Maharashtra

Nagpur

CC/378/2019

SHRI. BHUPENDRA MANOHAR GAJBHIYE - Complainant(s)

Versus

KRC CELEBRATION, THROUGH AUTHORISED SIGNATORY AND OWNER SHRI. AYYAJ ALI SAYYAD - Opp.Party(s)

ADV. MR. SOUMAN S SARKAR

06 Feb 2020

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/378/2019
( Date of Filing : 05 Jul 2019 )
 
1. SHRI. BHUPENDRA MANOHAR GAJBHIYE
R/O. PLOT NO. 47/A, SHINGNE LAYOUT, EKTA NAGAR, BORGAON, GOREWADA ROAD, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. KRC CELEBRATION, THROUGH AUTHORISED SIGNATORY AND OWNER SHRI. AYYAJ ALI SAYYAD
PALOTI NAGAR, NEAR PALOTI CHURCH, MANKAPUR, GOREWADA RING ROAD, NAGPUR-440013
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Feb 2020
Final Order / Judgement

(आदेश पारित व्‍दारा- श्री एस.आर.आजने, मा. सदस्‍य)

  1. तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा, १९८६ चे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी यांनी त्‍यांच्‍या मुलीचे दुस-या वाढदिवसाकरीता विरुध्‍द पक्ष यांचेकडे दिनांक ८/१/२०१९ ला संपर्क साधला व त्‍यांचे मुलीचे दिनांक ३/५/२०१९ ला साजरा करावयाचा वाढदिवसाकरीता विरुध्‍द पक्षाचे सेलिब्रेशन हॉल मधील लॉन २४० प्रति व्‍यक्‍ती प्रमाणे ५०० लोकांचे व्‍यवस्‍थेकरीता एकुण रुपये १,२०,०००/-  इतक्‍या रकमेमध्‍ये आरक्षीत केला. यामध्‍ये जेवणाचा समावेश होता परंतु मुख्‍यव्‍दाराचे तसेच स्‍टेज चे सजावटीचा समावेश नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने सेलिब्रेशन हॉल मधील लॉन चे बुकींगपोटी विरुध्‍द पक्षाला रुपये ६०,०००/- आगाऊ रक्‍कम दिनांक ८/१/२०१९ रोजी अदा केली. विरुध्‍द पक्षाने लॉन कन्‍फरमेशन बाबत पावती तक्रारकर्त्‍याला दिली. मधल्‍या काळात तक्रारकर्ता वाढदिवसाच्‍या इतर व्‍यवस्‍थेत उदा. बर्थडे कार्ड प्रिंटींग, केक आणि डेकोरेशन वर इत्‍यादी कामात व्‍यस्‍त होते. ३ महिण्‍यांच्‍या कालावधीनंतर विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक २/४/२०१९ रोजी फोन करुन विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात बोलाविले. तक्रारकर्ता व त्‍यांची पत्‍नी विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात गेले असता विरुध्‍द  पक्षाने एकही शब्‍द न बोलता रुपये ६०,०००/- इतक्‍या रकमेचा धनादेश क्रमांक ०००१०६, दिनांक २/४/२०१९  कोटक महिंद्रा बॅंक, नागपूर तक्रारकर्त्‍याला दिला. जेव्‍हा तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला विचारणा केली असता विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिनांक ३/५/२०१९ चे त्‍याने केलेले बुकींग रद्द झाल्‍याचे कळविले. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याला शॉक बसला व अशा परिस्‍थीतीत काय करावे असे सुचेनासे झाले. कारण तक्रारकर्त्‍याच्‍या मुलीचे वाढदिवसाचे कार्ड चे वाटप नातेवाईक व इतर मिञ म‍ंडळींना करण्‍यात आली होती व पाहुण्‍यांना कार्यक्रमानिमीत्‍त निमंञणे दिली होती. तक्रारकर्त्‍याने सदरचा धनादेश इंडियण ओव्‍हरसिज बॅंक, मेन ब्रॅन्‍च नागपूर यांचेकडे जमा केले असता सदरचा धनादेश अपु-या रकमेअभावी बॅंकेने तक्रारकर्त्‍याला परत केला.  तक्रारकर्त्‍याने संबंधीत धनादेश अपु-या रकमेअभावी परत आल्‍याबाबत विरुध्‍द पक्षाला कळविले असता विरुध्‍द पक्षाने दोन दिवसात धनादेशाचे पैसे मिळतील असे तक्रारकर्त्‍याला सांगितले. दिनांक ३/४/२०१९ ला विरुध्‍द पक्षाने रुपये ६०,०००/- पैकी रुपये २०,०००/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात ऑनलाईन ट्रान्‍सफर केले. त्‍यानंतर दिनांक ८/४/२०१९ ला तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात उर्वरीत रक्‍कम मिळण्‍याकरीता गेला असता विरुध्‍द पक्षाने रुपये १५,०००/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात दिनांक ८/४/२०१९ ला ऑनलाईन व्‍दारे जमा केले व उर्वरीत रक्‍कम रुपये २५,०००/- चालु आठवड्यात तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा करण्‍याचे आश्‍वासन विरुध्‍द पक्षाने दिले. परंतू विरुध्‍द पक्षाने दिलेल्‍या आश्‍वासनाप्रमाणे उर्वरीत रक्‍कम तक्रारकर्त्‍याच्‍या  खात्‍यात जमा न केल्‍यामुळे तक्रारकर्ता पुनश्‍च विरुध्‍द पक्षाचे कार्यालयात दिनांक २६/०४/२०१९ ला गेला त्‍यावेळी विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात रुपये १०,०००/- ऑनलाईन व्‍दारे जमा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला उर्वरीत रक्‍कम रुपये १५,०००/- ची मागणी केली परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रक्‍कम देण्‍यास मनाई केली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍दपक्षाला उर्वरीत रकमेची मागणी केली. परंतु प्रत्‍येक वेळेस विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याला चुकीचे आश्‍वासन दिले व उर्वरीत रक्‍कम परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्ता व त्‍याचा कुटुंबीयांना विरुध्‍द पक्षाच्‍या वागणुकीमुळे ञास झाला व तक्रारकर्त्‍याला मुलीचे वाढदिवसाकरीता ऐन वेळेवर इतरञ व्‍यवस्‍था करण्‍यापोटी जास्‍तीची रक्‍कम रुपये ५०,०००/- खर्ची  घालावी लागली. विरुध्‍द पक्षाचे सेवेतील ञुटीमुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला दिनांक २८/५/२०१९ ला कायदेशीर नोटीस पाठविली व त्‍याव्‍दारे बुकींग रक्‍कम रुपये १५,०००/- व अतिरीक्‍त व्‍यवस्‍थापोटी लागलेला खर्च रुपये ५०,०००/- व मानसिक, शारिरीक ञासापोटी रुपये ५०,०००/- ची मागणी केली परंतु विरुध्‍द  पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या नोटीस ची दखल घेतली नाही करीता तक्रारकर्त्‍याने मा. मंचासमोर तक्रार दाखल करुन खालिलाप्रमाणे मागणी केली आहे.
  1. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिल्‍याचे घेाषित करावे.
  2. विरुध्‍दपक्षाला निर्देश देण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याकडुन लॉन बुकींगपोटी घेतलेली उर्वरीत रक्‍कम रुपये १५,०००/- परत करावे व तक्रारकर्त्‍याला डेकोरेशन, बर्थडे कार्ड व इतर कामाकरीता कराव्‍या लागलेल्‍या अतिरीक्‍त खर्चाबाबत रुपये ५०,०००/- अदा करावे.
  3. मानसिक व शारिरीक ञासाकरीता व तक्रारीचा खर्च अदा करावा.
  1. विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली परंतु विरुध्‍द पक्ष नोटीस प्राप्‍त होऊनही मंचात हजर झाले नाही करीता विरुध्‍दपक्ष विरुध्‍द  प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दिनांक ९/१०/२०१९ ला पारित करण्‍यात आला.
  2. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत  दस्‍तऐवजाची यादी मध्‍ये दाखल दस्‍तऐवजाचे अवलोकन केल्‍यावर तसेच लेखी युक्‍तीवाद आणि तोंडी युक्‍तीवाद ऐकल्‍यावर निकालीकामी खालिलप्रमाणे मुद्दे उपस्थित करुन त्‍यावरील निष्‍कर्षे खालिलप्रमाणे नमुद आहे.

   अ.क्र.                                    मुद्दे                                                    उत्‍तर

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                   होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?        होय
  3. काय आदेश ?                                                         अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/५/२०१९ ला साजरा करावयाचा त्‍याचे मुलीचे दुस-या वाढदिवसाकरीता विरुध्‍द पक्षाचे सेलिब्रेशन हॉल मधील लॉन रुपये २४० प्रति व्‍यक्‍ती प्रमाणे ५०० लोकांचे व्‍यवस्‍थेकरीता एकुण रुपये १,२०,०००/- इतक्‍या  रकमेमध्‍ये   आरक्षीत केला होता ज्‍यामध्‍ये जेवणाचा समावेश होता परंतु मुख्‍य व्‍दाराचे तसेच स्‍टेज चे सजावटचा त्‍यामध्‍ये समावेश नव्‍हता. तक्रारकर्त्‍याने सेलीब्रेशन हॉल मधील लॉन तसेच जेवणाचे बुकींगपोटी विरुध्‍दपक्षाला रुपये ६०,०००/- आगाऊ रक्‍कम दिनांक ८/१/२०१९ रोजी अदा केली. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत दाखल दस्‍ताऐवजाचे अवलोकन केल्‍यावर हे सिद्ध होते की तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला कोणतेही वाजवी कारण नसतांना स्‍वतःचे कार्यालयात दुरध्‍वनी व्‍दारे बोलावुन तक्रारकर्त्‍याला रुपये ६०,०००/- इतक्‍या रकमेचा धनादेश दिला व तक्रारकर्त्‍याने मुलीच्‍या वाढदिवसाकरीता आरक्षीत केलेला लॉन रद्द झाल्‍याचे कळविले. सदरचा धनादेश तक्रारकर्त्‍याने बॅंकेत वटविण्‍याकरीता सादर केला असता सदरचा धनादेश अपु-या निधी अभावी वटविण्‍यात आला नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षाकडे संपर्क साधला व बुकींगपोटी दिलेल्‍या रकमेची मागणी केली असता तक्रारकर्त्‍याने दिनांक ३/४/२०१९ रोजी रुपये २०,०००/- दिनांक ८/४/२०१९ रोजी रुपये १५,०००/- व दिनांक २६/०४/२०१९ रोजी रुपये १०,०००/- ऑनलाईन व्‍दारे तक्रारकर्त्‍याच्‍या  खात्‍यात जमा केले परंतु उर्वरीत रक्‍कम रुपये १५,०००/- दिले नाही. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे मुलीचे वाढदिवसाकरीता विरुध्‍दपक्षाकडे आरक्षीत केलेले लॉन कार्यक्रमाच्‍या एक महिण्‍याआधी रद्द केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला जास्‍तीची रक्‍कम अदा करुन मुलीचा वाढदिवस साजरा करावा लागला व त्‍यामुळे तक्रारकर्ता व त्‍याचे नातेवाईकांना वाढदिवसाचे निमंञन पञिका चे वाटप विरुध्‍द पक्षाचे लॉन रद्द होण्‍याच्‍या आधी केल्‍यामुळे मानसिक व शारिरीक ञासाला समोरे जावे लागले तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दिलेले धनादेश अपु-या रकमेअभावी वटविता न आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या  खात्‍यातुन दिनांक ३/४/२०१९ रोजी व दिनांक २९/०४/२०१९ रोजी बॅंकेने सेवा शुल्‍क  रुपये ११८ असे एकुण २३६ खर्ची घातली. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे  मुलीचे वाढदिवसापोटी आरक्षीत केलेले लॉन रद्द केले व लॉन आरक्षणापोटी स्विकारलेली रक्‍कम परत केली नाही ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती ञुटीपूर्ण सेवा आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला मुलीचे वाढदिवसाकरीता अतिरीक्‍त  खर्च व मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागला. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला आरक्षणापोटी स्विकारलेली रक्‍कम रुपये १५,०००/-  व बॅंकेने आकारलेले सेवा शुल्‍क रुपये २३६ असे एकूण रुपये १५,२३६/- अदा न करता तक्रारकर्त्‍याला ञुटीपूर्ण सेवा दिली असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे व खालिलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येत आहे.  

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.
  2. विरुध्‍द पक्षाला निर्देश देण्‍यात येते की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला एकूण रक्‍कम रुपये १५०००/- परत करावे व त्‍यावर दिनांक ८/१/२०१९ पासुन द.सा.द.शे. १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे तसेच रुपये २३६/- तक्रारकर्त्‍याला अदा करावे व त्‍यावर दिनांक २९/०४/२०१९ पासुन द.सा.द.से. १२ टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला रक्‍कम प्रत्‍यक्ष अदायगीपर्यंत अदा करावे
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मानसिक व शारिरीक ञास व आर्थिक नुकसानपोटी रुपये ३०,०००/- अदा करावे व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावा.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.