View 1289 Cases Against Kotak Mahindra Bank
View 1289 Cases Against Kotak Mahindra Bank
View 2735 Cases Against Kotak Mahindra
SHRI. ZUNZAR TUKARAM PAWAR filed a consumer case on 10 Apr 2015 against KOTAK MAHINDRA BANK in the Sangli Consumer Court. The case no is CC/09/1882 and the judgment uploaded on 02 Jun 2015.
- नि का ल प त्र -
द्वारा – मा. सदस्या - सौ मनिषा कुलकर्णी
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने, त्याचे वाहन बेकायदेशीररित्या ओढून नेऊन त्याची विक्री केलेने तक्रारदारांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी दाखल केली आहे. प्रस्तुतचा तक्रार अर्ज स्विकृत करुन जाबदारांना नोटीस आदेश झाले. जाबदार क्र.1 यांनी वकीलामार्फत हजर होवून त्यांचे लेखी म्हणणे नि.16 वर दाखल केले. जाबदार क्र.2 विरुध्द दाद मागावयाची नाही अशा आशयाची पुरसीस तक्रारदाराने नि. 34 ला दाखल केली आहे.
2. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालीलप्रमाणे –
तक्रारदार हे वर नमूद पत्त्यावरील कायमचे रहिवाशी आहेत. त्यांचा शेती हा व्यवसाय आहे. त्यांना शेतीचे कामासाठी ट्रॅक्टर घ्यावयाचा होता. त्यांनी जाबदार यांचेकडून सप्टेंबर 2007 मध्ये कर्ज मंजूर करुन घेतले व तदनंतर त्यांना जाबदार यांनी ट्रॅक्टरची डीलीव्हरी दिली. जाबदार यांचेकडून रक्कम रु.1,90,000/- सप्टेंबर 2007 मध्ये कर्जाऊ घेतलेले होते व ते सहामाही हप्त्याने फेडणेचे होते. तक्रारदार यांनी जाबदार यांचेकडे पहिला हप्ता फेडलेला आहे. तक्रारदार यांचे सांपत्तीक स्थितीचा विचार न करता दि.14/01/2009 रोजी तक्रारदार यांचे घरी तक्रारदार अथवा घरातील पुरुषमाणसे नाहीत याचा फायदा घेवून तक्रारदार यांचे संमतीशिवाय घेवून गेले. सदरचे जाबदार यांचे कृत्य हे पूर्णपणे बेकायदेशीर व फौजदारी स्वरुपाच्या गुन्हयाचे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारे असे आहे. सबब, तक्रारदार यांना जाबदार यांनी अनुचित व्यापार प्रथा अवलंबून त्रुटीयुक्त सेवा दिले कारणाने अर्ज दाखल करणे भाग पडले आहे. तक्रारदाराने आपले तक्रारअर्जामध्ये नि.36 वरील आदेशानुसार दुरुस्ती करुन ट्रॅक्टरची मूळ किंमत रक्कम रु.4,82,000/- द.सा.द.शे.12 टक्के दराने मागितले आहेत.
3. तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठयर्थ तक्रारअर्जासोबत नि.4 चे फेरिस्तने एकूण 4 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये जाबदारांकडे रकमा भरलेच्या पावत्या व जाबदार संस्थेची नोटीस इ. चा समावेश आहे. तसेच तक्रारदाराने नि.15 चे फेरिस्तनेही काही कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार यांना नोटीस लागू झालेनंतर जाबदार क्र.1 हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी नि.16 वर त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले.
5. जाबदार यांचे म्हणणेनुसार तक्रारदारांचा अर्ज व त्यातील कथने जाबदार यांना मान्य व कबूल नाहीत. तक्रारदार यांनी जाबदार क्र.2 कडे कोटक महिंद्र बँक, पटेल चौक, सांगली असे नमूद केले आहे. जाबदार क्र.1 चे तसे ऑफिस नाही. तक्रारदार यांना रक्कम रु.3,03,337/- चे कर्ज मंजूर केलेले होते. तक्रारदारांनी फॉर्म वाचूनच अंगठा केलेला आहे. कर्ज पूणे येथे मंजूर केले होते. सदरचे कर्जाचे हप्ते हे रक्कम रु.47,813/- मात्रच्या सहामाही हप्त्याने फेडणेचे होते परंतु दि.10/6/08 चा पहिला हप्ता भरलेला नव्हता. तक्रारदार यांनी दि.31/7/08 रोजी रक्कम रु.15,000/- दि.7/8/08 रोजी रक्कम रु.25,000/- व दि.13/8/08 रोजी रक्कम रु.12,500/- याप्रमाणे पहिला हप्ता तक्रारदाराने दंड व व्याजासहीत जमा केलेला आहे. तदनंतर कोणताही हप्ता जमा केलेला नव्हता व नाही. तसेच ट्रॅक्टर संमतीविना घेवून गेलेले नाहीत. कर्जाचा हप्ता वेळेत न भरलेने तक्रारदारास नोटीस पाठविलेली होती व आहे व तदनंतरही कर्जाची परतफेड केलेली नवहती व नाही व रकमेची परतफेड करणेस तक्रारदाराने असमर्थतता दर्शविली व त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ट्रॅक्टर बँकेचे ताब्यात देवून सरेंडर लेटरही दिले. दि.21/2/09 रोजी तक्रारदारांना कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करणेबाबत कळविले व प्रस्तुतचा ट्रक जाबदार यांनी बँकेचे नियमाप्रमाणे रक्कम रु.2,40,000/- ला विक्री केलेला होता व ही रक्कम कर्जखातेस जमा करुनही तक्रारदार यांचेकडून भरीव रक्कम येणे आहे. तक्रारदार कधीही रक्कम रु.40,000/- घेवून आलेले नव्हते. तक्रारदारांनी स्वतःचे जाणीवेने, इच्छेने समजून, उमजून सदर ट्रॅक्टर जाबदारांचे ताब्यात दिला आहे व सदरचा ट्रॅक्टर विक्री करुन कर्जाची परतफेड करणेबाबत सांगितले होते. त्यानंतर प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदारांना दि.21/2/09 रोजीची नोटीस देवून कर्जाची थकीत रक्कम भरणेबाबत कळविले होते. त्यानंतर देखील तक्रारदारांनी कोणतीही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे जाबदारांना नियम व अटीप्रमाणे सदरचा ट्रॅक्टर विक्री करुन ती रक्कम कर्जखातेस जमा केलेली होती व आहे. सदरची रक्कम जमा करुन देखील तक्रारदारांकडून अद्याप बरीच भरीव रक्कम येणे बाकी आहे. सबब, प्रस्तुतचा अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी मागणी जाबदारांनी केली आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, जाबदार यांचे म्हणणे, दाखल पुरावे व उभय पक्षांचा युक्तिवाद यांचा विचार करता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदार हा ग्राहक आहे काय ? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सेवा देण्यामध्ये
त्रुटी केली आहे काय ? नाही.
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
कारणे
मुद्दा क्र.1
7. तक्रारदारांनी नि.4 चे फेरिस्त सोबत जाबदार बँकेस पेमेंट केलेची रिसीट तसेच जाबदार बँकेने तक्रारदार यांना पाठविलेली pre-possession notice यावरुन तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत ही बाब शाबीत होते. तसेच जाबदार बँकेने आपले फेरिस्त सोबत हजर केलेले लोन अॅग्रीमेंट यावरुनही ही बाब शाबीत होते. सबब तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.2
8. तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत ही बाब यापूर्वीच शाबीत झालेली आहे. तक्रारदाराचे कथनानुसार त्यांनी जाबदार यांचेकडून रक्कम रु.1,90,000/- चे कर्ज घेतले होते व सदरचे कर्जाचे पहिला हप्ता भरला होता असे म्हटले आहे. तसेच तक्रारदार यांनी, सदरचे वाहन जाबदार यांनी दि.14/1/09 रोजी जबरदस्तीने तक्रारदार यांचे संमतीशिवाय घेवून गेले असे कथन केले आहे. तक्रारदारांनी भरलेल्या हप्त्याच्या दि.30/7/08 व दि.30/8/08 च्या प्रत्येकी रक्कम रु.15,000/- च्या पावत्या या नि.4 चे फेरिस्तसोबत दाखल ककेल्या आहेत. व ट्रॅक्टर ओढून नेल्याने आपले नुकसान झाले असे तक्रारदार यांचे कथन आहे व आपल्या विनंती अर्जामध्ये तक्रारदार यांनी सदरचे ट्रॅक्टरची विक्री केली असलेने सदरचे वाहनाची रक्कम रु.4,82,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केलेली आहे.
9. परंतु जाबदारचे कथनानुसार सदरचे कर्जाचे हप्ते हे रक्कम रु.47,813/- मात्रच्या सहामाही हप्त्याने फेडणेचे होते परंतु पहिला हप्ता भरणेची तारीख ही दि.10/6/08 असूनही तक्रारदार यांनी तो भरलेला नव्हता. तक्रारदार यांनी दि.31/7/08 रोजी रक्कम रु.15,000/- दि.7/8/08 रोजी रक्कम रु.25,000/- व दि.13/8/08 रोजी रक्कम रु.12,500/- याप्रमाणे पहिला हप्ता तक्रारदाराने दंड व व्याजासहीत जमा केलेला आहे. तदनंतर कोणताही हप्ता जमा केलेला नव्हता व नाही. तसेच ट्रॅक्टर जाबदार हे संमतीविना घेवून गेलेले नाहीत. कर्जाचा हप्ता वेळेत न भरलेने तक्रारदारास नोटीस पाठविलेली होती व आहे व तदनंतरही कर्जाची परतफेड केलेली नव्हती व नाही व रकमेची परतफेड करणेस असमर्थतता दर्शविली व त्याप्रमाणे तक्रारदार यांनी ट्रॅक्टर बँकेचे ताब्यात देवून सरेंडर लेटरही दिले. दि.21/2/09 रोजी तक्रारदारांना कर्जाची संपूर्ण रक्कम अदा करणेबाबत कळविले व प्रस्तुतचा ट्रक जाबदार यांनी बँकेचे नियमाप्रमाणे रक्कम रु.2,40,000/- ला विक्री केलेला होता व ही रक्कम कर्जखातेस जमा करुनही तक्रारदार यांचेकडून भरीव रक्कम येणे आहे. तक्रारदार कधीही रक्कम रु.40,000/- घेवून आलेले नव्हते. तक्रारदारांनी स्वतःचे जाणीवेने, इच्छेने समजून, उमजून सदर ट्रॅक्टर जाबदारांचे ताब्यात दिला आहे व सदरचा ट्रॅक्टर विक्री करुन कर्जाची परतफेड करणेबाबत सांगितले होते. त्यानंतर प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदारांना दि.21/2/09 रोजीची नोटीस देवून कर्जाची थकीत रक्कम भरणेबाबत कळविले होते. त्यानंतर देखील तक्रारदारांनी कोणतीही रक्कम जमा केली नाही. त्यामुळे जाबदारांना नियम व अटीप्रमाणे सदरचा ट्रॅक्टर विक्री करुन ती रक्कम कर्जखातेस जमा केलेली होती व आहे.
10. वरील बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी नमूद केलेली व्याजाची रक्कम ही जाबदार यांनी दाखल केलेल्या लोन अॅग्रीमेंट प्रमाणे दिसून येत नाही. लोन अॅग्रीमेंट प्रमाणे असणारी रक्कम ही रु.3,00,338/- अशी आहे. तसेच तक्रारदार यांनी कर्जाचा पहिला हप्ता हा दि.10/6/08 रोजी भरावयाचा होता. परंतु तक्रारदार यांनी तो हप्ता दि.31/7/08 रोजी दंड व्याजासहीत भरलेचे दिसून येते. यावरुन कर्जाचा पहिला हप्ताच तक्रारदाराने दंडव्याजासहीत व विलंबाने भरलेला आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे.
11. तक्रारदाराने आपल्या तक्रारअर्जामध्ये जाबदार क्र.2 कोटक महिंद्र, सांगली यांना पाहिल्यांदा पक्षकार केलेचे दिसून येते व लोन अॅग्रीमेंट हे या शाखेमधून झाले आहे असे कथन केले आहे. मात्र दाखल लोन अॅग्रीमेंट वरुन सदरचे लोन हे जाबदार क्र.1 यांच्या पुणे येथील शाखेतून झालेचे दिसून येते व तदनंतर तक्रारदार यांनी नि.12 वर जाबदार क्र.2 यांना वगळणेचा अर्ज दिलेचे दिसून येते. सदरची बाब ही पश्चात बुध्दीने (after thought) झालेची दिसून येते.
12. जाबदार यांनी तक्रारदारांना पहिला हप्ता भरलेनंतर थकीत हप्त्यांविषयी कळविलेचेही दिसून येते व त्यासंबंधीची pre-possession notice दि.6/8/08, दि.14/01/09 व दि.5/2/09 रोजी पाठविलेचे जाबदार यांनी फेरिस्त सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन दिसून येते व स्वतः तक्रारदार यांनीही सदरच्या नोटीस आपल्या फेरिस्त सोबत दाखल केल्या आहेत. तसेच दि.20/2/09 चे सरेंडर लेटरही जाबदार यांनी दाखल केले आहे. तक्रारदार यांनी आपले तक्रारअर्जाचे कलम 2 मध्ये तक्रारदार यांनी, जाबदार हे सांगतील त्याप्रमाणे व त्याठिकाणी छापील फॉर्मवर अंगठे केलेचे कथन केलेले आहे. जाबदार यांनी आपले फेरिस्तसोबत हजर केलेल्या लोन अॅग्रीमेंट वरुन असे दिसून येते की, तक्रारदार हा जरी अशिक्षित असला व त्याला जरी लिहिता-वाचता येत नसले तरी त्याचा सहकर्जदार बबन झुंजार पवार असलेचे दिसून येते व त्याने स्वतःची सही ही इंग्रजी अक्षरामध्ये केलेचे निदर्शनास येते म्हणजेच कर्जदारास लोन अॅग्रीमेंटमधील सर्व गोष्टींचे ज्ञान आहे हे निर्विवाद आहे. वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदार यांनी सदरचे वाहनाचे हप्ते वेळेत न भरलेचे व त्याबाबत तशी समर्थताही दर्शविलेचे दिसून येत नाही. सबब, जाबदार यांनी वाहन जप्त करुन कायद्याचे उल्लंघन केलेचे अथवा सेवेत त्रुटी केली नसलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
मुद्दा क्र.3
13. तक्रारदार यांनी वादग्रस्त वाहनाचे कर्जाचे हप्ते हे वेळेत भरलेने नाहीत व फक्त एकच हप्ता भरलेने कागदपत्रांवरुन दिसून येते. सबब, तक्रारदार यांनी मागितलेल्या कोणत्याही मागण्या या मंचास संयुक्तिक वटत नसलेने सदरचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येतो. सबब हे मंच खालील आदेश पारीत करीत आहेत.
आदेश
1. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करणेत येते.
2. तक्रारीचा खर्च उभय पक्षकारांना आपला आपणे सोसणेचा आहे.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क द्याव्यात.
सांगली
दि. 10/04/2014
( सौ मनिषा कुलकर्णी ) ( सौ वर्षा शिंदे ) ( ए.व्ही. देशपांडे )
सदस्या सदस्या अध्यक्ष
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.