Maharashtra

Parbhani

CC/10/119

Shriram Degadouba Mudhane - Complainant(s)

Versus

Kranti Krashi Vikas Kendre,Parbhani - Opp.Party(s)

17 Aug 2010

ORDER


District Consumer Court,PARBHANIDistrict Consumer Court ,New Administrative Building,Near Telephone Bhavan PARBHANI
Complaint Case No. CC/10/119
1. Shriram Degadouba MudhaneR/o GagakhedParbhaniMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Kranti Krashi Vikas Kendre,Parbhanibaliraza Complex,Station road,ParbhaniParbhaniMaharashtra2. Dimaund Seeds pvt,ltd.413,Gadital Nourthtower Nataji Subhash Plase,Piteupura,Delihi-30 ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. C. B. Pandharpatte ,PRESIDENTHONABLE MRS. Sujata Joshi ,MemberHONABLE MRS. Anita Ostwal ,Member
PRESENT :

Dated : 17 Aug 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

निकालपत्र

 

                      तक्रार दाखल दिनांकः-   13/04/2010

                     तक्रार नोदणी दिनांकः- 19/04/2010

                        तक्रार निकाल दिनांकः- 17/08/2010

                                                                                    कालावधी 03 महिने  29 दिवस

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी

 

अध्यक्ष -         श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.                 

सदस्या                                                                                         सदस्या

  सुजाता जोशी B.Sc.LL.B.                                                     सौ.अनिता ओस्तवाल M.Sc.              

    

1     प्रा.विश्‍वनाथ मुंजाजी सोन्‍नर.               अर्जदारः-तक्रार क्रमांक 118/ 2010

निवृत्‍त प्राध्‍यापक/प्राचार्य.                             

वय 65 वर्षे.धंदा सध्‍या.शेती.                                 

रा.खळी ता.गंगाखेड.जि.परभणी.

2     श्री.श्रीराम दगडोबा मुंढे.                        अर्जदारः-तक्रार क्रमांक 119/2010

      वय 48 वर्षे.धंदा शेती.                       

रा.गंगाखेड.जि.परभणी.                    अर्जदारातर्फे अड.डी.यु.दराडे.

       विरुध्‍द

1     मे.क्रांती कृषी विकास केंद्र.                         गैरअर्जदार.

   बळीराजा कॉम्‍प्‍लेक्‍स,स्‍टेशन रोड,परभणी.         अड.संजय ए.केकान.                                                             

2     डायमंड सिड्स प्रा.लि.

   413,गडीतल नार्थेक्‍स टॉवर,नेताजी सुभाष प्‍लेस,

पितमपुरा,दिल्‍ली 110030

  -------------------------------------------------------------------------------------       

     कोरम  -    1)    श्री.सी.बी.पांढरपट्टे.      अध्‍यक्ष.

2)        सौ.सुजाता जोशी.                   सदस्या.                                              3)        सौ.अनिता ओस्तवाल.                 सदस्‍या.

-------------------------------------------------------------------------------------------------------                

                                 

 ( निकालपत्र पारित व्दारा श्री.सी.बी.पांढरपट्टे.अध्‍यक्ष.  )

     

      सदोष व निष्‍कृष्‍ट प्रतिच्‍या कलिंगड बियाणा बाबत प्रस्‍तुतच्‍या तक्रारी आहेत.

वरील दोन्‍ही प्रकरणातील अर्जदार मौजे खळी व गंगाखेड येथील रहिवासी शेतकरी आहेत.गैरअर्जदार नं 2 बियाणे उत्‍पादक डायमंड सिड्स प्रा.लि.दिल्‍ली असून गैरअर्जदार क्रमांक 1 बियाणे विक्रेता में क्रांती कृषी विकास केंद्र परभणी आहे.वरील दोन्‍ही प्रकरणात विरुध्‍द पक्षकार एकसमान आहेत.तसेच तक्रारीचे स्‍वरुप व त्‍यावर विरुध्‍द पार्टीने दिलेले लेखी जबाब एकसारखेच असल्‍याने संयुक्‍त निकालपत्राव्‍दारे निर्णय देण्‍यात येत आहेत.

अर्जदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की,

      मोशी पुणे येथे भरलेल्‍या किसान कृषी प्रदर्शनातील गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्‍या स्‍टॉल मधून माहिती घेवुन प्रकरण क्रमांक 118/2010 मधील अर्जदारने तारीख 19/02/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 बियाणे विक्रेत्‍याकडून कृष्‍णा आईस बॉक्‍स वाणाचे कलिंगड बियाणांची 20 ग्रॅमची 25 पाकीटे रु.550/- प्रमाणे एकुण 13750/- रुपयास खरेदी केली होती. त्‍यासोबत 10 ग्रँमची 5 पाकिटे बियाणे विक्रेत्‍याने मोफत दिली होती.प्रकरण 119/2010 मधील अर्जदारने तारीख 28/01/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्‍या दुकानातून कलिंगड बियाणांची 10 ग्रँमची 64 पाकिटे प्रतिनग 275/- प्रमाणे एकुण 17600/- रुपयास खरेदी केली होती त्‍यासोबत 10 ग्रँमची 6 पाकिटे मोफत मिळाली होती त्‍यानंतर पुन्‍हा 17/02/2010 रोजी 20 ग्रँमची 5 पाकिटे प्रत्‍येकी रु 550/- प्रमाणे एकुण 2750/- रुपयास खरेदी केली होती त्‍यासोबत 10 ग्रँमचे एक पाकिट मोफत मिळाले होते.

दोन्‍ही शेतक-याने अनुक्रमें ता.04/03/2010 आणि ता.14/02/2010 रोजी बियाणे आपल्‍या शेतात 10 फुट अंतरावर टोकण पध्‍दतीने प्रकरण 118/2010 मधील शेतक-याने 2 एकरात आणि प्रकरण 119/2010 मधील शेतक-याने 4 एकरात लागवड केली.त्‍यांचे म्‍हणणे असे की, कलिंगडाचे उत्‍पन्‍न मागील दोन ते चार वर्षां पासून घेत असल्‍यामुळे त्‍यांना त्‍याचा अनुभव आहे गैरअर्जदार क्रमांक 2 उत्‍पादक कंपनीच्‍या माहितीपत्रकामध्‍ये बियाणांची उगवण क्षमता 90 ते 95 टक्‍के आहे असे नमुद केले आहे परंतु प्रत्‍यक्षात लागवड केलेली बियाणे फारच कमी प्रमाणात उगवल्‍याचे दिसून आले.म्‍हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती गंगाखेड यांचेकडे तक्रारी नोंदवल्‍या त्‍यानुसार समितीच्‍या सभासदांनी ता.19/03/2010 रोजी दोन्‍ही अर्जदारांच्‍या शेताची समक्ष पाहाणी केली.त्‍याचे अहवाल दोघांनाही पाठविण्‍यात आले होते. प्रकरण 118/2010 मधील अर्जदाराच्‍या शेतातील बियाणांचे फक्‍त 32 टक्‍के उगवण झाल्‍याचे आणि प्रकरण 119/202010 मधील अर्जदाराचे शेतातील बियाणांचे फक्‍त 39 टक्‍के उगवण झाल्‍याचे अहवालात अभिप्राय दिला आहे. अर्जदारांचे पुढे म्‍हणणे असे की,गैरअर्जदार क्रमांक 2 उत्‍पादका तर्फे प्रसिध्‍द केलेल्‍या माहिती पत्रकात एकरी उत्‍पन्‍न 20 ते 21 टन उत्‍पन्‍न निघते असे नमुद केले आहे. त्‍यामुळे कलिंगडाचा बाजार भाव प्रतिटन रु 11000/- असल्‍याने प्रकरण 118/2010 मधील अर्जदाराचे 68 टक्‍के बियाणे उगवली नसल्‍याने रु 3,59,040/- आणि प्रकरण 119/2010 मधील अर्जदाराचे 61 टक्‍के उगवण झाली नसल्‍याने रु.6,44,160/- रु अपेक्षित उत्‍पन्‍नाची नुकसानी झाली ती नुकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी म्‍हणून ग्राहक मंचात प्रस्‍तुतच्‍या तक्रारी दाखल केलेल्‍या आहेत.वर नमुद केलेल्‍या नुकसान भरपाई खेरीज मानसिकत्रासापोटी प्रत्‍येकी रु. 1,00,000/- व अर्जाचा खर्च रु 8,960/- आणि 7,840/- मिळावा अशी मागणी केली आहे.

तक्रार अर्जाचे पुष्‍टयर्थ अर्जदारांचे शपथपत्र ( नि.2 ) आणि पुराव्‍यातील कागदपत्रात नि.3 लगत जमिनीचे 7/12 उतारे, बियाणे खरेदी पावत्‍या, गैरअर्जदार क्रमांक 2 उत्‍पादकाने प्रसिध्‍द केलेले माहितीपत्रक, बियाणे तक्रार निवारण समितीचा क्षेत्रनिरीक्षण अहवाल वगैरे चार कागदपत्रांच्‍या छायाप्रती तसेच नि.21 लगत कलिंगड विक्रीच्‍या पावत्‍या दाखल केल्‍या आहेत.

तक्रार अर्जावर लेखी म्‍हणणे सादर करणेसाठी गैरअर्जदारांना दोन्‍ही प्रकरणातून नोटीसा पाठविण्‍यात आल्‍यानंतर ता.12/07/2010 रोजी एकत्रितपणे दोन्‍ही प्रकरणात लेखी जबाब ( नि.13) दाखल केला.तक्रार अर्जातील परिच्‍छेद 1 मध्‍ये नमुद केले प्रमाणे गैरअर्जदार क्रमांक 1 कडून बियाणे खरेदी केल्‍याचा मजकूर त्‍यांना मान्‍य आहे. परंतु त्‍यापुढील परिच्‍छेद क्रमांक 3 ते 12 मधील विधाने साफ नाकारली आहेत.गैरअर्जदाराचे म्‍हणणे असे की,बियाणे पेरल्‍यावर त्‍याची उगवण कमी झाली त्‍या संबंधीची कसलीही तक्रार दोघांनीही त्‍यांचेकडे आजपर्यंत चांगली उगवण होण्‍यासाठी वातारवण, मातीचा दर्जा, वापरलेली खते, लागवडची पध्‍दत, पाणी पुरवठा, हे घटक विचारात घ्‍यावे लागतात वरील घटकांचा कमी जास्‍त प्रमाणात वापर झाला तर उगवण शक्‍तीवर परीणाम होतो.कमी उगवण झाली याला बियाणे सदोष आहेत असे म्‍हणता येणार नाही.कृषी विकास अधिका-याच्‍या समितीने अर्जदारांच्‍या शेताची पाहाणी करण्‍यापूर्वी गैरअर्जदारांना कोणतीही पूर्व नोटीस दिलेली नव्‍हती किंवा त्‍यांचे हजेरीत पिकांची पाहाणी केलेली नसल्‍यामुळे समितीच्‍या अहवालात दिलेला अभिप्राय संशयास्‍पद आहे तसेच पाहाणी केलेल्‍या जमिनीचा गट नंबर,एकुण क्षेत्र पैकी किती क्षेत्रात लागवड केली होती.त्‍यासंबंधीचा सकसलाही सविस्‍तर उल्‍लेख अहवालात दिलेला नाही त्‍यामुळे अहवाल कायदेशिररित्‍या ग्राहय धरता येणार नाही.गैरअर्जदारांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 13 (क) मधील तरतुदी प्रमाणे तसेच सिड्स अक्‍ट 1966 चे कलम 23 (अ) नुसार बियाणे सदोष अथवा निकृष्‍ट होती या संबंधी प्रयोगशाळेतील तपासणी रिपोर्ट मंचापुढे सादर केलेला नाही व त्‍याची पूर्तता करणे कायदेशिररित्‍या आवश्‍यक असतांनाही तो तपासणी अहवाल मागवुन घेण्‍याचा आग्रह धरलेला नाही.संपूर्ण वर्षांच्‍या नुकसानीचे गणित करुन भरमसाठ नुकसान भरपाई मिळवण्‍यासाठी अर्जदाराने प्रस्‍तुतच्‍या खोटया तक्रारी दाखल केलेल्‍या असल्‍याने त्‍या खर्चासह फेटाळण्‍यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे.

लेखी जबाबाच्‍या पुष्‍टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र ( नि.15) दाखल केले आहे.

अंतिम सुनावणीच्‍या वेळी अर्जदार तर्फे अँड.दराडे व गैंरअर्जदारातर्फे अड केकान यांनी  युक्तिवाद केला.

      निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.

     मुद्दे.                                             उत्‍तर.

1        गैरअर्जदार क्रमांक 2 यानी उत्‍पादीत केलेले कृष्‍णा आईस

बॉक्‍स या वाणाचे कलिंगड बियाणे सदोष व निकृष्‍ट दर्जाचे

उगवण शक्‍ती नसलेली आहेत हे अर्जदारानी कायदेशिरित्‍या

शाबीत केले आहे काय                                     नाही.  

2   गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडून या बाबतीत अनुचित व्‍यापारी

प्रथेचा अवलंब अथवा सेवात्रुटी झाली आहे काय ?                नाही.

3   अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?            नाही.

कारणे.

मुद्दा क्रमांक 1 ते 3

        प्रकरण क्रमांक 118/2010 मधील अर्जदारने गैरअर्जदार क्रमांक 1 च्‍या दुकानातून ता.19/02/10 रोजी 20 ग्रँमची 25 पाकिटे प्रतिनग रु 550/- प्रमाणे खरेदी केली होती आणि प्रकरण 119/2010 मधील अर्जदारने ता.28/01/10 रोजी 10 ग्रँमची 64 पाकिटे प्रतिनग रु 275 प्रमाणे व 17/02/10 रोजी 20 ग्रँमची 5 पाकिटे प्रतिनग रु 550/- प्रमाणे खरेदी केली होती ही अडमिटेड फॅक्‍ट आहे.दोघांनीही पुराव्‍यात खरेदीच्‍या पावत्‍या नि.3 लगत दाखल केलेल्‍या असल्‍याने अर्जदार गैरअर्जदारांचे ग्राहक असल्‍याचे शाबीत होते.खरेदी केलेले बियाणे अर्जदाराने त्‍यांच्‍या मालकीच्‍या कोणत्‍या शेत जमिनीत नेमेके किती क्षेत्रात लागवड केली याचा कसलाही स्‍पष्‍ट उल्‍लेख दोन्‍ही तक्रारी मध्‍ये केलेला नाही पुराव्‍यात नि 3 लगत शेतजमिनीचे 7/12 उतारे दाखल केलेले आहेत त्‍यांचे बारकाईने अवलोकन केले असता पिका खालील क्षेत्राच्‍या तपशिलामध्‍ये भुईमूग, तूर, कापूस,सोयाबिन,ऊस,उडीद ही पीके घेतल्‍याचा उल्‍लेख आहे मात्र कलिंगड पिकाचा दोन्‍हींही अर्जदारांच्‍या 7/12 मध्‍ये उल्‍लेख नाही एवढेच नव्‍हेतर पुराव्‍यातील 19/03/10 तारखेच्‍या बियाणे तक्रार निवारण समितीच्‍या क्षेत्रनिरीक्षण अहवालात (नि 3/4, 3/5) त्‍यामध्‍येही समितीच्‍या सदस्‍यांनी कोणत्‍या जमिनीची पाहाणी केली त्‍याचा गट नंबर अथवा सर्व्‍हे नंबर आणि किती क्षेत्रात लागवड केल्‍याचे त्‍यांना दिसले याचा एका शब्‍दाचाही उल्‍लेख अहवालात दिलेला नाही त्‍यामुळे खरेदी केलेल्‍या बियाणांची लागवड केली होती हे तक्रार अर्ज परिच्‍छेद क्रमांक 2 मधील कथन कायदेशिररित्‍या शाबीत झालेले नसल्‍याने पुराव्‍यातील 7/12 चे उतारे कायदेशिररीत्‍या अर्जदाराच्‍या तक्रारींच्‍या बाबतीत निरुपयोगी ठरले आहेत.व बळकटी आणू शकत नाहीत.

        दोन्‍ही अर्जदारांनी ग्राहक मंचात दाखल केलेल्‍या तक्रार अर्जामधून गैरअर्जदारां विरुध्‍द नि.3/3 वरील तक्रार निवारण समिती जि.प.कृषी विभाग परभणी यांच्‍या अहवालाच्‍या आधारे व तेवढाच एकमेव पुरावा सादर करुन दाद मागीतलेली आहे. परंतु समितीच्‍या दोन्‍ही अहवालाचे बारकाईने अवलोकन केले असता त्‍यामध्‍येही अनेक त्रुटी असल्‍याचे दिसते.पेरलेल्‍या बियाणांची उगवण झाली नाही म्‍हणून सदोष / निकृष्‍ट बियाणांबाबत शेतक-यांची कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्‍हा परिषद कृषी विभाग यांच्‍याकडे लेखी तक्रार आल्‍यावर राज्‍य कृषी संचालनालयाने जिल्‍हा स्‍तरावर सात सदस्‍यांची समिती गठण करुन त्‍या समितीने तक्रार दाराच्‍या शेतावर समक्ष भेट देवुन पिकांच्‍या पाहाणी संबंधी अनुसरावयाच्‍या कार्यपध्‍दती बाबत मार्गदर्शक सुचनांचे परिपत्रक 10 जून 82 व ता. 02 जानेवारी 84 आणि त्‍यानंतर ता.27/03/92 रोजी दुसरे परिपत्रक प्रसिध्‍द केलेले होते. अलिकडचे परिपत्रक क्रमांक गुनियो/बियाणे/स्‍थाज/5/92/का66 मध्‍ये आणि त्‍यानंतर पुन्‍हा तारीख 01/07/98 रोजी तिसरे परिपत्रक‍ प्रसिध्‍द केलेले आहे त्‍यामध्‍ये दिलेल्‍या मार्गदर्शक सुचने प्रमाणे अर्जदारांनी पुराव्‍यात दाखल केलेले दोन्‍हीही अहवाल परीपूर्ण नाही परिपत्रकातील सुचनेनुसार अर्जदारांच्‍या शेतामध्‍ये समितीच्‍या सर्वच्‍या सर्व सात सदस्‍यांनी समक्ष भेट देणे बंधनकारक असतांना अर्जदारांच्‍या अहवालात फक्‍त 4 सदस्‍यांच्‍या सहया दिसतात तसेच या कंपनीचे बियाणे ज्‍या बियाणे उत्‍पादका विरुध्‍द अर्जदाराची तक्रार आहे त्‍यांना पिक पाहणीसाठी पूर्व नोटीस देवुन त्‍यांचे समक्ष पाहाणी करणे बंधनकारक असतांना दोन्‍ही अर्जदारांच्‍या शेताची पाहाणी बियाणे उत्‍पादकांना पूर्व नोटीस न देताच परस्‍पर केली असल्‍याचे दिसते व दोन्‍ही अहवालावर अर्जदारांच्‍याही सहया दिसत नाही तसेच प्रत्‍यक्ष पाहाणी केल्‍यासंबंधीचा स्‍वतंत्र पंचनामाही समितीने केलेला नाही. त्‍यामुळे अहवाल प्रत्‍यक्ष पाहाणी करुन केला असेल का? ही शंका आल्‍यावाचून राहात नाही.त्‍यामुळे पाहाणी गैरअर्जदारांच्‍या अपरोक्ष व पंचनाम्‍याशिवाय केलेली असल्‍यामुळे अहवाल कायदेशिररित्‍या पुराव्‍यात ग्राहय धरता येणे कठीण आहे.त्‍याही पेक्षा महत्‍वाची बाब म्‍हणजे समितीच्‍या सदस्‍यांनी केलेल्‍या पाहाणीत बियाणांची उगवण निकृष्‍ट/ सदोष प्रतिच्‍या बियाणांमुळे झाली आहे असे समितीचे मत झाले असेलतर अभिप्रायाला अनुसरुन बियाणे उत्‍पादकाकडून अथवा विक्रेत्‍याकडून शेतक-याने पेरलेल्‍या बियाणांच्‍या लॉट मधीलच नमुने बियाणे / पाकिटे ताब्‍यात घेवुन समुचित प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले पाहिजेत अशीही परिपत्रकात मार्गदर्शक सुचना आहे परंतु त्‍यासंबंधीचा कसलाही पुरावा अर्जदारानी मंचापुढे सादर केलेला नाही.बियाणांची लागवड करतांना पेरणीच्‍यावेळी वापरलेली खते व किटकनाशके यांचा सकमितीच्‍या अहवालात सविस्‍तर उल्‍लेख केलेला आहे परंतु न्‍यायमंचापुढे ही गोष्‍ट शाबीत करण्‍यासाठी खते,किटकनाशके यांच्‍या खरेदी पावत्‍या दाखल केलेल्‍या नाहीत त्‍यामुळे त्‍यांचा वापर केला व ही बाबही ठोस पुराव्‍या शिवाय ग्राहय धरता येणे कठीण आहे.निरीक्षण अहवालातील अभिप्रायामध्‍ये पाहाणी समितीने नोंदणी शेतक-यांच्‍या शेतातील बियाणांची उगवण अनुक्रमे 32 टक्‍के व 39 टक्‍के आढळून आली असे म्‍हंटले आहे परंतु ही टक्‍केवारी कोणत्‍या पध्‍दतीने वा कशाच्‍या आधारे निश्चित केली. या संबंधीचा कसलाही खुलासा / स्‍पष्‍टीकरण अहवालात दिलेले नसल्‍यामुळे ते अविश्‍वासार्ह वाटते.

         क्षेत्र निरीक्षण अहवालातील वर नमुद केलेल्‍या त्रुटी खेरीज तक्रार अर्जाबाबत इतरही शंकास्‍पद बाबी उपस्‍थीत राहतात त्‍यामध्‍ये 1) उगवण झाली नाही म्‍हणून बियाणे सदोष आहे अशी शंका त्‍यांना आली होती म्‍हंटल्‍यानंतर बियाणे विक्रेता किंवा उत्‍पादकाकडे त्‍याबाबत का तक्रार केली नाही ? त्‍याचा कोणताही पुरावा मंचापुढे दिलेला नाही.किंवा तक्रार अर्जामध्‍येही तक्रार केल्‍याचा उल्‍लेख नाही.2) परभणी जि.प.कृषी विभागाच्‍या पाहाणी समितीने लागवड केलेली बियाणे सदोष असल्‍याचा अभिप्राय दिल्‍यानंतर अर्जदाराने गैरअर्जदाराकडे नुकसान भरपाईची मागणी केलेली होती परंतु त्‍यांनी देण्‍याचे नाकारले असाही पुरावा उदाः अर्जदाराने स्‍वतः अगर वकिलामार्फत पाठविलेल्‍या पत्राची / नोटीसीची स्‍थळप्रत मंचापुढे सादर केलेली नाही. 3) ग्राहक मंचात र्गरअर्जदारा विरुध्‍द पस्‍तुतच्‍या तक्रारी दाखल केल्‍यानंतर खरेदी केलेले बियाणे सदोष किंवा निकृष्‍ट दर्जाचे होते हे कायदेशिररीत्‍या शाबीत करण्‍यासाठी गैरअर्जदाराकडे तथाकथीत बियाणांचे नमुने समुचित प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणेत यावेत म्‍हणून  ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 13 (1) (क) मधील तरतुदी प्रमाणे मंचाकडे प्रकरणाच्‍या अंतिम सुनावणीच्‍या नेमले तारखे पर्यंतही दरम्‍यानच्‍या काळात मागणी केलेली नाही.अथवा त्‍याबाबत आग्रह धरलेला नाही.ही देखील मोठी कायदेशिर त्रुटी राहिलेली आहे.खरेदी केलेले बियाणे सदोष व उगवण क्षमता नसलेले होते.या कारणास्‍तव अर्जदाराने नुकसान भरपाईसाठी गैरअर्जदारा विरुध्‍द कायदेशिर दाद मागीतल्‍यावर बियाणे सदोष आहेत हे शाबीत करण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी अर्जदारावरच येते आणि बियाणांच्‍या प्रयोगशाळेतील                          

तपासणीतील निष्‍कर्षा खेरीज ते सदोष अथवा निकृष्‍ठ आहेत हे कायदेशिररित्‍या ग्राहय धरता येत नाही. तोच एकमेव सबळ पुरावा ठरतो.या संदर्भात

(1) रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 (महाराष्‍ट्र राज्‍य आयोग)

Field inspected by committee – Report of committee could not be acted upon as expert if not associated as required by Govt. Resolution – Seed Defective not proved – No Relief entitled.

(2) रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 ( महाराष्‍ट्र राज्‍य आयोग )          मध्‍ये असे    मत व्‍यक्‍त केले आहे की,

Seed Committee report placed on record not at all sufficient to establish infirior  quality of seeds  

(3) रिपोर्टेड केस (अ ) 2007 (2) सी.पी.जे.पान 148 ( राष्‍ट्रीय आयोग )

              (ब ) 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्‍ट्रीय आयोग)

When there was no laboratory testing report, then complaint was   liable to be dismissed.

(4) रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे पान 628 या प्रकरणात देखील मा.महाराष्‍ट्र राज्‍य आयोगाने वरील प्रमाणेच मत व्‍यक्‍त केले आहे.

(5) रिपोर्टेड केस 2009 (1) सी.पी.आर.पान 182 (राष्‍ट्रीय आयोग)

Question of quality of seeds is to be determined procedure contemplated under section 13 (1) (c) of  Consumer Protection Act and not on the besis of assumption or presumption .

(6) रिपोर्टेड केस 2007 (1) सी.पी.जे.पान 266 ( राष्‍ट्रीय आयोग )

If Laboratory testing report supports the seed manufacturer that seed was of 99.6 % purity. Then he  is not liable for any compensation

         वरील सर्व रिपोर्टेड केसेस मध्‍ये व्‍यक्‍त केलेली मते प्रस्‍तुत प्रकरणाला लागु पडत असल्‍यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 ने उत्‍पादिते केलेली तथाकथीत लॉट नंबरची बियाणे निकृष्‍ठ / सदोष होती हे कायदेशिररित्‍या शाबीत झालेले नाही.यावरुन गैरअर्जदारातर्फे नि.23 लगत दाखल केलेल्‍या पुराव्‍यात कंपनीने उत्‍पादित केलेले बियाणे मार्केटमध्‍ये वितरीत करण्‍यापूर्वी त्‍यांच्‍या उगवण क्षमते विषयी प्रायोगिक तपासणी केलेल्‍या अहवालाची छायाप्रत दाखल केलेली आहे त्‍यामध्‍ये उगवण क्षमता 85 टक्‍के चांगल्‍या प्रकाराची असल्‍याचे तपासणी मध्‍ये आढळून आलेले होते.असे नमुद केलेले आहे.रिपोर्टच्‍या शेवटी उगवण क्षमता चांगली विक्रीयोग्‍य असल्‍याचा अभिप्रायही दिलेला असल्‍यामुळे बियाणे मुळीच सदोष नव्‍हते हे पुराव्‍यातून स्‍पष्‍ट होते.

      अर्जदारानी तक्रार अर्जात नमुद केले प्रमाणे त्‍यांना कलिंगडाचे उत्‍पन्‍न घेण्‍याचा मागील 2/3 वर्षाचा अनुभव आहे हे ग्राहय धरले तरी रोपांची उगवण चांगल्‍या प्रकारे न होण्‍यापाठीमागे केवळ बियाणे सदोष आहेत हाच एक निकष नाही जमिनीची प्रत, आर्द्रता, औषधे, खते यावरही उगवण क्षमता अवलंबून असते त्‍यामुळे असा आरोप केल्‍यानंतर तो काटेकोरपणे शाबीत करण्‍याची अर्जदारांची जबाबदारी होती परंतु तो शाबीत झालेला नाही. त्‍यामुळे अर्जदार कोणतीही नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाहीत.

सबब,मुद्दा क्रमांक 1 व 3 चे उत्‍तर नकारार्थी देवुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.                     

                       आदेश

1         तक्रार क्रमांक 118/2010 व तक्रार क्रमांक 119/2010 नामंजूर

      करण्‍यात येत आहेत.

2     पक्षकारानी आपला खर्च आपण सोसावा.

3     पक्षकारांना आदेशाच्‍या प्रती मोफत पुरवाव्‍यात.       

4     आदेशाची मुळप्रत प्रकरण क्रमांक 118/2010 मध्‍ये ठेवावी व छायाप्रत

      प्रकरण क्रमांक 119/2010 मध्‍ये ठेवावी.

 

 

 

 

श्रीमती अनिता ओस्‍तवाल.          सौ.सुजाता जोशी.           श्री.सी.बी.पांढरपट्टे.

       सदस्‍या.                      सदस्‍या.                    अध्‍यक्ष.


[HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member