थेमध्ये ठेव गुंतविलेली आहे, ती पतसंस्थाच तक्रारदाराच्या ठेवीसाठी सर्वस्वी जबाबदार ठरते असाही मंचाचा निष्कर्ष निघतो. सचिव हे पतसंस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांचेविरुध्द कोणताही आदेश करणेत येत नाही.
६. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी जे व्याजाचे लेखी निवेदन दाखल केले आहे त्यामध्ये त्यांना ठेवपावतीवर कोणत्याही प्रकारचे व्याज प्राप्त झाले नसल्याचे कथन केले आहे. सदरहू ठेवपावतीची मुदत पूर्ण झालेली आहे या बाबींची दखल घेवून तक्रारदाराने ठेवपावतीत गुंतविलेली रक्कम ठेव ठेवल्यातारखेपासून पावतीवर नमूद व्याजदराने मंजूर करण्यात येत आहे. तर तक्रार अर्जाचा खर्च म्हणून तक्रारदारांना रक्कम रु.२,०००/- मंजूर करण्यात येत आहे.
सबब, मंचाचा आदेश की,
आदेश
१. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना मुदत ठेव पावती क्र.२६३५ मधील रक्कम रु.५०,०००/- (पन्नास हजार फक्त) दि.१६/११/२००६ पासून संपूर्ण रकमेची फेड होईपर्यंत द.सा.द.शे. १० टक्के व्याजासह अदा करावी.
२. यातील जाबदार पतसंस्था व पतसंस्थेतर्फे अधिकृत प्रतिनिधी यांनी तक्रारदारांना शारिरिक, मानसिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी म्हणून रक्कम रु.२,०००/- (दोन हजार फक्त) अदा करावेत.
३. वर नमूद आदेशांची अंमलबजावणी जाबदार पतसंस्थेने दि.१५/११/२०११ पर्यंत न केल्यास तक्रारदार त्यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदी अंतर्गत प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दिनांकò: २०/०९/२०११
(सुरेखा बिचकर) (गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली. जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.
|ÉiÉ : iÉGòÉ®únùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½ÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११
VÉɤÉnùÉ®ú ªÉÉÆxÉÉ ½þÉiÉ{ÉÉä½þÉäSÉ/®úÊVÉ.{ÉÉä¹]õÉxÉä Ênù. / /२०११