Maharashtra

Kolhapur

CC/17/430

Ranjan Vasant Raigandhi - Complainant(s)

Versus

Kotak Mahindra Old Mutual Life Insurance Ltd. & Others 1 - Opp.Party(s)

S.V. Jadhav

08 Mar 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/17/430
( Date of Filing : 17 Nov 2017 )
 
1. Ranjan Vasant Raigandhi
C.S.No.1330/3 E Ward, Shastrinagar Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Kotak Mahindra Old Mutual Life Insurance Ltd. & Others 1
Near Basant Bahar Tokis, Near Hotel Saibaba Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni PRESIDING MEMBER
 HON'BLE MRS. Rupali D. Ghatage MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Mar 2023
Final Order / Judgement

न्‍या य नि र्ण य

(व्‍दाराः- मा. सौ. रुपाली धै. घाटगे, सदस्‍या)

 

1.     तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे.  तक्रार अर्जातील थोडक्‍यात कथन पुढीलप्रमाणे—

  

      वि.प. क्र.2 ही जीवन विमा तदनुषंगिक सेवा देणारी कंपनी असून वि.प. क्र. 1 हे वि.प. क्र.2 यांचे कोल्‍हापूर येथील शाखा कार्यालय आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांचेशी संपर्क साधून तक्रारदार यांना कोटक इंडोवमेंट प्‍लॅन घेणेस भाग पाडले.  सदरचा प्‍लॅन हा युआयएन 107 एन 002 व्‍ही 01 पॉलिसी नं. 02254542 असा असून क्‍लायंट नं. 50664205 असा आहे.  सदरची पॉलिसी तक्रारदार यांनी ता. 7/3/11 रोजी वि.प. यांचेकडून घेतलेली असून सदर पॉलिसीचा हप्‍ता रक्‍कम रु. 1 लाख इतका तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेला आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसी ही 10 वर्षासाठी दिलेली होती.  तथापि, तक्रारदार यांना त्‍यांच्‍या आर्थिक व घरगुती अडचणीमुळे सन 2012 पासून सदर पॉलिसीचे पुढील हप्‍ते जमा करणे अशक्‍य झालेने तक्रारदार यांनी वि.प. यांना प्रथम ता. 20/3/2011 रोजी सदरची पॉलिसी बंद करणेस सांगितले.  तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांना कळवून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही.  तक्रारदार यांनी ता. 25/5/2016 रोजी सदरची पॉलिसी बंद करणेत यावी व वि.प. यांनी ता. 7/3/2011 रोजी स्‍वीकारलेल्‍या पॉलिसी हप्‍त्‍याची रक्‍कम रु. 1 लाख तक्रारदार यांना परत मिळावी अशी विनंती केली.  तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसीची हप्‍त्‍याची रक्‍कम रु. 1 लाख परत न देवून व तक्रारदार यांना काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली आहे.  सबब, पॉलिसीचे हप्‍त्‍याची रक्‍कम रु. 1 लाख पर‍त मिळावी, सदर रकमेवर 15 टक्‍केप्रमाणे व्‍याज मिळावे, नुकसानीपोटी रक्‍कम रु. 50,000/-, मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च रु.10,000/- देणेचा आदेश वि.प. यांना व्‍हावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. 

 

2.    तक्रारदाराने सदरकामी अॅफिडेव्‍हीट, कागदयादी सोबत वि.प. यांनी तक्रारदारांना दिलेली पत्रे, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले पत्र, वि.प. यांन दिलेली रिसीट इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच तक्रारदाराने पुराव्‍याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

3.    वि.प. यांनी याकामी तक्रारदाराचे तक्रारअर्जास म्‍हणणे दाखल केले आहे.  वि.प. यांचे कथनानुसार, इन्‍शुरन्‍स रेग्‍युलेटरी अॅण्‍ड डेव्‍हलपमेंट अॅथॉरिटी रेग्‍युलेशन्‍स 2002 चे कलम 6.2 प्रमाणे जर पॉलिसीधारक पॉलिसीची वैशिष्‍टये किंवा नियम आणि अटीबाबत समाधान नसेल तर तो Free Look Period  मध्‍ये पॉलिसी बंद परत करु शकतो.   तक्रारदार यांना पॉलिसी कागदपत्रे मिळल्‍यानंतर Free Look Period मध्‍ये पॉलिसीबाबत व तिच्‍या नियम व अटींबाबत कधीही तक्रार वा हरकत उप‍स्थित केलेली नाही.  याचा अर्थ तक्रारदारास पॉलिसी मान्‍य आहे व पॉलिसी योग्‍य होती.  एकदा 15 दिवसांचा Free Look Period संपला की पॉलिसीचे कागद, करारपत्र, अटी शर्ती दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक आहेत.  पॉलिसी फॉर्मवर तक्रारदार यांनी सही केलेली असून सदरची पॉलिसी वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली होती.  पॉलिसीधारकाने पॉलिसीची 10 वर्षाची मुदत व पॉलिसीचे कालावधीचे हप्‍ते देण्याचे मान्‍य केलेले होते.  पॉलिसी चालू झालेनंतर तक्रारदार यांनी दि. 7/11/2020 रोजी पहिल्‍या वर्षाचा प्रिमियम असा फक्‍त एकच प्रिमियम अदा केलेला असून त्‍यापुढील कोणतेही प्रिमियम वि.प. कडे भरणा केलेले नाहीत.  वि.प. यांनी पहिल्‍या वर्षाची संपूर्ण कालाधीकरिताचे लाभ कव्‍हरेज तक्रारदार यांना दिले आहे. त्‍याबाबत तक्रारदार यांची तक्रार नाही.  तक्रारदार यांनी ता 25/3/2016 रोजी पत्र पाठवून प्रिमियमची रक्‍कम रु.1 लाखाची मागणी केली.  परंतु त्‍यावेळी अखेर तक्रारदार यांची पॉलिसी ही लॅप्‍स झाली होती.  त्‍यामुळे पॉलिसीचे अटी प्रमाणे तक्रारदार यांची अशी बेकायदेशीर चुकीची करारबाहय मागणी वि.प. यांनी मान्‍य केलेली नाही.  ता. 6/3/2014 पासून तक्रारदार यांची पॉलिसी बंद झालेली आहे.  वि.प. यांनी सदर पॉलिसी बंद होणेपूर्वी पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करण्‍यात यावे अशी विनंती तक्रारदार यांना केली असूनही तक्रारदार याने पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करुन घेतलेले नाही.  त्‍यामुळे पॉलिसी बंद झालेली आहे.  सबब, तक्रारअर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा अशी मागणी वि.प. यांनी केली आहे.

 

4.    वि.प. यांनी याकामी शपथपत्र, कागदयादीसोबत प्रपोजलची प्रत, पॉलीसी तपशील, रिन्‍युवल नोटीसची प्रत, फोरक्‍लोजर इंटीमेशन पत्राची प्रत इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.  तसेच पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.

 

5.   तक्रारदारांचा तक्रारअर्ज, वि.प.यांचे म्‍हणणे, दाखल केलेली अनुषंगिक कागदपत्रे, तक्रारदाराचे व वि.प. यांचे पुराव्‍याचे शपथपत्र, लेखी युक्तिवाद यांचा विचार करता निष्‍कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

 

 

अ. क्र.

                मुद्दा

उत्‍तरे

1

तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत काय ?

होय.

2

वि.प. यांनी तक्रारदाराला द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे काय ?     

नाही.

3

अंतिम आदेश काय ?

अंशतः मंजूर.

 

 

कारणमिमांसा

 

मुद्दा क्र. 1

 

6.    वि.प. क्र.2 ही जीवन विमा तदनुषंगिक सेवा देणारी कंपनी असून वि.प. क्र. 1 हे वि.प. क्र.2 यांचे कोल्‍हापूर येथील शाखा कार्यालय आहे.  वि.प. यांनी तक्रारदार यांचेशी संपर्क साधून तक्रारदार यांना कोटक इंडोवमेंट प्‍लॅन घेणेस भाग पाडले.  सदरचा प्‍लॅन हा युआयएन 107 एन 002 व्‍ही 01 पॉलिसी नं. 02254542 असा असून क्‍लायंट नं. 50664205 असा आहे.  सदरची पॉलिसी तक्रारदार यांनी ता. 7/3/11 रोजी वि.प. यांचेकडून घेतलेली असून सदर पॉलिसीचा हप्‍ता रक्‍कम रु. 1 लाख इतका तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे जमा केलेला आहे.  वि.प. यांनी प्रस्‍तुतकामी म्‍हणणे दाखल केलेले असून सदरची पॉलिसी नाकारलेली नाही.  सबब, पॉलिसी व तिचे कालावधीबाबत वाद नसलेमुळे तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.   सबब, मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे आयोग होकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.2

 

7.    उपरोक्‍त मुद्दा क्र.1 मधील विवेचनाचा विचार करता तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत.  वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसी ही 10 वर्षासाठी दिलेली होती.  तथापि, तक्रारदार यांना त्‍यांच्‍या आर्थिक व घरगुती अडचणीमुळे सन 2012 पासून सदर पॉलिसीचे पुढील हप्‍ते जमा करणे अशक्‍य झालेने तक्रारदार यांनी वि.प. यांना प्रथम ता. 20/3/2011 रोजी सदरची पॉलिसी बंद करणेस सांगितले.  तदनंतर तक्रारदार यांनी वि.प. यांना कळवून देखील वि.प. यांनी तक्रारदार यांच्‍या तक्रारीची दखल घेतली नाही.  तक्रारदार यांनी ता. 25/5/2016 रोजी सदरची पॉलिसी बंद करणेत यावी व वि.प. यांनी ता. 7/3/2011 रोजी स्‍वीकारलेल्‍या पॉलिसी हप्‍त्‍याची रक्‍कम रु. 1 लाख तक्रारदार यांना परत मिळावी अशी विनंती केली.  तथापि वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसीची हप्‍त्‍याची रक्‍कम रु. 1 लाख परत न देवून व तक्रारदार यांना काहीही न कळवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत त्रुटी केली का ?  हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो.  सदर मुद्याचे अनुषंगाने वि.प. यांनी दाखल केलेल्‍या म्‍हणण्‍याचे अवलोकन करता वि.प. यांनी तक्रारदारांची तक्रार नाकारलली आहे.  इन्‍शुरन्‍स रेग्‍युलेटरी अॅण्‍ड डेव्‍हलपमेंट अॅथॉरिटी रेग्‍युलेशन्‍स 2002 चे कलम 6.2 प्रमाणे जर पॉलिसीधारक पॉलिसीची वैशिष्‍टये किंवा नियम आणि अटीबाबत समाधान नसेल तर तो Free Look Period  मध्‍ये पॉलिसी बंद परत करु शकतो.   तक्रारदार यांना पॉलिसी कागदपत्रे मिळल्‍यानंतर Free Look Period मध्‍ये पॉलिसीबाबत व तिच्‍या नियम व अटींबाबत कधीही तक्रार वा हरकत उप‍स्थित केलेली नाही.  याचा अर्थ तक्रारदारास पॉलिसी मान्‍य आहे व पॉलिसी योग्‍य होती.  एकदा 15 दिवसांचा Free Look Period संपला की पॉलिसीचे कागद, करारपत्र, अटी शर्ती दोन्‍ही पक्षांवर बंधनकारक आहेत.  पॉलिसी फॉर्मवर तक्रारदार यांनी सही केलेली असून सदरची पॉलिसी वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली होती.  पॉलिसीधारकाने पॉलिसीची 10 वर्षाची मुदत व पॉलिसीचे कालावधीचे हप्‍ते देण्याचे मान्‍य केलेले होते.  पॉलिसी चालू झालेनंतर तक्रारदार यांनी दि. 7/11/2020 रोजी पहिल्‍या वर्षाचा प्रिमियम असा फक्‍त एकच प्रिमियम अदा केलेला असून त्‍यापुढील कोणतेही प्रिमियम वि.प. कडे भरणा केलेले नाहीत.  वि.प. यांनी पहिल्‍या वर्षाची संपूर्ण कालाधीकरिताचे लाभ कव्‍हरेज तक्रारदार यांना दिले आहे. त्‍याबाबत तक्रारदार यांची तक्रार नाही.  तक्रारदार यांनी ता 25/3/2016 रोजी पत्र पाठवून प्रिमियमची रक्‍कम रु.1 लाखाची मागणी केली.  परंतु त्‍यावेळी अखेर तक्रारदार यांची पॉलिसी ही लॅप्‍स झाली होती.  त्‍यामुळे पॉलिसीचे अटी प्रमाणे तक्रारदार यांची अशी बेकायदेशीर चुकीची करारबाहय मागणी वि.प. यांनी मान्‍य केलेली नाही.  ता. 6/3/2014 पासून तक्रारदार यांची पॉलिसी बंद झालेली आहे.  वि.प. यांनी सदर पॉलिसी बंद होणेपूर्वी पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन र्जीवन करण्‍यात यावे अशी विनंती तक्रारदार यांना केली असूनही तक्रारदार याने पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करुन घेतलेले नाही.  त्‍यामुळे पॉलिसी बंद झालेली आहे असे वि.प. यांनी म्‍हणणे दाखल केलेले असून म्‍हणणेसोबत ता. 7/3/11 रोजीची प्रपोजलची प्रत व ता. 11/3/11 रोजीची पॉलिसीची प्रत, P.O. Details ची प्रत इ. कागदपत्रे दाखल केलेली आहेत.  तसेच ता. 7/7/2012 रोजीची रिन्‍यूवल नोटीसची प्रत दाखल केलेली असून सदर नोटीसचे अवलोकन करता,

 

We regret to inform you that owing to non-receipt of renewal premium, due as on 7/3/12, your policy has moved into lapsed mode w.e.f. 11/4/2012. 

 

A lapsed policy implies that life insured is no longer covered for life cover benefit or any of the rider benefit to revive your policy, we urge  you to pay all dues premium and charges thereon.

 

            If not received by 7/9/12, you will have to undergo major revival formalities. 

 

असे नमूद असून सदर पत्राद्वारे वि.प. यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांनी 7/3/12 रोजी सदर पॉलिसीचा हप्‍ता (Renewal premium) न भरल्‍यामुळे सदरची पॉलिसी ता. 11/4/2012 रोजीपासून लॅप्‍स मोड (mode) मध्‍ये जाईल असे कळविलेले दिसून येते.

 

8.         वि.प. यांनी ता. 13/1/14 रोजी तक्रारदार यांना पत्र पाठविलेले असून सदर पत्राचे अवलोकन करता,

 

            Reference - Foreclosure intimation of policy at the end of revival period.

 

We wish to inform you that your policy No. 02254542 is currently in the lapsed mode due to non-payment of renewal premium payment since 7/3/2012. 

 

As per the terms and conditions of the policy contract, if the policy is not revived within the eligible revival period, as mentioned in the policy contract, the policy will be terminated at the end of revival period and the surrender value if any shall be payable at the end of revival period.

 

The revival policy of your policy end on 6/3/2014 and accordingly, the policy will be terminated.  However, you can revive your policy within the above mentioned date. 

 

सबब, सदरची वि.प. यांची कागदपत्रे तक्रारदार यांनी नाकारलेली  नाहीत.  सदरच्‍या कागदपत्रांवरुन वि.प. यांनी सदरची पॉलिसी फोरक्‍लोज होणेपूर्वी पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करुन द्यावे अशी विनंती तक्रारदारास अनेकवेळा केलेली होती ही बाब सिध्‍द होते. तथापि तक्रारदार यांनीच दाखल केलेल्या पुरावा शपथपत्रावरुन तक्रारदार यांना केवळ त्‍यांच्‍या वैयक्तिक कारणामुळे वि.प. यांचेकडे पॉलिसीचे हप्‍त्‍याची रक्‍कम भरता आलेली नाही.  तसेच पुढील हप्‍ते हे तक्रारदार याने वि.प. यांचेकडे अदा केलेले नाहीत असे मान्‍य केलेले आहे.   

 

9.    प्रस्‍तुतकामी तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी तक्रारीसोबत वि.प. यांनी ता 1/6/16 रोजी तक्रारदार यांना दिलेले पत्र दाखल केलेले आहे. सदरच्‍या पत्राचे अवलोकन करता तक्रारदार यांनी सदर पॉलिसीचे तीन वर्षांचे प्रिमियम वि.प. यांचेकडे अदा न केलेने सदरच्‍या पॉलिसीची सरेंडर व्‍हॅल्‍यू तक्रारदार यांना देता येणार नाही असे कळविलले आहे.  अ.क्र.2 ला वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 31/5/2016 रोजी दिलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली असून अ.क्र.3 ला तक्रारदार यांनी वि.प. बँकेचे शाखाधिकारी यांना ता. 24/5/2016 रोजी पाठविलेल्‍या पत्राची प्रत दाखल केलेली आहे.  सदर पत्राने तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे सदरची विमा रक्‍कमेची मागणी केली आहे.  अ.क्र.4 ला वि.प. क्र.1 यांनी ता. 26/5/2016 रोजी तक्रारदार यांना खुलासा पत्र दिलेले आहे.  सदर पत्राचे अवलोकन करता, सदरची पॉलिसी तक्रारदार यांना प्राप्‍त झाल्‍यापासून Free look period  15 दिवसाचे कालावधीमध्‍ये तक्रारदार यांनी वि.प. यांना सदरची पॉलिसी रद्द करीत असलेबाबतचे कळविलेले नाही.  तसेच सदरची पॉलिसी रिव्‍हाईव्‍ह न केलेमुळे पॉलिसी लॅप्‍स मोडमध्‍ये गेलेली असून त्‍याबाबतची नोटीस तक्रारदार यांना पाठविलेली होती व तक्रारदार यांनी सदर नोटीसीस कोणतेही उत्‍तर न दिलेमुळे सदरची पॉलिसी पॉलिसीतील अटी व शर्तीप्रमाणे फोरक्‍लोज केलेबाबतचे कळविले आहे.  अ.क्र.5 ला ता. 10/5/2016 रोजी तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेले पत्र दाखल केलेले असून अ.क्र.6 ला वि.प. यांनी तक्रारदार यांना ता. 7/3/2021 रोजी दिलेली पावती दाखल केलेली आहे.

 

10.   सबब, दाखल कागदपत्रे व पुरावा शपथपत्र यांचे अवलोकन करता तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडून स्‍वेच्‍छेने सदर पॉलिसी घेतलेली होती.  वि.प. यांनी सदरचे पॉलिसीचे कागदपत्रे तक्रारदार यांना ता. 12/3/2011 रोजी पाठविलेली होती.  पॉलिसी चालू झालेनंतर तक्रारदार यांनी ता. 7/3/2011 रोजी पहिल्‍या वर्षाचा प्रिमियम वि.प. यांना अदा केलेचे मान्‍य केलेले आहे.  वि.प. यांनी पहिल्‍या वर्षाच्‍या संपूर्ण कालावधीकरिता लाभ कव्‍हरेज तक्रारदार यांना दिले आहे याबाबत तक्रारदार यांची कोणतीही तक्रार नाही.  तक्रारदार यांनी निव्‍वळ त्‍यांचे वैयक्तिक कारणामुळे वि.प. यांचेकडे पॉलिसीचे हप्‍ते भरलेले नाहीत ही बाब मान्‍य केलेली आहे.  तसेच मार्च 2012 पासून तक्रारदार यांनी वि.प. यांचेकडे कोणतेही हप्‍ते अदा केलेले नाहीत.  वि.प. यांनी देखील तक्रारदार यांना पुढील पॉलिसीचा हप्‍ता/प्रिमियम अदा न केलेमुळे वि.प. यांनी विविध संपर्काच्‍या माध्‍यमातून तक्रारदार यांना ता. 7/7/12 रोजी पॉलिसीचा हप्‍ता भरणे विषयी विनंती केलेली आहे.  तसेच 13/1/2014 रोजी सदरची पॉलिसी फोरक्‍लोज होणेपूर्वी पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करुन घ्‍यावे अशी विनंती देखील तक्रारदार यांना केली असून तक्रारदाराने सदर पॉलिसीचे पुनरुज्‍जीवन करुन घेतलेले नाही व त्‍यामुळे सदरची पॉलिसी बंद झालेली आहे ही बाब स्‍पष्‍टपणे दिसून येते.   सबब, इन्‍शुरन्‍स रेग्‍युलेटरी अॅण्‍ड डेव्‍हलपमेंट ऑथॉरिटी रेग्‍युलेशन्‍स कलम 6.2 प्रमाणे तक्रारदार यांनी सदरचे पॉलिसीचे कागदपत्रे मिळाल्‍यानंतर Free Look Period मध्‍ये सदरच्‍या पॉलिसीबाबत अथवा तिचे नियम व अटीबाबत कोणतीही तक्रार वा हरकत वि.प. यांचेकडे उपस्थित केलेली नाही व तसा कोणताही कागदोपत्री पुरावा सदरकामी दाखल केलेला नाही.  सबब, वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांची पॉलिसी ही मार्च 2012 मध्‍येच संपुष्‍टात आली असलेने व वि.प. यांनी तक्रारदार यांना सदरची पॉलिसी रिन्‍युअल करणेबाबत कळविलेले असताना देखील तक्रारदार यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही.  तसेच तक्रारदार यांनी तक्रारीमध्‍ये ता. 20/3/2011 रोजी सदर पॉलिसी बंद करणेस वि.प. यांना सांगितले असे कथन केले आहे.  तथापि त्‍याअनुषंगाने तक्रारदार यांनी कोणताही कागदोपत्री  पुरावा अथवा परिस्थितीजन्‍य पुरावा (Circumstantial evidence) दाखल केलेला नाही.  तक्रारदार यांनी त्‍यांची कथने पुराव्‍यानिशी शाबीत केलेली नाहीत. या सर्व बाबींचा विचार करता, सदरची पॉलिसी ही पॉलिसीचे अटी व शर्ती नुसार सन 2014 मध्‍ये तक्रारदार यांनी वि.प. यांना काहीही कळविले  नसलेने Terminate झालेली असलेने,  वि.प. यांनी तक्रारदार यांना सदर पॉलिसी अंतर्गत पहिल्‍या हप्‍तेपोटीची रक्‍कम रु. 1 लाख न देवून तक्रारदार यांना द्यावयाचे सेवेत कोणतीही त्रुटी केलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे आयोग येत आहे.  सबब, मुद्दा क्र.2 चे उत्‍तर हे आयोग नकारार्थी देत आहे.

 

मुद्दा क्र.3  -  सबब आदेश.

 

 

- आ दे श -

 

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येतो. 

 

  1. खर्चाबाबत आदेश नाहीत.
  2.  
  3. आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठवाव्‍यात.

 

 

 

 

 
 
 
[HON'BLE MRS. Manisha S.Kulkarni]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Rupali D. Ghatage]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.