Maharashtra

Nagpur

CC/10/435

SMT. PARTIBHA W/O NANDKISHOR BHOYAR - Complainant(s)

Versus

KOTAK MAHINDRA, - Opp.Party(s)

ADV.D.P.SHOUCHE.

18 Apr 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/435
1. SMT. PARTIBHA W/O NANDKISHOR BHOYARR/O.GHAR NO. 576,NEAR KOLHE PATIL'S HOUSE PIPRI, TRIMURTI NAGAR, WARD NO.3, WARDHA.WARDHAMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. KOTAK MAHINDRA,OLD MUTUAL LIFE INSURANCE CO. LTD. GODREJ KOLISIUM 8 FLOOR, BEHIND EVIRADNAGAR SAYAN(EAST) MUMBAI-400 022 THROUGH MANAGING DIRECTORMUMBAI MAHARASHTRA2. 2) MANAGING DIRECTOR, MEGNA FIN CORP LTD.MEGNA HOURSE, 24, PARK STREET COLCATTAW.BENGAL3. BRANCH MANAGER, MEGNA FIN CORP. LTD81 HILL ROAD, RAMNAGAR, NAGPUR, 440 010NAGPURMAHARASHTRA4. BRANCH MANAGER, KOTAK MAHINDRA LIFE INSURANCE CO. LTD.LOTAS BUILDING, DHRAMPETH, WEST HIGHCOURT ROAD, NAGPURNAGPURMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :ADV.D.P.SHOUCHE., Advocate for Complainant
ADV.A.A.SAMBARAY, Advocate for Opp.Party ADV.A.KUMAR, Advocate for Opp.Party ADV.A.KUMAR, Advocate for Opp.Party

Dated : 18 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 18/04/2011)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 08.08.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.          तक्रारकर्तीचे पतीने बॅक हो लोडर जे.डी. 315 व्‍ही, इंजिन नं. DRZ 825641, चेसिस नं. 315V5982ही मशीन खरेदी करण्‍याकरता मे. युनिव्‍हर्सल इंडस्टि्रयल इक्विपमेंट ऍन्‍ड टेक्‍नीकल सर्व्हिसेस प्रा. लि., एम.आय.डी.सी.हिंगणा, वाडी, नागपूर यांचेकडून कोटेशन घेतले होते. सदर मशीन घेण्‍याकरीता गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून कर्ज घेण्‍याकरीता संपर्क साधला व त्‍याबाबतची पुर्तता झाल्‍यानंतर तक्रारकर्तीच्‍या पतीस रु.13,63,100/- चे कर्ज मंजूर झाले. सदर रक्‍कम रु.45,500/- दरमहा प्रमाणे 35 मासिक हप्‍त्‍यात भरावयाची होती. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर कर्ज फेब्रुवारी-2009 मध्‍ये दिले. सदर मशीन खरेदी केल्‍यानंतर तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृति बिघडली त्‍यामुळे त्‍यांना सावंगी (मेघे) येथील इस्‍पीतळात भरती करावे लागले, म्‍हणून जूलै-2009 चा हप्‍ता वेळेवर भरु शकले नाही.
3.          कर्ज मंजूर करते वेळी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेमधे असलेल्‍या करारानुसार गैरअर्जदार क्र.1 ने तक्रारकर्तीचे पतीचा जीवन विमा उतरविला व त्‍याकरीता आवश्‍यक बाबींची पूर्तता व संपूर्ण शारीरिक तपासणी गैरअर्जदार क्र.1 ने केली व प्रिमीयम म्‍हणून रु.13,069/- घेऊन विमा पॉलिसी क्र. एफ.14 देण्‍यांत आला. सदर पॉलिसी दि.18.02.2009 ते 18.02.2012 या तीन वर्षांकरीता देय होती. सदर पॉलिसी नुसार कर्ज घेणा-या व्‍यक्तिच्‍या नावे मृत्‍यूच्‍या दिवशी म‍शीनच्‍या कर्जापैकी जेवढी रक्‍कम देय असेल ती गैरअर्जदार क्र.1 ने भरावी अशी तरतुद सदर पॉलिसीत होती. तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू दि. 11.08.2009 रोजी Gastro intestinal bleeding with metabolic acidosis  या आजारामुळे आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्‍पीटल, सावंगी (मेघे), वर्धा या ठिकाणी झाला. तक्रारकर्तीच्‍या पतीच्‍या मृत्‍यूनंतर गैरअर्जदार क्र.2 कंपनीकडून असे सांगण्‍यात आले की, तक्रारकर्त्‍याने जुलै-2009 चा हप्‍ता भरावा व तिच्‍या पतीचा मृत्‍यू ऑगष्‍ट-2009 मध्‍ये झाला असल्‍या कारणाने गैरअर्जदार क्र.1 कंपनी कर्जाची उर्वरित रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 कंपनीला अदा करतील. तक्रारकर्तीने गैरअर्जदार क्र.2 चे सांगण्‍यावरुन माहे जुलै-2009 हप्‍ता भरला.
4.          तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 चे अधिकारी दि.10.06.2010 आले व सदर मशीन एका ग्राहकाचे कामात लागलेली असतांना कुठल्‍याही प्रकारची पूर्व सुचना न देता ती मशीन घेऊन गेले. तक्रारकर्तीने मशीन चोरी गेल्‍याची तक्रार पोलिस स्‍टेशन, कारंजा (घाटगे), जि. वर्धा येथे केली. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 यांना गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून विमा पॉलिसीनुसार कर्जाची उर्वरित रक्‍कम घ्‍यावयास पाहिजे होती, तसे न करता त्‍यांनी तक्रारकर्तीची मशीन उचलुन नेऊन उपजिविकेचे साधन हिरावुन घेतले. तिने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.2 ने कोलकाता येथील एक वकील श्री. पुलीन बिहारी दास यांना आरबिट्रेशन नेमुन गैरअर्जदार क्र.2 ने एकतर्फी निकाल प्राप्‍त करुन घेतला व मशीन उचलून घेण्‍याचा अधिकार सुध्‍दा प्राप्‍त करुन घेतला.
5.          तक्रारकर्तीनुसार गैरअर्जदार क्र.2 ने बहुतांश बाबी आरबिट्रेटरपासुन लपवुन ठेवल्‍या असुन आरबिट्रेटरचा निकाल बेकायदेशिर असुन तो तक्रारकर्तीस बंधनकारक नाही, असे तक्रारकर्तीने नमुद केले आहे. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.3 यांनी दि.14.06.2010 ला तक्रारकर्तीच्‍या पतीचे नावाने पत्र पाठविले जेव्‍हा की, तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू दि.11.08.2009 रोजी झाला व सदर पत्रामधे गैरअर्जदार क्र.2 ने रु.15,31,610/- एवढी रक्‍कम भरण्‍याची सुचना दिली. त्‍यानंतर तक्रारकर्तीने दि.21.06.2010 रोजी गैरअर्जदार क्र.2 ला नोटीस पाठविली, त्‍याचे सुध्‍दा उत्‍तर त्‍यांनी दिले नाही. तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले आहे की, सदर मशीन उचलुन नेल्‍यामुळे तिला दररोज रु.5,000/- चे नुकसान होत आहे.
6.          तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे तिच्‍या वकीलांनी गैरअर्जदार क्र.1 ला जो नोटीस पाठविला होता त्‍याचे उत्‍तर दि.15.07.2010 रोजी देण्‍यांत आले, त्‍यामधे तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू एड्समुळे झाला होता, ही बाब नमुद केलेली आहे, सदर बाब खोटी असल्‍याचे तक्रारकर्तीचे म्‍हणणे आहे. तिने पुढे असेही नमुद केले आहे की, आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्‍पीटल, सावंगी (मेघे) यांनी दिलेल्‍या मुत्‍यू प्रमाणपत्रात एड्स रोगाचा कुठेही उल्‍लेख नाही, तसेच सदर बाबीमुळे तिच्‍या पतीचे चरित्र हणन झालेले आहे. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांनी तिचा दावा चुकीच्‍या पध्‍दतीने हाताळलेला आहे त्‍यामुळे तिने सदर प्रकरण मंचात दाखल केले असुन मागणी केली आहे की, गैरअर्जदार क्र.1 ने विमा दाव्‍याची रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 ला द्यावी. गैरअर्जदार क्र.2 ने तक्रारकर्तीची मशीन परत करावी व दि.10.06.2010 रोजी पासुन रु.5,000/- याप्रमाणे नुकसान भरपाई म्‍हणुन रु.50,000/- आर्थीक नुकसान, मानहानी व मानसिक त्रासापोटी द्यावे तसेच तक्रारीच्‍या खर्चाचे रु.10,000/- अदा करावे.
7.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्‍यांत आली असता गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे आपले उत्‍तर दाखल केलेले आहे.
            गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या उत्‍तरात मान्‍य केले आहे की, तक्रारकर्तीचे पती श्री.नंदकिशोर भोयर यांनी बॅक हो लोडर जे.डी.315 व्‍ही ही मशीन गैरअर्जदार क्र.2 यांच्‍या आर्थीक सहाय्याने विकत घेतली होती. त्‍यांनी पुढे मान्‍य केले आहे की, कर्ज घेणा-या व्‍यक्तिचा विमा उतरविण्‍याचा करार गैरअर्जदार क्र.2 व 1 यांचा झाला होता व त्‍यानुसार श्री. नंदकिशोर भोयर यांचा विमा उतरविला. त्‍यांनी पुढे असेही नमुद केली आहे की, डिक्‍लेरेशन ऑफ गुड हेल्‍थ मधे विमा धारक कोणत्‍याही रोगाने ग्रस्‍त नाही व उपचार घेत नसल्‍याचे नमुद केले आहे. तसेच त्‍यांना निरोगी असल्‍याचे डिक्‍लेरेशन दिल्‍यामुळे कोणतीही वैद्यकीय तपासनी करण्‍यांत आलेली नाही. गैरअर्जदार क्र.1 ने मान्‍य केले आहे की, विमा धारकाचा मृत्‍यू हा Gastro intestinal bleeding with metabolic acidosis मुळे झाला नसुन त्‍यास इतरही गोष्‍टी कारणीभुत आहेत. त्‍यांनी पुढे नमुद केले आहे की, विमा धारक हा बहुतांश आजाराने ग्रस्‍त होता, तसेच इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नियुक्‍ती केली व त्‍याच्‍याव्‍दारे दाव्‍याची शहानिशा केली. गैरअर्जदार क्र.1 ने आपल्‍या परिच्‍छेद निहाय उत्‍तरात तक्रारकर्तीचे बहुतांश मुद्दे नाकारलेले असुन आपल्‍या विशेष अनुमोदनात नमुद केले आहे की, विमा धारकाचा मृत्‍यू 6 महिन्‍याच्‍या आंत झाल्‍यामुळे त्‍यांचा संशय वाटतो व त्‍यामुळे इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नियुक्‍ती केती असुन त्‍यांनी आपला अहवाल सादर केला, त्‍यामध्‍ये मृत्‍यूचे कारण “Due to Gastrointestinal bleed with Metabolic Acidosis, Septicemia with spontaneous peritonitis with Chronic Renal Failure with CCF with Systemic Hypertension with Anemia” नमुद आहे. त्‍यांनी पुढे नमुद केले आहे की, इन्‍व्‍हेस्‍टीगेटरने विमाधारकाला जो आजार झाला होता तो पूर्वीचा होता, त्‍यामुळे विमा दावा नाकारलेला आहे.
8.          गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी खालिल प्रमाणे आपले उत्‍तर दाखल केलेले आहे...
            गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी सदर तक्रार तथ्‍यहीन असुन खोटी असल्‍याचे नमुद केलेले आहे. तसेच त्‍यांनी मान्‍य केले आहे की, तक्रारीत नमुद मशीन खरेदी करण्‍या करता तक्रारकर्तीचे पतीने त्‍यांचेकडून कर्ज घेतले होते व त्‍यामधे तक्रारकर्ती गॅरंटर होती. त्‍यांनी नमुद केले आहे की, जनरल पॉलिसी व पर्सनल पॉलिसी या दोन वेगवेगळया पॉलिसी होत्‍या व त्‍यानुसार विमा दावा देय असतो. तसेच त्‍यांचा मेडिक्‍लेम पॉलिसीशी काहीही संबंध नसल्‍याचे नमुद केले आहे .तक्रारकर्तीच्‍यापतीने गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेसोबत जो करार केला त्‍याच्‍या क्‍लॉज 14 (जी) प्रमाणे मशीनची नोंदणी करुन घेतल्‍यामुळे व तक्रारकर्तीने पतीच्‍या मृत्‍यूनंतर सदर मशीन आपल्‍या नावावर करुन घ्‍यावयास पाहिजे होती, ते सुध्‍दा तिने करुन घेतले नाही. त्‍यामुळे कराराच्‍या कलम 14 प्रमाणे करार रद्द करण्‍याचा अधिकार गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना आहे. त्‍यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीचे पतीने कधीही वेळेवर मासिक हप्‍ते भरलेले नाहीत, तसेच सदर प्रकरणामध्‍ये आरबीट्रेशन मॅटर हे दि.07.12.2009 रोजी कोलकत्‍ता येथे दाखल केले व सदर प्रोसिडींगची सुचना दि.10.12.2009 रोजी दिली व दि.14.02.2010 रोजी नोटीस दिला व परत दि.15.02.2010 रोजी तक्रारकर्तीला सुचना दिली. सदर सुचना देऊनही तक्रारकर्तीने काहीही प्रतिसाद न दिल्‍यामुळे मा. आरबीट्रेटर यांनी दि.12.03.2010 रोजी एकतर्फी आदेश पारित केला. तक्रारकर्तीने वाहनाची रक्‍कम भरली नाही व गैरअर्जदार क्र.2 व 3 सोबत वर्षभर कोणताही संबंध ठेवला नाही. त्‍यांनी आपल्‍या परिच्‍छेद निहाय उत्‍तरात गैरअर्जदार क्र.2 चे मुख्‍य कार्यालय कोलकत्‍ता येथे असुन त्‍यांची शाखा नागपूर येथे गैरअर्जदार क्र.3 हे आहेत. त्‍यांनी तक्रारकर्तीचे पतीला कर्ज दिले होते ही बाब मान्‍य केलेली असुन तक्रारकर्तीचे इतर सर्व म्‍हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्‍याची विनंती केली आहे.
9.          गैरअर्जदार क्र.4 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फी आदेश पारित करण्‍यांत आला.
10.          सदर तक्रार मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.06.04.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद त्‍यांचे वकीला मार्फत ऐकूण घेतला तसेच मंचासमक्ष दाखल दस्‍तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
 
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
11.          उभय पक्षांच्‍या कथनावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, तक्रारकर्तीचे पतीने बॅक हो लोडर जे.डी. 315 व्‍ही, इंजिन नं. DRZ 825641, चेसिस नं. 315V5982ही मशीन खरेदी करण्‍याकरता गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचेकडून कर्ज घेतले होते व गैरअर्जदार क्र.1 कडे सदर मशीनचे खरेदीदार श्री. नंदकिशोर भोयर जे तक्रारकर्तीचे पती आहे ते विमाकृत होते व सदर विमा हा गैरअर्जदार क्र.2, 3 व 1 यांच्‍या आपशी करारानुसार काढण्‍यांत आला होता. परंतु करारानुसार विमा धारकाचे मृत्‍यूनंतर कर्जाची रक्‍कम त्‍या दिवशी जेवढी थकीत असेल ती रक्‍कम देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ची राहील, याबाबत स्‍पष्‍ट असल्‍यामुळे तक्रारकर्ती ही विमाधारक श्री. नंदकिशोर भोयर यांची पत्‍नी असल्‍यामुळे लाभधारक आहे व त्‍यामुळे ती सर्व गैरअर्जदारांची ‘ग्राहक’ ठरते असे मंचाचे मत आहे.
12.         तक्रारकर्तीचे पतीने गैरअर्जदार क्र.2 यांचेकडून 13,63,100/- एवढे कर्ज घेतले होते, ही बाब दस्‍तावेज व उभय पक्षांचे कथनावरुन स्‍पष्‍ट होते.
           तक्रारकर्तीच्‍या पतीची प्रकृति बिघडल्‍यामुळे त्‍यांना आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्‍पीटल, सावंगी (मेघे) येथे भरती करण्‍यांत आले होते व त्‍या ठिकाणी दि.11.08.2009 रोजी मृत्‍यू झाला, ही बाब तक्रारीसोबत दाखल दस्‍तावेजांवरुन स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्तीचे पतीच्‍या मृत्‍यू संबंधात आचार्य विनोबा भावे रुरल हॉस्‍पीटल, सावंगी (मेघे), वर्धा यांनी जे मृत्‍यूचे प्रमाणपत्र दिले आहे ते तक्रारकर्तीने दस्‍तावेज क्र.6 म्‍हणून दाखल केलेले आहे. सदर प्रमाणपत्रामध्‍ये मृत्‍यूचे कारण  Cause of Death: “Due to Gastrointestinal bleed with Metabolic Acidosis, Septicemia with spontaneous peritonitis with Chronic Renal Failure with CCCF”हे नमुद केलेले आहे  व पुढे “Systemic Hypertension with Anemia”चाउल्‍लेखआहे. यावरुन तक्रारकर्तीच्‍या पतीचा/विमाधारकाचा मृत्‍यू दस्‍तावेजात नमुद कारणामुळे झाला ही बाब स्‍पष्‍ट होते.
13.         गैरअर्जदार क्र.1 यांनी विमा दावा नाकारल्‍या मागचे कारण देत असतांना तक्रारकर्तीच्‍या पतीने पॉलिसी काढीत असतांना तो निरोगी असल्‍याबद्दलची घोषणा केली होती. त्‍यामुळे त्‍याची शारीरिक तपासणी केली नाही असे नमुद केले आहे. परंतु ही बाब मान्‍य करण्‍यासाठी विमा कंपनीने शारीरिक तपासणी केल्‍या शिवाय विमा पॉलिसी देता येते हे दर्शविणे गरजेचे आहे. तसेच सदर प्रकरणात त्‍यांनी शारीरिक तपासणी न करण्‍या बद्दलचे दिलेले कारण न्‍यायोचित वाटत नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर विमा पॉलिसी काढीत असतांना सदर घोषणापत्रामध्‍ये निरोगी असा उल्‍लेख असेल तर शारीरिक अथवा वैद्यकीय तपासणी करण्‍याची गरज नसल्‍याची कोणतीही अडचण अथवा नियम दाखल केलेला नाही.
14.         गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी नंदकिशोर भोयर जे तक्रारकर्तीचे पती यांनी तक्रारीत नमुद मशीन खरेदी करण्‍या करता कर्ज दिले होते व सदर कर्जाचे सुरक्षीतते करीता गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी मशीन धारकाचा विमा गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे गैरअर्जदार क्र.2 व 3 यांचे मधील करारानुसार उतरविला होता. यावरुन गैरअर्जदार क्र.2 व 3 हे गैरअर्जदार क्र.1 च्‍या अभिकर्त्‍याची भुमिका पार पाडतात ही बाब स्‍पष्‍ट होते.
            सदर विमा पॉलिसेचे अवलोकन केले असता गैरअर्जदार क्र.1,2 व 3 यांचेमधे करार झाला होता ही बाब स्‍पष्‍ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला असुन विमा धारकाने चुकीची माहिती दिली असा बचावात्‍मक मुद्दा घेतलेला आहे व त्‍याला पुर्वीचा आजारा होता असे म्‍हटले आहे. परंतु ही बाब कोणत्‍याही दस्‍तावेजांवरुन सिध्‍द होत नाही, याकरता इनव्‍हेस्‍टीगेटर नियुक्‍त केला होता, त्‍याचे प्रतिज्ञापत्र सुध्‍दा दाखल केलेले नाही. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्‍या उत्‍तरात तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू हा ‘एड्स’ मुळे झाल्‍याचे म्‍हटले आहे, ही अत्‍यंत खेदजनक बाब आहे. कारण तक्रारकर्त्‍याच्‍या पतीस एड्स होता ही बाब कोणत्‍याही दस्‍तावेजांवरुन अथवा तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू ज्‍या हॉस्‍पीटलमध्‍ये झाला त्‍यामधे सुध्‍दा मृत्‍यूचे कारणामधे त्‍याला दिल्‍या गेलेल्‍या उपचाराच्‍या पध्‍दतीमध्‍ये एड्सच्‍या आजाराबद्दलचा कुठलाही उल्‍लेख नाही, असे असतांना पुराव्‍या अभावी कोणताही बचावात्‍मक मुद्दा घेणे व त्‍यामुळे प्रतिष्‍ठेला कमीपणा आणण्‍याचा गैरअर्जदार क्र.1 यांनी केलेला प्रयत्‍न अत्‍यंत चुकीचा व बेकायदेशिर असल्‍याचे मंचाचे मत आहे.
 
15.         सदर प्रकरणामधे गैरअर्जदार क्र.1 ने जो विमा दावा नाकारलेला आहे त्‍याला कुठलेही कायदेशिर कारण नाही व ज्‍या कारणाकरीता विमादावा नाकारला आहे ते कारण गैरअर्जदार क्र.1 यांनी सिध्‍द केलेले नाही.
            सदर प्रकरणामध्‍ये गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्‍या उत्‍तरात असे म्‍हटले आहे की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍या विरुध्‍द आरबिट्रेशन मॅटर, कोलकत्‍ता येथे सुरु केले होते, त्‍या ठिकाणी आरबिट्रेटरने अवार्ड पास केलेला आहे. तक्रारकर्तीने सदर अवार्ड दस्‍तावेज क्र.8 म्‍हणून मंचासमक्ष दाखल केलेला आहे. सदर दस्‍तावेजांचे अवलोकन केले असता ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर अवार्ड हा तक्रारकर्तीचे पती व तक्रारकर्ती या दोघांचे विरोधात दाखल केला आहे व सदर अवार्ड हा दि.12.03.2010 रोजी झालेला आहे. याउलट तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू दि.11.08.2009 रोजी झालेला आहे. तसेच आरबिट्रेटरची नियुक्‍ती ही दि.07.12.2009 रोजी झालेली आहे, म्‍हणजेच विमाधारक/ तक्रारकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यूनंतर आरबिट्रेटरची नियुक्‍ती करण्‍यांत आली व त्‍यानुसार आरबिट्रेटरने अवार्ड पारित केलेला आहे. यावरुन ही बाब स्‍पष्‍ट होते की, गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्तीचे पतीचा मृत्‍यू झाल्‍यानंतर आरबिट्रेटरची नियुक्‍ती केली. गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्ररकर्तीच्‍या पतीचा मृत्‍यू झाला ही बाब माहित असतांनाही जाणून-बुजून लपवुन ठेवली व मृत व्‍यक्तिच्‍या विरुध्‍द अवार्ड पारित करुन घेतला, ही अनुचित व्‍यापार पध्‍दत आहे असे मंचाचे मत आहे. तसेच मृत व्‍यक्ति विरुध्‍द पारित केलेला कोणताही आदेश अथवा अवार्ड हा मुळातच बेकायदेशिर असुन त्‍याला काहीही कायदेशिर महत्‍व राहत नाही, असा सिध्‍दांत आहे. त्‍यामुळे सदर आरबिट्रेटर अवार्डचा बचावात्‍मक घेतलेल्‍या मुद्यात काहीही तथ्‍य उरत नाही, असे मंचाचे मत आहे. III(2010) CPJ 384 (NC), “Magma Fincorp Limited (Formerly Magma Leasing Finance Ltd.) –v/s- Ashok Kumar Gupta” या राष्‍ट्रीय आयोगाच्‍या निवाडानुसार आरबिट्रेटरचा आदेश हा मंचास बंधनकारक राहत नाही, त्‍यामुळे गैरअर्जदारांचा बचावात्‍मक मुद्दा विचारात घेण्‍यांत येत नाही.
            जर गैरअर्जदारांनी आरबिट्रेटर अवार्ड पारित केला होता तर आरबिट्रेशन कायद्यानुसार त्‍यांनी मा. जिल्‍हा न्‍यायाधिश यांचेकडून Execution व्‍दारे Execute करावयास पाहिजे होते व त्‍या व्‍दारे वाहन जप्‍त करावयास पाहिजे होते. परंतु त्‍यांनी तसे केले नाही. याउलट गैरकायदेशिरपणे गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर वाहन जप्‍त केल्‍याचे सकृत दर्शनी स्‍पष्‍ट होते. याकरीता मा. राष्‍ट्रीय आयोगाने सीटी कॉर्प फायनांस लि. वि. एस. विजयालक्ष्‍मी, नॅशनल कंझुमर केसेस पार्ट 212 या न्‍याय निवाडयात गैरकायदेशिरपणे वाहन जप्‍त करणे ही सेवेतील त्रुटी असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे.
16.         वरील सर्व निवाडयांचा विचार करता मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारकर्तीची जप्‍त केलेली बॅक हो लोडर जे.डी. 315 व्‍ही, इंजिन नं. DRZ 825641, चेसिस नं. 315V5982 मशीन परत करावी. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचे मृत्‍यूच्‍या दिवसापासुन थकीत असलेले कर्ज गैरअर्जदार क्र.2 यांना द्यावी.
 
17.         तक्रारकर्तीचे वाहन गैरकायदेशिरपणे गैरअर्जदार क्र.2 यांनी जप्‍त केल्‍यामुळे तिला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी रु.15,000/- द्यावे. तसेच तक्रारीच्‍या खर्चाचे रु.5,000/- सर्व गैरअर्जदारांनी मिळून तक्रारकर्तीस द्यावे. जर आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीची मशीन गैरअर्जदार क्र.2 यांनी परत केली ना‍ही तर प्रति दिवस रु.1,000/- याप्रमाणे मशीन परत देईपर्यंत नुकसान भरपाई म्‍हणून देय राहील.
 
18.         प्रस्‍तुत प्रकरणात दाखल दस्‍तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्‍ही वरील निष्‍कर्षांच्‍या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
 
 
 
      -// अं ति म आ दे श //-
 
 
1.     तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यांत येते.
2.    गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍याला सेवेत त्रुटी दिल्‍याचे घोषीत करण्‍यांत येते.
3.    गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीच्‍या पतीचे      मृत्‍यूच्‍या दिवसापासुन थकीत असलेली कर्जाची रक्‍कम गैरअर्जदार क्र.2 यांना अदा      करावी.
4.    गैरअर्जदार क्र.2 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीची मशीन परत करावी. जर आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासुन 30 दिवसांचे आंत तक्रारकर्तीची       मशीन गैरअर्जदार क्र.2 यांनी परत केली ना‍ही तर प्रति दिवस रु.1,000/-    याप्रमाणे मशीन परत देईपर्यंत नुकसान भरपाई म्‍हणून देय राहील.
5.    गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना आदेश देण्‍यांत येतो की, त्‍यांनी तक्रारकर्तीचे मशीन गैरकायदेशिरपणे जप्‍त केल्‍यामुळे तिला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल रु.15,000/- द्यावे, तसेच तक्रारीच्‍या खर्चाचे रु.5,000/- अदा करावे.
6.    वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍याचे  दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT